गाभा:
या चर्चेची प्रेरणा :-)
सर्वप्रथम, कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. मिपा सहीत अनेक मराठी संस्थळांवर अनेकजण सातत्याने लेखन करत असतात, आपले विचार मांडत असतात, आदान-प्रदान करतात आणि वादही घालत असतात! या सर्वाला वाचन, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, नियोजनपूर्वक वादविवाद कौशल्य असे बरेच काही लागते.
तरी देखील अनेक प्रश्न मनात उद्भवतात, त्यावर चर्चा घडावी हा या धाग्याचा हेतू आहे.
- इतके सगळे (मराठी संस्थळ, स्वतःचे ब्लॉग्ज अजून कुठे कुठे) लिहून नक्की हाती काय पडलं?
- संशोधन, विकास, नेटवर्कींग, समाजसेवा अशा काही गोष्टी घडल्या का?
- भ्रष्टाचार दूर झाला का?
- बरेचसे विचार , त्यावरील वादात आलेले मुद्दे देखील आधीच लिहून झालेले असतात, तरी देखील परत का लिहीले जाते? त्यात नवीन काय?
- मराठी संस्थळं देखील आधीच काढली गेली होती, तरी देखील नवीन संस्थळ, ब्लॉग्ज काढण्यात काय हशील?
- जर हौस म्हणूनच लिहायचे असेल तर स्वखर्चाने स्वतःचे संस्थळ तयार करून का लिहीत नाहीत?
- ह्या सर्व लेखन-चर्चा आदींचा नक्की काय उपयोग झाला आहे? बेरोजगारी कमी झाली, गुन्हेगारी कमी झाली, राजकारणी शहाणे झाले का आपापल्या हापिसात efficiency/productivity वाढली, कंपन्यांना नफा अधिक झाला आणि आपल्याला पगारवाढ मिळाली?
तसे संस्थळ मालक-चालक-लेखक-कवी-वादक (म्हणजे वाद घालणारे ;) ) असे अनेक जण मला माहीत आहेत आणि फार भारी वाटतं त्यांचे लेखन पाहून.
पण त्याबरोबरच सगळं करुन करायचं काय हा अत्यंत वास्तववादी प्रश्न त्रास देतो आहे.
ह्यावर साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
22 May 2012 - 9:32 pm | नितिन थत्ते
_/\_
मला चाचा/चिच्चा ही पदवी मिळाली. हा फायदा झाला माझा. :)
22 May 2012 - 9:31 pm | चित्रगुप्त
लेखन ही एक उर्मी आहे.... किंवा उर्मी आल्यावर केली जाणारी उत्स्फूर्त कृति आहे, अश्या गोष्टींना कोणतेही व्यावहारिक मापदंड लावता येत नाहीत, लावूही नयेत.
सृजनशीलतेची गंमत व महत्व तिच्या व्यावहारिक दृष्ट्या निरुपयोगी असण्यातच सामावलेले असते.
भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी कमी होणे इ. इ. चा अश्या लेखनाशी संबंध लावत बसू नये.
22 May 2012 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद राखून ठेवतो. :)
-दिलीप बिरुटे
22 May 2012 - 9:49 pm | पिवळा डांबिस
साक्षात प्राडाँच्या प्रतिसादाला बूच मारण्याचा टारगटपणा करायला मिळाला हे फलित काय थोडं आहे?
:)
बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं खाली दिली आहेत.....
24 May 2012 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साक्षात वगैरे म्हणून का लाजवताय गरिबाला. :)
आपल्यासारखी दिलखूलास माणसं भेटली हेच खरं फलित आहे.
बाकी, प्रश्नांच्या उत्तरं जमेल तशी लिहितोच.
-दिलीप बिरुटे
22 May 2012 - 9:39 pm | भडकमकर मास्तर
जालिंदरजींचे प्रसिद्ध वाक्य आठवतय.
कुणीतरी त्यांना विचारलं- "Why do you want to write a blog?"
ते म्हणाले होते- "Because it's there"
बाकी वरील सर्व प्रश्न गैरलागू आहेत. (विशेषतः खुर्च्या उबवत नाष्टा करता करता) ;)
22 May 2012 - 10:03 pm | प्रचेतस
जालिंदरबाबांनी दुसर्या कुणाचा ब्लॉग लिहिलाय का?
