गोव्यातली ठिकाणे

अँग्री बर्ड's picture
अँग्री बर्ड in काथ्याकूट
24 Apr 2012 - 12:07 pm
गाभा: 

नमस्कार, ह्यावर्षी कंपनीची annual meeting गोव्याला आहे. ३ मे रोजी विमानाने निघणार असून Marriott मध्ये उतरणार आहोत. ३ तारखेला म्हणजे बुधवारी मिटिंग होईल त्यानंतर दोन दिवस फिरणे हा कार्यक्रम असेल. माझ्या मते Marriott मिरामार बीच जवळ आहे. गोव्यात काही हटके offbeat ठिकाणे सांगू शकता का जी बघता येतील, जवळ water-sport कुठे आहेत, गवि यांनी त्यांच्या धाग्यात सुचवल्याप्रमाणे अस्सल गोव्याच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मार्टिन कॉर्नर्स मध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी जायचे ठरवले आहे. मग अजून काही ठिकाणे सुचवू शकाल काय ? धन्यवाद .

प्रतिक्रिया

अप्रतीम अस्सल गोव्याचे जेवण मिळणारे अजून एक ठिकाण म्हणजे बागा येथील "ब्रिटोज". सी-फूड आवडत असेल तर ब्रिटोज अजिबात चुकवू नये.
कलंगूट बीचवर सूझा लोबो हे पण नावाजलेले असले तरी आमच्या मागच्या ट्रिपचा तिथला अनुभव इतका वाईट होता की परत तिकडे पाऊल न ठेवण्याचे ठरवले आहे. असो.
वेळ मिळाल्यास उत्तर गोव्यातील अरंबोळ- मांद्रेम - मार्लेम हे बीचेस पण अवश्य पहा.

अँग्री बर्ड's picture

24 Apr 2012 - 12:22 pm | अँग्री बर्ड

अवश्य .. तुम्ही सुचवलेले किनारे notebook मध्ये साठवीत आहोत.धन्यवाद.

रामपुरी's picture

25 Apr 2012 - 10:37 pm | रामपुरी

" notebook मध्ये साठवीत आहोत"
"विमानाने निघणार असून Marriott मध्ये उतरणार आहोत"

:) :) :)

(बाकी आमची समजूत होती की गोवा कोकणाच्या जास्त जवळ आहे त्यामुळे कोकणी लोकांना त्याबद्दल जास्त माहीती असावी. पण इथे उलटाच प्रकार दिसतोय. :) :) असो चालू द्या)

कपिलमुनी's picture

26 Apr 2012 - 10:56 am | कपिलमुनी

त्यांना काय ठाउक ३ * ....५ *हॉटेल ...

अँग्री बर्ड's picture

26 Apr 2012 - 4:46 pm | अँग्री बर्ड

माहिती असलेच पाहिजे असे नव्हे, शिवाय कोकणातले म्हटले की रायगडपासून कारवरपर्यंत सगळे माहिती हवे असा तुमचा अट्टाहास आहे का ? गोव्यापासून मी १२० किलोमीटर अंतरावर राहतो. गोव्याला आयुष्यात एकदाच गेलोय, त्याला बरीच वर्षे झालीत. माड, काजू, आंबे, सुपार्या, समुद्रकिनारे हे ज्यांच्यासाठी अप्रूप आहे त्यांना गोव्याचे खास आकर्षण, ते मला नित्यनेमाचे आहे त्यामुळे ते पाहून काही विशेष वाटत नाही, पण ऑफिसमधल्या सगळ्यांचा मी गोव्याचा लै भारी जाणकार आहे असा समज असल्याने हा काथ्याकुट मांडीला आहे.

कोळवा बीच तुलनेत शांत, सभ्य आणि भरपूर वॉटरस्पोर्टस.. मिरामारपासून जवळ नाही पण जाण्यासारखा. (द. गोवा)
कोळवा बीचवर संध्याकाळी गेलात तर तिथे लागणार्‍या पोर्टेबल रिक्षा-कन्व्हर्टेड श्वारमा स्टॉलवर गरमागरम धगीवरचा चिकन श्वारमा ट्राय करा (लांबड्या पावात भरुन..)

कोळवा बीचवरच वाळूत थेट समुद्रासमोर लाकडी प्लॅटफॉर्मवाल्या शॅक्स आहेत. तिथे रात्र झाली तर बीचकाठीच खालील केंचुकी या हॉटेल / रेस्टॉरंटात उत्तम फेणी आणि फिशकरी आदि जेवणाचा आस्वाद घ्या. महाग अजिबात नाही. शिवाय संध्याकाळ ते रात्र लाईव्ह म्युझिक असतं. फर्माईशीही घेतल्या जातात. कोंकणी गाणी सांगावी. उत्तम मूड लागतो.

