पक्षी निरिक्षकांचे नंदनवन Little Rann of Kutch .

Manish Mohile's picture
Manish Mohile in भटकंती
23 Feb 2012 - 11:47 pm

शीर्षक वाचून कदाचित त्यात थोडासा विरोधाभास दिसेल. कारण रण म्हटले म्हणजे आपल्या डोळ्या समोर येते मैलोंन मैल पसरलेली रखरखीत रुक्ष जमीन, विखरलेली काटेरी झुडपं. अशा जागी पक्षी आणि ते सुद्धा फ्लेमिंगोज, पेलिकन्स सारखे पक्षी दिसणं कसे शक्य आहे?

पण हे सत्य आहे. पावसाळ्यामध्ये जो काही थोडा बहुत पाऊस पडतो ते पाणी नंतर हळूहळू सुकू लागते आणि हिवाळ्यापर्यंत जमीन पाणथळ (काही अंशी दलदलीची) बनते जी पक्ष्यांसाठी आदर्श असते.

कच्छचे रण सगळ्यांना माहीत आहे. आपल्या भारत देशाची पश्चिम सीमा. "रिफ्यूजी" चित्रपटामध्ये खुपसं चित्रीकरण या रणातील आहे. पण ते GRK - Greater Rann of Kutch. ते देखील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण मी सांगतोय ते LRK अर्थात Little Rann of Kutch बद्दल. LRK हे भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे अभयारण्य आहे .

अहमदाबाद पासून साधारण १००-११० कि.मी. अंतरावर सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये ध्रांगध्रा नावाचे एक छोटे गाव आहे. तेथून बजाना नावाच्या एका एकदम छोट्या गावामधून entry आहे LRK मध्ये. तसा अजून एक entry point आहे झिंझुवाडा या गावाजवळून. पण जर तुम्हाला पक्षी निरिक्षणामध्ये रस असेल तर बजानाच ऊत्तम कारण येथून water bodies जवळ आहेत.
येथे जवळच एखाद दोन रिसॉर्ट्स पण आहेत जी सफारी आयोजित करतात. पण त्या थोड्या महागड्या आहेत साधारण रु. २२००-२५०० एका गाडी साठी . त्या जिप्सी मध्ये ६ व्यक्ती असतात. या रिसॉर्ट्स मध्ये साधारणतः नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि निवास असे पॅकेज असते. आम्हाला मात्र सकाळी जाऊन दुपार पर्यंत अहमदाबाद ला परत येणे शक्य असल्यामुळे आम्ही ठरवले की रविवारी सकाळी लवकर निघायचे.

रविवार १२ फेब्रुवारी २०१२. सकाळी पावणे सहा वाजता आम्ही (मी, माझा मित्र प्रदीप आणि आमच्या दोघांच्या फॅमिलीज) अहमदाबादहून निघालो. साधारण पावणे दोन तासात आम्ही बजानाला पोहोचलो. गुजरात वन विभागाच्या कार्यालयातून परवाना घेतला. गाडी आमचीच होती. फक्त गाईड घ्यावा लागला. पाच वयस्क आणि दोन मुले यांची entry fee रु. ३००/- व दोन cameras चे रु १००/- भरून आणि गाईड ला गाडीत घेऊन आम्ही निचालो. गावापासून एखाद कि.मी. पुढे आल्यावर ऊजवीकडे वळलो आणि प्रवेश केला रणामध्ये आणि झाले रणाचे पहिलं दर्शन.

थोडे पुढे गेलो आणि दिसली "घुडखुर" म्हणजेच "Wild Ass". जगातील एकमेव नैसर्गिक आवास - Wild Ass चे.

तो कळप बघून लगेच आम्ही निघालो कारण आमचे मुख्य आकर्षण आणि लक्क्ष्य होते पक्षी. गाडी सावकाश चालवत आजूबाजूला बघत आम्ही पुढे जात होतो आणि पहिल्यांदा दिसले "Common Crane".

त्यानंतर दिसला "ग्रे हेरॉन".

आणि मग दिसले सुप्रसिद्ध फ्लेमिंगो पक्षी - कमीत कमी दोन अडीचशे. एका फ्रेम मध्ये पकडणे अशक्य होते.

तिथेच दिसला "Western reef egret" - काळा बगळा.

मनसोक्त फोटो काढले. आता जवळपास दहा वाजले होते. सडकून भूक लागली होती. मग तेथेच त्या पाणवठ्याच्या बाजूला थोडीशी सावली बघून आम्ही नाश्ता केला. थंडी अजून ही टिकलेली होती. मोकळ्यावरची जागा होती. सोबतीला फ्लेमिंगोज होते. अजून काय हवे? नाश्ता ऊरकला. आपल्यामुळे पर्यावरण प्रदुषित होऊ नये म्हणून disposable plates, glasses वगैरे कचरा गोळा करून एका पिशवीत भरला आणि ती पिशवी गाडीत ठेवली घरी परत गेल्यावर कचर्यात टाकण्या साठी.

तिथून निघालो आणि थोड्याच वेळात एक मोठी water body दिसली

आणि त्यात दर्शन झाले पेलिकन्सचे.

इतर ही अनेक पक्षी दिसले - ऊदा. Northern Shoveller, Common Snipes, Black tailed godwits, Sea gulls.

