अंड्यांची बॅचलर पाक-क्रुती (भाग १)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
12 May 2012 - 10:40 pm

गेले २/३ दिवस भरपूर कठीण कठीण पाक-क्रूती वाचुन एखादी सोपी पाक-क्रूती टाकावी असा विचार करत होतो.तर मग ती मिळाली. एकदम सोपी आहे खाली देत आहे.

आधी साहित्य.

१. अंडी एका वेळेस जितकी खावू शकाल तेव्हढी आणि जशी माणसे असतील त्या प्रमाणात आणि कबूतरा पासुन ते डायनॅसोर पर्यंत.आपली आपली आवड. मी आपला डायनॅसोरच्या बायकोची अंडी वापरतो.आमचा डायनॅसोर अंडी घालत नाही .तो फक्त समस्त पूरूष जातींसारखा कारणमात्र आहे.ही अंडी कूठे मिळतात ते विचारू नका. शोधा म्हणजे सापडेल.जरा गूगल वापरा.नाहीतर मला व्य.नी. करा.एका व्यं.नीचे २ जूने तांब्याचे पैसे.ते पुण्यात मिळतात. अत्रूप्त आत्मा ह्यांची जुन्या-बाजाराची लिंक बघा.

२. गॅस आणि त्या अनूषंगिक इतर गोष्टी.(आपण २/३ दिवसांपूर्वीच चहा केला आहे.नाना चेंगट ह्यांची लिंक उघडा आणि जरा वाचायचे कष्ट घ्या.)

३. पाणी ....कसेही आणि कुठल्याही प्रकारचे.ते कसे मिळवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.आम्ही इथे वाचकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बसलो नाही. प्रश्नोत्तर करायला ही काही पेशव्यांची चावडी नाही आहे.

४. एक पातेले .परत ज्याचा त्याचा प्रश्न. अंड्यांच्या प्रमाणात घ्यावे लागते एव्हढे सांगू शकतो.

क्रूती..

१. पातेल्यात पाणी घ्या.
२. त्यात अंडी घाला.
३. गॅस पेटवा.
४. पाणी मस्त उकळू द्या. आणि लक्ष ठेवा.टॉमॅटो सारखा ह्यांचा स्फोट नाही.(गरजूंनी स्पा ह्यांची लिंक बघावी, ती मिळाली नाही तर फेणे ह्यांची लिंक बघावी. ईतरांचा फेणे आणि आमचा मात्र स्पा.) तसे ह्यांचे टरफल लगेच तूटत नाही पण पाणी कमी झाले तर जळू शकते.

५. पाणी उकळले की मग गॅस बंद करा.किती वेळाने हे अनुभवाने समजते.

तर अशा प्रकारे ही उकडलेल्या अंड्यांची क्रुती मी इथेच संपवतो.

क्रमशः (पूढची पाक क्रूती उकडलेले अंडे आणि त्याचे ऊपयोग)

ता.क. : आपण बाजारात जी अंडी बघतो तसेच हे अंडे दिसते.डोळस व एकाक्ष लोकांना हे माहितच आहे आणि आंधळे काही फोटोला हात लावुन अंदाज घेवू शकत नाहीत , म्हणून फोटो टाकला नाही. चूक केलीच नसल्याने क्षमस्व म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. (तरी पण मि.पा.वाले काही तरी चूक शोधतीलच.ते तर काय अम्रूत दिले तरी चूक काढणारच.हे असले काही तरी फालतू मी फक्त इथेच लिहू शकतो.फार सहनशील आहेत हो हे मि.पा. सदस्य.)

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

12 May 2012 - 10:55 pm | अविनाशकुलकर्णी

हे असले काही तरी फालतू मी फक्त इथेच लिहू शकतो.फार सहनशील आहेत हो हे मि.पा. सदस्य.)
==================
हे वाचल्याने अनेक सभासदाना धिर आला असेल नव नविन लिहिण्याचा....

पैसा's picture

12 May 2012 - 11:28 pm | पैसा

फोटो दिल्याशिवाय या वस्तूला पाकृ म्हणण्यात येणार नाही. तुम्ही नवसदस्य असल्यामुळे सांगायचे कष्ट घेतले. अन्यथा.. एखादा फोटो आंजावरून उचलून चिकटवला तरी चालेल.

ही पाकृ अंडे न घालता.... वगैरे वगैरे.... सुडने म्हणायचं ते आधीच म्हटलंय असं समजा.

अहो पण ही पाकृ करण्याआधी तुम्ही स्टीव्हन स्पीलबर्गची* परवानगी घेतलीय का? :p
त्यानेच सर्वात आधी डायनॉसॉरच्या रक्ताची आणि मग अंड्याची पाकृ चार भागात करुन दाखवली होती ;-)
बाकी लेख वाचून हहपुवा

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))
=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))

*खरं म्हणजे मायकल क्रायटनची

रमताराम's picture

14 May 2012 - 9:04 am | रमताराम

ठ्यां. =))

मन१'s picture

13 May 2012 - 1:34 pm | मन१

:)

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2012 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा

@ते तर काय अम्रूत दिले तरी चूक काढणारच.>>> पण अमृत द्यायचच कशाला..? :-P

मुक्त विहारि's picture

13 May 2012 - 4:05 pm | मुक्त विहारि

हे असले फालतू लेख वाचून कूणी यमाच्या भेटीला जायला नको.

म्हणून आधीच अम्रूत देवून ठेवावे आणि बिंधास्त लेख लिहायला सुरूवात करावी.

मग आपण आपले,

आणून चंद्रावरचे गरमागरम पाणी
त्यात मंगळावरचे खडे टाकून केले मी लोणी
सूर्याच्या शेकोटीवर केले त्या लोण्याचे मी तूप
ते पिवून , झिंगलो आहे मी , आता झालो आहे गप्प

अशा मौलिक कविता करायला आपण मोकळे होतो...

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2012 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

@आणून चंद्रावरचे गरमागरम पाणी
त्यात मंगळावरचे खडे टाकून केले मी लोणी
सूर्याच्या शेकोटीवर केले त्या लोण्याचे मी तूप
ते पिवून , झिंगलो आहे मी , आता झालो आहे गप्प. >>> --^--^--^--

स्पंदना's picture

14 May 2012 - 8:28 am | स्पंदना

कवितेला १०० पैकी १००.
पाकृ माहित नाही

चला अता इथे अंडी शोधणे आले.

अन्तर्यामी's picture

13 Jun 2012 - 12:20 pm | अन्तर्यामी

आता मी सुखाने मरतो...
अशा पाक्रु वाचुन माझ ज्ञान कैक पटिने वाढला...