गुंतवणु़कीच्या काही योजना खरच बोगस आहेत का?

निश's picture
निश in काथ्याकूट
18 Apr 2012 - 5:19 pm
गाभा: 

दोन तीन दिवसाआधी लोकसत्ता च्या पहिल्या पानावर एक बातमी आली होती की भरमसाठ लाभाची गुंतवणुकीवर हमी देणार्‍या योजनांची बाजारात भरमार झाली आहे व त्यातल्या बहुतेक सगळ्या बोगस आहेत म्हणुन.
त्यात ट्वींकल म्हणुन ही गुंतवणुक योजनेच बोगस म्हणुन नाव आल होत. अश्या अजुनही काही योजना असतिल ज्या लोकाना भरपुर लाभाची हमी देउन लोकांना फसवीत असतील.

मुळात ह्या अश्या योजनांवर R B I स्वताहुन कारवाई का करत नाही ? लोकांचे पैसे डुबायची का वाट बघत?

R B I ची अश्या योजनाबद्दल नक्कि नियमावली काय आहे?

अजुन कोण अजुन लोक असतील जे अश्या गुंतवणुक योजनांमध्ये पैसे गमावलेले आहेत ते त्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दल सांगतिल का? जेणे करुन भविष्यात अश्या योजनांमध्ये लोक गुंतवणुक करुन आपले पैसे गमावणार नाहीत.

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

18 Apr 2012 - 5:58 pm | सर्वसाक्षी

अधिक फायद्याच्या गुंतवणुकीचे काय घेउन बसलात, लोक नायजेरीयन फसवणुकीलासुद्धा अजुनही बळी पडत आहेत. 'जुना वाडा पाडताना बिस्किटे मिळाली आहेत, स्वतात देतो' असे सांगणार्‍यांवर विश्वास ठेवुन लोक 'अस्सल सोने' विकत घेतात. किमान लोभापायी भरमसाठ परतावा देउ करणार्‍या योजना/ कंपन्यांमध्ये पैसा गुंतवताना इतका विचार केला की "जर बँका १५ टक्क्याने कर्ज देतात तर हे गुंतवणुक कंपनीवाले मला॑ ५० वा १००% मोजायला का तयार आहेत?" तर फसवणुक टळेल.

आर बी आय, सेबी वगैरे कडुन फारशा अपेक्षा ठेवु नका. फसवणुक करणार्‍या कंपन्यांवर सगळं झाल्यावर कारवाई होते पण प्रतिबंधात्मक कारवाई शक्यच नाही. धुम्रपानावर बंदी आणणारे शासन उत्पादन का बंद करीत नाही? लाउड स्पिकर मोठ्या आवाजात लावणे वा रात्री दहा नंतर लावणे जर कायद्याने अपराध आहे तर मुळात लाउड स्पिकरचा व्यवसाय करण्यावर निर्बंध का नाहीत?

पोलिस जनतेला सांगतात व पत्रकेही लावतात की हल्ली मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार घडत आहेत तरी नागरीकांनी सावधता बाळगावी; घरफोड्या होतात तेव्हा घरात पैसे/ दागदागीने ठेवु नयेत, रात्री लुटण्याचे प्रकार घडतात तेव्हा अपरात्री भटकु नये.

तात्पर्यः - तुम्ही सावध असलात म्हणजे त्यांना बिचार्‍यांना त्रास होणार नाही. सावध राहा.

सर्वसाक्षी साहेब, तुम्ही १००% खर बोललात...

खरच एकदम सहमत

मन१'s picture

18 Apr 2012 - 8:34 pm | मन१

प्रतिसादाच्या मतितार्थाशी सहमत.

चौकटराजा's picture

18 Apr 2012 - 6:41 pm | चौकटराजा

निश हा काय धागा तू घेऊन आला आहेस ? हे आपल्या पार डोक्यावरून जातं गड्या ! मालवणीचो वर्गो चे काय झाले ? निदान लिंक तरी ?
तुला लिहिता पाहून बरे वाटले !

चौकटराजा साहेब, हा धागा देण्या मागे एक कारण आहे...

