उन्हाळा जसा वाढू लागतो तसे तसे जीवाची काहिली होत जाते. प्रत्येक क्षण जगणे अवघड होत जाते. उच्चवर्गियांसाठी वातानुकुलित यंत्रणा, थंड हवेची ठिकाणे इत्यादी पर्याय असतात, परंतु सर्वसामान्यासाठी मात्र उन्हाळा एक परिक्षाच घेऊन येत असतो.
माझ्या लहानपणी ( ३०/३५ वर्षापूर्वी) पंखा असणे ही सुद्धा चैनीची बाब समजली जात असे किंवा थोड्याश्या भर उन्हातून थोड्याश्या सावलीमध्ये गेल्यास सुध्दा उन्हाच्या झळयापासुन सहजपणे बचाव करता येत असे. आता वाहनाच्या अमर्याद वाढलेल्या संख्येमुळे अथवा वृक्ष / जंगल तोडीमुळी तापमान वाढतच चालले आहे. त्यासाठी काही छोट्याशा सूचना, शिफारशी इत्यादी.
१. पाण्याचा, त्यातही माठाच्या पाण्याचा वापर करणे. भरपूर पाणी पिणे.
२. उन्हाळ्यात आंबे, कलिंगड, खरबूज, जांभळी, करंवदी, काकड्या इत्यादी फळांचा वापर भरपूर करणे.
३. खूपच उकाडा होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याच्या भिजलेल्या कपड्यांने सर्वांग ओले पुसुन त्यानंतर कोरड्या रुमालाने पुसुन घेणे.
४. मी नागपूरला राहत असतांना हा प्रयोग करित असे. नागपूरला कुलर इत्यादींचा वापर करावाच लागतो. कुलरचा आवाज प्रचंड असतो. मला एकवेळ उकाडा सहन होतो परंतु आवाज / गोंगाट सहन होत नाही. मी रात्री झोपण्यापूर्वी ५/६ प्याले माठातील थंड पाणी पीत असे. त्यानंतर झोपतांना अक्षरशा पंखा अथवा कुलर न लावता झोपत असे. रात्री अगदी शांत झोप लागत असे.
५. रात्री झोपण्यापूर्वी खोली जमीनीवर पख्यांच्याखाली मध्ये एखाद्या जुन्या चादरीवर भरपूर पाणी टाकावे. रात्रभर खोली थंड राहते.
६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे.
७. घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, शक्य असल्यास खिडक्यांना जाळी बसवावी.
८. सर्वसाधारण रात्री बाहेर बर्यापैकी थंड होत असते, परंतु खोलीतल्या चालू असलेल्या पंख्यामुळे बाहेरची हवा आत येत नाही. टेबल पंखा खिडकीच्या जवळ ठेवल्यास आणि बाहेरची हवा आतमध्ये घेतल्यास फायदा होतो.
९. बाहेर जातांना कान आणि कपाळ झाकून घ्यावे.
वरील गोष्टींचे पालन केल्यास उन्हाळा सुसह्य होईल अशी आशा वाटते.
प्रतिक्रिया
5 May 2012 - 2:13 pm | कुंदन
थंडगार बीअर...
5 May 2012 - 11:42 pm | सोत्रि
सर्वात भावलेला पर्याय आहे हा! :)
- ('किंगफिशर') सोकाजी
6 May 2012 - 10:40 am | सर्वसाक्षी
द्वारकानाथजी,
तुम्ही कच्छी बिअर प्या. म्हणजे धन्या-जिर्याची पूड पेरलेले थंडगार ताक. परवा राजकोटला गेलो होतो, मस्त ४४ तापमान होते. हा उपाय लागु पडला. पुढच्या आठवड्यात इंदूर. मग दिवसा हाच उपाय.
6 May 2012 - 10:55 pm | रेवती
नाचणीच्या ताकातल्या आंबीलीला बियर हा पर्याय होऊ शकतो का?
