तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
11 Jun 2008 - 7:35 am
गाभा: 

मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का?

मी माझ्यापासून सुरवात करतो.

मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद.

याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत.
एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत.
दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD. हे फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. ह्या लीन्कवर त्यांची सुंदर प्रकाशचित्रे आहेत. http://www.flickr.com/photos/arunmanohar/
आणखी कोणी?
बघुया कदाचित इतर मिपाकरांकडून आणखी काही इन्टरेस्टींग माहिती मिळेल.

प्रतिक्रिया

राजे's picture

11 Jun 2008 - 9:20 am | राजे (not verified)

मी तर यत्रतत्र सर्वत्र आहे !!!!!
राज जैन Washington University मध्ये प्रोफेसर देखील आहे...
राज जैन Wal-Mart prez सीईओ देखील आहे....
राज जैन Vice-Chairman and Managing Director, R S Soft देखील आहे.
राज जैन Managing Director, Whirlpool of India येथे देखील आहे ... अजून माहीती हवी तर येथे पाहा
राज जैन लेखक ही आहे.. दिल्ली मध्ये नेता ही.... चपाराशी देखील आहे व नेटवर्क मध्ये नावाजलेले नाव देखील..... पण... किंतू... परंतू... ह्या पैकी मी कोणी ही नाही...

मी आपला साधाभोळा... दहावी पास... दिल्ली रहिवासी.. गुडगांव मध्ये छोटे खानी काम करणार... मिपाकर !!!!!
म्हणजेच राजे.... One & Only !!!!

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2008 - 9:53 am | बिपिन कार्यकर्ते

मी बिपिन कार्यकर्ते. आपले खुल्ला चॅलेंज आहे... या नावाचे दुसरे कोणीही नाही. :) :) :)

बिपिन.

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 11:05 am | विजुभाऊ

मी विजय शाह
माझ्याच शहरात या नावाचे तिघे जण आहेत. इतर दोघे डॉक्टर आहेत.
सर्वात मजेशीर म्हणजे एक विजय शाह जगतले सर्वात मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा दक्षीण अफ्रिकेत हिरे विक्रीचे मोठे साम्राज्य आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अमोल केळकर's picture

11 Jun 2008 - 11:35 am | अमोल केळकर

विजय शाह नावाचे सांगलीत एक प्रसिध्द दंत वैद्यक आहेत

(अवांतर : शाह आणी शहा एकच आडनाव की वेगवेगळे ? )

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 12:36 pm | विजुभाऊ

शहा हे आडनाव सहसा जैन धर्मियांच्यात असते.
शाह हे नागर ब्राह्मण किंवा वैश्य यांच्यात असते.
खरेतर "शा " हा शब्द "श्रीमान " अथवा "राजेश्री" याप्रमाणे "शाहुकार" या बिरुदासाठी वापरला जातो. शाहुकार म्हणजे "श्रेष्ठी" "शेठ"
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अभिषेक पटवर्धन's picture

11 Jun 2008 - 11:16 am | अभिषेक पटवर्धन

मी अभिषेक पटवर्धन, सध्या वास्तव्य दुबई. मी ज्या अ. प. ला ओळ्खतो तो माझा चुलत भाउच आहे. पण सध्या तो त्याच दुसर नाव म्हन्जे अमेय पटवर्धन अस लावतो. अजुन एक अ. प. या पॄथ्वीतलावर असल्याच माहिती आहे. काही दिवसापूर्वी मला एका 'सावित्री यलमन्चीली' अशा विचित्र नावाच्या मुलीच्या ईमेल यायला लागल्या. मी तीला रीप्लाय करुन विचारल्यावर मला त्या दुसर् या अ. प. चा शोध लागला.
याहुन वेगळा अ. प. कुणाला माहिती असल्यास मलाही सान्गा.

