"गांधीजींनंतरचा महान नेता"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
5 Jun 2012 - 5:01 pm
गाभा: 

IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे.
या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे
मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच
आहेत..
प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे.
समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे.
असो बघू यात नेमके काय होते ते..
स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते. पण दुसर्‍या
अंगाने ते बरेच झाले कारण या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा
आहे आणि सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?.
आले वागळेच्या मना तेथे कोणाचे चालेना

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

5 Jun 2012 - 5:15 pm | चिरोटा

अहो कसला तो IBN आणि कसला तो माहिमचा वागळे घे॑वून बसलात? हल्ली बर्‍याच वर्षांनी बघितला टी.व्ही.वर. डोक्यावरचे केस कमी झालेत आणि सोनेरी फ्रेमचा चष्मा आलाय. आता ज्येष्ठ पत्रकार वाटतो.

चिंतामणी's picture

5 Jun 2012 - 5:57 pm | चिंतामणी

>>>डॉक्टर साहेब

म्हणजे नक्की कोण???????

>>>सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?.

तुम्हाला नक्की काय वाटते????????

असो.

लोकमत ग्रुपच्या दर्डांची निष्ठा कुठे वाहिलेली आहे हे जगजाहीर असल्याने आश्चर्य वाटले नाही की राग आला नाही.

बाकी तुमचा रोख जर लौकर स्पष्ट करा.

JAGOMOHANPYARE's picture

5 Jun 2012 - 6:13 pm | JAGOMOHANPYARE

आता तुम्हीच म्हनले ते गांधिजींपेक्षा महान हुते म्हनुन , मग आनि आय बी एन च्या यादीत त्यांचे नाव का नाही, म्हनुन परत धागाही काढलात..

मृगनयनी's picture

5 Jun 2012 - 7:01 pm | मृगनयनी

हे 'आय बी एन ग्रुप' काय असतं.. आणि दर्डा कोण? आमच्या किराणावाल्याचं आडनाव कुणी चोरलं ?

सुनील's picture

5 Jun 2012 - 7:07 pm | सुनील

तुम्ही मॉलमध्ये नाही जात वाट्टं?

मृगनयनी's picture

5 Jun 2012 - 7:20 pm | मृगनयनी

गहू, तान्दूळ, डाळ, रवा, शेवया.. इ. सारख्या नेहमी लागणार्‍या अन्नधान्यासाठी "दर्डा" ची क्वालिटी अत्युत्तम असून ते आर्थिक दृष्ट्याही आम्हाला मॉलपेक्षा किफायतशीर वाटते!!!! :)

त्यामुळे "दर्डा"कडे न मिळणार्‍या गोष्टी आम्ही मॉलमधून आणतो!! :)

सुनील's picture

5 Jun 2012 - 7:30 pm | सुनील

तुम्ही जिलब्या कुठून आणता?

नाना चेंगट's picture

5 Jun 2012 - 7:32 pm | नाना चेंगट

घरगुती उद्योग असावा ;)

सुनील's picture

5 Jun 2012 - 7:39 pm | सुनील

;)

मृगनयनी's picture

5 Jun 2012 - 7:46 pm | मृगनयनी

तुम्ही जिलब्या कुठून आणता?

आम्ही बर्‍याचदा रसमलाई, काजूकतली वगैरे आणतो!!!....जिलबी आम्हाला जास्त आवडत नाही!!!

मागे एकदा कुठल्याश्या थन्डीतल्या सणाच्या दिवशी दान्डेकर पूलावर काही गरीबांना आम्ही जिलब्या वाटल्या होत्या.... ;)

बाकी आपण कुठून आणता जिलब्या? :)

सुनील's picture

5 Jun 2012 - 8:14 pm | सुनील

बाकी आपण कुठून आणता जिलब्या?

दान्डेकर पुलावरून ;)

कर्ण's picture

5 Jun 2012 - 6:37 pm | कर्ण

अच्छा तर राग सावरकराच नाव न टाकल्याचा आहे.

चिंतामणी's picture

5 Jun 2012 - 7:07 pm | चिंतामणी

मग त्यात काय चुकले?????????

कोणाला पटो ना पटो. मोठे व्यक्तीमत्व होते ते. एकेरी उल्लेख टाळा.

मृत्युन्जय's picture

5 Jun 2012 - 10:00 pm | मृत्युन्जय

लिष्टेत आंबेडकराच नाव आहे काय?

त्यानी डॉक्तरसाहेब असा उल्लेख केला आहे, ते बहुदा तेच असावेत.

याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते... आणि हे इचारतात ते कुणीतरी आहेत ते सावरकरांचं का नाव घेत नाहीत? :)

का, नुसतं डॉक्टर असे म्हनुन संशयाचा फायदा हेगडेवाराना द्यायचा डाव आहे की काय? :)

कौतिक राव's picture

6 Jun 2012 - 10:24 am | कौतिक राव

काय मिस्टर मारोपिछेसेसारे ??
परत वेडाचा झटका आला वाटते??
की ब्रिगेड विचारसरणी ची कावीळ उमळली परत?? :sick:

काळजी घ्या ब्वॉ ... :crazy:

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 10:51 am | मृत्युन्जय

अच्छा तर डाक्टरचे नाव न टाकल्याचा राग आहे तर.

याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते.

या साठी न चुकता रोज ते वैद्यांचा पाटणकर काढा घेत असतात सकाळ-संध्याकाळ ;-)
.
.
.
.
.
.
.
(लुगडेवार )

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2012 - 8:21 pm | टवाळ कार्टा

माझा प्रतिसाद का उडवला???

सुनील's picture

5 Jun 2012 - 6:43 pm | सुनील

धाग्याची शंभरी लवकर गाठण्यासाठी माझा खारीचा वाटा .....

नाना चेंगट's picture

5 Jun 2012 - 6:44 pm | नाना चेंगट

आर्थिक परिस्थितीला घरघर लागलेल्या चॅनेलचे पैसे मिळवण्याचे प्रयत्न असतात असल्या एसएमएसने स्पर्धा आयोजित करण्याच्या कल्पना... . सोडून द्या ! :)

किंवा एक काम करा त्यांना मदत म्हणून रु.१/- (रुपये एक मात्र) चा चेक पाठवून द्या. :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार

रामदास आठवले.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 7:09 pm | संजय क्षीरसागर

ते तुला का आठवले?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 7:11 pm | परिकथेतील राजकुमार

मी का नाही आज फुला फुलांचा रंगीबेरंगी शर्ट घातलाय आणि मला तद्दन टुकार चारोळ्या पण सुचत आहेत.

नाना चेंगट's picture

5 Jun 2012 - 7:13 pm | नाना चेंगट

पाडा जिलब्या पटापट

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

पाडा जिलब्या पटापट
प्रतिसाद मिळतील सटासट
संपादक धावतील झटाझट
पंख लागतील फटाफट

'ट' वृत्तातली आणि 'टा' गणातली ही चारोळी नानाला समर्पीत.

मृत्युन्जय's picture

5 Jun 2012 - 10:03 pm | मृत्युन्जय

फट तिथे खटपट
भाता चाले रटरट
आमचा नेता नटखट
बोंबा मारे पटपट

आमचे बडबडगीत पराला समर्पित.

बॅटमॅन's picture

6 Jun 2012 - 4:14 pm | बॅटमॅन

पुढे "ढम ढम बा ऽ ऽ जे ढोल!!!" हे पालुपद लावायचं विसरलात वाट्टं ;)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे बडबडगीत पराला समर्पित.

हे गर्दूलविकृतीडीत वृत्तातील गीत अतिशय आवडले.

मुक्त विहारि's picture

5 Jun 2012 - 7:48 pm | मुक्त विहारि

एकच नाव नरेंद्र मोदी.

विकास's picture

5 Jun 2012 - 8:11 pm | विकास

सोनीयाजी :-)

JAGOMOHANPYARE's picture

5 Jun 2012 - 8:27 pm | JAGOMOHANPYARE

गांधीनंतर कोण????

इंदिरा गांधी
राजीव गांधी
सोनिया गांधी
.
.
.

गांधी अमर रहे..

मृगनयनी's picture

5 Jun 2012 - 9:49 pm | मृगनयनी

गांधीनंतर कोण????

इंदिरा गांधी
राजीव गांधी
सोनिया गांधी

... ओह याssss... राजीव गान्धी!!!!... .. राजीव'जी इज ( माईट बी ओन्ली) द पर्फेक्ट मॅन आफ्टर मोहनदास करमच्न्द गान्धी!... .दॅट्स व्हाय.....आय लव हिम सो मच!!!....

राजीव'जी.. इवन इफ आय डोन्ट लाईक 'बनाना'....बट......................खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजकाल तुमची आठवण येते!!... प्लीज कम बॅक.. (इफ पॉसिबल)!!!!

तुमच्या वेड्या मुलाकडे पाहिलं.. की देशापेक्षा त्याच्याच भविष्याची जास्त चिन्ता वाट्टे! ;)

ओह.. जोक्स अ पार्ट........बट...
राजीव'जी....स्टील वी लव यु... मिस यु!!!!!! :) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

थोडक्यात तुमचा ब्राह्मणांवर जो राग आहे तो कशाही प्रकारे निघालाच पाहीजे..
बाकी सावरकरांवर बरंच लिखाण वाचलंय त्यामुळे वरचा मुर्खपणा बाद.