6 May 2012 - 1:14 pm | पांथस्थ
हा सर्वात झकास उपाय.
बाल्कनीत ह्या सीझनच्या बाटल्यांचा ढिग लागला आहे ;)
5 May 2012 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व ऋतू परवडले पण उन्हाळा नको. काही सूचना शिफारशी चांगल्या आहेत. पण, काही धोकादायक आहेत. पैकी.
- घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, शक्य असल्यास खिडक्यांना जाळी बसवावी.
च्यायला, दोन दिवसापूर्वी उन्हाळ्याच्या कटकटीपायी खिडक्या उघड्या ठेवणे अंगलट आले होते. खिडक्या उघड्या ठेवून आम्ही रुम बदलून झोपलो. पहाटे तीनच्या सुमारास आमच्या खिडक्यांच्या जाळ्या उचकायचं काम चोरांनी सुरु केलं होतं. कटवणी ( लोखंडी पहारीला पुढे खिळे उचकण्यासाठी फट ठेवतात ते साधन) ने खिडकी वाकवायचं काम सुरु होतं. बरं झालं आम्ही जागे झाल्यामुळे चोरांच्या कामात अडथळा आला. नै घरात तसं नेण्यासारखं कै नव्हतं. दोन महिन्यापासून पगार नव्हते त्यामुळे त्यांना काही सापडलं नसतं. पण, दोन दोन लोखंडी फटके दिले असते तर काय भावात पडले असते. तेव्हा खिडक्या उघड्या ठेवू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.
-दिलीप बिरुटे
6 May 2012 - 1:10 am | मोदक
६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे.
सांगलीला एका उन्हाळ्यात भन्नाट चोरी झाली..
एक जण अंगणात कॉट वर झोपला व सकाळी जमिनीवर उठला. रात्री झोपेत असताना चोरांनी त्याला उचलून खाली ठेवले आणि कॉट व गादी पळवून नेली. :-D
(ही ऐकीव गोष्ट / किस्सा नाहीये.)
6 May 2012 - 1:26 am | यकु
च्यायला कमाल आहे!
=)) =)) =)) =))
6 May 2012 - 1:27 am | यकु
प्र का टा आ
6 May 2012 - 9:00 pm | रमताराम
सुखी आहे माणूस. या महागाईच्या जमान्यातही (आमच्या वयातील लोकांचा या वाक्यप्रयोगावर कॉपीरैट्ट असतो) गाढ झोप लागते बिचार्याला. वाईटातील ही चांगली बाजू लक्षात घ्या की. बी पॉजिटिव यार.
6 May 2012 - 11:47 pm | मोदक
मी प्रॅक्टीकली विचार केला.. ;-)
"कोणत्या तारेत झोपला होता देव जाणे.." :-D
5 May 2012 - 2:38 pm | अमृत
|| ६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे.
व सोबत ओडोमास लावायला विसरू नये. :-)
उन्हाळ्यात बरेचदा नाक फुटणे, घेरी येणे हे प्रकार घडतात म्हणून सदैव सोबत १ छोटा कांदा बाळगावा व असे काही झाल्यास कांदा ठेचुन नाकपुडीत त्याचा रस टाकाव लगेच आराम मिळतो.
बाहेर जाताना पुरेशे पाणी सोबत घ्यावे.
उन्हातून आल्या आल्या लगेच पाणी पिऊ नये.... इत्यादी, इत्यादी.......
अमृत
5 May 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर
फळांच्या यादीतील आंबा हे फळ उष्ण आहे. उन्हाळ्यात, त्याचे अतिरिक्त सेवन टाळावे. त्यापेक्षा शहाळ्याचे पाणी पोटभर प्यावे.
