रोडी-९

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
17 Mar 2012 - 1:59 pm
गाभा: 

एम टिव्ही (M Tv) वर दर शनिवारी रात्री ७ वाजता रोडी नावाचा प्रत्यक्ष चित्रण ( रियलिटी शो) होत असतो. बर्‍याच तरुण लोकांना तो आवडतही असतो असे माझ्या निदर्शनास आले आहे.

जवळपास मागच्या ९ वर्षापासून हा खेळ M Tv वर होत असतो आणि काही अनिच्छेनेच मी याचे छायाचित्रण पाहिले आणि मला हा खेळ, सादरीकरण आणि एकंदरीतच कल्पना आवडली.

कोणी हा खेळ या वाहिनीवर पाहत असेल तर त्याला याची बर्‍यापैकी कल्पना असेलच पण न पाहणार्‍यासाठी मी थोडाफार गोषवारा देऊ इच्छितो.

या खेळामध्ये ( फक्त) तरुण मुलामुलींचीच निवड होत असते.त्यासाठी याच्या आयोजकानी अनेक शहरातही प्रवास केला आहे. त्यासाठी गटाचर्चेची फेरी पार पाडावी लागते. प्रत्यक्ष निवड झाल्यानंतर संयोजक म्हणून तीन तरुण म्हणजेच रणविजय, रघू आणि राजीव त्या मुलामुलीची मुलाखत घेत असतात. मुलाखतीत अनेक प्रश्न अनेक पध्दतीने विचारले जातात आणि त्यात उमेदवाराच्या विचारात सुसंगतता नसेल तर त्यातील विसंगती, अतार्किकता अतीशय परखडपणे उमेदवाराच्या समोर मांडली जाते. ( प्रसंगी मी संतापशब्दाचा (शिव्या) वापर सढळ होत असतांना मी पाहिले आहे.)

काही वेळेस संयोजक उपमर्दवाटेल अश्याही पध्दतीच्या भाषेचा वापर करीत असतात. उमेदवाराला अनेक पण (task) पूर्ण करावे लागतात जसे जोर मारणे, डोक्यावर उभे राहणे, गाणी / नृत्य करून दाखविणे इत्यादी इत्यादी.

उमेदवार आणि मुलाखत घेतांना अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पातळीच्या चर्चेत्तून उमेदवाराचे अनेक पैलू उलगडत जातात.

वैचारिक गाभा अथवा कस नसलेल्या उमेदवाराची ( बोलके पोपट) भंबेरी उडत जाते असा माझा ( पाहत असतांनाचा) अनुभव आहे.

प्रश्नत्तोराच्या फेरी झडत असतांना अनेक उमेदवार भावूक होऊन ओक्साबोक्शी रडत असतांनाही मी या खेळात पाहिले आहे.

बादफेरीत उमेदवारांची गळती होत जात पूढे पूढे प्रवास होणारा असा हा कार्यक्रम आहे.

तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.

कलंत्री

प्रतिक्रिया


तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.

का तर

ही वेळेस संयोजक उपमर्दवाटेल अश्याही पध्दतीच्या भाषेचा वापर करीत असतात. उमेदवाराला अनेक पण (task) पूर्ण करावे लागतात जसे जोर मारणे, डोक्यावर उभे राहणे, गाणी / नृत्य करून दाखविणे इत्यादी इत्यादी.

उमेदवार आणि मुलाखत घेतांना अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या पातळीच्या चर्चेत्तून उमेदवाराचे अनेक पैलू उलगडत जातात.

वैचारिक गाभा अथवा कस नसलेल्या उमेदवाराची ( बोलके पोपट) भंबेरी उडत जाते असा माझा ( पाहत असतांनाचा) अनुभव आहे.

प्रश्नत्तोराच्या फेरी झडत असतांना अनेक उमेदवार भावूक होऊन ओक्साबोक्शी रडत असतांनाही मी या खेळात पाहिले आहे.

वा वा
चान चान
:)

चिंतामणी's picture

17 Mar 2012 - 2:25 pm | चिंतामणी

सहमत.

कार्यक्रम अनेकदा पातळी सोडतो. नव्हे गलीच्छ म्हणावे अशी पातळी गाठतो.
उपमर्द करताना जी भाषा वापरली जाते ती गलीच्छ तर असतेस. परन्तु समोर कोण आहे, म्हणजे मुलगा की मुलगी हेसुद्धा विचारात घेतले जात नाही.

स्पा's picture

17 Mar 2012 - 2:35 pm | स्पा

मानसिक विकृतीची परिसीमा गाठलेला कार्येक्रम आहे हा..
तरुणांनी आदर्श घ्यावा असे या कार्येक्रमात काय आहे हे अजूनही समजलेले नाही

मोदक's picture

18 Mar 2012 - 9:54 am | मोदक

तरुणांनी आदर्श घ्यावा असे काय आहे..? आणि रोडी झालो म्हणजे नक्की काय..?