आता इथे जातीचा संबंध कुठे आला? या प्रतिसादात मी जातीबद्दल काही लिहिलं आहे का?

कौतिक राव's picture

6 Jun 2012 - 10:36 am | कौतिक राव

त्यात पण मोहन आलाच.. किती रे गाधीं प्रेम ऊतु जाते तुझे...

प.पू. नथुरामजी आज हवे होते आज, म्हणजे या मोहनला ही जागो च्या जागो भगवान को प्यारे केले असते.. :cry:

मृत्युन्जय's picture

5 Jun 2012 - 10:09 pm | मृत्युन्जय

इथे काय संदर्भ? हे अधिकृत दस्तावेज आहेत काय?

मला तरी वाटते कोल्हापुरच्या शाहुच्या सुनहर्‍या कहाण्यांइतकेच तथ्य आहे यात. काय म्हणता?

त्याच्या वर एक धागा निघु देत.. प्रतिक्रियन्ची डबल सेन्चुरी झालीच म्हनुन समजा.. :wink:

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 10:53 am | मृत्युन्जय

होय होय मी त्याच कहाण्यांबद्दल बोलतो आहे. कोल्हापुरात गेल्यावर मी प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. ;)

मे महीन्याच्या सुट्ट्यान्मधे त्या ऐतिहासिक कहाण्या चवीने चावल्या जाय्च्या..
तुम्च्या मुळे आज त्या सुखद आठवणी परत ताज्या झाल्या.. :)

बॅटमॅन's picture

6 Jun 2012 - 4:18 pm | बॅटमॅन

'मर्दानी आणि मैदानी व कसरतीच्या' या खेळांमुळे मीदेखील प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. हे खरे पौरुष! त्यापुढे शनिवारवाड्यातली "ती" वरणभात घट**की म्हंजे किस घटकी **की :P

रमताराम's picture

6 Jun 2012 - 1:00 pm | रमताराम

याच लेखाच्या खाली हे लिहिले आहे. ते वाचले असेलच
(' आऊटलूक ' च्या या अंकातच गांधी हत्या कटातील सावरकरवाद्यांच्या सहभागाविषयी पूर्ण विरुद्ध भूमिकाही मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राचे संपादक असणा-या तरुण विजय यांचा लेखही तुम्हाला ' सलाम सावरकर ' मध्ये वाचता येईल)

अर्थात आपल्या पूर्व-निष्कर्षाला सोयीचे तेवढेच वाचणार्‍या तुम्ही दुसरी बाजू वाचण्याची तसदी घेतली नसेल याची खात्रीच आहे.

नितिन थत्ते's picture

5 Jun 2012 - 9:00 pm | नितिन थत्ते

गांधीं"नंतर"चे म्हणजे ३० जानेवारी १९४८ नंतर महान समजले केलेले का?

नर्मदेतला गोटा's picture

5 Jun 2012 - 9:45 pm | नर्मदेतला गोटा

>>बाकी आपण कुठून आणता जिलब्या?

दान्डेकर पुलावरून <<

दांडेकर पुलाखालीही उत्तम प्रतीच्या मिळतात जिलब्या

सुनील's picture

5 Jun 2012 - 9:49 pm | सुनील

आणू आणू, तिथूनही आणू एकदा!

नर्मदेतला गोटा's picture

5 Jun 2012 - 9:52 pm | नर्मदेतला गोटा

पण लवकर जा
संपतील नाहीतर

सुनील's picture

5 Jun 2012 - 9:58 pm | सुनील

अहो आता कुठे ३२ खपल्यात. अजून ६८ बाकी असतीलच ;)

पण तरी काही भरवसा नाही. काही ठिकाणच्या मंडळींना "उपलब्ध आहेत" पेक्षा "संपले" अश्या पाट्या लावण्याचाच उत्साह जास्त !!

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2012 - 10:06 pm | अविनाशकुलकर्णी

ताजी स्थिति.....

या कार्यक्रमाची यु ट्युब आहे का?

यामध्ये 'कुमारी सुशेरी बेहेन मायावती' यांचे नाव नसल्याबद्दल तीर्व निशेध!!

हा समस्त स्त्री जातीवर अन्याय आहे!..

