मॅंगो चीजकेक ...खास प्रेमदिनानिम्मीत्त

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
14 Feb 2012 - 7:08 pm

आज प्रेमदिन आणी एकही पाकृ नाही???? असे आत्ताच आपल्या एका मिपाकर मैत्रीणीने विचारले...असं कसं होईल...आजचा दिवस खास आहे म्हणून खास पाकृ देत आहे :) तुम्ही नक्की करुन पहा आणी आपल्या प्रियजनांना खाऊ घाला :)

अतिशय सोप्पी आणी नो बेक... नो एग अशी पा़कृ आहे ;)

साहित्यः
२०० ग्राम क्रीम चीज
१५० मिली फ्रेश क्रीम
२५० ग्राम कॅन्ड मॅंगो पल्प (आंब्याच्या सीझनमध्ये ताजा आमरस वापरलात तर उत्तम)
१-१/२ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा
२-३ टेस्पून बटर
१/२-३/४ वाटी साखर (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून जिलेटीन पावडर
दीड टीस्पून वेलचीपूड

.

पाकृ:

प्रथम मारी बिस्किटांच्या चुर्‍यात वितळलेले बटर घालून नीट एकजीव करावे.

.

तुमच्याकडे जर का स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर त्यात ह्या बटर घातलेल्या चुर्‍याचा बेस दाबून तयार करावा. नसेल तर कुठल्याही बाऊल/ वाईन ग्लासमध्ये चमच्या च्या मदतीने बेस दाबून तयार करावा. तयार ग्लासेस / टीन फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.

.

.

आता मिक्सींग बाऊलमध्ये क्रीमचीज, फ्रेश क्रीम व साखर घालून बीटरने फेटून घ्यावे.

.

३ टेस्पून पाणी मायक्रोव्हेवमध्ये १०-१५ सेकंद गरम करून घ्यावे व त्यात १टेस्पून जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. हे मिश्रण आंब्याच्या रसात घालून एकजीव करावे. (घाई गडबडीत ह्याचे फोटो काढायचे राहून गेले :( )

आता अर्ध्यापेक्षा जास्त जिलेटीनमिश्रीत आंब्याचा रस त्यात घालावा. वेलचीपूड घालून परत एकदा बीटरने बीट करुन घ्यावे.

.

फ्रिजमध्ये ठेवलेले ग्लासेस/ टीन काढून त्यावर ह्या चीजच्या मिश्राणाचा जाडसर थर पसरावा.पुन्हा फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.

.

.

१५ मिनिटांनी त्यावर उरलेल्या आंब्याच्या रसाचा थर द्यावा व रात्रभर फ्रिजमध्ये किंवा ६-७ तास सेट होण्यासाठी ठेवावे.

.

.

दुसर्‍या दिवशी स्प्रींगफोर्म केकटीनच्या कडेने हलकेच सुरी फिरवून त्याचे रिंगण काढावे. आवडत असल्यास त्यावर चॉकलेट सॉस / मिश्र फळ्यांच्या/ आंब्याचा तुकड्यांनी किंवा असेच पुदिनाची पाने लावून सर्व्ह करावे.

ग्लासमध्ये सर्व्ह करत असाल तर असेच सर्व्ह करा दिसायला ही छान दिसतं :)

.

मिपावर येऊन एक वर्ष कधी पूर्ण झाले समजले नाही... आज ही पाकृ तुम्हा सगळ्या मिपाकर मित्र-मैत्रीणींसाठी आहे :) असेच प्रेम असु द्या :)

.

प्रतिक्रिया

आज एखादी तायडी काही तरी पेश्शल घेउन येणार हा आमचा होरा चुकु दिला नाहीत.
धन्स.
मिपावाच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल शुभेच्छा !!!.

प्राजु's picture

14 Feb 2012 - 7:31 pm | प्राजु

खल्लास!!!!!!

ते कोको पावडरने हार्ट शेप मध्ये डेकोरेशन कसे केले आहेस??

मस्त दिसतंय!

सानिकास्वप्निल's picture

14 Feb 2012 - 10:10 pm | सानिकास्वप्निल

ते कोको पावडरचा हार्ट शेप मी घरीच साध्या कागदाचा स्टेन्सील वापरून केले आहे :)
बाजारात ही असले स्टेन्सील मिळतात :)

प्राजु's picture

15 Feb 2012 - 12:57 am | प्राजु

वॉव....! छान आयडीया आहे.. :)

पियुशा's picture

15 Feb 2012 - 12:36 pm | पियुशा

जबरा !!!!!! कातील, पॉश.......
शब्द कमी आहेत स्तुती करायला :)
____/\____
:)

मोदक's picture

14 Feb 2012 - 7:36 pm | मोदक

तोंपासू.. :-)

अन्नू's picture

14 Feb 2012 - 7:42 pm | अन्नू

Smiley Smiley

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 7:43 pm | अत्रुप्त आत्मा

पहाता क्षणीच खावासा वाटणारा क्येक

फोटो आणी पा.कृ.सांगायची श्टाइल...नेहमी प्रमाणेच एकदम अप-टु-डेट...आणी झक्कास...! :-)

पक पक पक's picture

14 Feb 2012 - 7:49 pm | पक पक पक

झक्कास ..मस्त..लाजवाब....

Solapurkar's picture

14 Feb 2012 - 8:18 pm | Solapurkar

ताई, फारच सुन्दर पाक्रु. :-)

अभिनन्दन.