इथे मुद्दा 'तोच' आहे.
---------------------------------------------------------------------------------------
लेखनाने सर्वही होते| लेखनिक प्यारेणु| आधी तो आपुला किजे| ब्लॉग बोर्डावरी दिसे||
22 May 2012 - 10:11 pm | पिवळा डांबिस
१. इतके सगळे (मराठी संस्थळ, स्वतःचे ब्लॉग्ज अजून कुठे कुठे) लिहून नक्की हाती काय पडलं?
लिहून हाती काय पडलं ते सांगणं कठीण आहे, पण वाचून हाती 'मोकलाया दाही दिशा' पडलं. ते काय थोडं आहे?
:)
२. संशोधन, विकास, नेटवर्कींग, समाजसेवा अशा काही गोष्टी घडल्या का?
संशोधन -करायचा हेतूच नव्हता...
विकास - दोन आहेत की, एक दांडीवाला आणि दुसरा बिन्दांड्यांचा, पुरे नाही का झाले? अजून विकास कशाला?;)
नेटवर्किंग - बख्खळ झालंय की!!
समाजसेवा - मराठी संस्थळाद्वारे? खी खी खी.....
हां आता कट्टे भरवणं हीच समाजसेवा म्हणत असाल तर....
३.भ्रष्टाचार दूर झाला का?
भ्रष्टाचार हा कधीच पूर्णपणे आणि कायमचा दूर होत नसतो या सत्याची जाणीव असल्याने तो प्रयत्न केला नाही. फक्त स्वतः भ्रष्टाचार करत नाहिये ना हे काटेकोरपणे पाळलंय...
४.बरेचसे विचार , त्यावरील वादात आलेले मुद्दे देखील आधीच लिहून झालेले असतात, तरी देखील परत का लिहीले जाते? त्यात नवीन काय?
ही जुनी मेंबरं शिंची आधीच लिहून ठेवतात आम्हाला सुचलेल्या आयडियांवर! मग आमचा लेखनविकास व्हायचा कसा?
फोडणीच्या भाताची एक पेश्शल रेसेपी टाकायची होती मला!!!!
५.मराठी संस्थळं देखील आधीच काढली गेली होती, तरी देखील नवीन संस्थळ, ब्लॉग्ज काढण्यात काय हशील?
त्याला (सॉरी चुकून तात्याला असं लिहिणार होतो!!) 'सुलेमानी किडा' म्हणतात!!!!
६. जर हौस म्हणूनच लिहायचे असेल तर स्वखर्चाने स्वतःचे संस्थळ तयार करून का लिहीत नाहीत?
कोण म्हणतो, लिहित नाहीत?;)
७.ह्या सर्व लेखन-चर्चा आदींचा नक्की काय उपयोग झाला आहे? बेरोजगारी कमी झाली, गुन्हेगारी कमी झाली, राजकारणी शहाणे झाले का आपापल्या हापिसात efficiency/productivity वाढली, कंपन्यांना नफा अधिक झाला आणि आपल्याला पगारवाढ मिळाली?
अहो खुळे की काय तुम्ही बॉस्टनवाले?
अहो हे संस्थळ नसते तर मिपाकरांना मदिरेविषयी, बुवा-बाबांविषयी, आपल्या भव्यदिव्य प्राचीन परंपरांविषयी (सालं ते सनातनी विमान अजून शोधतोय मी!!), शिळ्या अन्नाचे काय करावे याविषयी, मराठी लोकांच्यातल्या जातीयतेविषयी अधिक माहिती कुठे बरं मिळाली असती?
म्हणून म्हणतो,
दिनोदिनी धागे जरी ते काढावे,
प्रतिसाद अखंडित पिंकीत जावे ||
जय जय डांबिसेश्वर समर्थ!!!!
:)
22 May 2012 - 10:27 pm | रमताराम
लिहून हाती काय पडलं ते सांगणं कठीण आहे, पण वाचून हाती 'मोकलाया दाही दिशा' पडलं. ते काय थोडं आहे? खी: खी: खी: स्पेलिंग मिश्टेक झाली जनू. 'दाहि दिश्या' अस लिवायला पायजे ना.