विकास's picture

5 Jun 2012 - 10:38 pm | विकास

या लिस्ट मध्ये काहीतरी कट शिजत असल्याचा वास येत आहे. कारण रजनीकांत २० व्या क्रमांकावर आहे. ते शक्यच नाही. गांधीजींच्या आधी, वेळेस आणि पश्चात फक्त एक आणि एकच महान नेता आहे आणि तो म्हणजे रजनीकांत!

------------

नितिन थत्ते's picture

6 Jun 2012 - 8:34 am | नितिन थत्ते

नेत्यांच्या यादीत सचिन, तेंडुलकर, कलाम, मदर तेरेसा आणि जे आर डी टाटा यांची नावं पाहून मौज वाटली.

यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध.

ऋषिकेश's picture

6 Jun 2012 - 4:22 pm | ऋषिकेश

+१ अगदी ह्हेच लिहायला आलो होतो

विकास's picture

6 Jun 2012 - 5:04 pm | विकास

+१ सहमत!

मस्त कलंदर's picture

7 Jun 2012 - 1:34 am | मस्त कलंदर

आँ!!!
सुधीर मुतालिक?? चिच्चा, बिच्चारे जीव देतील हो हा प्रतिसाद वाचून.
बरं चिच्चा ते चिच्चा.. प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत?

अवांतरः तुम्हाला प्तमोद मुतालिक म्हणायचं आहे का?

नितिन थत्ते's picture

7 Jun 2012 - 1:42 pm | नितिन थत्ते

स्वारी हां. प्रमोद मुतालिक म्हणायचं होतं 'रेसिपिअंट ऑफ पिंक चड्डी अ‍ॅवॉर्ड'.

विकास's picture

7 Jun 2012 - 8:22 pm | विकास

प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत?

ऋ बद्दल ऋ च सांगेल! :-) पण मी विचार केला, नितिनराव म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार म्हणून नेहमी प्रमाणे सहमती दाखवली. ;)

सुनील's picture

7 Jun 2012 - 8:59 pm | सुनील

त्याला मिपाच्या भाषेत बाडिस असे म्हणतात!

विकास's picture

7 Jun 2012 - 9:09 pm | विकास

मिपाच्या भाषेत

बोली की प्रमाण?

सुनील's picture

7 Jun 2012 - 9:11 pm | सुनील

हा हा हा!!!

यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध. >>>>>>

=)) =)) =)) =))

हसून हसून जीव गेला की ओ थत्तेचाचा !! ;)

मायला काही कंट्रोल ठेवत जा की ;)

कौतिक राव's picture

6 Jun 2012 - 10:40 am | कौतिक राव

८वाले आणी मंड्ळीं नी पगारी सुशिक्षित बेरोजगार लावुन काउंट वाढवलेला दिसतोय... :bigsmile:

कौतिक राव's picture

7 Jun 2012 - 4:29 am | कौतिक राव

मुलायम , लालू, इमाम बुखारी, निहाल अहमद, टिपू सुलतान, औरंग्जेब, राघोबादादा,जावळीचेमोरे वगेरे लोकांची नावे असती तर लज्जत आली असती पोल ला...

चुलबुल पांडे's picture

6 Jun 2012 - 12:01 am | चुलबुल पांडे

णथुराम गोडसे.

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2012 - 9:12 am | श्रीरंग_जोशी

डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता, कष्ट, त्याग, समाजासाठी व लोकशाहीसाठीचे योगदान, त्यांचा दूरदर्शीपणा व इतर अनेक गोष्टी...

या यादीमध्ये माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटले. त्यांच्या दूरदर्शीपणाची फळे आज आपण उपभोगतो आहे.

क्लिंटन's picture

6 Jun 2012 - 10:05 am | क्लिंटन

पहिल्या फेरीमध्ये १० मते देता येतात. त्यापैकी ९ मते मी दिली. माझी ९ मते: (in no particular order)

जवाहरलाल नेहरू, Dr. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, होमी भाभा, विक्रम साराभाई, Sam Manekshaw, इला भट, बाबा आमटे , मदर टेरेसा.

या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले. तसेच भारतीय judiciary मधील कोणाचेच नाव नाही हे बघूनही वाईट वाटले. निदान न्यायमूर्ती हंसराज खन्ना, (त्यांच्या डाव्या विचारांना समर्थन नसले तरी) न्यायमूर्ती कृष्ण अय्यर किंवा एस. एम. सिकरी यांच्यासारखी नावे या यादीत हवी होती असे वाटते. निदान bollywood मध्ये अंगप्रदर्शनाची लाट आणणारे राज कपूर किंवा रजनीकांत यांच्यापेक्षा या धुरीणांचे योगदान अधिक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

शिल्पा ब's picture

6 Jun 2012 - 10:41 am | शिल्पा ब

नेहरु? का बॉ? नेहरुंनी तर गांधींना ब्लॅकमेल करुन पंतप्रधानपद पदरी पाडुन घेतलं म्हणे! काश्मीर प्रश्नाचं घोंगडं अजुन भिजकटच आहे.. :(

आग्रह नाही पण कारण सांगितलं तर आवडेल.