5 May 2012 - 4:09 pm | स्पा
शिवाय कलिंगड आणि मस्क मेलन (चिबूड) यांचा हि मारा करावा :)
माठात मोगर्याची फुल किंवा वाळा टाकून ते पाणी घेता येईल
5 May 2012 - 5:37 pm | पिंगू
शीतली म्हणून एक योगक्रिया आहे. तिचा वापर केला तर अतिशय उत्तम..
- पिंगू
5 May 2012 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा
5 May 2012 - 10:01 pm | इरसाल
उन्हातून आल्या आल्या गुळ आणी माठातील थंड पाणी प्यावे.
शक्य असल्यास पन्हे घ्यावे.
मुबलक प्रमाणात कलिंगड खावे.
लिंबू पाणी घ्यावे.
वाळ्याचा वापर करावा.
खिडक्यांवर जुन्या चादरी/ गोधडी ओली करुन टांगावी (जुना उपाय)
महत्वाचे म्हणजे दिवसातून २/३ वेळा आंघोळ करावी. :D ;)
5 May 2012 - 10:42 pm | अन्या दातार
इच्छा व पाणी असल्यास हे जास्त महत्त्वाचे नाही का? ;)
6 May 2012 - 1:55 pm | पिंगू
इरसालराव, सध्या पुण्यात पाण्याची लय तंगी हाय आणि दोन-तीन वेळेला आंघोळ अजाबात शक्य नाय.. ;)
- पिंगू
7 May 2012 - 10:11 am | इरसाल
पिंगूशेट तसा असल्यास तो तेव्ह्ढा मुद्दा बाद समजावा.
6 May 2012 - 1:56 am | निनाद मुक्काम प...
हिल स्टेशन गाठावे
बजेट प्रमाणे
माथेरान ते पार स्विझर्लंड
मला माहीत असलेले काही उपाय
भरपूर पाणी प्यावे म्हणजे नियमित पणे दिवसातून २ लिटर तरी पाणी पिणे.
मदिरा पान माफक करणे आणि चमचमीत पदार्थ कमी खाणे. बाहेरील उष्णता जास्त असतांना शरीरात उष्णता वाढेल असे काही करू नये.
सब्जा चे सेवन करावे.
रसदार फळे खावीत उदा कलिंगड
सर्वात प्रबावी उपाय म्हणजे उन्हातून आल्यावर लिंबू सरबत प्यावे. डीहायड्रेशन होऊ नये म्हणून ग्लुकोन्सी घेण्यात हरकत नाही.
ताक व थंड दुध सर्वोत्तम
6 May 2012 - 10:44 am | सर्वसाक्षी
उन्हाळ्यात सुट्टी अजिबात घेऊ नये. हपिसात गारवा, आंतरजाल सेवा, दूरध्वनी सेवा, चहा-कॉफी (मिटिंग लावल्यास नाश्तापाणी) हे सगळ फुकट असतं. उगाच घरची बिले का वाढवा? रात्र झाली, उकाडा कमी झाला की घरी परतायचं.
6 May 2012 - 1:57 pm | पिंगू
सध्या हाच उपाय करतोय... :D
- पिंगू
6 May 2012 - 10:36 pm | यकु
;-)
7 May 2012 - 1:04 pm | नाना चेंगट
वा ! उन्हाच्या झळा बर्याच वाढलेल्या दिसत आहेत.
(नेहमीचेच किर्तन आणि पुराण) चालू द्या.
7 May 2012 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार
सालाबादप्रमाणे गरमी आली की हा धागा वर आणणे हे प्रत्येक मिपाकराचे आद्य कर्तव्य असताना, कलंत्री काकांनी नवीन धागा काढलाच कसा ? आता मी दोन तास नैष्ठीक मौन पाळून ह्याचा निषेध करणार आहे.
7 May 2012 - 1:33 pm | सुहास..
शोधेपर्यंत लिंक हजर !! ;)
7 May 2012 - 10:29 pm | मदनबाण
माठातल्या पाण्यात वाळा घालावा, व ते पाणी प्यावे. :)