स्पावड्या तुला "हा कार्यक्रम भंपक आहे.. आजिबात पाहू नये" असे काही म्हणायचे आहे का..? :-)

(काय दिवस आलेत राव.. स्पा ला सहमती द्यावी लागती आहे. ;-))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2012 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा

हे नक्की काय भयंकर मायाजाल आहे ते पहावे लागणार तर.... हल्ली पैसा/प्रसिद्धि साठी कोणत्याही प्रकारचे तथाकथित टॅलेंट हंट शो तय्यार होत असतात... धागाकर्त्यांनी एकंदर केलेले वर्णन पहाता...हाही काहिसा तसाच खेळ वाटतो...

तेथे एक प्रकारचे विडंबनच चालु असते.

तुमच्या मध्ये ती क्षमता दिसते त्यामुळे तेथे उमेदवार म्हणुन आपल्याला पहायला आवडले असते.

(आपला हितचिंतक.)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2012 - 1:07 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या मध्ये ती क्षमता दिसते त्यामुळे तेथे उमेदवार म्हणुन आपल्याला पहायला आवडले असते.>>>>>>>>>>>>>> माझा गौरव केल्याचे पाहुन ड्वाले पाणावले... ;-)
माझ्या सारखा उमेद-वार तुमच्या सारखा परिक्षक असल्याशिवाय येऊ शकत नाही... :-p

अवांतर--- हे पापी माणसा :-D म्या तुला वळिकले हाय... ;-)

तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.

खल्लास कलंत्रींनी आमचा पत्ता कट करुन टाकला. :(

बाकी या कार्यक्रमा बद्दल काही मित्रांकडुन ऐकले आहे. पण पहाण्याचा योग कधी आला नाही.

प्रश्नत्तोराच्या फेरी झडत असतांना अनेक उमेदवार भावूक होऊन ओक्साबोक्शी रडत असतांनाही मी या खेळात पाहिले आहे.

हॅ हॅ हॅ.. दुरचित्रवाणी वरच्या प्रत्यक्ष चित्रण ( रियलिटी शो) कार्यक्रमातल्या आसवां बद्दल म्या पामराने काय बोलावे. :)

धन्या's picture

18 Mar 2012 - 7:43 am | धन्या

काल चेनेल बदलताना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डचा कार्यक्रम दिसला. चक्क शाहरुख खान आणि रणबीर कपुर स्त्री वेषामध्ये होते. आणि कार्यक्रमामाला उपस्थित असलेल्यांच्या चेहर्‍यावर "आजि म्या ब्रम्ह पाहिले" असे भाव.

पैशासाठी लोक किती खालच्या थराला जातात याचे उत्तम उदाहरण.

ते दोघे जुळे कधीकधी तर मॅसोचिस्ट्च्या पातळीला जातात.. आणि आलेले बकरे-बकर्‍या सॅडीस्टांच्या.
दोघांनाही जाऊन एक एक वाजवावी वाटते.

अन्या दातार's picture

17 Mar 2012 - 2:43 pm | अन्या दातार

ते दोघे जुळे कधीकधी तर मॅसोचिस्ट्च्या पातळीला जातात.

यासंदर्भात रोडीज-९ चे एक विडंबनही तुनळीवर आहे. हे घ्या:

Nile's picture

19 Mar 2012 - 11:36 pm | Nile

व्हिडो आवडल्या गेला आहे!! मस्त बनवलाय!

मायला यकुशी हज्जारवेळा सहमत. दोघा जुळ्यांना कानफटवले पाहिजे असे त्यांचे वर्तन बरेचदा असते.

रोडीज बघून मला काय पुरुषार्थ स्फुरणार आहे का?

- पिंगू

अन्या दातार's picture

17 Mar 2012 - 2:57 pm | अन्या दातार

रोडीज बघून मला काय पुरुषार्थ स्फुरणार आहे का?

ते तुलाच माहित. इथे मात्र कलंत्री काकांना लैच स्फुरण चढलेलं दिसतंय ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Mar 2012 - 4:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

यकु, तुला उलटे म्हणायचे आहे बहुतेक. दोघे जुळे सॅडीस्ट आणि आलेले बकरे मॅसोकिस्ट् .....
तसे नसेल तर तुझे म्हणणे कळले नाही. जरा इस्कटून सांग

वेदना कुणाला आवडतात ?
- स्वपीडकांना ! ते सॅडीस्ट. ते बकरे किंवा बकर्‍या.
वेदना दुसर्‍यांना द्यायला कुणाला आवडतं?
- परपीडकांना. मॅसोकिस्ट किंवा चिस्टांना - ते, ते जुळे.