विकास - दोन आहेत की, एक दांडीवाला आणि दुसरा बिन्दांड्यांचा, पुरे नाही का झाले? अजून विकास कशाला? मेलो.
23 May 2012 - 1:29 am | पिवळा डांबिस
स्पेलिंग मिश्टेक झाली जनू. 'दाहि दिश्या' अस लिवायला पायजे ना.
बरोबर आहे तुमचं....
पण त्याचं काय आहे, की जसं सुधीर फडक्यांना 'पुरुष' हा शब्द 'पुरुश' असा उच्चारता येणं कठीण तसंच आमच्या मराठी लेखनाचं पण आहे!!!
दोष आमच्या शाळेचा!!!
:)
22 May 2012 - 10:57 pm | विकास
एकूण सगळ्याच प्रतिसादाला पै़कीच्या पैकी मार्क! पण,
अहो हे संस्थळ नसते तर मिपाकरांना मदिरेविषयी, बुवा-बाबांविषयी, आपल्या भव्यदिव्य प्राचीन परंपरांविषयी (सालं ते सनातनी विमान अजून शोधतोय मी!!), शिळ्या अन्नाचे काय करावे याविषयी, मराठी लोकांच्यातल्या जातीयतेविषयी अधिक माहिती कुठे बरं मिळाली असती?
म्हणून म्हणतो,
दिनोदिनी धागे जरी ते काढावे,
प्रतिसाद अखंडित पिंकीत जावे ||
जय जय डांबिसेश्वर समर्थ!!!!
याला मात्र बोनस __ /\ __ :-)
23 May 2012 - 1:08 am | Nile
मी हेच लिहायला आलो होतो. त्याशिवाय अजुन एक मुद्दा आहे, तो म्हणजे फुकटात करमणुक होते. अहो, हाफिसात मस्त एशीत बसलेलो असलो तरी झोपा काढता येत नाहीत. मग तेव्हढंच लोकांचे विद्वत्तापूर्ण प्रतिसाद वाचून आम्ही आमचं मनोरंजन करून घेतो.
23 May 2012 - 1:32 am | नंदन
अगागागागा! शिवाय आय.टी. वाल्यांचा अंमळ हळवेपणा, अनिवाशांची मुजोरी वर अॅक्सलरॉडचा इमेल अॅड्रेस हेही आहेच की :)
बादवे, ती फोडणीच्या भाताची रेशिपी येऊ द्या लवकर. ह्याच वीकांताला करून दीर्घ वीकांत सत्कारणी लावीन म्हणतो ;)
22 May 2012 - 10:18 pm | मराठे
मिपा नसतं तर बोळे अडकून पाणी तुंबलं असतं मिष्टर!
22 May 2012 - 10:57 pm | विकास
१००% सहमत :-)
22 May 2012 - 10:23 pm | पैसा
तुमच्या त्या संस्थळ मालक-चालक-लेखक-कवी-वादक (म्हणजे वाद घालणारे ) यांचं काय म्हणणं आहे?
(लेखासाठी _/\_ )
22 May 2012 - 11:24 pm | शुचि
अंतर्मुख ची बरीच बहिर्मुख झाले.
अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली.
22 May 2012 - 11:43 pm | शिल्पा ब
मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल आहे.. हा अबोलपणा अन बुजरेपणा किंचीत दुर झाल्यासारखं वाटत आहे.
23 May 2012 - 1:52 am | दादा कोंडके
:)
23 May 2012 - 8:03 am | सुहास..
मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल आहे.. हा अबोलपणा अन बुजरेपणा किंचीत दुर झाल्यासारखं वाटत आहे.>>>
व्हय !!! ;)
23 May 2012 - 10:27 am | श्रीरंग
तुम्हाला "व्हाय" असं म्हणायचं आहे का? :)
23 May 2012 - 12:37 pm | हंस
<मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल आहे.. हा अबोलपणा अन बुजरेपणा किंचीत दुर झाल्यासारखं वाटत आह>
अगं बाई! एकावे ते नवलच! ;)
23 May 2012 - 9:47 pm | शिल्पा ब
बघा बै!! खरं सांगितलं तं असं!!
टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या!
23 May 2012 - 1:23 am | रेवती
1.इतके सगळे (मराठी संस्थळ, स्वतःचे ब्लॉग्ज अजून कुठे कुठे) लिहून नक्की हाती काय पडलं?
संपादकपद. ;) मी ज्या दर्जाचं लेखन केलं त्यात एवढच मिळालं. ;)
2.संशोधन, विकास, नेटवर्कींग, समाजसेवा अशा काही गोष्टी घडल्या का?
संशोधन करणार्या चित्राताई व विकास यांच्याशी नेटवर्कींग करून दोनचार जेवणे पदरात पाडून घेतली. त्यातून त्यांना समाजसेवेचे समाधान मिळाले असे कानावर आले. ;)
3.भ्रष्टाचार दूर झाला का?
तसे माझ्या नवर्यास वाटते. त्याचे डोके खाण्याऐवजी मिपाकरांचे खाल्याने माझा भ्रष्ट आचार कमी झाल्यासारखेच वाटले.;)
4.बरेचसे विचार , त्यावरील वादात आलेले मुद्दे देखील आधीच लिहून झालेले असतात, तरी देखील परत का लिहीले जाते? त्यात नवीन काय?
तेच विचार परत आले तरी आपल्या पुढील लेखास प्रतिसादक मिळवण्याच्या नादात परत लिहिले जाते. कधीकधी धागाकर्तेही वेगवेगळे असल्याने तेच नविन वाटते. लाजेकाजेस्तव आपल्या लेखास त्यांचे 'लेखन आवडले' अशा स्वरूपाचे प्रतिसाद तरी येतात. ;)
5.मराठी संस्थळं देखील आधीच काढली गेली होती, तरी देखील नवीन संस्थळ, ब्लॉग्ज काढण्यात काय हशील? एकीकडे दंगा केल्यामुळे डच्चू मिळाल्यास दुसरीकडे लिहिण्याचा मार्ग मोकळा राहतो. तिकडूनही अर्धचंद्र मिळाल्यास आपला हक्काचा ब्लॉग आहेच. ;)
6.जर हौस म्हणूनच लिहायचे असेल तर स्वखर्चाने स्वतःचे संस्थळ तयार करून का लिहीत नाहीत?
आंग्ल भाषेतील हाऊस व मराठीतील हौस यांचा मिलाप झाल्यास खर्चाची चिंता का करावी? ;)
7.ह्या सर्व लेखन-चर्चा आदींचा नक्की काय उपयोग झाला आहे?
राजकारण्यांवर कडाडून येथे टीका केल्याने नंतर काही करण्याची गरज भासत नाही........निदान मला तरी.
बेरोजगारीची जाणीवही कमी झाली. :) घराबाहेर जाऊन उगाच इकडून तिकडे फिरण्यामुळे जनतेशी वाद, मारामार्या होण्याची शक्यता कमी झाल्याने गुन्हेगारी कमी झाली असे आम्ही मानतो. ;)
23 May 2012 - 6:41 am | यशोधरा
1.इतके सगळे (मराठी संस्थळ, स्वतःचे ब्लॉग्ज अजून कुठे कुठे) लिहून नक्की हाती काय पडलं?
संपादकपद. मी ज्या दर्जाचं लेखन केलं त्यात एवढच मिळालं.
LOL! :D
23 May 2012 - 11:44 am | रमताराम
काय अब्यास काय अब्यास! याला म्हणतात जालविदुषी. इतके बिनचूक नि साक्षेपी विवेचन कोणी करू शकेल असं वाटंत नाही. _/\_
23 May 2012 - 12:04 pm | श्रावण मोडक
इतकं अंडरप्ले का करताय स्वतःला? यापुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात संपादकाचेच गुणविशेष दिसतात. ;-) या पहिल्या उत्तराच्या संदर्भात पुढची उत्तरे वाचली तेव्हा एकेक संपादक (काही उत्तरांवर एकच) डोळ्यांपुढे येत गेला...
ररांशी सहमत!
