सांगली बीड मध्ये अफूच्या शेतीचे प्रकरण गाजत आहे..
शेका~या वर अटक करून खटले भरले जात असल्याचे वाचनात येते.
शेतकरी अफू कडे आता नगदी पिक ह्या दृष्टीतून बघत आहे.८०० रुपये किलो भाव चालू आहे.
शरद जोशी यांनी सरकाराने परावाने द्यावेत व ह्या शेतीस कायदेशीर मान्यता द्यावी असा विचार मांडला आहे..
अफू तयार करणा~या कारखान्यावर बंदी आणा ...पिका वर बंदी नको...शेतक~याना का त्रास असा खडा सवाल जोशी यांनी उभा केला आहे....
उसा पासून दारू व हात भट्टी करतात म्हणून उस शेतीवर बंदी आणणार का?
सरकारचे धोरण शेतक~यास कर्ज बाजारी करते..
पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर हि शेती होईलच कशी?असा टोला पतंग रावांनी मारत सार लाटण पोलिसांच्या गळ्यात घातले आहे.
दुसरी बाजू म्हणजे अमली पदार्थांची तस्करी व त्यातून मिळणारे धन व फोफावणारा दहशवाद हे सारे एका मेकात गुंतले आहेत..
आमली पदार्थांची उलाढाल जगात ३०० बी लीयान डॉलर इतकी प्रचंड आहे...
एक किलो हेरोईन ची किंमत १ कोटी ...
ह्या सा~या पार्श्व भूमीवर सरकार काय करते हे बघायचे..
धन्या पासून दारू आता अफूची शेती.......
प्रतिक्रिया
4 Mar 2012 - 11:21 am | अमितसांगली
सांगलीत अफू नाही....काही ठोस पुरावा आहे का.......????
4 Mar 2012 - 11:24 am | चिंतामणी
सांगली जिल्हयात.
4 Mar 2012 - 11:30 am | अन्या दातार
मग ही कारवाई आकसापोटीच झाली असणार ;)
जप्त केलेला माल(१२२ किलो अफू बोंडे, ६२९२ किलो अफू झाडे) पोलिसांनीच कुठुनतरी आणून टाकला का?
गृहितकः पोलिसांनी नि:पक्षपणे पंचनामा करुन त्याची 'खरी' प्रत प्रेसकडे दिली
4 Mar 2012 - 2:44 pm | चिंतामणी
१)
२)
३)
४)
4 Mar 2012 - 11:52 am | रघुनाथ.केरकर
बर्याच धान्या.न पासुन मद्य बनउ शकतो, म्हणुन सगळ्याच धान्या.न च्या शेतीवर सरकार बन्दी आणणार का?
4 Mar 2012 - 1:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अकु काका*, इथे फार दंग होण्यापूर्वी एक मुद्दा मांडतो.
अफू खसखशीपासून बनते अशी माझी माहिती आहे, पण नक्की फरक माहित नाही. म्हणजे अफू ही प्रोसेस्ड खसखस असते की खसखस ही प्रोसेस्ड अफू असते की दोन्ही एकाच कच्च्या मालापासून बनतात, हे मला नीटसे माहित नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा असा आहे की, आम्हाला खसखस पिकवू द्या त्यापासून अफू बनवणाऱ्या कारखान्यांवर बंदी घाला. जे तार्किक दृष्ट्या पटणारे आहे.
अजून एक प्रश्न असा की आपल्याकडे खसखशीच्या शेतीवर बंदी असेल तर मग आपण जी खसखस खातो ती नक्की कुठे पिकते ? बंगाली लोकांच्या काही पदार्थात खसखस हा मुख्य पदार्थ असतो, त्यामुळे तिथे त्याची शेती होते असे एका बंगाल्याकडून ऐकले होते.
कॉलिंग मुटे काका !
कॉलिंग मुटे काका !!
कॉलिंग मुटे काका !!!
* मीच चुकून अफू काका वाचले, पूर्वदृश्य बघताना ;-)
4 Mar 2012 - 2:19 pm | गणामास्तर
>>>म्हणजे अफू ही प्रोसेस्ड खसखस असते की खसखस ही प्रोसेस्ड अफू असते की दोन्ही एकाच कच्च्या मालापासून बनतात, हे मला नीटसे माहित नाही.
