चिकन तंदुरी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
15 May 2012 - 7:22 am

साहित्यः
५०० ग्राम चिकन
३-४ टेस्पून दही
२-३ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२ टेस्पून कोथींबीर
२ टेस्पून पुदिन्याची पाने
२ टेस्पून तंदुरी मसाला
रंगासाठी दीड टेस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून काळिमिरीपूड
१ टेस्पून गरम मसाला
मीठ चवीनुसार

.

पा़कृ:

आले, लसूण, कोथींबीर व पुदिना एकत्र वाटुन पेस्ट करुन घेणे.
चिकनला दही, तंदुरी मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळिमिरीपूड, गरम मसाला, मीठ व हिरवी पेस्ट लावून मॅरीनेट करावे. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे.

.

.

बेकिंग ट्रेला ग्रीज करुन घेणे किंवा बेकिंग पेपर लावावा. त्यावे मॅरीनेट केलेले चिकन पीसेस ठेवावे.
थोडेसे बटर सोडून २०० डिग्रीवर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १५ मिनिटे भाजावे.मधे एकदा उलटवून पुन्हा १५ मिनिटे भाजावे.

.

स्मोक्ड फ्लेव्हर देण्यासाठी चिमट्यात चिकन पीस धरुन गॅसच्या शेगडीवर धरुन १ मिनिटे भाजावे.

.

सॅलॅडसोबत सर्व्ह करावे :)

.

प्रतिक्रिया

मोदक's picture

15 May 2012 - 7:31 am | मोदक

फोटो आवडले.. :-)

चिंतामणी's picture

15 May 2012 - 8:15 am | चिंतामणी

सकाळी सकाळी,भुकेच्या वेळी हे असले दाखवून आमची भूक अजूनच उद्दिपीत केल्याबद्दल.

(नेहमीपेक्षा वेगळी प्रतिक्रीया लिहायला काहीतरी सुचले ;))

सुहास झेले's picture

15 May 2012 - 8:50 am | सुहास झेले

सहीच... सकाळी सकाळी हे फोटो बघून अंमळ हळवा झालो. ;)

माझी आवडती डिश :) :) :)

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2012 - 10:08 am | प्रभाकर पेठकर

फारच आकर्षक आणि चविष्ट छायाचित्रं. अभिनंदन.

दही वापरायचे असेल तर ते पाणी निथळवून (चक्का) वापरावे. दह्या ऐवजी नेस्ले क्रिम वापरल्यास पाककृतीस एक प्रकारची 'शाही' चव येते. मसाल्यांचे प्रमाण मला जास्त वाटले. तंदुरी मसाला आणि गरम मसाला वगळून नुसतेच काश्मिरी लाल तिखट वापरावे आणि चिकन तयार झाले की वरून चाट मसाला भुरभुरावा.

इरसाल's picture

15 May 2012 - 10:25 am | इरसाल

मस्त आहे.
अवांतरः शेवटी शेवटी चिकन फुल प्यांटवरुन क्याप्रीवर आलेले वाट्टेय. :D ;)

गणामास्तर's picture

15 May 2012 - 10:27 am | गणामास्तर

वीकांत सोडून ईतर दिवशी सकाळी सकाळी टाकत जाऊ नका हो असल्या पाकृ.
हापिसात दिवसभर हाल होतात मग.

मुक्त विहारि's picture

15 May 2012 - 10:48 am | मुक्त विहारि

सुंदर...

पियुशा's picture

15 May 2012 - 10:54 am | पियुशा

नॉन - व्हेज खात नाही
पण केवळ तुझ्या पा.क्रु.च्या जिवघेण्या फोटोसाठि ही पोच :)
अगदी कातील फोटु :)

खादाड's picture

15 May 2012 - 11:44 am | खादाड

पण आता संध्याकाळ पर्यन्त !! जीभ स्वस्थ बसु देणार नाही !! :)

जागु's picture

15 May 2012 - 11:59 am | जागु

सानिका सह्ही एकदम.

स्मोक्ड फ्लेव्हर देण्याची कल्पना आवडली ;-)
रेसीपी बरोबरच फोटोग्राफी मधे देखिल आपला हातखंडा आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाल.

गणपा's picture

15 May 2012 - 12:47 pm | गणपा

खंग्री फटु आहे शेवटचा.
बरेच दिवसांनी काही आवडत आलं बोर्डावर. ;)

कवटी's picture

15 May 2012 - 12:59 pm | कवटी

बदली भर लाळ गाळल्या गेली आहे याची नोंद घ्यावी.

स्मिता.'s picture

15 May 2012 - 1:23 pm | स्मिता.

याला म्हणतात तंदूरी चिकन... मस्तच दिसतंय.

थोर्लेबजिराव's picture

15 May 2012 - 5:08 pm | थोर्लेबजिराव

फोतु फरच सुरेख अहेत. शकाहरि मानसाला पन आवड्ले.. !!

चिंतामणी's picture

15 May 2012 - 5:54 pm | चिंतामणी

थोर्लेबजिराव मसांहार करीत व्हते.

परिकथेतील राजकुमार's picture

15 May 2012 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

फटू आवडले.

बरं झालं पाकृ बघितली. आता या प्रकारे ट्रायते.
मी आणि नवरा शाकाहारी असलो तरी मुलगा मांसाहारी आहे.
त्याच्यासाठी म्हणून धाडस करून ड्रमस्टीक्स आणल्या.
त्याला पांढरी स्कीन होती (नक्की काय म्हणतात माहीत नाही.) ती काढतानाच उत्साह संपला.
नंतर घट्ट दह्याचे मॅरिनेड तयार केले पण बेक करताना इतके पाणी सुटले की काय करावे ते समजले नाही.
मी बहुतेक अव्हन ब्रॉईलवर ठेवायला विसरले असे नवर्‍याचे म्हणणे आहे. तसे असेलही पण त्यावेळी मी रागीट चेहरा करून वेळ मारून नेली.
गणपाला फोटू पाठवीन असे कबूल केले होते पण ते फोटू पाहून त्याने सन्यास घेतला असता म्हणून पाठवले नाहीत.

इरसाल's picture

16 May 2012 - 11:13 am | इरसाल

तसे असेलही पण त्यावेळी मी रागीट चेहरा करून वेळ मारून नेली.

अगदी जालीम उपाय वापरलात आजी !

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2012 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा

अस्तो खाणारा तर.. फोटुत घुसून...

जयवी's picture

27 May 2012 - 8:50 pm | जयवी

सही यार....... फोटो कसले कातिल !!!!!!!!!!

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Jun 2012 - 10:48 am | श्रीयुत संतोष जोशी

साला रंग पण काय आलाय .......भारी . जियो जियो :)

अन्नू's picture

23 Jun 2012 - 2:17 pm | अन्नू

सानिकाजी, तुमच्या घरच्या मंडळींना बाहेर हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जायची गरजच वाटत नसेल ना! ;)

रॉजरमूर's picture

2 Mar 2014 - 10:48 pm | रॉजरमूर

पण बरेचदा ही तंदुरी रबरासारखी वातड का होते कधी कधी तर दगडासारखी होते मास हाडाला घट्ट चिकटून बसते असे का होत असावे ? मी ओ टी जी वापरतो .
कृपया मार्गदर्शन करावे