आम्हाला लहान पणापासुन सांभाळ करायला एक ताई यायची आता ती माझ्या भावाच्या मुलीला सांभाळते कधि कधि. तिचि परिस्थिती अतिशय गरिब आहे. तिचा मुलगा चांगला शिकला आहे व एका कंपनीत नोकरी करतो आहे. घरची गरीबी म्हणुन वर कमाई व्हावी म्हणुन तो वर उल्लेख केलेल्या ट्वींकल योजनेत काम करायच म्हणुन जात होता.

जेव्हा मी लोकसत्ता मध्ये ही बातमी वाचली व तेव्हा मला एकदम तो डोळ्या समोर आला. त्याचा सारखा अजुन कोणी ह्यात फसु नये म्हणुन हा धागा काढला..

मालवणीचो वर्गो चे काय झाले ? तर ते तर माका आता परत चालु करुचे असत.

अव्यक्त's picture

18 Apr 2012 - 9:08 pm | अव्यक्त

१०/१५ वर्षापूर्वी माझ्या आईने संचयनीत पैसे गुंतवले होते, कारण आमच्या नात्यातले एक स्नेही agent होते. जवळ जवळ २०/२५००० रु गुंतवले असतील... संचयनी बुडाली आणि आमचे पैसेही...कोणाला काही माहिती आहे का? संचयनीविषयी..ते गुंतवलेले पैसे मिळण्याचे काही आशा..सविस्तर माहिती कळवावी...

माझ्या ताईचेपण पैसे त्या संचयनी मध्ये होते. संचयनी गोत्यात आहे हे समजल्यावर मी तात्काळ त्यांच्या ऑफीसमध्ये गेले होते तर तिथल्या मैडम 'आमची संचयनी कित्ती चांगली आहे अन बाळा, लोक्स उगाच गैरसमज पसरवतात लक्ष देवू नकोस' वगैर बतावण्या करु लागल्या. अन मी जेव्हा पैसे काढायचे म्हणताच एक जास्तीचा हफ्ता भरावा लागेल अश्या म्हणाल्या मग मी ते पैसे एक जास्तीचा हप्ता भरुन सर्व पैसे काढून घेतले (जास्तीच्या हफ्त्यासकट) अन ताईला दिले.
(तेव्हा मला सर्वांनी उगाच जास्तीचा हप्ता भरु नको म्हणून सांगीतले पण मग मी ती रिस्क ताईसाठीघेतली होती. नशीब पैसे मिळाले. )

स्पिक एशिया पण असेच आहे का ?

वाहीदा जी, स्पिक एशिया पण असेच आहे.

स्पिक एशिया च्या वर पोलिस तथा R B I ने कारवाइ चालु केली आहे.

स्पिक एशिया पण बोगस आहे. भारतात उद्योग धंदा चालु करण्या साठी लागणारे परवाने पण त्यांच्या कडे नव्हते.

वाहीदा's picture

19 Apr 2012 - 7:38 am | वाहीदा

संचयनी डायरेक्टर ला अट्क अन पोलिस कोठडी :
http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-09-06/pune/27301613_1_p...

संचयनी तक्रार :
http://www.consumercomplaints.in/complaints/sanchayani-saving-amp-invest...

पण या अश्या लोकांना हे असे बिझनेस करण्याचे लायसंन्स सरकार कसे काय देते ? काही नॉर्म्स नाहीत का आर बी आय कडून ?

रक्कम घेणारा, व्याजाच्या स्वरूपात काही काळ फक्त तुमचं भांडवलच परत करत असतो.

या काळात त्याला दोन गोष्टी साधायच्या असतात, एक म्हणजे आणखी गुंतवणूकगारांकडून भांडवल जमा करायचं असतं आणि तुम्ही आधीच गळाला लागलेले असल्यानं तुम्ही देखील अधिक गुंतवणूक करण्याची शक्यता असते.

तस्मात, `हाय रिटर्न हाय रिस्क' हे नेहमी लक्षात ठेवा आणि `भांडवल सलामत तो रिटर्नका चान्स' (नही तो भांडवलच गुल!) हे पण लक्षात ठेवा म्हणजे तुमची कधीही फसवणूक होणार नाही.