देणे आणि करुन घेणे यात कनेक्षन होत असल्यानं गोंधळ होतोय आणि देणारा तो घेणारा आणि घेणारा तो करुन देणारा या दोन्हींची अदलाबदल होतेय.

इफ यू सेपरेट देम ऑल अवे विदाऊट बिईंग ए कनेक्षन, बोथ वर्ड्स हॅव ए सेपरेट , मिनींग.

JAGOMOHANPYARE's picture

17 Mar 2012 - 8:02 pm | JAGOMOHANPYARE

तुम्ही उलट सांगताय.. सॅडिस्टला दुसर्‍याला वेदना द्यायला आवडते.

बर.
उद्या ठरवतो.
आज टकूरं तापलंय.
:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Mar 2012 - 10:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे तू नकोस व्याख्या ठरवूस. विकिपीडिया वर बघ. छान आर्टिकल्स आहेत.

विकीपिडीया वाचणे चांगली सवय आहे काय?
मी फारसा वाचत नाही.
आणि माझ्या व्याख्या मी स्वत:च केल्यात सगळ्याबाबतीत. ..
सॅडिस्ट आणि मॅचोचिस्ट* या दोन शब्दांच्या आज पहिल्यांदा केल्यात फक्त.
त्यामुळं झाला ना बल्ल्या.. सगळंच असं आहे. विकीपिडाया वाचून किती व्याख्‍या बदलून घेऊ?

* विशेष सूचना: आगामी आकर्षण : आमचा पुढील लेख : मॅसोचिस्ट सौंदर्यशास्‍त्र : एक गूढ

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2012 - 12:57 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे नाही रे भाऊ. तुझ्या स्वपीडक आणि परपीडक या व्याख्या परफेक्ट आहेत. त्यांचे इंग्लिश भाषांतर गंडले .... आता त्यात पण सूट घ्यायची असेल तर काय करणार मी ? :-)

आणि माझ्या व्याख्या मी स्वत:च केल्यात सगळ्याबाबतीत. ..

यालाच professional hazards म्हणत असावेत बहुतेक ;-)

आमचे प्रमादरणीय मित्र श्री. स्पांडू यांनी आत्ताच अशी परमात्म्यासमोर इच्छा प्रकट केली की 'गुगल' शी नामसाधर्म्य असलेल्या (पैचान कोन? ;-) ) अंतर्जालावरच्या (सध्या मिपानिवृत्त असलेल्या ) एका महान विचारप्रवर्तक सदस्याने रोडीज् मध्ये भाग घ्यायला पाहिजे.. त्या जुळ्यांची जिरवण्यासाठी.

स्पांडूदेवांची इच्छा परमात्मा पूर्ण करो.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2012 - 8:34 am | अत्रुप्त आत्मा

@गुगल' शी नामसाधर्म्य असलेल्या (पैचान कोन? Wink ) अंतर्जालावरच्या (सध्या मिपानिवृत्त असलेल्या ) एका महान विचारप्रवर्तक सदस्याने >>> हहपुवा... अगदी योग्य निवड... तोच हवा,,,त्यांची हवा काढायला ;-)

रणजित चितळे's picture

17 Mar 2012 - 4:09 pm | रणजित चितळे

इच्छा नाही बघण्याची हे सगळे वाचल्यावर

निखिल देशपांडे's picture

17 Mar 2012 - 9:01 pm | निखिल देशपांडे

डॉनरवांचे या कार्यक्रमाबद्दलचे मौलिक विचार वाचायला आवडेल.

बाकी ऑगस्ट मधे हत्या झालेल्या आर टी आय कार्यकर्त्या शीला मसुद यांचा भावाचे रोडीज ऑडीशन पहायला मिळाले होते.

बटाटा चिवडा's picture

18 Mar 2012 - 11:38 am | बटाटा चिवडा

मी गेल्या ८ वर्षांपासून रोडीज बघतो आहे.. त्यामुळे मी ह्या कार्यक्रमातून तरुणांना घेण्यासारखे काय आहे ह्याचे विश्लेषण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो..