क्लिंटन's picture

6 Jun 2012 - 12:56 pm | क्लिंटन

काश्मीर प्रश्नाचं घोंगडं अजुन भिजकटच आहे..

No not again. अधिक माहितीसाठी हा मिपाप्रसिध्द धागा वाचा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Jun 2012 - 3:40 am | निनाद मुक्काम प...

अगदी बरोबर
आपले नेते सुब्रमण्यम स्वामी ज्यांनी नुकताच ३जि घोटाळा बाहेर काढला त्यांनी
पाकिस्तानी वाहिनीवर लाइव मुलाखतीत आय एस आय च्या माजी प्रमुखांना सांगितले की ते नेहरू आणि त्यांनी युन मध्ये नेलेला काश्मीर प्रश्न अजिबात मानत नाही त्यामुळे घोगड भिजत पडलाय.
नेहरू ह्यांनी हा निर्णय लोकशाही पद्धतीने सल्ला मसलत न करता घेतला हे देखील सांगितले.

क्लिंटन's picture

7 Jun 2012 - 10:01 am | क्लिंटन

कोण सुब्रमण्यम स्वामी? तो तर राजकारणात दुर्लक्षला गेलेला आणि काहीही करून प्रसिध्दीच्या झोतात राहावे यासाठी धडपड करणारा मनुष्य आहे.१९९१ मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना यानेच लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना चंद्रशेखर यांच्याबरोबर फुटलेल्या ५ मंत्र्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवायच्या प्रश्नावर "मी तुम्हाला अटक करीन" अशी धमकी दिली होती असे वर्तमानपत्रात वाचल्याचे पक्के आठवते संदर्भ . लोकसभा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर चौथ्या क्रमांकाचे पद असते. अशा पदावरील व्यक्तीला आपला राजकीय स्वार्थ साध्य होत नाही म्हणून अटक करण्याची धमकी देणारा मनुष्य कायदामंत्री कसा होऊ शकतो?

पुढे जयललितांविरूध्द याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये परत त्याच जयललितांबरोबर युती करून त्याने खासदारकी पदरात पाडून घेतली. त्या निवडणुकांसाठी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे अलम दुनियेला माहित होते. तरीही त्यांना पाठिंबा देत असलेल्या जयललितांबरोबर युती करून खासदारकी तर पदरात पाडलीच पण पुढे तीन महिन्यात "जातीयवादी" सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा शाहजोगपणा त्यांनीच दाखवला. २००४-०५ मध्ये रामसेतू या अजिबात महत्वाच्या नसलेल्या प्रश्नावर त्याने रान उठवायचा व्यर्थ प्रयत्न केला. ए.राजाने २जी स्पेक्ट्रम मध्ये सरकारी खजिन्याचे मोठे नुकसान केले आहे असे २००८ पासून वर्तमानपत्रात येतच होते.त्यावरूनच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून स्वामींनी फुकटची प्रसिध्दी लाटायचा प्रयत्न मात्र जरूर केला. अशा माणसाला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.

सिब्बल साहेब आता कुठे गेलात??
यावर बंदि का बरे नाही घालत?
या लिस्ट मधे सावर्कर १ क्रमांकावर असते तर मात्र ताबडतोब घात्ली असती बंदी.. :tired:

विकास's picture

6 Jun 2012 - 7:47 pm | विकास

या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले.

अहो त्यांनी संधी मिळालेली असताना देखील गांधीजींची इच्छा* साकार केली नाही, म्हणून कदाचीत त्यांचे नाव नसेल. :-)

(* स्वातंत्र्योत्तर काळात, काँग्रेस राजकीय पक्ष करण्याऐवजी विसर्जीत करण्यात यावी अशी गांधींजींची इच्छा होती. ;) )

विकास's picture

7 Jun 2012 - 1:10 am | विकास

अजून एक गाळलेले नावः अण्णा हजारे.

सुहास..'s picture

7 Jun 2012 - 2:40 am | सुहास..

भारतीय judiciary मधील कोणाचेच नाव नाही हे बघूनही वाईट वाटले. >>>

आणि डिफेन्स मधील ही कोणी ही नाहीये :(

क्लिंटन's picture

7 Jun 2012 - 7:35 am | क्लिंटन

आणि डिफेन्स मधील ही कोणी ही नाहीये

सॅम मानेकशॉ आहेत की

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार

आमच्या एन. डी. तिवारींचे नाव का नाही यात ? आणि कलमाडी, शरदचंद्रराव पण दिसत नाहीयेत.