23 May 2012 - 7:21 pm | रेवती
अरे वा! टिकला का आमचा प्रतिसाद!
मला वाटले एव्हाना पंख लागले असतील शिवाय व्यनीतून चपला घालण्याचा आदेशही मिळाला असेल.
श्रामो, ररा, ही गंमत आहे. मला खरे लिहायला लावून संमंकडून परस्पर नोटीस पाठवायचा विचार दिसतोय! ;)
23 May 2012 - 7:27 pm | विकास
"वरील विचार हे व्यक्तीगत आयडीचे आहेत, त्याच्याशी संपादकमंडळ सहमत असेलच असे नाही" असा संपादक मंडळाचा याला डिसक्लेमर आहे असे गृहीत धरू का? ;)
23 May 2012 - 7:30 pm | रेवती
विकासादादा, संमंचे आतले मतभेद असे बाहेर का आणताय?;) हवा तर प्रतिसाद अप्रकाशित करा. तुम्हाला तो अधिकार आहेच.
24 May 2012 - 12:30 am | श्रावण मोडक
ते मतभेद चव्हाट्यावर आणत नाहीत. ते सल्ला देताहेत. ;-) समझनेवालेको अशी त्यांची पद्धत आहे. समजून घ्या. :-)
संपादक मंडळातील मतभेद त्यांनाही कळतात का? :-)
24 May 2012 - 1:31 am | Nile
तुम्ही छुपे संपादक असूनही बर्याच गोष्टी उघड्या करताहात. ;-)
23 May 2012 - 6:46 am | हुप्प्या
१. लिहून हाती काय पडले?
आपले विचार मराठीत मांडायला शिकलो. नाहीतर लेखी मराठीशी संपर्क रहात नाही. विरोधी विचार करणारे काय मुद्दे मांडतात त्यांना कसे तोंड द्यावे इ. रणनीती शिकलो.
२. संशोधन, विकास, नेटवर्किंग, समाजसेवा घडली का?
कितीतरी नव्या गोष्टी, पुस्तके, सिनेमे, नाटके, खाद्य याविषयी कितीतरी नवी माहिती विनासायास मिळते. हे संशोधनच माझ्या करता. मी नवे विचार समजू शकतो, मांडू शकतो हे माझे प्रबोधन आहे. मी समाजाचा घटक आहे तेव्हा तो माझ्या परीने खारीचा वाटा आहे. माझ्या संपर्कात येणार्या लोकांना माझे विचार समजावणे सोपे होते.
३. हौस म्हणून लिहायचे असेल तर ब्लॉग का नाही?
आडियन्स कुठुन मिळणार? लोकप्रिय स्थळावर अनेक लोक सहभाग घेतात. अधिकस्य अधिकं फलम् असे म्हणतात ते खरे असावे.
४ उपयोग काय?
वाद हा एखाद्या खेळाप्रमाणे नियम पाळून खेळावा लागतो हे कळते. कधी कधी दुसर्याचे विचार पटतात. कधी आपले इतरांना. हारजीत चालायचीच. हत्यारावर गंज चढत नाही.
कधी कुणी नातेवाईक कुवतीप्रमाणे नेताबिता बनलाच किंवा आय ए एस वा अगदी नगरसेवक तर निदान आपले मत मांडता येऊ शकेल. इथले अठरापगड, बारा देशांचे पाणी प्यालेले लोक अनुभवाचे बोल ऐकवतात तेव्हा काहीतरी शिकायला मिळतेच.
५. पुनःपुन: तेच लिहून काय फायदा?
विचार मांडणे, त्यात वेळोवेळी सुधारणा, भर करणे हे होते. विरोधक प्रत्येक वेळी तेच असतील असे नाही. त्यामुळे तोच सामना तसाच खेळला जातो असे नाही. अजून तरी ह्याचा वीट आलेला नाही.
23 May 2012 - 9:59 am | ऋषिकेश
ठ्ठो!
=))
23 May 2012 - 10:07 am | प्यारे१
मस्तच विकासराव!
हे देखील महत्त्वाचं होतंच की!
सकाळी हापिसात आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत मिपा मिपा खेळून नेमकं काय मिळतं हे महत्त्वाचं आहेच.