पहिला प्रश्न मला गेल्या ८ वर्षांपासून पडला आहे (जो आजही अनुत्तरीत आहे), तो म्हणजे रोडीज हा शो खरच "रिआलिटी शो" आहे की ते एक नाट्यमय प्रदर्शन (Scripted) आहे? हेच कळत नाही. कारण ब-याचदा असे दिसून येते की, फक्त टी. आर. पी. (कुणाला फुल फॉर्म माहित असेल तर सांगावा) म्हणजेच कार्यक्रमाचे दर्शक वाढविण्यासाठी आणि त्याद्वारे फक्कड पैसा जोडण्यासाठी एखाद्या उमेदवाराला बळीचा बकरा बनवला जातो आणि त्याची ह-यासमेंट केली जाते.
पण कधीतरी असेही होत असेलच की... की एखादा 'शेरास सव्वाशेर' (मिपा'करांसारखा) उमेदवार इंटरव्हू मध्ये येऊन रघू ला तोडीस तोड उत्तर देत असेल.. परंतु, आज-तागायत असा एकही उमेदवार रोडीज च्या इतिहासात जन्माला आलेला नाही काय? याचा अर्थ रघू सर्वगुणसंपन्न आहे काय? की असा उमेदवार येऊन देखील रघू च्या ड्याशिंग इमेज ला धक्का पोहोचू नये, म्हणून तो इंटरव्हू प्रदर्शित केला नसेल काय? रघू जर इतका सर्वगुणसंपन्न आणि हुशार आहे तर मग त्याला दुसरे कोणी काम का देत नाही? ... अर्थात हे सर्व मला पडलेले प्रश्न आहेत.
आता तुम्ही म्हणाल जर मला रोडीज बघून एवढे सारे प्रश्न पडले आहेत, तर मुळात मी हा शो बघतोच का ? :D

त्याचं असं आहे की, रोडीज मध्ये काही "घेण्यासारख्याही"! गोष्टी आहेत, जसे,
रोडीज सारखा स्ट्रेस्ड इंटरव्हू सतत पाहिल्याने, जर त्या इंटरव्हू मध्ये त्या उमेदवाराच्या जागी आपण असतो तर काय केले असते या विचारानेदेखील मनाची इतकी तयारी होते की, 'जॉब इंटरव्हूज' अगदीच साधे आणि फिके भासू लागतात आणि आत्मविश्वास वाढतो आणि चांगली नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढतात. (हा फायदा थोडासा अतिशयोक्तीकडे कल असणारा असला तरीही ब-याच जणांना हा फायदा झाल्याचे माझ्या ऐकीवात आहे.
दुसरा फायदा म्हणजे, मनोरंजन... काही उमेदवार एवढे मजेशीर असतात की त्यांचे जनरल नॉलेज अगदीच "जनरल" असल्याचे आढळून हशा थांबत नाही. (जसे, एकदा एका उमेदवाराला भारताचा राष्ट्रपती कोण आहे.. तो पुरुष आहे की स्त्री आहे हेदेखील माहित नव्हते.)

परंतु, ह्या कार्यक्रमाची झुकती बाजू म्हणजे स्वत: रघू होय.
काही वेळा रोडीज चे संपादक रघू हा 'फेक' असल्याचे जाणवते. जेव्हा तो समोरच्या उमेदवाराला " मुलींचा रिस्पेक्ट न केलेल्या कारणावरून" शिव्या घालत असतो, तेव्हा त्या शिव्या ह्यादेखील आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या असतात, हे तो (जाणूनबुजून?) विसरतो असे दिसून येते. ह्या शिव्या हे देखील महिलांचा रिस्पेक्ट न करणे असे नाही काय?? अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

पण आजकालच्या व्यावसायिकीकरणाने झपाटलेल्या जगात रोडीज सारख्या रिआलिटी शो कडून जेन्यूइन असण्याची भाबळी अपेक्षा करणे हेच गैर वाटते.

आपण मला जे काही वाटत होते त्याला अगदी अचूकपणे शब्दबद्ध करुन दाखविले आहे. धन्यवाद.

या जगामध्ये विजेता हा एखादाच असू शकतो, परन्तू विजयाचे दावेदार अनेक असू शकतात. मूख्य म्हणजे आपापले यश अथवा अपयश आपल्या समज अथवा व्यावहारीक ज्ञानाचा अभाव असण्याची शक्यता असल्याचेच दर्शवते. लौकिक व्यवहारातही अनेक लोक गप्पा / गमजा / बढाया करतांनाच आढळतात. त्यातील खरे अथवा खोटे समजून घेणे कधी कधी दुरापास्तच होत जाते.

या खेळामध्ये मला अनेक वेळा असे जाणवले की खरा स्वभाव ( attitude) कसा ओळखता आला पाहिजे.

शेवटी सारासार विचार करुन योग्य अयोग्य ठरविता आलेच पाहिजे.

हा लेख लिहितांना बर्‍याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आपडत नव्हता. त्या शब्दांना योग्य शब्द मिळावेत हीच माफक अपेक्षा. उदा. task, attitude, reality show, interview pannel इत्यादी इत्यादी..

