पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपुर्ण होउ पहात असलेला उद्योग आहे.भारतातही हा उद्योग चांगलाच जम धरतोय्,मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत पर्यटनउद्योगात उदासीनता मोठ्या प्रमाणात आढळुन येते.
वास्तविक महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड विविधता आहे. मात्र आपले पर्यटन विषयक धोरण फक्त अजिंठा वेरुळ,माथेरान,महाबळेश्वर इथ पुरतेच मर्यादित आहे की काय अशी शंका येते.
खरे तर ऐतिहासीक दृष्टीने विचार करता आपल्याकडे पर्यटनाला मोठा वाव आहे, महाराष्ट्रातील गडकील्ले ही महाराष्ट्राची मोठी संपत्ती आहे,कोकण चा नितांत सुंदर व स्वच्छ सागर किनारा ही आपली पर्यटनातली मोठि पर्वणी ठरु शकते.धार्मिक पर्यटन तर आपल्याकडे आहेच .मात्र तरीही पर्यटनाच्या माध्यमातुन सरकार च्या तिजोरित तसेच मराठी माणसाच्या रोजगारात फारसा फरक पडताना दिसत नाही.
महाराष्ट्राच्या भुमी मध्ये ऐतिहासीक खुणा दाखवनारी अनेक ठिकाणे आहेत रुढ अर्थाने सर्वांना माहिति असलेली ठिकाणे सोडली तरी अनेक गड किल्ले ज्या ठिकाणी मराठ्यांच्या लढाया झाल्या ती ठिकाणे ऐतिहासीक वाडे,गढ्या,पुरातन वास्तु याचा इथे सुकाळ आहे.
इथे बर्याच लोकांना असे वाटु शकेल,की कशाला लोकंना माहीत नसलेल्या अनवट जागा दाखवायच्या?
त्या जागांवर लोक फारसे जात नाही तिथेच त्या जागेच ऐतिहासीक महत्व टिकुन राहत.या आक्षेपातहि निश्चीत तथ्य आहे कारण ज्या किल्ल्यांवर जायला रस्ता आहे तिथली अवस्थ आज काय आहे हे सर्वांनाच माहीती आहे,तिथे जाणारे पर्यटक (काही सन्माननीय अपवाद वगळ्ता)तिथे मद्यपान,ध्रुमपान करुन वातावरण दुषीत करताना दिसतात,पण तरीही हा पर्याय योग्य वाटत नाही ,कारण एक मराठी माणुस म्हणुन ती आपली जबाबदारी आहे लोकांना प्रबोधीत करण्याची. .आपल्या स्थानिक इतिहासावर आपण प्रेम केले तर मला वाट्ते हे निश्चीत अवघड नाही
माझ्या मते याला कारणीभुत असणारी बाब म्हणजे पर्यटनाकडे अजुनही आपण ए़क उद्योग म्हणुन पाहत नाही,सरकारची उदासीनता तर याला कारणीभुत आहेच .
सर्व मिपाकरांना एक प्रश्न : महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या बाबतीत सध्या दोन मतप्रवाह आहेत १.पर्यटकांना अशा अनवट जागांवर जाण्यास सोयी कराव्यात/करु नयेत...... तुम्हाला काय वाट्तं....?
(सदर विषयावरील धागा जर अगोदर आला असेल तर कृपया संपादकांनी हा धागा काढुन टाकावा)
प्रतिक्रिया
15 Apr 2012 - 9:22 pm | मन१
मराठी माणूस उद्योगात मागे का
असा खरेतर प्रश्न असायला हवा प्राध्यापकसाहेब.
पुणेकर बनू पाहणारा
15 Apr 2012 - 9:55 pm | प्राध्यापक
नाही हो मनोबा .......
मराठी माणूस उद्योगात मागे नाही..
उदाहरणादाखल कितीतरी मराठी उद्योगपतींची नावे देता येतील्,माझा प्रश्न पर्यटन उद्योगाबाबत आहे.
काय करुन राहीले राव तुम्ही? धाग्या ला अशाने भलतेच वळण लागेल ना?
15 Apr 2012 - 11:32 pm | JAGOMOHANPYARE
देवळं आणि पडके किल्ले याच्यापलीकडे म्हाराष्ट्रात बघण्यासारखं आहे तरी काय? दक्षिणेकडे हिरवे रान असते, शिल्पकलेची देवलं, नावेतली घरं, उत्तरेत जंगलं, हिमालय, डोंगर, काश्मीरमध्ये शिकारा... महाराष्ट्रात काय आहे?