आता जवळपास सव्वाबारा वाजले होते. गरमी वाढायला लागली होती. आम्ही पक्षी निरिक्षणाचा अगदी मनसोक्त आनंद लुटला होता. परतीच्या वाटेला लागलो आणि दिसले दोन शिकारी पक्षी - देव ससाणा म्हणजेच "Common Kestrel" व "शिकरा".

आजची आपली ट्रीप खुपच यशस्वी झाली या आनंदात परत निघालो. त्या यक्षभूमी कडे जिने एवढे सगळे पक्षी आम्हाला दाखवले तिच्याकडे वळून नजर टाकली आणि हे द्रुश्य दिसले.

निसर्गाच्या अगाध लीलेचे आणि विविधतेचे कौतुक करत आम्ही अहमदाबादच्या दिशेने परत निघालो. आता दरवर्षीच्या पक्षी निरिक्षण स्थळांच्या यादीमध्ये एका हमखास जागेचा समावेश झालेला होता.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2012 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

चान चान ...मन पंछी बनके उडने लगा

सुंदर आणि अचंबीत करणारे आहे हे...

जयंत कुलकर्णी's picture

24 Feb 2012 - 5:02 am | जयंत कुलकर्णी

छान. मलाही एकदा जायचे आहे या भागात. जायच्या अगोदर आपल्याशी माहितीसाठी संपर्क करेनच.

मदनबाण's picture

24 Feb 2012 - 7:48 am | मदनबाण

वा... मस्तच ! :)
जायला मिळाले पाहिजे इथे...

(पाखरु निरिक्षक);)

प्रचेतस's picture

24 Feb 2012 - 8:42 am | प्रचेतस

भारी.
सुंदर फोटो. मजा केलीत राव.

यशोधरा's picture

24 Feb 2012 - 11:23 am | यशोधरा

छान.

विसोबा खेचर's picture

24 Feb 2012 - 11:27 am | विसोबा खेचर

मस्तच..!

सुंदर सहलीचे सुरेख वर्णन आणि फोटो. आवडले.

स्वातीविशु's picture

24 Feb 2012 - 12:15 pm | स्वातीविशु

वॉव...सगळे पक्षी किती शिस्तबद्ध आहेत ना? :)

मस्त सफर आणि फोटो.:)

पंछी बनू उडती फिरु मस्त गगन में, आज मैं.............

पियुशा's picture

24 Feb 2012 - 12:27 pm | पियुशा

मस्त फोटो :)

पैसा's picture

24 Feb 2012 - 1:55 pm | पैसा

मस्त फोटो आणि वर्णन. तो ससाण्याचा फोटो तर एकदम जबरदस्तच आहे! काय ऐट आहे त्याची!
आणि कचरा तिथे न टाकता परत आणल्याबदल अभिनंदन! नाहीतर सगळी अभयारण्यं आणि पिकनिक स्पॉट म्हणजे भल्यामोठ्या कचराकुंड्या झालेल्या दिसतात बहुतेकवेळा!

अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम

सर्वसाक्षी's picture

24 Feb 2012 - 2:14 pm | सर्वसाक्षी

झकास वर्णन आणि सुरेख चित्रे. इथे जायला काही विशिष्ठ मोसम आहे का? उन्हाळ्यात फार गरम असेल तेव्हा पक्षी असतील का? इथे जायला निश्चितच आवडेल.

शैलेन्द्र's picture

24 Feb 2012 - 7:51 pm | शैलेन्द्र

मस्त ... .

परत कधी जाताय?

वपाडाव's picture

24 Feb 2012 - 8:19 pm | वपाडाव

इथे हिवाळ्यात'' गेल्यास मजा येते असे ऐकुन आहे...
रात्रीच्या वेळी चंद्राचं टिपुर चांदणं अन लखलखती चंदेरी झळाळी ल्यालेली क्षितीजापर्यंत पसरलेली पांढरी फटक जमीन... एकदम विहंगम दृष्य असते... एक झलक...
http://wikitravel.org/upload/shared/6/64/Rann_utsav_11.jpg

वा
फोटो आणि वर्णन सुंदर आहेत

मेघवेडा's picture

24 Feb 2012 - 9:02 pm | मेघवेडा

छान! ऐटबाज ससाण्याचा आणि शेवटचा फोटो आवडला! :)

अभिजीत राजवाडे's picture

25 Feb 2012 - 6:06 am | अभिजीत राजवाडे

मला या जागेबद्द्ल आणि या अभयारण्याबाबत माहित नव्हते. तुमच्या लेखामुळे कळले. पक्षीनिरीक्षणावर आणखी लेख येऊ द्यात.

नविनच माहीती आणी फोटोज बद्दल बोलायला शब्दच नाहीत :-)

--टुकुल

एकट्या फ्लेमिंगोचा पाण्यात प्रतिबिंब पाहणारा फोटो खुप मस्त आला आहे.

अमृत's picture

25 Feb 2012 - 7:21 pm | अमृत

फ्लेमिंगो माझा आवडता पक्षी... सगळेच फोटो छान आलेत. . . पक्ष्यांच्या इतक्या प्रजातींची नावे माहिती असल्याबद्दल तुमचा हेवा वाटला.

अमृत