(टेलिव्हिजन रेटींग पाँइंट म्हणजे TRP)

बटाटा चिवडा's picture

18 Mar 2012 - 8:12 pm | बटाटा चिवडा

आपण मला जे काही वाटत होते त्याला अगदी अचूकपणे शब्दबद्ध करुन दाखविले आहे. धन्यवाद.

मी फक्त माझे मुक्तविचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच.. !! :-)

हा लेख लिहितांना बर्‍याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आपडत नव्हता. त्या शब्दांना योग्य शब्द मिळावेत हीच माफक अपेक्षा. उदा. task, attitude, reality show, interview pannel इत्यादी इत्यादी..

काही इंगजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द:-
Task = कार्य.
Attitude = प्रवृत्ती.
Reality Show = वास्तवदर्शी कार्यक्रम.
Interview Panel = मुलाखतकारांचा दल.

(टेलिव्हिजन रेटींग पाँइंट म्हणजे TRP)

ह्या अमुल्य माहितीबद्दल शतश: धन्यवाद कलंत्री काका.. :-)

Nile's picture

19 Mar 2012 - 11:45 pm | Nile

पहिला प्रश्न मला गेल्या ८ वर्षांपासून पडला आहे (जो आजही अनुत्तरीत आहे), तो म्हणजे रोडीज हा शो खरच "रिआलिटी शो" आहे

मालक सगळेच रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात. कोणत्या जगात आहात राव?

रोडीज सारखा स्ट्रेस्ड इंटरव्हू सतत पाहिल्याने, जर त्या इंटरव्हू मध्ये त्या उमेदवाराच्या जागी आपण असतो तर काय केले असते या विचारानेदेखील मनाची इतकी तयारी होते की, 'जॉब इंटरव्हूज' अगदीच साधे आणि फिके भासू लागतात आणि आत्मविश्वास वाढतो आणि चांगली नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढतात. (हा फायदा थोडासा अतिशयोक्तीकडे कल असणारा असला तरीही ब-याच जणांना हा फायदा झाल्याचे माझ्या ऐकीवात आहे.

एक प्रामाणिक मत देतो, राग मानू नका. दुसर्‍याला जुलाब होताना पाहताना देखील कदाचित* दोन चार गोष्टी पाहणारे** शिकत असतील पण म्हणून काय...? कळलं ना?

* शक्यता
**वाक्य नीट न वाचता प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाईल.

**वाक्य नीट न वाचता प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाईल.

बाकी काहीही असो, पण या वाक्यावर मी एवढ्या जोरात हसलोय !
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Mar 2012 - 12:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मालक सगळेच रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात. कोणत्या जगात आहात राव?

Is this a fact or opinion ??

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Mar 2012 - 12:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मालक सगळेच रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात. कोणत्या जगात आहात राव?

Is this a fact or opinion ??

Nile's picture

21 Mar 2012 - 2:56 am | Nile

Factual opinion! ;-)

बटाटा चिवडा's picture

20 Mar 2012 - 11:28 pm | बटाटा चिवडा

एक प्रामाणिक मत देतो, राग मानू नका.

अहो, प्रामाणिक मत देणार असाल तर कशाला राग मानू मी .....

दुसर्‍याला जुलाब होताना पाहताना देखील कदाचित* दोन चार गोष्टी पाहणारे** शिकत असतील पण म्हणून काय...? कळलं ना?

अतिशयोक्तिच्या सीमारेषेचा पार चक्काचूरच केला की निळूराव तुम्ही :D
येड-बीड लागलेय की काय....?? :D हा हा हा ...तुमचे प्रामाणिक मत जुलाबाच्या गोळ्या खाऊन बेजार झालेल्या माणसासारखे झाले की राव ...
हाहाहा.. आता कृपया तापू नका.. कदाचित तुम्हाला नुकतेच जुलाब हा विकार जडून गेलेला दिसतोय, त्यामुळे जुलाबाचे उदाहरण प्रामाणिक मतात देखील अगदी 'प्रामाणिकपणे' दिले आहे असे दिसतेय ... :P
तुमच्यावर बटूकेश्वराची कृपा होऊन तुम्हाला जुलाब कधीही लागू नयेत, असे माझे "प्रामाणिक" मत आहे बर का !! :D

मालक सगळेच रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात. कोणत्या जगात आहात राव?

हे तुमचे (प्रामाणिक) मत की, गोड गैरसमज की, एक्स्पर्ट ओपिनिअन की अजून काही? तुमच्या वक्तव्याचे नेमके बूड (Base) काय आहे? ...