16 Apr 2012 - 7:12 am | रेवती
फिरण्याची फारशी आवड नसल्याने असेल पण मला माहीत नाही की महाराष्ट्रात नक्की काय किंवा काय काय आहे. गड, किल्ले पहायला गेलं तर कधी अस्वच्छता, कधी पर्यटकांसाठी लागणार्या सोयी नसणे, गडांची दुरुस्ती झालेली नसणे असे बरेच वर्षापूर्वी वाटले. कोकणात नुकतीच जाऊन आले तर काही ठीकाणी जेवणाची सोय बरी होती. अगदी वाईट असे काही नव्हते. तरी काही मुद्दे आहेत, पण जाऊ दे.
16 Apr 2012 - 1:16 pm | गवि
असे मोघम नको. काय आहेत ते कोंकणाविषयीचे मुद्दे...? सडेतोडपणे मांडा कृपया..
16 Apr 2012 - 7:45 pm | रेवती
मोघम काय आहे?
जाणवणार्या गोष्टी आहेत पण सगळीकडेच ती गैरसोय आहे.
स्वच्छतागृहांची सोय कुठे आहे तर कुठे नाही.
जे लोक सोय असलेल्या ठिकाणी जातात ते ही गोष्ट मान्य करीत नाहीत पण जे लोक गैरसोय असलेल्या ठिकाणी जातात त्यांना प्रश्न येतो. मग सोय आहे म्हणावे की नाही? याचे उत्तर ५०% असे (समजा) दिले तर ते मोघम वाटावयास नको कारण ती वस्तूस्थिती आहे. गणपतीपुळ्याला सरकारने वेगवान होडीची सोय केलिये पण ते फक्त खाडीतूनच फिरवून आणणार म्हणतात. तिथेच जी खासगी सोय आहे ते मात्र समुद्रात नेतात. आता जर एवीतेवी सोय आहेच तर सरकारने समुद्रात नेण्यास काय हरकत? पण सोय मात्र 'आहे'. मग यावर खूष व्हावे की नाखूष? काहीजण म्हणतील की पूर्वी एवढेही नव्हते. आता तक्रारी कशाला? पण ज्यावेगाने आणि व्यवहार्य पद्धतीने हा व्यवसाय म्हणून वाढायला हवा तेवढा वाढत नाही. सरकारी निवासस्थाने असोत की खासगी (खासगीचा मला अनुभव नाही) पण स्टाफ हा प्रशिक्षित असावा असे वाटते. या बाबतीत मला स्वत:ला आलेला अनुभव सौजन्यपूर्ण नव्हता. काहीजणांना त्याच ठिकाणी मात्र चांगला अनुभव आला होता. जेवणाखाण्याच्या बाबतीत त्यामानाने बरा अनुभव होता. त्याबाबतीत एक उपहारगृह नाही तर दुसरे असे आपण निवडू शकतो पण निवासस्थानाच्याबाबतीत तसे दरवेळी करता येईलच असे नाही. ऐकीवात आल्यानुसार पुळ्याचा किनारा खूपच घाण (लोकांमुळे) असतो पण मी गेले त्यावेळी तर स्वच्छ होता. म्हणजे इथेही तुम्ही नक्की सांगू शकत नाही. ज्यांनी घाण अनुभवलेली आहे ते नावे ठेवणार तर मी नाही ठेवणार कारण मी तसे पाहिले नाही. यामुळे मोघम असे नाही पण पटकन नावे ठेवणे योग्य नाही म्हणून माझे मत दिले नव्हते (जे आता दिले.).
याशिवाय नको तिथे परदेशी गोष्टींचे अनुकरण करताना अनेकजण दिसतात पण जिथे शक्य आणि परवडण्यासारख्या अनुकरणीय सोयी सरकारने का देऊ नयेत? आपल्याकडे गड, किल्ले, किनारे प्रेक्षणीय आहेतच पण ते सोयीचे केल्यास नक्कीच जास्त पर्यटक भेट देऊ शकतात. किल्ल्यांची डागडुजी तर ते पर्यटन स्थळ आहे की नाही हा विचार न करता व्हावीच. आता अजून यापेक्षाही जास्त सुचवता येईल पण ते राहू दे.
17 Apr 2012 - 12:59 pm | गवि
नाही हो आज्जी... मोघम या शब्दावर विशेष जोर नव्हता. एकूण उद्देश असा की आमच्या कोंकणाविषयी काय मत झालं ते, विशेषतः त्यातल्या उण्या बाजू मुद्देसूद / नेमक्या जाणून घ्याव्यात.
म्हणून आपलं म्हटलं की काय अनुभव आले त्यातले काहीसे न आवडलेले अनुभव "सोडून देऊ" पेक्षा जाणून घेऊ. इतकंच..
16 Apr 2012 - 11:38 am | अमृत
महाबळेश्वर, अजिंठा- वेरूळ, कोकण, ताडोबा, माथेरान, चिखलदरा, प्रसिद्ध तीर्थक्षेत्रं उदा. शिर्डी, ज्योतिर्लींग, कोल्हापूर इ. इ. विसरलात की...
