विमान प्रवास सुचना आणि (अनाहुत) सल्ले...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
7 Apr 2012 - 12:26 pm
गाभा: 

नमस्कार,

३/४ दिवसांपुर्वी श्री.मन ह्यांनी "विमान प्रवास कसा करावा?" ह्या बाबत काही सुचना आणि सल्ले मागितले होते...असे सल्ले देण्यात मराठी माणुस नेहमीच पुढाकार घेतो, आणि मी पण त्याला अपवाद नाही...त्यांनी हे सल्ले सगळ्यांना सांगा अशी एक प्रती-सुचना केली आणि आपण पण एक १००% मराठी आहोत असे सिध्ध केले..

विमान प्रवास सुचना आणि सल्ले...वाचुन सोडुन द्या....फारच मुल्यवान वगैरे वाटल्या तर जपुन ठेवा...

अ.) बैठक राखुन ठेवा.....आज-काल बैठक आधीच राखुन ठेवता येते...शक्यतो खिडकीची बैठक घ्या....(खुलासा पुढे आहे...चिंता नसावी...अगदीच घाई असेल तर (हा) कडे वळा..)...

ब.) शक्यतो कानात बोळे घाला आणि फक्त १ तास लवकर जा... बैठक राखुन ठेवल्यामुळे , विमान कर्मचारी आपली चरफडत वाट बघत असतात..सामान घेण्या पासुन ते व्यवस्थित विमानात चढवे पर्यंत सर्व मदत करतात...अगदी बोर्डिंग पास सकट..

क.) आपल्या कानात बोळे असल्याने , ते चिडलेले विमान कर्मचारी , आपल्याशी अजुन हळु बोलतात... हळुच बोलल्यामुळे ते चिडु शकत नाहीत....(स्वतः वर प्रयोग करुन बघा....पटेल...)...राग येवुन पण तो चिडु शकत नाही त्यामुळे तो अजुन चरफरडतो....ते त्याच्या चेहर्‍यावर दिसते...मस्त मजा येते ही गम्मत बघायला...खुप चिडला तर Feed Back Form मागा....सगळे विमान कर्मचारी ह्या Feed Back Formला घाबरतात...

ड.) हे विमान नसुन हवेत उडणारी बस आहे असे समजा..

ई.) एयर इंडिया नामक एक विमान कं. आहे तिने जा....ती हवेतील कसरती छान करुन दाखवते..माझी विमान प्रवासाची भिती पार पळुन गेली आहे...एकदाच ह्या कं.ला पैसे दिले...सगळे वसुल झाले...आपल्या जीवाची किंमत पण कळाली.....सासु बाईंना एकदा ह्या कं. चे तिकीट दिले..नंतर परत कधी त्या, घरी आल्या नाहीत...फार जालीम उपाय आहे....

फ.) एक-दोन पेग आधीच मारुन घ्या...विमान वर जाण्याआधीच आपले शरीरच एक मस्त विमान झालेले असते...आधी मला पण बस लागायची..मी हा प्रयोग बस-प्रवासात करुन बघितला आहे...आणि तो उत्तम आहे...(ती कथा परत कधीतरी)....तुम्ही पण हा प्रयोग विमान प्रवास करतांना करुन बघा आणि अनुभव सांगा...(मी विमान प्रवासासाठी हा प्रयोग केलेला नाही...तुम्ही जर हा प्रयोग केला तर त्याचे मानधन म्हणुन "मि.पा." वर लेख टाका...त्याचे १०० प्रतिसाद हेच तुमचे प्रति मानधन समजा...)

ग. ) तंबाखु खात असाल तर उत्तम....ती खाल्ली की काहीच लागत नाही...तोंडात असलेल्या तंबाखुच्या पानाशिवाय आमचे पान पण लिहुन होत नाही....सकाळचा परसदारचा प्रवास असो की विमान प्रवास हे पान आधी...तुम्ही पण हा प्रयोग करुन बघा...

ह. ) Internet Connection असलेला Laptop जवळ ठेवा आणि "मिसळपाव"ला भेट द्या...आपण हसतोय असे बघितले तर शेजारी मस्त जळतो..(भारतात सार्वजनिक ठिकाणी आणि त्यात पण विमानात एक्ट्याने हसणे हे पाप समजतात)..ते बघुन मग अजुन २/३ "दिल खेचक" साईट त्याला हळुच दिसेल अश्या उघडा आणि बंद करा....तो चिडेल आणि मग तुमचा वेळ पण जाईल....तुम्हाला जरा जरी कंटाळा आला की हिच गोष्ट परत करा...