Nile's picture

21 Mar 2012 - 2:55 am | Nile

अतिशयोक्तिच्या सीमारेषेचा पार चक्काचूरच केला की निळूराव तुम्ही

हे हे हे, सीमारेषा वगैरे म्हणजे काय ते आम्हाला माहित नाही. ;-)

हाहाहा.. आता कृपया तापू नका.. कदाचित तुम्हाला नुकतेच जुलाब हा विकार जडून गेलेला दिसतोय, त्यामुळे जुलाबाचे उदाहरण प्रामाणिक मतात देखील अगदी 'प्रामाणिकपणे' दिले आहे असे दिसतेय

त्यात तापायचंय काय? नवशिक्यांकडून चूका त्या व्हायच्याच नाही का!

तुम्ही शिकायच्याच मोड(कमोड नव्हे!!)मध्ये आहात तर सांगतो. जेव्हा वाक्यात '*' चिन्ह लिहून खाली त्याच चिन्हासमोर काही लिहलेलं असेल तर त्याचा अर्थ तिथे काहीतरी 'टीप' दिलेली असते. ती टिप सदर वाक्याचा अर्थ लावण्यात महत्त्वाची असते. असो, शिकाल हळू हळू.

बटाटा चिवडा's picture

23 Mar 2012 - 9:07 pm | बटाटा चिवडा

हे हे हे, सीमारेषा वगैरे म्हणजे काय ते आम्हाला माहित नाही.

तरुण वयात 'सीमारेषा' माहीत असाव्यात... (इतरांच्या) स्वास्थ्यास बरे असते ते.. !! :D
तेव्हा त्या माहिती करून घ्या लवकरच !!

त्यात तापायचंय काय? नवशिक्यांकडून चूका त्या व्हायच्याच नाही का!

नवशिके..? इथे नवशिका कोण आहे कळाले तर बरे झाले असते... असो.. गैरसमज स्वत:जवळच असावेत.. बरे असते ते.. :P

तुम्ही शिकायच्याच मोड(कमोड नव्हे!!)मध्ये आहात तर सांगतो. जेव्हा वाक्यात '*' चिन्ह लिहून खाली त्याच चिन्हासमोर काही लिहलेलं असेल तर त्याचा अर्थ तिथे काहीतरी 'टीप' दिलेली असते. ती टिप सदर वाक्याचा अर्थ लावण्यात महत्त्वाची असते. असो, शिकाल हळू हळू.

अहो.. हे * तर आम्ही शाळेत असतानापासून वापरतो आहोत की... छान छान.. तुम्हीही शाळेत गेला होता तर !!
पण तुमचे थोडे चुकले हो... सदर वाक्याचा अर्थच काय अनर्थ सुद्धा लागत नाहीये..:D
अर्थ लागणा-या वाक्यावर * ची खूण दिली पाहिजे हे तुम्ही हळूहळू नको, तर लवकरात लवकर शिकून घ्या ..त्यासाठी तुम्हाला कोणत्या मोड (कमोड नव्हे बर का!!:P ) वर जावयाची गरज असल्यास जरूर सांगा.. मी तुम्हास तिथे पोहोचण्यास मदत करेन ...म्हणजे संवाद दुतर्फी होऊ शकेल.. जरूर सांगा काही मदत लागली तर.. बटुकेश्वराचा आशीर्वाद आहेच !!

गणामास्तर's picture

18 Mar 2012 - 4:04 pm | गणामास्तर

ते दोघे टकले जुळे भाऊ मागच्या वर्षी पुण्यात आले होते, तेव्हा अभाविसे च्या कार्यकर्त्यांनी त्यांना
फटकवल्याची बातमी वाचली होती सकाळ मध्ये.
बाकी हा कार्यक्रम पाहता तो नाट्यमय रूपांतरणच आहे असे वाटते.
त्यातून नक्की मनोरंजन कुणाचे होते हे कळायला काही मार्ग नाही.

आत्मशून्य's picture

18 Mar 2012 - 5:44 pm | आत्मशून्य

तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.

बाडीस. तरुणांच्या सहज उत्साहपुर्ण, साहसी व स्पर्धात्मक स्वभावाला उत्तेजन देणारा हा शो आहे यात शंकाच नाही. बरेचदा कोणत्याही इंटेन्स प्रसंगी प्रत्येकाचा तोल जातो मनसोक्त शिवीगाळ वैयक्तीक पातळीवरही होते पण केवळ उघड उघड शिव्या दिल्या जातात ही एकमेव गोश्ट सोडली तर एकताच्या डेली सोप मालीकेत आणी या शो मधे आक्षेप घेण्यासारखे असे किती असमान मुद्दे सापडतील ?

शो चा जो टारगेट ओडीयन्स आहे त्यांची वर्तणुक सामान्य सामजीक जिवनात अशी कीती वेगळी असते ? एखादा कार्यक्रम सलग ९ सिजन प्राइम टाइमला चालतो आहे एखाद्या चॅनेलचा प्रमुख आधारस्तंभ आहे यातच तो पॉप्युलर तर आहेच पण टारगेट ऑडीयन्सने अत्यंत आवडीने अ‍ॅक्सेप्टही केला आहे हे तर स्पश्टच आहे.