अमृत
16 Apr 2012 - 8:03 am | मदनबाण
रस्ते नसलेल्या राज्यात पर्यटन कसे काय विकसीत होणार ?
16 Apr 2012 - 8:30 am | सहज
गेल्या काही वर्षांपासुन इको-टुरिझम नामक प्रकार जो शेतकर्यांना पर्यटन हा पूरक व्यवसाय म्हणून उपलब्ध झाला आहे. लगेच दुवा सापडत नाही आहे पण पुण्यात अश्या सल्लागार संस्था आहेत ज्या शेतकर्यांना हा धंदा उभारायला मदत करतात. शासन यात मदत करते, शासनाचा नक्की रोल मला आत्ता माहीत नाही.
सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात स्थानीक (भारतीय) व विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढच होताना दिसते. विशेषता परदेशी पर्यटक महाराष्ट्रात यायचे प्रमाण जास्त दिसते.
तुम्ही एम टी डी सी चे संकेतस्थळ पाहीले असेलच, गुहा, गुंफा, समुद्रकिनारे, मंदीर, जंगल, गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे इ इ सर्वच ठिकाणी सोयी आहेत.
पर्यटन व सांस्कृतिक असे एक स्वतंत्र खाते आहे. त्यांच्या अधिकृत संस्थळावर पर्यटन धोरण तसेच योजनांची माहिती आहेच. मला तरी, सरकार तितके उदासीन आहे असे वाटत नाही. अर्थात सरकार जितका पैसा यात ओतत आहे त्याप्रमाणात वसुली होत आहे का याकरता माहिती अधिकाराचाच वापर करावा लागेल व जर हा पैसा फक्त खर्चच होत असेल तर अजुन किती काळ हा असा पैसा जाउ देणार? सरतेशेवटी सरकार किती करणार? सरकारकडे तेवढा निधी उपलब्ध करुन दिला तरी मग त्याचा विनियोग नेमका कसा व किती हाही चर्चाविषय जनतेत प्रिय आहेच!
16 Apr 2012 - 10:56 am | अमृत
या अहवालात उपलब्ध आहे. पण हे आकडे पटण्यासारखे नाहीत. टॉप १० आंतरदेशीय पर्यटक राज्यांच्या कृमवारीत केरळ कसा काय गायब आहे ते कळत नाही. तसेच आंध्र प्रदेश हे तिरूपती आणि पुट्टपर्थी या दोन धार्मिक स्थळांमूळेच अग्रणी आहे यात वाद नाही. तसेच अंतरदेशीय पर्यटनात माहाराष्ट्राचा वाटा २८% दाखवला गेला आहे ज्याचे एक कारण पर्यटक भारतात येताना मुंबईत आधी उतरतात हे असू शकेल. प्रथम १० आंतर्देशीय पर्यटन स्थळांच्या यादीत अजिंठा आणि बीबी क मकबरा असलेत तरी विदेशी पर्यटकांअना मात्र त्याचे जास्त अप्रूप नाही हे सिद्ध होतं.
आणखी बरीच माहीती या अहवालात मिळेल.
अमृत
16 Apr 2012 - 11:06 am | ५० फक्त
कुणाच्या ?
16 Apr 2012 - 12:05 pm | सस्नेह
पर्यटन स्थळांची कमतरता नसूनही महाराष्ट्र पर्यटनात मागे आहे हे अगदी खरे आहे. यांची कारणे माझ्या मते पुढीलप्रमाणे असावीत.
१. प्राचीन गडकिल्ले, लेणी इ. ठिकाणे स्वच्छ व संरक्षित नाहीत. शासनाने या ठिकाणी सुरक्षा, स्वच्छता व देखभालीची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
२. पर्यटन स्थळांचे रस्ते सुमार दर्जाचे आहेत.
३. पर्यटन स्थळांचे सुलभ नकाशे उपलब्ध नाहीत.
४. पर्यटन स्थळांचे गावात राहण्याची व जेवणाची चांगली सोय नाही.
५. शासकीय वाहनांची उच्च दर्जाची वाहतूक व्यवस्था नाही.
६. प्रसिद्धीची कमतरता.
कर्नाटकात शासनाने अगदी लहानात लहान पर्यटन स्थळामध्ये सुद्धा बागा , कुंपणे व रक्षकांची व्यवस्था केली आहे. तसेच मूळ स्थानाला कुशल सजावटीची योजना केल्यामुळे प्राचीन अवशेषांचे सौदर्य खुलून दिसते. कर्नाटकात बाकी रस्ते कसेही असले तरी पर्यटन स्थळांचे रस्ते मात्र ए क्लास आहेत. तसेच या ठिकाणी चांगल्या दर्जाची हॉटेल्स वाजवी दारात उपलब्ध आहेत. शासकीय बसेससुद्धा खाजगीच्या बरोबरीने आरामशीर आहेत. वाहतूक दरही कमी आहेत. या सगळ्यामध्ये कर्नाटक शासनाचा सहभाग असल्यानेच हे शक्य झाले आहे.
