प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
3 May 2012 - 2:32 pm
गाभा: 

मला ना, ही लहान मुले सिनेमात आली की काही प्रश्न हमखास पडतात.

१. ती आता कधी हरवणार? (पूर्वी मुले जन्मल्या नंतर लगेच किंवा एक ७/८ वर्षांची झाली की हरवत असत.असे सिनेमे मोठी माणसे पाहत असत.नाही हरवली तर तो लहान मुलांचा सिनेमा असे समजून मोठी माणसे, लहान मुलांना तो सिनेमा बघायला परवानगी देत असत.)

२. त्यांना आता कुठला रोग होणार? (ताप येणार, की ब्लड क्यान्सर?)

३. त्यांना आता कुठला अपघात होणार?(बोट बुडणार?की विमान अपघात? की गाडी उडवणार? गेली कित्येक दशके हे गाडीवाले लहान मुलांना आणि इतर मंडळीनी उडवत आहेत.म्हणून एक उप-प्रश्न असा पडतो की ह्या अशा सिनेमातून स्फूर्ती घेवून तर आज-काल गाडीवाले अपघात करत नसतील?

४. मोठे झाल्यावर कोण काय काय रूप धारण करणार? (म्हणजे अमिताभ,धर्मेंद्र,विनोद खन्ना हे पूर्ण आणि ऋषी कपूर अर्धा (एकूण साडे तीन).... माझे हिरो इथेच संपतात.)

५. कुठला व्यवसाय करणार?

६. एक चोर तर दुसरा पोलीस का?

७. एकदम धावता-धावता मोठे होणार? की मारामारी करून?

८. हे कितीही लहान असले तरी ह्यांना मोठ्या माणसांसारखी समज कशी काय असते? (म्हणजे हिरो-हिरोईन जवळ आले की हळूच बघत बसणे, पटकन अडचणीत येणारे प्रश्न विचारणे. इत्यादी)

९. व्हिलन कितीही ताकदवान असला तरी हे त्याला का घाबरत नाहीत?

१०. भर मारामारीत पळून जायचे (आपला बचाव करायचे) सोडून हळूच व्हिलनला हाताने दगड किंवा गलोल घेवून खडे का मारतात?

मला ह्या १० मिनिटात जेव्हढे आठवले तेव्हढे लिहिले... तुम्हाला अजून सुचत असतील तर सांगा....

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 May 2012 - 3:20 pm | चिरोटा

बूट पॉलिश करत असताना व्हिलनच्या मित्राकडून शिव्या खाणे,कधीतरी मार खाणे.

-भूक लागलेली असूनही मुझे भूख नही लगी है म्हणणे.
-अजिबात केस न कापणे..
-"पापा पापा, हम इस आंटी को मेरी मम्मी क्यूं नही बना सकते?" अशा स्वरुपाचे प्रश्न योग्य वेळी विचारुन विधुर पित्याच्या भविष्यातील बोळा काढणे.
- "मम्मी मम्मी, पापा हमारे साथ क्यूं नही रेहते?" असे प्रश्न विचारुन मम्मीला रडवण्यासाठी लेखक दिग्दर्शकास मदत करणे.
-लहान बहिणीच्या भुकेसाठी पाव चोरी करणे अन मार खाणे.. त्या प्रोसेसमधे एका भल्या माणसाच्या दृष्टीस पडून स्वत: आणि बहीण या दोहोंची दत्तक जाण्याची सोय करणे.
-आल्टर्नेटिव्हली याच प्रोसेसमधे भल्या व्यक्तीऐवजी एका भल्या दिसणार्‍या खल व्यक्तीच्या नजरेस पडून वाईट मार्गाला लागणे.. यथावकाश इधर का माल उधर, किंवा टांग तोडना असे किरकोळ धंदे करणे, लेकिन खून.. ना नाबा ना..
- हिरोने सर्वकाही जमवून आणले असताना आणि व्हिलनला चेकमेट देण्याच्या क्षणी किडनॅप होणे आणि हिरोच्या प्रयत्नात खोडा घालणे.

बास इतकेच.. आता कंटाळा आला..