उपयोगी व्यसनाला सवय म्हणतात तर निरुपयोगी सवयीला व्यसन. मिपाची सवय लागली आहे की व्यसन ते तरी कळावं एकदा!
(खरडफळ्यावर आत्ता जे चालू आहे त्याचं फलित देखील काय ते एकदा समजायला हवं! ;) )
23 May 2012 - 11:08 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हे बरिक खरे हो!!
23 May 2012 - 4:30 pm | विकास
उपयोगी व्यसनाला सवय म्हणतात तर निरुपयोगी सवयीला व्यसन.
वाक्य खूपच आवडले!
बाकी हे चर्चात्मक विडंबन हलकेच घेतल्याबद्दल आभार. :-)
23 May 2012 - 4:13 pm | नाना चेंगट
>>>मिपासहीत मराठी संस्थळांवर लेखन-प्रतिसाद देण्याचे नक्की फलीत काय?
शष्प कर्तन केंद्र चालवता येते.
23 May 2012 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे
कंडशमनाइतके मोठे फलित दुसरे कोणते असणार?
23 May 2012 - 4:48 pm | सुहास..
मोठे फलित दुसरे कोणते असणार? >>
ओ पका काका , कर्मण्ये वाधिकारस्ते .....( म्हणजे कर्माचा वाद रस्त्यावर ) असे कोणीतरी म्हटल्याचे तुम्ही माल्या निर्मीत रासायनिक द्रव्य प्राशन करताना म्हणाला होतात ना पण ;)
23 May 2012 - 5:03 pm | प्रकाश घाटपांडे
सोमरस प्राशनार्थाय संभवामि युगे युगे असं म्हणालो होतो मी!
23 May 2012 - 5:10 pm | सुहास..
सोमरस प्राशनार्थाय संभवामि युगे युगे असं म्हणालो होतो मी! >>>
=)) =)) =))
म्हणाला असाल ! आम्ही त्या वेळी ब्रम्हांड दर्शनात चक्राकार बिसी होतो ;)
23 May 2012 - 10:10 pm | पैसा
१. स्वतःचा धागा शत्रूपक्षाच्या लोकांची टर उडवण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी लिहिता येतो. (फक्त थेट उल्लेख टाळला की झालं.) त्या निमित्ताने अनेक नव्या जुन्या शत्रूपक्षाच्या लोकांचे स्कोअर सेट्ल करता येतात. हा मोठाच फायदा.
२. स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देणे याद्वारे धागा सतत चर्चेत ठेवता येतो आणि लोकप्रिय असल्याचा आभास निर्माण करता येतो. (इथे लेख लिहिणे आणि प्रतिसाद देणे दोन्ही गोष्टींचा चतुराईने वापर केला आहे हे लक्षात घ्यावे.)
३. प्रछन्न प्रतिसाद देऊन शत्रूपक्षाला उचकवता येते. मग शिक्षा झाल्यास उचकलेल्या सदस्याला जास्त होते आणि आपण काडी टाकून नामानिराळे राहू शकतो.
४. प्रतिसादाद्वारे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करता येतो. घरात तसेच ऑफिसात ज्यांच्या तोंडून शब्द फुटू शकत नाहीत त्याना संस्थळावरील लेख आणि प्रतिसाद हा मोठाच सहारा होऊ शकतो. (यावरून मी इथे का लिहितेय याबद्दल कोणतेही निष्कर्ष काढू नयेत.)
५. आंतरजालावरून ढापलेल्या ज्ञानाचे प्रदर्शन करता येते. प्रतिसाद देणार्यांनी "अहो रूपं अहो ध्वनि: " हे सुवचन लक्षात ठेवून सहकारी तत्त्वावर लेख आणि लेखकांची स्तुती आरंभली की नवखे सदस्य अलगदपणे आपल्या मित्रराष्ट्रात आणता येतात.
आणखीही बरीच फलितं सांगता येतील. पण थोडे पत्ते हातात लपवून ठेवणं शहाणपणाचं!!
23 May 2012 - 10:31 pm | विकास
स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देणे याद्वारे धागा सतत चर्चेत ठेवता येतो आणि लोकप्रिय असल्याचा आभास निर्माण करता येतो.