हाय रे ह्या देशाचे दुर्दैव.

आयला गीनिज बुकमधे आलेल्या मराठी माणसाचं नांव कसं लक्षात आलं नाही?

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 11:15 am | मृत्युन्जय

+ १

आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा?

छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

सहमत.

आणि रामदास आठवले, ज्योतीराव फुले, सावित्रीबाई, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई ह्यांची पण नावे का नाहीत ?

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 11:16 am | मृत्युन्जय

+ १

आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा?

छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

विकास's picture

6 Jun 2012 - 7:42 pm | विकास

दिग्गूजींना विसरून कसे चालेल? ;)

त्यांचे नाव त्या लिष्टमध्ये नसण्यात आरेसेस चा हात आहे हे नक्की ;)

विकास's picture

7 Jun 2012 - 8:29 pm | विकास

हा हा हा!

त्यांचे नाव त्या लिष्टमध्ये नसण्यात आरेसेस चा हात आहे हे नक्की

"हात" म्हणले की फक्त काँग्रेसच डोळ्यासमोर येते ! :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jun 2012 - 8:44 pm | बिपिन कार्यकर्ते

हात ले विकाशकाका!

विसुनाना's picture

6 Jun 2012 - 11:15 am | विसुनाना

पोल सर्व्हेचा तक्ता ' द ग्रेटेस्ट इंडियन' असे म्हणतो आहे.
(आणि हो, 'आमच्या' श्री. आण्णा हजारेंचे आणि 'थोड्या आमच्या' बाबा रामदेव यांचे नाव का वगळले आहे?)

काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत. अगदी नाका समोर बघून चालणारे. आता नाकच वाकडे असल्यामुळे असे विचित्र प्रतिसाद देतात. बाकी आपण महाराष्ट्रातीलच लोक जर सावरकरांसारख्या व्यक्तीचा आदर ठेवू शकलो नाही तर बाकीच्या राज्यातील लोकांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? मागे मला वाटते मागे (बहुतेक मनी शंकर ऐयरने) पण सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढले होते.

त्यांना माहित आहे महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे दिल्लीत गेले कि शेपटी आत घालून बसतात. वाईट ह्या गोष्टीचेच वाटते कि आपलीच माणसे ह्याला खतपाणी घालतात. सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल. बाकी अगदी fashion म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशीच अवस्था आहे.

JAGOMOHANPYARE's picture

6 Jun 2012 - 12:18 pm | JAGOMOHANPYARE

अगदी. अगदी... कुणीतरी जाब विचारायला हवा सावरकरांचे नाव का नाही म्हणून...

काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत.

सरळ जिलेबी कशी असते? आमच्याकडे तर जिलब्या वाटोळ्याच असतात.

श्रावण मोडक's picture

7 Jun 2012 - 3:16 am | श्रावण मोडक

'अनुद्गार' हा शब्द वाचून सावरकरांचा आत्मा (सावरकर असल्याने तो असण्याची शक्यता नाही हा भाग वेगळा) तळमळेल हे मत्र नक्की.

विसुनाना's picture

7 Jun 2012 - 6:39 pm | विसुनाना

अनुदार + उद्गार = अनुद्गार. :)

आणि सावरकरांना कदाचित आत्मा नसला तरी तळमळणारा 'प्राण' होता हे त्यांनी स्वतःच 'सागरास' सांगितले आहे, मोडक साहेब. ;)

श्रावण मोडक's picture

7 Jun 2012 - 9:02 pm | श्रावण मोडक

अनुदार + उद्गार = अनुद्गार.

इतका 'संधी''साधू'पणा आम्हाला कळतच नाही ना! ;-)

JAGOMOHANPYARE's picture

6 Jun 2012 - 12:15 pm | JAGOMOHANPYARE

राजाजी म्हणजे कोण?

रमताराम's picture

6 Jun 2012 - 12:56 pm | रमताराम

तुमच्यासारख्या त्रिकालज्ञाला राजाजी ठाऊक नाहीत, आश्चर्य आहे ब्वॉ.
राजाजी म्हणजे 'चक्रवर्ती राजगोपालाचारी'. बाकीची माहिती तुम्ही गुगलून मिळवालच.

राजघराणं's picture

6 Jun 2012 - 1:00 pm | राजघराणं

वाजपेयींचे नाव आहे का?