दादा कोंडके's picture

3 May 2012 - 10:42 pm | दादा कोंडके

आणखी भर,

- मुलगा असेल तर गुडघ्याच्या खाली पर्यंत येइल अशी ढगळी चड्डी घालणे आणि मुलगी असेल तर गुढग्याचा वरच संपेल असा लांडा फ्रॉक घालणे

- 'उगिचच कानफाटात मारावी' असं वाटण्यासारखा चेहरा करणं आणि मुलगा असलातरी लताच्या प्रचंड चोंबड्या आवाजात गाणं म्हणणं

अजून आठवेल तसं. :)

प्यारे१'s picture

4 May 2012 - 12:28 pm | प्यारे१

>>>लताच्या प्रचंड चोंबड्या आवाजात गाणं म्हणणं

अधोरेखित शब्दांसाठी --- म्हणजे?
चोंबडा आवाज म्हणजे कसला आवाज?
लता कोण ?
तिचा (एकेरी मुद्दाम) आवाज चोंबडा आहे असं कुणी ठरवलं?
कसं ठरवलं?
क्रायटेरिया काय वापरला?

नै म्हन्जे आम्ही काही संगीतात रस वगैरे घेणारे 'संगीतप्रेमी' नाही म्हणून आपलं विचारलं.

दादा कोंडके's picture

6 May 2012 - 11:56 pm | दादा कोंडके

मुर्गा मुरगी प्यारसे देखे किंवा बच्चे मनके सच्चे किंवा अलिकडचे चॉकलेट लाईमज्युस म्हणणारी अशक्य लाडीक चोंबडा आवाज काढून म्हणणारी लता. आणि "अजी रूठ कर", "ये दिल तुम बीन लगता नही" किंवा "मालवून टाक दीप" सारखी जीव ओवाळून टाकावा असं वाटणारी गाणी म्हणणार्‍या स्वरसम्राद्नी लता मंगेशकर!

[पाचवीत संगीता नावाच्या मुलीवर लाईन मारणारा (त्या व्यतिरीक्त संगीताशी काहीही संबंध नसलेला)] दादा

आशु जोग's picture

7 May 2012 - 12:00 am | आशु जोग

तुम्ही पुणेकर काय हो

नाही आपली एक शेन्का म्हणून विचारलं
(खेडवळ) आ. जो.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2012 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

आईबापाला स्वतःच्या गालांची पप्पी एकाचवेळी घ्यायला लावून ऐनवेळी चेहरा मागे करणे!

सोत्रि's picture

3 May 2012 - 10:05 pm | सोत्रि

बिकाशेख, एकदम मस्त!

- (आपल्यालाही अशी मुले असावीत असे वाटणारा) सोकाजी

आपल्या श्रीमंत मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी "गुढिया" देण्यासाठी आकाशपाताळ एक करणे

५० फक्त's picture

3 May 2012 - 4:16 pm | ५० फक्त

मुन्ना मुन्नी बिछडे मेले में
फिर ना पुछो क्या हुवा
मुन्नी तो बदनाम हो गयी
और मुन्ना डॉक्टर बन गया

पैसा's picture

3 May 2012 - 8:46 pm | पैसा

या प्रश्नांच्या उत्तरात बहुतांश हिंदी सिनेम्यांचा इतिहास दडलेला आहे!

तिमा's picture

3 May 2012 - 9:12 pm | तिमा

मुलगी आहे हे स्पष्टपणे दिसत असताना देखील मुलाचे काम करणे आणि मधूनमधून आपल्या 'पडीक' दातांचे दर्शन देणे.

आशु जोग's picture

6 May 2012 - 1:36 am | आशु जोग

http://www.misalpav.com/node/21555

या धाग्याचा सीक्वेल इतक्या लवकर निघेल असे वाटले नव्हते

(त्यामुळे पुढच्या धाग्याचे नाव काय ठेवावे या विचारात पडलेला ) आ. जो.

खी खी खी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 May 2012 - 1:46 am | निनाद मुक्काम प...

कूच कूच होता हे परत एकदा पहा .
ती साना का कोण लहान चिमुरडी माझ्या एवढी डोक्यात गेली होती
की कधी समोर आली तर थोतरीत ठेऊन वाटे.

आशु जोग's picture

9 May 2012 - 10:21 pm | आशु जोग

ती मुलगी छानच होती
कुच कुचवाली