अगदी अगदी! असतात खरं असे महाभाग. सहमत!
(प्रतिसाद नंबर ४२ ;) )
23 May 2012 - 10:14 pm | छोटा डॉन
इन जनरल सांगायचे म्हटले तर आंतरलाजावर माझा वावर लोकांशी 'असहमत' होण्यासाठीच असतो.
जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी पटकन लोकांशी 'असहमत' होऊन जातो व 'सविस्तर प्रतिसाद थोड्या वेळाने' असा रुमाल ठेऊन टाकतो.
बाकी अजुन खास असे लिहण्यासारखे काही नाही.
- (असहमत)छोटा डॉन
23 May 2012 - 11:19 pm | निनाद मुक्काम प...
वपुर्झा मध्ये वपू म्हणतात त्या प्रमाणे आपण का लिहितो ह्याचे एकमेव कारण मला जग किंवा एखादा विषय समाजाला उमजला आहे हे सार्यांना कळावे म्हणून.
माझ्या मते मराठी संस्थळांवर लिहिता झाल्याने माझ्या वयक्तिक आयुष्यात खूप होकारात्मक बदल झाले. मला वाचनाचे व्यसन असल्याने जास्त वाचून व तू नळीवर पाहून मनातील भाव ,भावना ह्यांचा निचरा होण्यास आभासी जगतात अभिव्यक्त होणे हा रामबाण उपाय आहे. एखादे टोपण नाव घेउंन समजा आपण एखादा विचार जो प्रत्यक्ष जीवनात मांडायला चाचरतो तो आभसी जगतात मांडला व त्याला काही समविचारी मंडळीचे अनुमोदन मिळाले की आपल्या विचार अगदीच फुटकळ नव्हता हा विचार एक आत्मविश्वास देऊन जातो.
आपल्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब तुम्हाला आभासी जगतात दिसते, तुम्ही ह्या जगात नवे असतात तेव्हा प्रस्थापितांचे किंवा समविचारी गटाचे ( ह्याला काहीलोक कंपू म्हणतात ) प्राबल्य असते तेथे आपला निभाव कसा लागावायचा.ह्याचे प्राथमिक शिक्षण मिळते.
येथे आपल्या ऑफिसातील आपल्या कामावर वरिष्ठ मंडळाची मर्जी कशी सांभाळावी त्यांच्या हो मध्ये हो कसे मिसळावे. किंवा दोघांच्या वादात आपला फायदा कसा करून घ्यावा. किंवा योग्य त्या वेळी जुने स्कोर कसे सेटल करावे. अश्या अनेक गोष्टी आपसूकच शिकायला मिळतात.
कट्टा संस्कृती मुळे आपण प्रत्यक्ष जीवनात एकमेकांना भेटतो ह्या वयक्तिक ओळखींच्या आपल्या खाजगी जीवनात उपयोग होतो. ह्या मागील भावना एकमेका सहाय्य करू ,अवघे धरू सुपंथ अशीच असते. उदा मला जर भारताबाहेरून
भारतात शेअर बाजारात काही उलाढाल करायची असेल तर मी हक्काने रामदास ह्यांना व्यनी करू शकतो. उद्या कोणी मिपाकर अथवा त्यांचे परिचित म्युनिक च्या जवळपास येणार असतील तर त्यांना काही माहिती ,सल्ला , देऊ शकतो .हेच जगभरात पसरलेल्या मिपा संप्रदायातील सर्वांना लागू पडते.
ह्या येथे झडणाऱ्या चर्चा मी वांझोट्या मनात नाही. विविध विषयाला वाहिलेले लेख किंवा चर्चा ह्यामुळे वास्तविक आयुष्यात मिपाकर कोणत्याही विषयावर हक्काने समूहात तोंड उघडू शकतो
.
येथे स्वतः ला कसे प्रेझेंट करावे किंवा स्वताची ब्रांड वल्यू कशी निर्माण ,विकसित व जपायची ह्यांचे शास्त्रशुद्ध धडे मिळतात ते आपल्या वास्तविक आयुष्यात उपयोगी पडतात.उगाच विजेता व्हा किंवा शिव खेरा ह्यांना पैसे का द्यावे?