16 Apr 2012 - 4:58 pm | चिरोटा
कर्नाटक सरकारने हुशारीने महाराष्ट्र,आंध्र,केरळ ह्या राज्यांतल्या पर्यटन स्थळांशी स्वतःच्या वॉल्वो गाड्या जोडलेल्या आहेत. मुंबई-शिरडी 'शिवनेरी' आहे की नाही माहित नाही पण बेंगळूर्-शिरडी,बेंगळूर-तिरुपती अशा वॉल्वो गाड्या आहेत. कर्नाटकातली बरीचशी पर्यटनस्थळे स्वच्छ्, लोकांकडून कमीत कमी फसवणूक होणारी आहेत.
16 Apr 2012 - 1:07 pm | चिरोटा
औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शासनाने जो राज्याच्या पर्यावरणाचा बॅन्ड वाजवला त्यामुळे पर्यटन क्षेत्रात राज्य मागे पडले. केरळ्,आंध्र,कर्नाटक,तामिळनाडुच्या तुलनेत महाराष्ट्र चांगलाच पिछाडीवर आहे.
वर म्हंटल्याप्रमाणे रस्ते,राहण्याच्या सोयी,खाद्यसेवा ह्या सगळ्याच बाबतीत सुधारणा अपेक्षित आहेत.
किल्ल्यांच्या ईतिहासात प्रत्येक पर्यटकाला स्वारस्य असेलच असे नाही.
16 Apr 2012 - 1:19 pm | गवि
प्रश्न उत्तम आहे आणि ही सत्यपरिस्थिती आहे. प्रथमदर्शनी असं का व्हावं (पक्षी: टुरिझमची अवस्था वाईट का असावी / व्हावी) हे कळत नाही. पण ती तशी आहे हे खरं.
वाचतो आहे. अधिक चर्चा / कारणे वाचायला आवडतील..
17 Apr 2012 - 12:22 pm | यकु
महाराष्ट्र पर्यटनात मागे का?
आणि का मागे?
हे दोन वेगळे विषय आहेत ना हो गवि? :p
;-)
17 Apr 2012 - 12:33 pm | गवि
हॅ हॅ हॅ.. एकदम बरोबर.... :)
16 Apr 2012 - 1:50 pm | ऋषिकेश
पर्यटन म्हंजे काय अपेक्षित आहे?
सध्या असलेल्या पर्यटन स्थळांकडे पाहिलं तर केवळ भरपूर हॉटेले, स्थानिक पदार्थाच्या नावाखाली होणारी फसवणूक, रात्री-अपरात्री रस्त्यावरून टुन्न होऊन फिरणार्या तथाकथित 'पर्यटकांचे' जत्थे, माणसांपेक्षा कित्येक पटीने बोकाळलेल्या प्लॅस्टीक पिशव्या, मागे लागणारे एजंट्स, गाईड्स, फसवणारे रिक्षावाले वगैरे वगैरे याव्यतिरिक्त फारसे काही दिसत नाही
16 Apr 2012 - 7:44 pm | जयंत कुलकर्णी
+११११
16 Apr 2012 - 8:02 pm | पैसा
पर्यटनाच्या विकासाच्या नावावर गणपतीपुळे आणि आंबोलीचा माझ्या डोळ्यादेखत सत्यानाश झालाय. गणपतीपुळ्याचं ते कौलारू देऊळ गेलं म्हणून वाईट वाटतंच, पण पाण्यातले खेळ वगैरेसाठी येणार्या कितीजणाना गणपती म्हणून हिरवाईने भरलेल्या डोंगराला पाखाडीने प्रदक्षिणा घालतात हे माहिती आहे?
आंबोलीसुद्धा एकेकाळी पेट्रोल मिळत नाही, म्हणून रिक्षा नाहीत अशा अवस्थेत पाहिलय. तिथल्या मातीच्या रस्त्यावरून पायी मजेत भटकलेय. आता ठिकठिकाणी दारू पिऊन बेहोश झालेले "पर्यटक" दिसतात म्हणे! जायची इच्छासुद्धा होत नाही.
16 Apr 2012 - 8:09 pm | रेवती
ठिकठिकाणी दारू पिऊन बेहोश
त्यामुळे ते फारसे सुरक्षितही नाही असे आवर्जून सांगितले जाते.
उगीच नको त्या आठवणी घेऊन घरी परत येणे तर वाईटच.
आता या परिस्थितीचा दोष कोणाला द्यायचा?
