विदेश .....!! [थोडा टाईम पास ]

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
26 Jan 2012 - 10:46 pm

मी विदेशात होतो
किती मस्त मजेने जगलो
कैफात असा होतो
हे जग विसरुनी मी गेलो

मज आठवण येता तिथली
जीव कासावीस होतो माझा
आठवूनी गुलाबी थंडी
हुडहुडी भरे अंगाला

त्या विदेशातील घरे
कशी मस्त लाकडी होती
काचेच्या खिडकी मधुनी
आभाळ उतरुनिया येई

ह्या देशामधली गर्दी
नि गोंगाट कसा भरलेला..?
ह्या गाड्या मधली गर्दी
मी घामाने ओला ओला

नव्हता देव्हारा तेथे
मी उघडला छोटा बार
संध्याकाळी बसता
मी विसरुनी जातो पार

मी विदेशात होतो
किती मस्त मजेने जगलो............!!

शृंगारमौजमजा

प्रतिक्रिया

प्रशांत उदय मनोहर's picture

28 Jan 2012 - 10:40 am | प्रशांत उदय मनोहर

तुम्ही विदेशात होता की विदेशीत होता?

पक पक पक's picture

30 Jan 2012 - 9:15 pm | पक पक पक

:crazy:
मग ईकडे का आलात परत ..? तिकडेच 'बसुन' ;) लिहायचीत विंग्रजीत कविता .बाकी देशी काय पचली नाय भाउ....

ते 'घोड दौड संताजीची' या काव्यासारखे काहीतरी वाट्ते आहे.......