तर्री's picture

14 Feb 2012 - 8:19 pm | तर्री

पाकृ , निवेदन व सजावट सारेच अप्रतिम.
मिपा परिवारात वर्ष पूर्ती बद्दल अभिनंदन.

रेवती's picture

14 Feb 2012 - 8:27 pm | रेवती

अग्ग्ग्ग्ग!
भारी पाकृ.
प्रेमदिन व मिपावर वर्षपूर्तीच्या शुभेच्छा!
आज सगळेजण भारीच प्रेमळपणे वागतायत असे वाटते आहे.:)

इरसाल's picture

15 Feb 2012 - 12:47 pm | इरसाल

प्रथम तर पाकृ एकदम, जबरा, खतरा, आणी टकाटक.

आता.......

आज सगळेजण भारीच प्रेमळपणे वागतायत असे वाटते आहे.......बद्दल ही घ्या माझी माशी शिन्कली.....;)

वाटरमार्क फिका किन्वा एका कोपर्यात असावा अस्स वाटतय, नाहीतर तो पदार्थात तरन्ग्तोय असा भास होतोय.

चिरोटा's picture

14 Feb 2012 - 9:01 pm | चिरोटा

मस्तच

निवेदिता-ताई's picture

14 Feb 2012 - 10:22 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर.......करुनच पहाते उद्या..

जाई.'s picture

14 Feb 2012 - 10:41 pm | जाई.

खल्लास

स्मिता.'s picture

15 Feb 2012 - 12:06 am | स्मिता.

ते शेवटचे दोन फोटो कसले आहेत! काय बोलू? जावू दे... दर वेळी नवीन शब्द कुठून आणायचे?

झकास.. कसला केक बनला आहे आणि तोही बिनअंड्याचा.. मस्त मस्त.. बाकी शब्द सुचत नाहीत..

- पिंगू

इन्दुसुता's picture

15 Feb 2012 - 12:40 am | इन्दुसुता

उत्कृष्ट.... फार आवडली पाकृ... आणि अर्थातच प्रेझेन्टेशन.... ह्या कलाकृतीला सलाम.

तुम्ही जेंव्हा भारतात याल ना तेंव्हा तुझ्या हातांचा फोटो काढुन ठेवणार आहे माझ्याकडे....

प्यारे१'s picture

15 Feb 2012 - 12:07 pm | प्यारे१

५० जपून बरं...
चमचे मागता मागता हाताचे फटु मागू लागला आहात.
उद्या
.
.
.
.
.
.
स्वप्निल मागाल. कसं जमायचं? ;)

खादाड's picture

15 Feb 2012 - 11:34 am | खादाड

खूपच छान !!:)

जयवी's picture

15 Feb 2012 - 12:02 pm | जयवी

आई गं...... कातिल फोटो......... !!

धनुअमिता's picture

15 Feb 2012 - 1:08 pm | धनुअमिता

मस्तच. नक्की करुन बघेन.

:) :-) :smile:

रूपाली.नाईक's picture

15 Feb 2012 - 2:15 pm | रूपाली.नाईक

खुप खुप आभार....
आता आम्बे नाहि ग ताई मिलत...
मी strawberry ने try करेन...
मिपावर वर्षपूर्तीच्या शुभेच्छा!!

स्वाती२'s picture

15 Feb 2012 - 3:17 pm | स्वाती२

खल्लास!

प्राजक्ता पवार's picture

15 Feb 2012 - 3:39 pm | प्राजक्ता पवार

सुपर्ब :)

हसरी's picture

15 Feb 2012 - 4:32 pm | हसरी

सुरेख!! :-)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2012 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

शब्दच संपले....

सुहास झेले's picture

15 Feb 2012 - 7:25 pm | सुहास झेले

ज ह ब ह र ह !!!

पैसा's picture

15 Feb 2012 - 7:39 pm | पैसा

आमच्या डाएट प्रोग्रामची सरे 'आम' कत्ल करण्यात आलेली आहे!

चैत्रपालवी's picture

16 Feb 2012 - 2:35 pm | चैत्रपालवी

हाय सानिका,
तुझ्या पाककृती नेहमी वाचते. आणि करुनही बघत असते. खूप छान होतात आणि मुख्य म्हणजे न चुकता!
तुला खूप खूप धन्यवाद.
ही पाककृती पण नेहमीप्रमाणेच छान! मला एक शंका आहे पण. क्रीमचीझ म्हणजे काय? इकडे (जर्मनीमध्ये) काय नावाने मिळतं कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2012 - 9:59 pm | सानिकास्वप्निल

धन्यवाद प्रतिसादाबद्दल :)
क्रीमचीज हे मऊ आणी जास्तं फॅट्स असलेले चीज असते.
मी ह्या पाकृत Philadelphia cream cheese वापरले आहे कदाचित जर्मनी मध्ये ही मिळू शकेल हे :)

चैत्रपालवी's picture

17 Feb 2012 - 10:29 pm | चैत्रपालवी

:)

हा तुमची रेशिपी बघून बनवला.

उगा काहितरीच's picture

8 Apr 2016 - 11:46 pm | उगा काहितरीच

वरच्या फोटोच्या जवळ ठेवला तर त्या फोटोला नजर लागणार नाही ;-) ;-) ;-)
हघ्या हेवेसांनलगे ;-)

सूड's picture

8 Apr 2016 - 11:54 pm | सूड

अगदी!!