माझ्या माहिती प्रमाणे झाड खसखशीचे असते आणि त्याला जी बोंडे लागतात ती वाळल्यावर त्यांना रगडून खसखस उत्पन्न केली जाते. परंतु ती बोंडे ओली असताना त्याला चीर पाडली असता त्यातून एक प्रकारचा स्त्राव येतो, त्यापासूनच अफू तयार होते.
पुढे त्या स्त्रावावर रासायनिक प्रक्रिया वगैरे करून त्याचे हेरोईन बनवले जाते असेही वाचल्याचे स्मरते.
बाकी जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच..
6 Mar 2012 - 12:20 am | अपूर्व कात्रे
तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि बाकीची माहिती खालील दुव्यावर मिळेल.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=214...
4 Mar 2012 - 3:42 pm | प्रास
अफूच्या बोंडातील बीज म्हणजे खसखस.
अफूची शेती सरकारी असते. सरकार परवाने देऊन ऑफिशिअली अफूची शेती करायची परवानगी देते. असं करत असताना अफूच्या बोंडांपासून हशीश बनणार नाही याची काळजी घेतली जाते (किंवा तसा प्रयत्न केल्याचं दाखवलं जातं.) या शेतीमधूनच खाण्यासाठीच्या खसखशीचा पुरवठा होतो.
पहाटे अफूच्या बोंडांवर चाकूने चिरा पाडून त्यातून दिवसभर त्या चिरांमधून स्रवणारा स्राव (चिक) पुढे अफू, हशीश आणि चरस बनवण्यासाठी वापरतात. हा स्राव एका बोंडातून साधारण ३ ते ४ दिवस स्रवतो आणी सुरूवातीला पांढर्या रंगाचा असला तरी पुढे उन्हात काळा पडतो.
अफूच्या बोंडांतून स्राव यायचा थांबला तरी ती बोंडं (पोसदाडा) औषधी उपयोगात उत्तम वेदनाशमनाचं कार्य करतात. (मात्र सात-आठ वर्षांपूर्वी सहज उपलब्ध असलेला पोसदाडा सरकारदरबारी बॅन असल्याने हल्ली मिळत नाही.)
4 Mar 2012 - 11:12 pm | किचेन
मा.किरण बेदी यांच्या इ डेअरया पुस्तकात त्यांचा अफूच्या फुलांसोबत फोटो पहिला होता.त्या फुलांना च्चेद दिला जातो कि त्याच काही फळ कणीस वगैरे काही असत?
4 Mar 2012 - 4:46 pm | मन१
असल्या कुठल्या बंदीची गरजच काय?
कायदा बदला म्हणावं. अफू पिकवली, त्याचं ते बहुमूल्य हेरॉइन वगैरे बनवलं तर उलट अर्थव्यवस्थेला दणक्यात चालना मिळेल. फक्त त्याच्या सेवनावर बंदी हवी, अफू व हेरॉइनचे उत्पादन, प्रोसेसिंग व निर्यात ह्यास उत्तेजन दिल्यास उत्तम.
4 Mar 2012 - 6:16 pm | कुंदन
मन्या , ओन साईटला जाताना नेशील का पार्सले?
4 Mar 2012 - 6:39 pm | मन१
मी ऑनसाइटला जाइन त्या ठिकाणी तू असशील तर नक्कीच.... ;)
4 Mar 2012 - 6:32 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या माहितीप्रमाणे राजस्थान व इतर काही राज्यात तेथील सरकार ने तेथील शेतकऱ्यांना कायदेशीर परवाने देऊन अफू लागवडी साठी परवानगी दिली आहे. मात्र त्याची विक्री ही औषधी कंपन्यांना थोडक्यात कायदेशीर वापराकरिता होतो. अफू चे पीक होण्यासाठी विशिष्ट हवामान लागते. दक्षिण अमेरिका ,अफगानिस्तान हे काही प्रमुख पट्टे आहेत.
ह्या देशांची अर्थव्यवस्थेत अफू फार मोलाची कामगिरी बजावतात. त्यांची प्रमुख बाजारपेठ अनुक्रमे ,उत्तर अमेरिका, वेस्ट युरोप, आशिया मधील प्रगत देश आहेत.
महाराष्ट्रात अफूचे पीक घेणे जर शक्य असेल तर राज्य सरकारने कायदेशीर रीत्या इतर राज्यासारखे ह्या पिकाचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना अनुमती दिली तर त्यांचा विकास होईन.