JAGOMOHANPYARE's picture

6 Jun 2012 - 1:10 pm | JAGOMOHANPYARE

५ नंबरवर आहे.

अजातशत्रु's picture

6 Jun 2012 - 1:21 pm | अजातशत्रु

सॉरी जीलबी चालली आहे ना
जीलब्या टाकलेले प्रतिसाद फारच रोचक आणि मनोरंजनात्मक आहेत :-)
त्यातल्या त्यात माधवी भावे यांचा एकच प्रतिसाद जबरा वाटला,

सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल.

अक्षरशः अंगावर काटा आला :bigsmile:

बाकी जसे हि शोध मोहिम टुकार लोकांची भिकार विचारसरणी आहे
तसे इथले काही सन्माननीय सदस्यांचे नेहमी येणारे प्रतिसादही त्याच पठडितले,

.
.
.
.
.

अवांतरः- ठाकरे काका ,बाबासाहेब पुरंदरें , P L देशपांडे, मनोहर जोशी,गडकरी,अडवाणी, गीडवाणी, राजपुरोहित
यांची नावं नसल्यामुळे तीव्र णीषेद
(टरकूराम रामसे)

अशोक पतिल's picture

6 Jun 2012 - 1:27 pm | अशोक पतिल

हा निवडशोध म्हनजे बोलाचाच भात......बोलाचीच कढी....
खुप नावे ह्यात नाहित. विनोबा भावे, जय प्रकाश , बाबा आमटे .
निवडशोध वाले पण त्याच लायकीचे पाहज्येतना .

मृगनयनी's picture

6 Jun 2012 - 2:31 pm | मृगनयनी

अशोक'..... बाबा आमटेंचे नाव या लिस्टमध्ये १५ व्या क्रमान्कावर आहे!

नाना चेंगट's picture

6 Jun 2012 - 3:36 pm | नाना चेंगट

मिपाचे महान नेते तात्या अभ्यंकर यांचे नाव नसल्याने जाहिर निषेध !

तात्यारावांचे नाव का नाही, हीच तर चर्चा आहे... तात्यारावांचे नाव आले की त्यांचेही नाव आपोआप येईल. :)

नाना चेंगट's picture

6 Jun 2012 - 6:20 pm | नाना चेंगट

डोक्यावर पोचे आले आहेत का हो तुमच्या?

श्रीरंग's picture

6 Jun 2012 - 6:23 pm | श्रीरंग

ते अशक्य आहे.

श्रावण मोडक's picture

7 Jun 2012 - 3:19 am | श्रावण मोडक

किमान शब्दांत कमाल टिप्पणी. ;-)

राजो's picture

6 Jun 2012 - 6:42 pm | राजो

जा गो... (गपगुमान) प्या रे..
.
.
.
.

(कालची हातभट्टीची उतरलेली दिसत नाही)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Jun 2012 - 8:38 pm | निनाद मुक्काम प...

अरुण गवळी उर्फ डेडी (
किंवा युपी मधील राजाभय्या
प्रकाश आंबेडकर
राहुल ,सोनिया ,राजीव ( गांधी )
मनमोहक मनमोहन
आमचे आदर्श व स्फूर्तीस्थान बरीच आहेत.
सध्या इतकेच

चित्रगुप्त's picture

7 Jun 2012 - 2:30 am | चित्रगुप्त

रविंद्रनाथ ठाकुर
कुमार गंधर्व
ओपी नय्यर
त्रिंदाद मास्तर
जी ए कुलकर्णी
पुल
चिं वि जोशी
हरिप्रसाद चौरसिया...
....असे अनेक कलावंत, लेखक, कवी, संगीतकार...
हे खरे ग्रेटेस्ट इंडियन्स...
....नेत्यांबद्दल काही न बोलणेच बरे.

कवितानागेश's picture

7 Jun 2012 - 8:24 am | कवितानागेश

सरहद्द गांधी. :)

प्रास's picture

7 Jun 2012 - 2:24 pm | प्रास

१००

चिरोटा's picture

7 Jun 2012 - 2:25 pm | चिरोटा

सेंचुरी झाली.

अर्धवटराव's picture

7 Jun 2012 - 11:23 pm | अर्धवटराव

वाह... काय "शॉट" निवडलाय सेंचुरी कंप्लीट करायला !!!

अर्धवटराव

आशु जोग's picture

10 Jun 2012 - 9:02 pm | आशु जोग

४५ वर्षे सलग सत्तेवर असलेले
देशातील सर्वात कमी वयात मुख्यमंत्री बनलेले(नं २ चे )

जाणता राजा नावाने ओळखले जाणारे 'शेतकर्‍यांचा राजा'

देशाचे संरक्षणमंत्री असलेले (९३ सालचे बॉम्बस्फोट विसरा)

भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आणणारे (आय पी ल ला १००० कोटी ची करमाफी मिळवणारे)
इतके वर्षे सत्तेत असून पैसे खाण्याच्या आरोपावरून कधीही सत्तेवरून पाय उतार न व्हावे लागलेले.