प्रमोद देव's picture

11 Jun 2008 - 11:52 am | प्रमोद देव

माझ्या वडिलांचे संपूर्ण नाव होते... श्रीकांत गणेश देव.
अगदी ह्याच नावाचे एक गृहस्थ अष्टविनायकांपैकी एका कोणत्या तरी ठिकाणचे(बहुदा मोरगाव असावे..निश्चित आठवत नाही आता) विश्वस्त आहेत/होते असे काही वर्षांपूर्वी लोकप्रभेमध्ये वाचल्याचे स्मरते.
नाव आणि आडनाव सारखेच असल्याची बरीच उदाहरणे मिळू शकतील...पण वरील योग फारच विरळा असावा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अरुण मनोहर's picture

11 Jun 2008 - 12:07 pm | अरुण मनोहर

पण वरील योग फारच विरळा असावा.

खरय!

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 12:39 pm | विजुभाऊ

माझ्या वर्गात दोन मुले
महेश मधुकर कुलकर्णी या नावाची होती
त्या नन्तरही कॉलेज मधे याच नावाची अजुन तीन वेगवेगळ्या व्यक्ती मला भेटल्या
त्यामुळे हा योग विरळा नसावा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लंबूटांग's picture

12 Jun 2008 - 4:49 am | लंबूटांग

पंकज अशोक पाटील नावाची २ मुले होती. आम्ही त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून हाक मारायचो :) एकाला बॅरेज रोड आणि एकाला हेंद्रेपाडा !!!

ध्रुव's picture

11 Jun 2008 - 12:09 pm | ध्रुव

माझ्यासमं मीच!! :)
--
ध्रुव

पक्या's picture

11 Jun 2008 - 12:52 pm | पक्या

आमच्या बिल्डींग मध्ये माधुरी दिक्षीत नावाच्या बाई रहातात. असा योग विरळाच.

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 1:57 pm | विसोबा खेचर

तात्या अभ्यंकर नावाचे एक आमदार की बागायतदार असे कुणी आहेत असे ऐकून आहे. अजून कुणी तात्या अभ्यंकर असल्यास मला महिती नाही! :)

आपला,
तात्या अभ्यंकर.

शरुबाबा's picture

11 Jun 2008 - 2:23 pm | शरुबाबा

माझ्या वर्गात दोन मुले
आनंद पुरशोत्तम देशपांडे या नावाची होती
त्यामुळे एक काळा देशपांडे आणी एक गोरा देशपांडे

ऋचा's picture

11 Jun 2008 - 2:31 pm | ऋचा

आमच्या वर्गात २ मुली होत्या 'रेश्मा ओसवाल' नावाच्या
त्यातल्या १की ला आम्ही चंपो म्हणायचो. कारण तिच्या वडीलांचे नाव चंपालाल होते.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मयुरयेलपले's picture

11 Jun 2008 - 2:32 pm | मयुरयेलपले

माझ्याच वर्गात पंढरपुरला मयुर येलपले नावाच आजुन एक जण आहे.... जाम धमाल येते..

आपला मयुर

झकासराव's picture

11 Jun 2008 - 2:52 pm | झकासराव

सोनाली कुलकर्णी नावाच्या एक दंतवैद्य आहेत. :)
माझ्या नावाच कोणी नसेलच.
हा फक्त "चार्लीज ऍन्जेल्स पार्ट टु" बघुन कळाल की त्या गुटगुटीत नायिकेच "(तिच खर नाव ब्र्यु डेरीमोअर अस काहिस आहे जे फक्त एन्ग्रजीत आणि मनातल्या मनात वाचणच सोप आहे :)) फिल्लममधील नाव हेलेना झकास असत. :)
(चु भु दे घे)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

लंबूटांग's picture

12 Jun 2008 - 4:51 am | लंबूटांग

ड्र्यू बेरीमोर

ऋचा's picture

11 Jun 2008 - 3:27 pm | ऋचा

तिचे ना ड्र्यू बॅरीमोर आहे

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धमाल मुलगा's picture

11 Jun 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

आणि ती मला फार फार आवडते :)
तिच्या चेहर्‍यावरचा गोडवा मला जाम भुरळ घालतो!!!!!
आता ती वयस्क झाली असली तर्रीही....