शेवटी सरकारने तरी किती ठिकाणी गस्त ठेवायची?
16 Apr 2012 - 3:04 pm | सर्वसाक्षी
कुणाला पडली आहे पर्यटनाची? मंत्री आपली खुर्ची शिल्लक आहे तोवर छापायचे या ध्येयाने पछाडलेले. रस्ते नाहीत. पाण्याची बोंब, अविकसीत प्रेक्षणीय स्थळे/ गड/ मंदिरे, चांगली हॉटेल्स नाहीत. पर्यटनस्थाळाला अत्यावश्यक अशी स्वच्छातागृहे तर खिजगणतीत नाहीत. अनेक तास प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी देहधर्म कुठे उरकावा? कुठेही गेले तरी असे दिसुन येते की प्रवासी मुख्य स्थळाआधी 'त्या' स्थळाला भेट देतात. एम टी डी सी ची हॉटेल्स वा रिसॉर्टस म्हणजे अर्धे अधिक मोडके तोडके - बांधल्यापासुन नुतनीकरण नाही. दर पाच वर्षांनी नुतनीकरण केले नाही तर प्रवसी येत नाहीत हा हॉटेल व्यवसायाचा नियमच आहे.
आपले चांगले काय व कसे हे जगाला सांगण्याची गरज शासनाला वाटत नाही. महत्व हे निर्माण करावे लागले. "इथे आहे काय? ते पडके किल्ले?" असे विचारणारे पर्यटक इतर देशात साम्राज्यांचे आणि संस्कृतिचे अवशेष पाहायला आवर्जुन जातात. इजिप्तमधली पडकी मंदिरे आणि प्रासाद पाहताना खूप वाईट वाटले की आमच्या रायगड-प्रतापगडाला आम्ही असे महत्व का दिले नाही? तिथे सोयी केल्या नाहीत की लोकांना आकर्षित केले नाही. भारतातल्या इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र पर्यटनाच्या जाहिराती दूरदर्शनवर, एफ एम वर दिसत/ ऐकु येत नाहीत. गुजरातची स्तुती करायला आणि पर्यटकांना गुजरातची महती सांगायला मोदीसाहेब अमिताभला करारबद्ध करतात, आपण काय करतो? उत्तरपूर्व, मध्यप्रदेश,काश्मिर यांच्या मानाने आपला आवाज वा प्रतिमा अजिबात नाही.
हरहमेश परदेशी फिरणार्या मंत्र्यांना बाहेरच्या देशातले चांगले काहीच घ्यावेसे का वाटत नाही. प्रत्येक गोष्ट करायला अफाट पैसे लागतात असे नाही तर केवळ कल्पकता आणि इच्छाशक्ति लागते. इजिप्त मध्ये प्रत्येक स्मारकाच्या प्रवेशालगत त्या संपूर्ण स्मारकाची प्रतिकृती व कुठे काय पाहायचे याचे मार्गदर्शन असते. ही प्रतिकृती काचेने बंदिस्त केलेली असते. हे करायला करोडो रुपये नक्कीच लागत नाही.
16 Apr 2012 - 3:17 pm | नितिन थत्ते
सहमत आहे. विशेषतः इतरत्र बरेच लोक पडके अवशेषच पहायला जात असतात याबाबत.
एक शंका आहे (सर्वसाक्षींच्या म्हणण्याबद्दल नाही).
आपल्याकडे गडकिल्ल्यांची व्यवस्था नीट का नाही? या प्रश्नाचे उत्तर "गडकिल्ले पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असतात त्यामुळे राज्यसरकारला* तेथे डागडुजी (आणि इतर गोष्टी) करता येत नाहीत". असे मिळाले होते. ही अडचण अन्य राज्यांमध्ये येत नाही का?
*किंवा शिवप्रेमींना करायची असली तर त्यांनाही करता येत नाही.
16 Apr 2012 - 10:32 pm | रमताराम
विशाळगड (तोच तो बाजीप्रभूंच्या कथेशी जोडलेला) नि प्रतापगड जाऊन पहा एकदा. गड नावाचं काही अस्तित्वात नाही तिथे. गडावर मस्त इन्टरलॉकिंग ब्लॉकचे रस्ते आहेत. दुकानांच्या रांगा आहेत. दुमजली भक्कम आरसीसी स्ट्र्क्चरची घरे आहेत. (गडाच्या दुरुस्तीला परवानगी नाही पण ही घरे कशी बांधली, तर म्हणे हे गड खाजगी मालकीचे आहेत) पन्हाळ्यावर आहे तसे तारांकित हॉटेल तेवढे नसावे, निदान मला दिसले नाही. दुकानातून बार्बी डॉलपासून पिशव्या, फोटो, बॉक्स कॅमेरा काय वाट्टेल ते मिळते. फक्त फोटो काढायचे कशाचे हा प्रश्न पडतो. गडावर बेसुमार माणसेच माणसे. एक मुख्य दरवाजा वगळला तर पूर्ण गड फक्त दुकाने, घरे नि देवळे... आणि हो दर्गेही... यांनी गच्च भरलेला. चार्-दोन भिंती ज्या काय शिल्लक असतात त्यावर या पर्यटकांच्या प्रेमकहाण्या अमर झालेल्या दिसतात. काय डोंबलं इतिहास समजणार इथे. चार-चव्वल घेऊन तथाकथित गाईड्स तोंडाला येईल ते फेकत असतात नि हे 'पर्यटक' भक्तिभावाने ऐकतात, त्या गाईडचा फोटो काढतात नि फेसबुकावर टाकतात. हे राम.