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया आदी देशातून उत्तर अमेरिकेत कोकेन आले. व त्याने अमेरिकन समाजजीवन ढवळून गेले. ह्याचे यथार्थ वर्णन ब्लो ह्या सिनेमात दिसून येईन. हा सिनेमा अमेरिकेला कोकेन ची चव चाखायला लावणाऱ्या एक ड्रग डीलर च्या आयुष्यावर आहे. जॉनी डेफ नेहमीप्रमाणे ही भूमिका जगलाय. .
आज अमेरिका अफगाण वर द्रोण हल्ले करत कारण अमेरिकेचे काही हजार माणसे ट्वीन टॉवर उध्वस्त झाल्याने मारल्या गेलीत. मात्र लाखो अमेरिकन माणसे वर्शोवर्ष उध्वत करणार्या ह्या शेजारील देशांवर द्रोण हल्ले का बरे करत नाहीत. अगदी संयुक्त राष्ट्र संघांचे प्रमुख उद्दिष्ट अमली पदार्थांचा व्यापार रोखणे आहे. ते तेथे संयुक्त कारवाई का बरे करत नाहीत.
कारण सोपे आहे. जगातील सर्वात फायदेमंद व भरपूर पैसा असलेला ह्या व्यवसायात जगातील सर्वात बलाढ्य देशातील बड्या लोकांचे हात आहेत.
दाउद ने अफगाण मधून स्वस्त व गुणवत्तेत सरस कोकेन युरोपात आपल्या गुन्हेगारी जगतातील जाळ्याच्या वापर करून पुरवठा केला. दक्षिण अमेरिकेतील धंदा मारला गेला. कारण आशियातून कोकेन युरोपात व आशियात जलद व सहज पोहोचवले जाऊ लागले. आज अफगाण मध्ये जगातील सर्वात जास्त अफू पिकवली जाते. व ह्या सध्याच्या यादवीत त्यांचा धंदा सुरळीत चालू आहे.त्यावर नियंत्रण मिळवणे हा अमेरिकन यंत्रणेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असा अमेरिकन विरोधी प्रचार सध्या जोरात चालू आहे.
अफू., तेल . शस्त्रे ह्या त्रिमूर्ती जगातील सर्वात मोठा व्यापार घडवून आणतात. अनेक देशातील अर्थकारण व सत्तापालट ह्याचं कारणांसाठी होतो.
.
4 Mar 2012 - 11:15 pm | किचेन
अफगाण हा शब्द अफु वरुन आलाय का?
6 Mar 2012 - 11:14 pm | प्रभाकर पेठकर
अर्धा शब्द अफूवरून आला असावा, उरलेला अर्धा का आणि कशावरून आला ह्यावर संशोधन करावे लागेल.
7 Mar 2012 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार
पेठकर काका म्हणजे कहर आहेत !
__/\__
7 Mar 2012 - 2:43 pm | विसुनाना
माझे एक मराठी मित्र राजस्थान/मध्यप्रदेश सीमेवर (इंग्रजांनी) वसवलेल्या 'नीमच' (हे एका लांब इंग्रजी नावाचे संक्षेपीकरण आहे) नावाच्या गावी Central Bureau of Narcotics मध्ये उच्च पदावर काम करतात.
त्यांच्याकडून मिळालेली माहिती - त्या भागात मोठ्या प्रमाणावर अफूची शेती केली जाते आणि खसखससुद्धा तयार होते. बोंडावर चिरा पाडून एकत्र केलेला चीक आणि खसखस (बोंडांमधले बी) सरकार खरेदी करते. हे 'ओपियम' कायदेशीरपणे अनेक औषधी द्रव्यांमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते. (त्याचा अंमली पदार्थांतला वापर बेकायदा आहे.) म्हणजे ही रीतसर शेती आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रात अफूच्या शेतीला परवानगी दिली तर हे पीक राजरोसपणे घेता येईल. परंतु त्यासाठी नार्कॉटिक्स अॅक्ट मध्ये बदल करून महाराष्ट्रात 'सीबीएन' ची कार्यालये आणि कार्यप्रणाली ठीकठिकाणी राबवावी लागेल.
असे होईपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना ही शेती कायदेशीरपणे करता येणार नाही.