आइस्क्रीम फलुदा

योगिता_ताई's picture
योगिता_ताई in पाककृती
13 Jun 2008 - 11:41 am

आज माझ्या वाढदिवसानिमित्त गोड व सोपी पाककृती
----------------------------------------
साहित्य -
दीड चमचे कॉर्नफ्लोअर,
२ कप पाणी,
दीड कप बर्फाचे पाणी,
२ चमचे तुळशीचे बी,
१ चमचा गुलाब सरबत,
आइस्क्रीम स्कूप
थंड दूध (आवश्‍यकतेनुसार).

कृती - तुळशीचे बी भिजवून ठेवा. साध्या पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून शिजवा. पारदर्शक दिसू लागल्यावर शेवयाच्या यंत्राने बर्फाच्या पाण्यात शेवया पाडून घ्या. ३० मिनिटांनी गाळून घ्या. तुळशीचे बी ग्लासमध्ये घालून फलुदा घाला. १ चमचा गुलाबजल, बारीक केलेला बर्फ व थंड दूध घाला. सर्वांत वर आइस्क्रीम स्कूप ठेवा.

प्रतिक्रिया

पद्मश्री चित्रे's picture

13 Jun 2008 - 1:13 pm | पद्मश्री चित्रे

वाढदिवसाच्या..

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 10:15 pm | स्वाती राजेश

योगिताताई,
वाढ्दिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!

भाग्यश्री's picture

13 Jun 2008 - 11:02 pm | भाग्यश्री

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Jun 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर

योगिता_ताई's picture

20 Jun 2008 - 2:07 pm | योगिता_ताई

धन्यवाद....

तात्या व अनुष्कावहिनी तुमच्या शुभेच्छांबद्दल..!