अजून महत्वाचे म्हणजे येथे वाचायला मिळणारे विनोदी लेखन ( ह्यात कोणी प्रयत्नपूर्वक विनोदी लिहितात तर कोणाचे लेखन आपसूक विनोदी ठरते )
ह्यामुळे दिलखुलास हास्याचे फवारे उडतात. आजच्या ताण तणावाच्या आयुष्यात
हेच हास्य आपल्याला अनेक आजार व विकारांपासून लांब ठेवते.
तुमच्यातील लखू रिसबूड येथेच विकसित होतो. मग तुमच्या कामावर तुमच्याविषयी मत बनते " ह्याला सगळ्यातील सगळे कळते"
माझ्या बाबतीत म्हणाला तर येथे जीव गुंतल्या पासून पार्ट्या किंवा आयुष्यातील अनेक चैनीच्या व खर्चाच्या गोष्ठी करायला वेळ मिळत नाही व चित्त लाभत नाही.
त्यामुळे वाचाल तर वाचाल व लिहाल ( अभिव्यक्त ) तर तणाव मुक्त आयुष्य बहाल
असा सुखी आयुष्याचा मूलमंत्र येथे सापडला.
येथे सध्याच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व गरजेची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे मोफत आपली कातडी गेड्याची करून मिळते.
खर्या आयुष्यात कोणाशी वाद झाले व आपली बाजू कमकुवत पडत असेल तर मुद्दा भरकट वण्याची अमुल्य कला येथे शिकायला मिळते.
कोणी पूर्वी आपल्यावर जाणून बुजून टीका केली किंवा आपल्याला टार्गेट केले तर वास्तविक व आभसी जगतात ते सुरवातीला सह्न होत नसे पण सरावाने त्यांच्यात सुद्धा लुफ्त घेण्यास सुरवात होते.
सध्या इतक्यात माझ्यावर किंवा माझ्या लेखनावर वयक्तिक किंवा जनरल टीका झाली नाही आहे, पण जेव्हा ती होते तेव्हा मनातून गुदगुल्या होतात.
आपल्यावर कोणी चार शब्द ,ओळी खर्च कराव्यात हेच काय आजच्या जगात कमी आहे.
.( बदनामी हुई पार नाम तो हुआ ह्या विचारसरणी असलेल्या प्रवृत्ती येथे व सार्वजनिक आयुष्यात सापडतात, त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा
मी म्हणेन जागतीकारणात मराठी माणस जगाच्या कानाकोपर्यातून एका आभासी व्यासपीठावर रोज जमतात. कोणी जहाल तर कोणी मवाळ तर कोणी तटस्थ तर कोणी न अध्यात ना मध्यात विविध विचारसरणीच्या माणसोबत सुखाने समाजात नांदायचे असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याहून वेगळा विचार करते म्हणून ती चूक कारण आपण कधीच चुकीचे वागत नसतो हा भ्रम दूर होण्यास आभसी जगताची मोलाची मदत होते.
आणि त्याचा वास्तविक आयुष्यात खूप वायदा होतो.
आभासी जगतात आपण जसे वाद कसा करायचा हे शिकतो तसे तो कसा टाळायचा हे देखील शिकतो. मुळात आभासी जगतात वाद केलेला चालून जातो.
वास्तविक आयुष्यात मात्र प्रत्येक वेळी तसे करून चालत नाही.
24 May 2012 - 12:18 am | श्रावण मोडक
विकासराव, आता बोला! ;-)
24 May 2012 - 12:26 am | विकास
बोलणच खुंटलय! :( काय बोलणार!
24 May 2012 - 1:30 am | Nile
म्हणजे आता तुम्हाला इथेही फार बोलता येणार नाही तर? ;-)
पळा नाहीतर काका-काकू दोघं हाणायचे!
25 May 2012 - 9:19 am | नाखु
प्रयोजन (च्यायला काय सोलिड शब्द आहे नाय?) कळले की असले "*****प्रश्न " पडत नाहीत..
***** गरजूनी आप आपल्या आवडी प्रमाणे भरावयची मुभा आहेच.
25 May 2012 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा