अशा फाईल्स इथे चिकटविता येतात का ? एक चौकशी

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
12 May 2012 - 6:37 pm

मिपावर आपण लेख लिहिताना आपल्याला काही चित्रांची फाईल इथे लिंक देऊन जोडता येते. जालावर मूळ जागी जोपर्यंत ती फाईल आहे तो पावेतो चित्र इथे दृग्गोचर होते. हे आपण सारे जाणतोच. मी इथे नवा असल्यानी एक चौकशी करीत आहे.
आपल्याला इथे विडीओ चिकटवायचा असेल तर आपण इथे लि़क जोडतो. पण युट्यूब सारखे होस्ट असल्याने ते शक्य आहे .पण अ‍ॅनिमिटेड जी आय एफ वा तत्सम फाईल्स इथे जोडावयाच्या असतील. ( समजा दाखविणे शक्य नसेल तर ) तर असे कोणते होस्ट आहेत की जे अशा फाईल्स ला अप्लोड साठी परवानगी देतात. ?

जालावर माहिती काढली असता असे समजले की युट्युब , फ्लिकर तसेच फेसबुक अशी परवानगी देत नाहीत. किंवा अशा फाईल्स चे इमेज फाईल्स मधे रुपांतर करून टाकतात.

१) आपल्या पैकी कोणी जी आय एफ सारख्या फाईली कोणत्या होस्टकडे (अर्थातच मोफत) लोड केल्या आहेत का ?
२) अशा फाईल्स आपल्या लेखातून इथे जोडल्या आहेत का? कशा ?

सर्व जुन्या नव्या मिपाकराना विनंति की त्यानी यावर प्रकाश टाकावा !

तंत्रचौकशी

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

12 May 2012 - 10:46 pm | अविनाशकुलकर्णी

फाईल पिकासा वर अप लोड करा..
लिंक ची क्व्यापी करा..
व मी.पा वर चढवा..