बाकी स्थलदर्शनाचीही गोव्यात काही कमी नाही. त्यापैकी बरीचशी अनवट ठिकाणं गोव्यातले निवासी सांगतीलच.

कपिलमुनी's picture

24 Apr 2012 - 12:37 pm | कपिलमुनी

हे अतिशय सुंदर बीच आहे

पाळोळे.

कमी गर्दीचा आणि दक्षिणेस दूर असलेला आहे. उत्तम बीच. तिथे जाण्यायेण्यात बराच वेळ जाईल पण, जर हे मिरामारला राहणार असतील तर.

कपिलमुनी's picture

24 Apr 2012 - 3:41 pm | कपिलमुनी

हा सुद्धा सुंदर बीच आहे ..पण तुलनेने सुविधा कमी आहेत ..
@ गवि : गोव्याचा सर्वात सुंदर बीच कोणता ??

पैसा's picture

24 Apr 2012 - 8:40 pm | पैसा

तुम्ही मेरिएटला म्हणजे मिरामार-पणजी इथे रहाणार आहात, तर पाळोळे किनारा जरा लांब होईल. अर्थातच गोव्याच्या एका टोकाहून दुसर्‍या टोकाला एका दिवसात सहज जाऊन येता येतं. वाहन हातात असेल तर प्रश्नच नाही. उत्तर गोव्यात मोरजी मांद्रे पेडणे हरमळ ही किनार्‍यालगत गावे आहेत आणि बीचेसही आहेत. मिरामारला वॉटर स्पोर्ट्स पाहिल्याचं आठवतं.

आवडत असेल तर कॅसिनो आणि रिव्हर क्रूज पणजीलाच मिळेल. तुमच्या बरोबरचा गट तरुणांचा आणि मजा करण्यासाठी आलेला असेल असं गृहित धरते. त्यामुळे जास्त कान्याकोपर्‍यातली ठिकाणे सुचवणार नाही. फार तर दूधसागर धबधबा आणि मोलें अभयारण्य हे मोले इथे रिसॉर्टमधे राहून पाहू शकाल. तसंच काणकोणच्या पुढे खोतीगाव अभयारण्य आणि जंगल रिसॉर्ट रहायला छान आहे पण तुम्ही मेरिएटमधेच रहाणार असाल तर तेही लांबच पडेल. तेव्हा प्रवासात जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा एका दिवसात टूरने जे दाखवतील ते पाहून घ्या किंवा मिरामार कोलवा कलंगुट वगैरे बीचेसवर मजा करा!

तुम्ही जे ऑथेंटिक गोव्याचं जेवण म्हणताय ते जरा कठीण आहे. मार्टिन्स कॉर्नर वगैरेसारख्या ठिकाणी जे मिळतं ते पोर्तुगीज किंवा पोर्तुगीज संस्कार झालेलं ख्रिश्चन पद्धतीचं जेवण असतं. त्यातल्या बीफ आणि पोर्कच्या वापरामुळे तसंच व्हिनेगर वगैरे असल्यामुळे गोव्यातले हिंदू लोक आयुष्यात कधीही त्या दिशेने पहातही नाहीत. जर ती टेस्ट डेव्हलप केलेली असेल तर ठीक आहे. पण चोरीसां किंवा सोर्पोटेल खाऊन एखाद्या प्रियोळकराच्या घरात गेलात तर तुम्हाला पडवीत बसवून ठेवतील आणि आंघोळ करून मग घरात घेतील.

खरं जे शाकाहारी किंवा मांसाहारी गोव्यातलं जेवण आहे म्हणजे पातोळ्या, मडगणे, कडधान्याचे रोस, आंब्याचं सासव, कुवोळ, नीरफणसाचे काप, डाळीतोय, सोलकढी, माशांमधे आंबशे-तिखशें, उडीदमेथी, हुमण, तळलेले मासे, किसमूर इ. पदार्थ तुम्हाला अशा फाईव्ह स्टार हॉटेलात कधीही मिळणार नाहीत. त्याच नावाचे पदार्थ असले तरी चव काही वेगळीच असेल. असलं जेवण तुम्हाला एखाद्या गोंयकाराच्या घरातच मिळेल किंवा एखाद्या आडरस्त्यावर खानावळीत. तेव्हा त्याच्या जास्त अपेक्षा ठेवू नका! बाकी तुमच्या ट्रीपला शुभेच्छा!

अँग्री बर्ड's picture

25 Apr 2012 - 10:03 am | अँग्री बर्ड

खुपच छान.. तुमच्या प्रतिसादाची प्रिंटच काढुन घेतली आहे. धन्यवाद ताई. ह्या माहितीचा फिरताना चांगला उपयोग होईल.