आमच्या मते एकाद्या ब्रिगेडने या सार्या गडांकडे जाणारे डांबरी रस्ते बॉम्बने उडवून द्यावेत, खणून काढावेत नि (दुर्दैवाने काही गरीबांचा रोजगार जाईल हे ठाऊक असूनही) तिथल्या सार्या दुकानांवरून नांगर फिरवावेत अशी तीव्र इच्छा आहे. अस्मितेचा बाजार म्हणजे काय ते इथे पाहता येईल.
आगाऊ क्षमा मागून म्हणावेसे वाटते 'पर्यटनाच्या आईचा घो'.
16 Apr 2012 - 7:16 pm | प्राध्यापक
एकदम सहमत आहे ,आपण आपल्या राज्यातील पर्यटन स्थळांना फोकस करायला कमी पडतो.उदा.गिरीर्दुग हे आपले खरे पर्यटनातील बलस्थान आहे ,केवळ मराठी लोकांनी जरी याला भेटी दिल्या तरी यातुन दोन उद्देश साध्य होतील एकतर आपल्याला आपला इतिहास समजेल,कोणत्या अवघड पार्श्वभुमि वर आपल्या पुर्वजांनी लढाया केल्या ते तरी समजुन येइल,तसेच आपल्या पर्यटन व्यवसायातहि भर पडेल.
पुढील काळात आपल्याला हा वारसा असाच समृध्द ठेवायचा असेल तर आत्तापासुनच आपल्या भावी पिढीवर इतिहासाचा हा वारसा जपण्याचे संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे हेच खरे.
16 Apr 2012 - 7:45 pm | जयंत कुलकर्णी
+१११११
16 Apr 2012 - 7:53 pm | रेवती
साक्षीजी, +१ पण थोडा बदल.:)
देशोदेशी फिरणारे मंत्री हे सगळे पहात असतात आणि त्याच नाविन्यपूर्ण सोयी ते त्यांच्या खासगी जागेत करून घेतात. त्यांच्या जमिनीचा काही भाग ते अश्या अप्रकारे विकसित करतात आणि तिथे भरपूर शुल्क आकारून लोकांना आकर्षित करतात. हा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून सुरु झाला आहे आणि फळफळलाही आहे.
16 Apr 2012 - 3:22 pm | रमताराम
चांगलंच आहे की. नुकतेच पाहिलेले प्रतापगड, विशाळगडाचे रूप पाहता, उलट अशा ठिकाणचे रस्ते उखडून टाकून पर्यटकांना मज्जावच करावा अशा मताचा झालोय (रायगडाचे काय झाले असेल या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो.)
पर्यट्क हे कोणतीही बांधिलकी नसलेले लोक असतात. पैसे फेकून यांना पर्यटनस्थळी 'घरचेच' वाटावे इतक्या सोयी हव्या असतात. त्यामुळे मूळ स्थान इतके भ्रष्ट होऊन जाते की ज्यासाठी तिथे जायचे तो हेतूच नाहीसा होतो. सतत नावीन्याची वखवख असलेले पर्यट्क यथावकाश नव्या जागा शोधतात नि जुने स्थान 'जुनीओळख पुसलेली नि नवी विरलेली' अशा दुहेरी गर्तेत सापडते.
पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था ही दोर्याला बांधून फिरवलेल्या दगडाप्रमाणे असते. जोवर फिरवत आहात तोवर ती तिची उंची राखून असते. फिरवणे थांबवले की थेट खाली कोसळते. असल्या बाह्य मदतीवर अवलंबून राहणे वेडेपणाचे असे आमचे जुनाट, मागासलेले मत.
16 Apr 2012 - 3:27 pm | मदनबाण
प्रत्येक गोष्ट करायला अफाट पैसे लागतात असे नाही तर केवळ कल्पकता आणि इच्छाशक्ति लागते.