हा ) मध्येच एकदा विमान कर्मचार्‍याला Feed Back Form मागावा आणि त्याचे नाव विचारुन, लगेच विसरुन जावे...त्याला तो Form आणतांना बघुन ती उदबत्तीची कांडी किंवा कचकड्याची बाहुली किंवा पाप्याचे पितर उर्फ हवाई सुंदरी वैतागते...एका पुरुषाने दुसर्‍या पुरुषाला असे काही भले करणारे मागितले की सर्वच महिला कर्मचारी वैतागतात...पण ती काही जीव द्यायला उडी मारत नाही... हा राग ती मग आपल्याला खाण्याची सेवा देतांना व्यक्त करते, आणि जास्तीचे खाणे देते..(आंतर राष्ट्रीय प्रवासात २/३ पेग जास्त मिळतात्..आणि सर्वात शेवटी उतरण्यापुर्वी एखादी पाण्याची बाटली व २/३ चकण्याची पाकिटे)....आपली खिडकी जवळ बैठक असल्याने ती थोडी अजुन झुकते व त्याच्याशी अबोला धरते...मग त्या दोघांचे भांडण बघत आपला वेळ छान जातो...बरं, परत ती हवाई सुंदरी आपल्याशी गोड बोलतांना आणि वाकलेली बघुन शेजारी अजुन चिडतो...

ही ) थोडक्यात काय तर आपल्या आजुबाजुंच्या व्यक्तींना जेवढा त्रास देता येईल तेव्हढा द्या....."इतरांचे तळतळाट आणि शाप , हेच आमचे समाधान" हे भारतिय नेत्यांचे ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा....

ह्या मुळे तुमचा प्रवास सुखकर होईल की नाही ते माहीत नाही...पण लेख वाचतांना तुमच्या ४ घटका तर हसत खेळत गेल्या ना.....

आपलाच मित्र
टवाळखोर

ता.क. : Feed Back Form काही-बाही वाटेल ते लिहुन पाठवा...कुणीही तो वाचत नाही....

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

7 Apr 2012 - 12:47 pm | अमोल खरे

मजा आली. :)

परिकथेतील राजकुमार's picture

7 Apr 2012 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

सगळ्यात आधी विमान उडायच्या आधी खिशात बिल भरण्याचे पैसे असतील आणि आजूबाजूचे वेटर दणकट नसतील ह्याची खात्री करा.

एवढं धीर गंभीर लिखाण ' विनोद आणि विडंबन' या सदरांखाली कसे येईल ते कळाले नाही,

चौकटराजा's picture

7 Apr 2012 - 2:46 pm | चौकटराजा

मुक्त विहारी ,
तुम्ही या लेखाचा फीडबॅक किंवा फिस्टबॅक फॉर्म तयार केला असेल ना ? तो पाठवा.बघून घेतो.पुढच्या वेळेला आमच्या कंपनीच्या विमानाचे कसे
येता ते !
आपला फौकट म्हाराजा

पैसा's picture

7 Apr 2012 - 4:20 pm | पैसा

तुमच्याकडे पण गगनविहारींसारखे सगळ्या विषयांवर सल्ले आहेत की हो!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2012 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

मला हा ) ...ही ) ... अनुभव घ्यायचा आहे... ;-)

पक पक पक's picture

7 Apr 2012 - 7:11 pm | पक पक पक

मला हा ) ...ही ) ... अनुभव घ्यायचा आहे.. ;)

आपण मुक्त विहारी आहात... ;)

आत्म्यांना विमानात प्रवेश नाही.त्यातला त्यात साध्या आत्म्यांना वशिलेबाजी करून प्रवेश मिळू शकतो, पण अतृप्त आत्मा....नाय नो नेवर...

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2012 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा

@साध्या आत्म्यांना वशिलेबाजी करून प्रवेश मिळू शकतो,
पण अतृप्त आत्मा....नाय नो नेवर...>>> एss...एss... किच्चुताइ वेडी...किच्चुताइ वेडी... पण मी कुणाचं झाड पकडुन गेलो तर....?

पक पक पक's picture

8 Apr 2012 - 5:57 pm | पक पक पक

ओ किचेन तै ,आत्म्यांना सर्वत्र मुक्त संचार करता येतो म्हण्ल.... ;)

रेवती's picture

8 Apr 2012 - 12:59 am | रेवती

ई) या मुद्द्याशी भयानक सहमत.
मेल्यांनी अगदी नको नको केलं यावेळी.

श्रीयुत संतोष जोशी's picture

8 Apr 2012 - 9:47 am | श्रीयुत संतोष जोशी

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा

मन१'s picture

8 Apr 2012 - 11:43 am | मन१

सूचना कडक....
प्रवास मस्त झाला(थँक्स टू ऑल मिपाकर्स, च्युंइंगम खात खात आलो, डोकेदुखी टळली.)

चिंतामणी's picture

8 Apr 2012 - 2:21 pm | चिंतामणी

पण एक सुचना आड करायची राहिली का?

हु) प्रवासापुर्वी गवींचे एअर क्रॅश (भाग १ ते ५) न वाचणे. आणि वाचले असल्यास न आठवणे.

(ह.घे.)