योगप्रभू's picture

25 Apr 2012 - 11:32 pm | योगप्रभू

<< खरं जे शाकाहारी किंवा मांसाहारी गोव्यातलं जेवण आहे म्हणजे पातोळ्या, मडगणे, कडधान्याचे रोस, आंब्याचं सासव, कुवोळ, नीरफणसाचे काप, डाळीतोय, सोलकढी, माशांमधे आंबशे-तिखशें, उडीदमेथी, हुमण, तळलेले मासे, किसमूर इ. पदार्थ तुम्हाला अशा फाईव्ह स्टार हॉटेलात कधीही मिळणार नाहीत. त्याच नावाचे पदार्थ असले तरी चव काही वेगळीच असेल. असलं जेवण तुम्हाला एखाद्या गोंयकाराच्या घरातच मिळेल किंवा एखाद्या आडरस्त्यावर खानावळीत. >>

१) लाळ सांडली कीबोर्डवर... पैसाताई दुष्ट आहेत...
२) म्हापश्याला अनेक खानावळी आहेत जिथे एथनिक टेस्टचे खास गोमंतकीय जेवण मिळते. स्थानिक लोक सांगतात.
३) या पदार्थांवर सविस्तर लिहिले असेल तर कृपया लिंक द्या. नसेल तर लिहा.

पैकाकू नीरपणसाचे काप, नीरपणसाचे काप सतरांदा लिहीत्येस. एकदा ते काय असतं त्याची रेशिपी नको निदान फोटो तरी टाक. :)

नेत्रेश's picture

25 Apr 2012 - 6:00 am | नेत्रेश

http://www.mumskitchengoa.com/

Mum's Kitchen - अतीशय सुंदर, चवदार आणी अस्सल गोवन. थोडे महाग वाटु शकते, पण गोवा मॅरीअ‍ॅट मध्ये रहाणार्‍यांसाठी नक्कीच महाग नाही.

बंडा मामा's picture

25 Apr 2012 - 6:53 am | बंडा मामा

अरे बापरे...विमानाने जाणार आणि फायु स्टार हॉटेलात राहणार म्हणजे मोठेच साहेब दिसताय. आम्ही एस्टीने गेलो होतो पणजीला तिथली हॉटेले महाग म्हणून मडगावात राहिलो होतो. तुम्हाला आम्ही काय सुचवणार. गवि वगैरेंसारखी श्रीमंत ठिकाणे काय माहित नाही ब्वा!

आपला गरीब
बंडा मामा

गवि's picture

25 Apr 2012 - 7:51 am | गवि

हॅ हॅ हॅ. गैरसमज हो मामा.
अनेक वर्षे मी यूथ हॉस्टेल गोवा या ठिकाणच्या निवासात 20 रुपये प्रति बेड डॉर्मिटरीत राहात असे.
मग तिथेच 120 ला रूम.
गतवर्षीच्या ट्रिपेस कोलवा बीचजवळ 1000 प्रतिदिन दराचे हॉटेल मिळवले होते. आजच्या दराने हे अतिस्वस्तच म्हणायचे की.
बाकी सर्व प्रकारच्या हाटेलीत अनुभव म्हणून वेळोवेळी राहिलो आहे. पण पंचतारांकित मात्र हपीसच्या कारणानेच.

-(चिकट कोंकणी) गवि

अँग्री बर्ड's picture

25 Apr 2012 - 10:09 am | अँग्री बर्ड

छान माहिती आणि फोटो दिल्याबद्दल गविंचे आभार. बाकी बंडामामा, ऑफिस फायनान्स करते आहे म्हणून तर सगळे चालले आहे ना. एरवी मी कणकवलीचा, गोव्यात राहणे परवडत नाही म्हणून पहाटे गाडीवरून गोव्याला निघायचे, २ तासात गोवा, मग काय दिवसभर इकडे तिकडे फिरून संध्याकाळी परत घरी. पण त्याला आता ४ वर्षे झालीत, कुठे फिरलो ह्याचे नेमके डिटेल्स आठवत नाहीत
म्हणून हा काथ्याकुट. असो, सर्वांचेच आभार.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Apr 2012 - 10:50 pm | निनाद मुक्काम प...

आयता हा धागा आणि प्रतिसाद माझ्या तावडीत सापडले. आता त्यांची जपवणूक केली की पुढेल भारतभेटीचा बंदोबस्त झाला.
गावी गोव्यातील खादाडी ह्या नावाने एक लेखमाला येउच दे त्यात गोव्यातील गमती जमती पण येऊ दे.
अवांतर आखतात चिकन शोर्मा मिळतो तुर्की लोकांमुळे जर्मनी आणि मग युके व युरोपात लोकप्रिय झालेला कोवळ्या लुसलुशीत मटणाचा शोर्मा आणि त्याची चव अजूनही तोंडाला पाणी सुटते. आठड्यातून एकदा तरी खाऊन होतो.
साडे ३ युरोमध्ये भरपेट जेवण अजून काय पाहिजे