कोण म्हणतं पैसा आणि इच्छा शक्ती नाही ते ? ;)
अहो अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक बांधरण आहेत म्हणे! ते देखील कोट्यावधी खर्च करुन ! ;)
इतके पुतळे राज्यात आहेत त्यात +१ अजुन काय ! :(
इतकी इच्छाशक्ती आणि पैसा राज्याच्या रस्त्यांवर केला तरी राज्याच भलं होईल हे राजकारण्यांना समजत नाही, असं का वाटतय तुम्हाला ?
16 Apr 2012 - 4:00 pm | सर्वसाक्षी
बाणा,
पैसा आणि इच्छाशक्ति पर्यटन विकासासाठी अशा अर्थाने 'नाही' म्हटले आहे. खाण्याच्या दृष्टीने नव्हे:). नवे आणि तेसुद्धा कोट्यावधींचे स्मारक म्हणताना अनेक नेते पुढे येतील यात शंका नाही. पण असलेल्या जुन्या स्मारकांचे काय?
16 Apr 2012 - 4:03 pm | सुहास..
पुलापलीकडे पुणे संपते , आणि पुण्याशिवाय महाराष्ट्रात बघण्यासारखे काय आहे ;)
पुलाखालचा ;)
16 Apr 2012 - 4:26 pm | रमताराम
अवांतरः तुजं सासर कोन गाव म्हनायचं
17 Apr 2012 - 2:25 pm | धन्या
कोणता पुल? म्हात्रे पुल, लकडी पुल, दांडेकर पुल, झेड ब्रिज, होळकर ब्रिज, संगमवाडी ब्रिज, वारजे ब्रिज असे अनेक पुल आहेत पुण्यात.
पुलापलिकडचा ;)
17 Apr 2012 - 2:33 pm | गवि
हॅ हॅ..
गरवारे उड्डाणपूल.... :)
16 Apr 2012 - 5:03 pm | सुहास..
सासर मी भांड्याच्या दुकानातुन आणली आहे, कपाबरोबर ;)
धन्यवाद
16 Apr 2012 - 7:53 pm | चौकटराजा
पर्यटन हे आवडीशिवाय होत नाही. पैसा नसेल तरीही होत नाही. पहाण्यासारखे फारसे जगावेगळे काही नसेल तर पर्यटन होत नाही. सुविधा नसतील तर पर्यटन विकसित होत नाही. इतिहासातील राजे, पराक्रम,लढाया ,याचे आकर्षण परकीय माणसाला नसते. तो काहीतरी दिव्य पहायला
आलेला असतो. या बर्याचशा गोष्टींची महाराष्ट देशी कमतरता आहे.
उदा. पर्यटकाला कैलास लेण्याचे आकर्षण असते. पण तुम्ही म्हणाल की पैठणची ज्ञानदेवानी चालविलेली पण आज ढळलेली भिंत त्याने पहावी
तर आपला आग्रह चुकीचा .
16 Apr 2012 - 8:07 pm | प्राध्यापक
काहीतरी भव्य दिव्य पहायलाच पर्यटक येतात असे नाही,आणी इतिहासा बद्दल म्हणाल तर परकिय लोकांना आपला इतिहास समजुन घ्यायची इच्छा असतेच,आपल्या इतिहासाच्या हजारो कागदपत्रांचे जतन परकियांनी केले आहे ही वस्तुस्थिती आहे, प्रश्न असा आहे की थर्मापिल्ली ची खिंड जशी इतिहासात प्रसिध्द आहे तितकी आपली पावनखिंड किति लोकांना माहीत आहे,त्या खिंडीत मावळ्यांनी केलेला पराक्रम जरी आपण पुढे आणु शकलो तरी त्या जागेला भेट देणार्यांचे प्रमाण वाढु शकेल .
पण आपल्या लोकांना जिथे सर्व सोयी सुविधा आहेत अशाच जागा प्रिय आहेत,त्याला काय करणार ?
17 Apr 2012 - 8:52 am | चौकटराजा
मी स्वत: पुष्कळसा भारत पाहिलेला आहे. वास्तूंशी निगडित इतिहास समजावून देणे व वास्तूतील बारकावे समजावून देणे असे गाईडचे साधारण काम असते. दुसर्या कामासाठी पर्यटक जास्त उत्सुक असतो असा माझा तरी अनुभव आहे. कोणताही इतिहास नसलेले रांजणखळगे व ग्रँड कॅनन
हे पर्यटकांची आवडती स्थळे आहेतच की. परकीयानी आपला इतिहास जतन करून ठेवला आहे याचा पर्यटकाच्या इतिहास प्रेमाशी काय संबंध ? अमेरिकेतील सिस्मोग्राफर्स भारतातील भूकंपाचे मापन करतात .त्याची रीतसर नोंद ठेवतात . तसे परकीय आपल्या इतिहासाची नोंद ठेवू शकतात.