वन अँड ओनली शरद पवार

यांचे नाव कुठेच नाही

पुरावा द्या हो.असे बोंबलुन काय होनार आहे.

त्यांच साम्राज्य MALAYSIA,DUBAI,SINGAPORE,.,.,.पर्यंत पसरले आहे. असे म्हणंतात.

त्यांच्या राजकुमारीकडे म्हणे मलेशियाचेही नागरिकत्व आहे, ........त्या केस च काय झाले कोणी सांगेल का?

सुनील's picture

11 Jun 2012 - 10:26 pm | सुनील

ताजी स्थिती काय आहे? कोण पुढे, कोण मागे वगैरे ...

अविनाशकुलकर्णी's picture

11 Jun 2012 - 10:34 pm | अविनाशकुलकर्णी

आजच्या तारखेला........

सुनील's picture

12 Jun 2012 - 12:56 am | सुनील

पहिल्या अन् दुसर्‍या नंबरात एवढी तफावत? विंटरेस्टिंग!

JAGOMOHANPYARE's picture

11 Jun 2012 - 10:54 pm | JAGOMOHANPYARE

छान

अविनाशकुलकर्णी's picture

11 Jun 2012 - 11:03 pm | अविनाशकुलकर्णी

हि भारताच्या भावी राजकारणाची नान्दी आहे ??????

अजातशत्रु's picture

12 Jun 2012 - 5:17 pm | अजातशत्रु

अशी चाचपणी असेलही.

येत्या निवडणूकां मध्येही वोटींग SMS द्वारे करण्याची मुभा असावी उगा चालायचे कष्ट कोण घेणार?
वागळे ,अण्णा हजारे आणि गँगने अशी एक मागणी लावून धरली पाहिजे.

अन्तर्यामी's picture

15 Jun 2012 - 12:08 pm | अन्तर्यामी

गान्धी महान होते, हा जावइ शोध कोणी लावला??

नितिन थत्ते's picture

15 Jun 2012 - 1:52 pm | नितिन थत्ते

आधुनिक भारताच्या दधिचींनी

विकास's picture

15 Jun 2012 - 5:02 pm | विकास

म्हणजे नेहरू का?

नितिन थत्ते's picture

15 Jun 2012 - 6:11 pm | नितिन थत्ते

नाय हो.... पूज्य नथुराम’जी’ गोडसे. त्यांनी गांधी महान असल्याचे सर्टिफाय केले होते असे ऐकून आहे.

[त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते]

विकास's picture

15 Jun 2012 - 6:23 pm | विकास

[त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते]

खुलाशाबद्दल धन्यवाद! बाकी आपण प्रदीप दळवींचे फॅन दिसताहात! ;)

नितिन थत्ते's picture

15 Jun 2012 - 9:34 pm | नितिन थत्ते

१. तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का? - आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न.
२. गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का?

असो.

विकास's picture

15 Jun 2012 - 9:48 pm | विकास

तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का?

नेहरूंना अधुनिक भारत कसा असावा याबद्दलचे प्रामाणिक vision होते, जे त्यांचे विरोधक देखील नाकारणार नाहीत. पंतप्रधान झाल्यावर अधिकृत नेतृत्व म्हणून नेहरूंनी अनेक प्रकल्प चालू केले ज्यातून अधुनिक भारत घडू लागला. त्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांनी हाडाची काडे केली असे म्हणणे अतिशयोक्तीपर ठरणार नाही. म्हणून अधुनिक भारताचे दधिची म्हणणे काही गैर ठरणार नाही.

आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न.

तुमचा नेहरूंबद्दलचा अभ्यास आणि आदर लक्षात घेता, तसेच काही असू शकेल असे वाटले.

गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का?

हा प्रश्न ज्या मूळ प्रतिसादात होता, त्यातील "जावई शोध" वाक्प्रयोग मला तो पटला नाही आणि उपहास आहे म्हणून मी सोडून दिला होता.

तर्री's picture

15 Jun 2012 - 6:25 pm | तर्री

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?

तर्री's picture

15 Jun 2012 - 6:26 pm | तर्री

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?

आशु जोग's picture

15 Jun 2012 - 11:46 pm | आशु जोग

गांधीजी गेले पण ते जीना राहीले

अशी स्थिती केली या गोडसे यांनी