राहीली गोश्ट त्या टकल्यांची, तर स्पर्धकांना दमात घेण्यास त्यांचे वर्तन शोच्या द्रुश्टीकोनातुन योग्य आहेच. फक्त ते तसं वागायचं डेरींग कॅमेर्‍यासमोर सातत्याने दाखवतात यातच बरेच जणांना पोटदुखी होते इतकचं. रोडीजचा कोणताही सिजन म्हणजे अलका कुबलचा "माहेरचं कुंकु" चित्रपट निपजावा अशी अपेक्षा योग्य नाही....

चेतनकुलकर्णी_85's picture

18 Mar 2012 - 9:39 pm | चेतनकुलकर्णी_85

तरुण भारतीय वर्ग कसे विकृत पाश्चात्य वर्तवणुकीचे तंतोतंत नक्कल करतो याहे सही सही उदाहरण आहे हा शो म्हणजे..
मुलाखत घेणारे आणि मुलाकःतीला येणारे दोघेही गावावरून ओवाळून टाकलेले आहेत..

आत्मशून्य's picture

18 Mar 2012 - 9:47 pm | आत्मशून्य

आपली ती संस्कृती त्यांची ती गटारी विकृती... बाडीस.

चेतनकुलकर्णी_85's picture

18 Mar 2012 - 10:03 pm | चेतनकुलकर्णी_85

बर...तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणी येरागाबाल्याने असल्या शो मध्ये "MC " "BC" केले तरी तुम्हाला काही प्रोब्लेम नाही येणार ना?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2012 - 10:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काय आशू, तुला आपली संस्कृती माहित नाही ??? जालावर वयाने, मानाने आणि ज्ञानाने मोठ्या असणाऱ्यांना मारहाणीच्या धमक्या देत फिरणे ज्यात बसते ती आपली महान संस्कृती.. त्याची तुला जराही कदर नाही ?? हर हर.... काय झाले आहे या देशाचे !!!

यकु's picture

18 Mar 2012 - 11:50 pm | यकु

प्रकाटाआ.
यशवंत.

चेतनकुलकर्णी_85's picture

19 Mar 2012 - 3:57 am | चेतनकुलकर्णी_85

काय आशू, तुला आपली संस्कृती माहित नाही ??? जालावर वयाने, मानाने आणि ज्ञानाने मोठ्या असणाऱ्यांना मारहाणीच्या धमक्या देत फिरणे ज्यात बसते ती आपली महान संस्कृती.. त्याची तुला जराही कदर नाही ?? हर हर.... काय झाले आहे या देशाचे !!!

मग काय दुसर्यांच्या खरडी पाहून भांडण लाऊन देण्यात आहे का आपली संस्कृती? :P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Mar 2012 - 12:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग काय दुसर्यांच्या खरडी पाहून भांडण लाऊन देण्यात आहे का आपली संस्कृती?

अजिबात नाही, भांडण लावून देण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, असलाच थोडासा तर स्वत: करण्यात आहे. शिवाय समोरील पार्टी समजूतदार आहे. अजिबात भांडण करणार नाही. धमकी देणाऱ्याला आपली चूक झाली याची जाणीव झाली तरी भरपूर आहे.

अजून एक, तुमच्याकडून दुसऱ्यांदा उल्लेख ऐकतो आहे म्हणून सांगतो, खरडी या इतरांनी बघाव्या म्हणूनच असतात. इतर लोकं वाचणारच. त्रास होत असेल तर व्यनी सुविधा आहे. तिचा वापर करावा.

सुहास..'s picture

20 Mar 2012 - 2:09 pm | सुहास..

मुलाखत घेणारे आणि मुलाकःतीला येणारे दोघेही गावावरून ओवाळून टाकलेले आहेत.. >>>>

=)) =)) =))

आणि पाहणार्‍याला ?? ;)

संपत's picture

18 Mar 2012 - 11:11 pm | संपत

मी रोडीचा एक सिझन पहिला होता तो मला नक्कीच आवडला होता. जाता जाता सांगायची गम्मत म्हणजे माझ्या एका मित्राला मी मिसळपावची शिफारस केली होती तेव्हा त्याने मिसळपाव वर घेतलेले आक्षेप हे वरती रोडीज वर घेतल्या जाणारया आक्षेपान्सारखेच होते.. उथळ प्रतिक्रिया, स्वताला शहाणे समजणारे लोक, बाष्कळ धागे, अर्वाच्य भाषा इत्यादी.. ज्याचे मत त्याच्याकडे... आपल्याला बुवा रोडीज आवडते आणि मिसळपाव देखील .. :)

निखिल देशपांडे's picture

19 Mar 2012 - 11:25 am | निखिल देशपांडे

याने मिसळपाव वर घेतलेले आक्षेप हे वरती रोडीज वर घेतल्या जाणारया आक्षेपान्सारखेच होते.. उथळ प्रतिक्रिया, स्वताला शहाणे समजणारे लोक, बाष्कळ धागे, अर्वाच्य भाषा इत्यादी.