17 Apr 2012 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या समोरच्या सौंदर्य फुफाट्यातली गर्दी पण रोडावली आहे. :(
17 Apr 2012 - 3:37 pm | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षीजींनी म्हंटल्या प्रमाणे इजिप्त मध्ये प्रत्येक (आणि अशी अनेक आहेत) पर्यटन स्थळावर अत्यंत स्वच्छ असे स्वच्छतागृह आहे. रस्ते तर उत्तम आहेतच पण सरकारी पाठ्यशिक्षणात गाईड्स साठी अभ्यासक्रम आहेत आणि असे प्रशिक्षित गाईड(च) तिथे पर्यटकांना मार्गदर्शन करीत असतात.
राजस्थानातील चितोडगडाचा इतिहास आपल्या अनेक किल्यांपेक्षा डावाच मानावा लागेल पण राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाने किल्ल्याची व्यवस्था चोख ठेवली आहे. शुल्क आकारावे आणि त्या स्थळाची नियमित व्यवस्था पाहावी.
अमेरिकेतील कित्येक पर्यटनस्थळे बिन महत्त्वाची आहेत पण सरकारने त्या - त्या स्थळाची जाहिरात आणि सर्व सोयी सुविधा पुरविणे ह्या क्लुप्त्या वापरून पर्यटन वाढवले आहे.
आपल्या रायगडाच्या वाटेवर शिवथर घळची एक बारीक पाटी आहे. तिथून वळल्यावर रस्ता एकदम छोटासा (एक गाडी जाईल एवढाच) आहे. पुढे तिठ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूस वळायचे की उजव्या बाजूस हे सांगणारा फलक नाही.
पाचाडला जीजाबाईंचा पुतळा (अगदी छोटा) असलेल्या बागेबाहेरील माहिती दर्शक फलक पूर्ण गंजलेला आहे. त्यावर काय लिहिले आहे वाचताही येत नाही.
प्रतापगडावर जाताना अफजल खानाची कबर, महाराजांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाच्या घटनेशी निगडीत अशी वास्तू, वादाच्या भोवर्यात सापडून पर्यटकांसाठी बंद आहे. ती वास्तू सर्वासाठी खुली करणे, तिची डागडुजी करणे तिचा इतिहास फलकाच्या स्वरुपात तिथे उपलब्ध करून देणे आदी बाबत सरकार उदासीन आहे.
परदेशी पर्यटकांना आपल्या इतिहासाशी काही घेणे देणे नाही हे जरी गृहीत धरले तरी त्यांना वास्तुचे सौंदर्य, भव्यता लुभावते. त्यांच्या देशात आणि जगात इतरत्र मिळणार्या सोयी सुविधा पाहता भारतात (विशेषतः महाराष्ट्रात) त्यांची भयंकर गैरसोय होते. व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहता 'गिर्हाईका'ची गैरसोय करून कुठलाच व्यवसाय यशस्वीरितीने करता येत नाही.
खुप ठीकाणी रस्ते लहान असले तरी बरे आहेत. स्वच्छतागृहे भरपुर आणि खरोखर 'चकचकीत' असावित. पोलीसपहारा असावा. सरकारी (आणि खाजगी) निवासस्थाने चांगल्या प्रतिची असावित. पंचतारांकित नसली तरी तीन तारांकित असावित. परदेशी पर्यटकांना भारतात पिण्याचे पाणी आणि जेवण ह्या दोन समस्या भेडसावतात. (जेवणाची समस्या आपल्यालाही परदेशात भेडसावते) त्याची नीट व्यवस्था असावी. भारतिय जेवणाच्या बरोबरीने, बिन तिखटाचा कॉन्टीनेंटल मेन्यूही असावा. कर्मचारी वर्ग 'स्वच्छ', नेटका, गणवेषात (निदान स्वच्छ कपड्यात), आतिथ्यशील आणि मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषा जाणणारा असावा. पर्यटन स्थळावर प्रशिक्षित गाईड असावेत. स्वयंघोषित गाईड्सना मनाई असावी.
वरील सर्व सोयी सुविधा ह्या मुलभूत गरजा आहेत. त्या साठी शुल्क आकारले तरी पर्यटक खळखळ करणार नाही.
सर्व पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन करार तत्वावर खाजगी संस्थांना द्यावे.
देवस्थानांवर वेगळा धागा सुरू करावा लागेल. प्रतिसादात काय लिहीणार?
17 Apr 2012 - 6:42 pm | चौकटराजा
अमेरिकेतील कित्येक पर्यटनस्थळे बिन महत्त्वाची आहेत पण सरकारने त्या - त्या स्थळाची जाहिरात आणि सर्व सोयी सुविधा पुरविणे ह्या क्लुप्त्या वापरून पर्यटन वाढवले आहे.
यालाच नेट वर टूरिस्ट ट्रॅप" म्हणतात ना ?