प्रभाकर पेठकर's picture

11 Jun 2008 - 7:47 pm | प्रभाकर पेठकर

आता ती वयस्क झाली असली तर्रीही....

हृदयस्थ प्रतिमा वयस्क होत नाहीत....

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Jun 2008 - 7:55 pm | ब्रिटिश टिंग्या

>>हृदयस्थ प्रतिमा वयस्क होत नाहीत....
हम्म्म्म्म्.......अनुभवाचे बोल दिसतायेत! :?

- (असाच एक अनुभवी) टिंग्या ;)

प्रभाकर पेठकर's picture

11 Jun 2008 - 8:03 pm | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म ...! तसे आपण सगळेच अनुभवी. असो.
एकांतात जुने अल्बम चाळताना सगळ्याच प्रतिमा धूसर होतात....

अन्या दातार's picture

11 Jun 2008 - 3:34 pm | अन्या दातार

मी अनिरुद्ध दातार. माझ्या नावाचे अजून ३-४ जण तरी आहेतच.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 Jun 2008 - 10:39 pm | डॉ.प्रसाद दाढे

दाढे नाव तर फारच दुर्मिळ आहे. पुण्यात दाढे चार्टर्ड अकाउट॑ट फार प्रसिद्ध होते. माझे ते कुणीही लागत नाहीत पण पुण्यात मला लोक॑ हा प्रश्न नेहमी विचारतात. (त्या॑ना हाच प्रश्न कुणी विचारत असेल काय? :)
माझ्या आजोबा॑नी 'दाढे कुलवृत्ता॑त' स॑पादित केला होता.
समान नावे आणि त्यायोगे घडणार्‍या ग॑मती ह्यावर मुकु॑द टा॑कसाळे ह्या॑च्या 'टाकसाळीतली नाणी' पुस्तकात एक मस्त गोष्ट आहे.. 'नावात काय आहे'. त्यात लेखकाच्या बहिणीला 'विजय जोशी' नावाच्या व्यक्तिचे स्थळ सा॑गून येते आणि मग त्याला शोधताना बरीच धमाल येते अस॑ सगळ॑ त्यात आहे..

भाग्यश्री's picture

11 Jun 2008 - 11:54 pm | भाग्यश्री

माझ्या नावाची नटी होती/आहे, भाग्यश्री.. बाकी भाग्यश्री कुलकर्णी नावच्या एक-दोन व्यक्ती सापडल्या.. पण कोणी फार विशेष कामगिरी करत नाही बहुधा..

जाता-जाता, माझ्या वहीनीचे माहेरचे नाव माधुरी दिक्षित.. :) नंतर नेने नाही झाली.. :|

http://bhagyashreee.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

12 Jun 2008 - 12:31 am | इनोबा म्हणे

आमच्या नावाची दुसरी व्यक्ती जगात कुठेही सापडणार नाही. या जगात 'अनिवसे' नावाचा दूसरा कुणीही सापडणे अशक्य!(आमचे नातेवाईक सोडून)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा's picture

12 Jun 2008 - 12:02 pm | धमाल मुलगा

माझ्याच वर्गात कैवल्य नावाचा आणखी एकजण होता. आम्ही दोघं बरोबरच बालवाडीत गेलो, शेजारी शेजारी बसलो, मग १-४, ५-१०, ग्रॅज्युएशनही बरोबरच केलं :)
योगायोग म्हणजे त्याचे आणि माझे दोघांचेही वडील एकाच शाळेत, एकाच डिपार्टमेंटला :)
ये हमारी दोस्ती काफी पुरानी है!!!!