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2012 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

त्याने मिसळपाव वर घेतलेले आक्षेप हे वरती रोडीज वर घेतल्या जाणारया आक्षेपान्सारखेच होते.. उथळ प्रतिक्रिया, स्वताला शहाणे समजणारे लोक, बाष्कळ धागे, अर्वाच्य भाषा इत्यादी..

=)) =)) =)) =))

आता माझ्यासारख्या दोन-चार लोकांना अंभाविप* ने भविष्यात रट्टे दिले, की राहिलेली कसर पण भरल्या जाईल.

*अंतरजालिय भारतीय विद्यार्थी परिषद.

कपिलमुनी's picture

20 Mar 2012 - 2:06 pm | कपिलमुनी

पोरांना टॉर्चर करणारा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2012 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरूण मुलांनी हा कार्यक्रम जरुर पाहावा अशी मी शिफारस करु इच्छितो.

कधी तरी पाहीन हे प्रकरण. माहितीबद्दल धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2012 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार

तरूण... तरूण म्हणत आहेत ते.

तुम्ही ज्ञानसंपन्न, जेष्ठ आणि सिनियर सिटिझन आहात मिपाचे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2012 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, एकशे चौर्‍यांशी ( की साडेतिनशे )वर्षाचे पितामह भिष्म तरुण होते त्या तुलनेत तर मी तर नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला देखणा तरुण आहे. ;)

तुम्ही ज्ञानसंपन्न, जेष्ठ आणि सिनियर सिटिझन आहात मिपाचे.

थँक्स रे......!!! एका सिनियर बेडकाचं एका तरुण बेडकानं केलेला आदर पाहून डोळे डबडबून आले. :)

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

20 Mar 2012 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार

थँक्स रे......!!! एका सिनियर बेडकाचं एका तरुण बेडकानं केलेला आदर पाहून डोळे डबडबून आले.

आता एक राजकुमारी शोधली पाहिजे चुंबन देणारी. ;)

आता एक राजकुमारी शोधली पाहिजे चुंबन देणारी. >>>

पुर्व दिशेला कोणीतरी ' ईश्श्य ' म्हणुन लाजल्याचा भास झाला ;)

प्यारे१'s picture

20 Mar 2012 - 3:57 pm | प्यारे१

>>>पुर्व दिशेला कोणीतरी

नक्की पूर्वच का रे?
'अमरिका एक 'पश्चिमी' सभ्यता है जो हर दुसरे देश की सभ्यता में बडी असभ्यता से अपना मुह घुसाने का प्रयास करती है'
असं काहीसं भाषांतरीत हिन्दी ऐकलं होतं ब्वा!

मा झीचला ल : मी माझ्या ३.१४ *३.१४ च्या बाथरुमला समुद्र म्हणतो. येनी आब्जेक्शन????

____/\____!!!!!!

=) =)) =)) =)) =)) =))

प्यार्‍या.. तु पण ना..!
जौ दे रे भौ.

इरसाल's picture

20 Mar 2012 - 1:16 pm | इरसाल

आजकाल चीनमधे काय ? (की विहीरीबद्दल बोलताय.)

रोडीचे मागचे २ भाग बरेच कंटाळवाणे वाटले. त्यांच्या मुलाखतीमध्ये बर्‍यापैकी खूमार होती.

दुर्दैवाने यात कोणी मराठी मुले दिसली नाही.

मितभाषी's picture

25 Mar 2012 - 4:37 pm | मितभाषी

८ व्या भागात बुलढाणा जिल्ह्यातला एक तरुण होता. सुरज कि असे काहीतरी नाव होते, नक्की नाव आता आठवत नाही.

मी ज्या ज्या वेळी हा कार्यक्रम पाहिला त्यावेळी ह्यात सुत्रसचालक व सहभाग कर्ते देखिल एकमेकावर डाफरत असतात.

गोंधळी's picture

23 May 2012 - 8:10 pm | गोंधळी

हा सिझन खुपच बोरिंग वाटतो आहे.सगळे रोडिज पकाव आहेत. ऑडिशन बघुन वाटले होते मागील मालिकेतिल रोडिजपेक्शा या मालिकेत नगास नग अस्तिल.पण फूस....