गुगल, गुरुजी आणि अन्य शोधयंत्र अद्याप मागासलेली का..?

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in काथ्याकूट
17 Jan 2012 - 11:24 am
गाभा: 

नमस्कार,

भारतीय संविधानाच्या कलम २१-अ - Right to education चा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती -

आजच्या घडीला गुगल, गुरुजी आणि अन्य अनेक शोधयंत्र आंतरजालावर कार्यरत आहेत. त्यामुळे माहिती मिळवण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही. उदाहरणार्थ, समजा आपल्याला 'Mango' म्हणजे काय हे माहिती नाही; आणि म्हणून आपण गुगलच्या शोधयंत्रात 'Mango' हा शब्द टंकीत केला तर क्षणार्धात हजारो संकेतस्थ़ळांची, छायाचित्रांची माहिती आपल्या पुढ्यात येते. यात जगभराच्या आंब्याच्या जाती, आंबा उत्पादन, आंब्याच्या पाककृती, निरनिराळ्या जातींच्या आंब्यांची हजारो छायाचित्रे इत्यादी नानाविध माहितीचा खजिना आपल्यापुढे उघडला जातो. परंतु हे झाले दिलेल्या 'Mango' ह्या शब्दावरून आंब्याची माहिती पुरवण्याचे गुगलचे कसब. परंतु आमचा प्रश्न निराळाच आहे. तो असा -

गुगलच्या शोधयंत्रात जशी शब्द टंकीत करून शोध घ्यायची सोय आहे तशी एखादी जेपीजी प्रतिमा चढवण्याची व त्या अनुषंगाने शोध घ्यायची सोय का नाही..?

आम्ही आमचा मुद्दा वरीलप्रमाणे उदाहरणाद्वारे अजून थोडा स्पष्ट करू इच्छितो. समजा आमच्या संगणकावर आंब्याची प्रतिमा उपलब्ध आहे, परंतु ती प्रतिमा नेमकी कशाची आहे, कोणाची आहे हे जर आम्हाला माहीत नसेल तर मग गुगलच्या शोधयंत्रात सदर प्रतिमेची जेपीजी चढवून 'शोधा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये? गुगलचे शोधयंत्र जसे दिलेल्या शब्दावरून तो शब्द ओळखून त्यानुसार त्या शब्दासंबंधी जमेल तितकी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे गुगलचे शोधयंत्र दिलेली प्रतिमा ओळखून त्यानुसार माहिती पुरवण्यास आजच्या घडीला असमर्थ का?, हा आमचा सवाल आहे.

या अनुषंगाने काही स्वाभाविक प्रश्न -

१) प्रतिमेवरून शोध घेण्याचे तंत्र अद्याप विकसितच झालेले नाही? किंबहुना तसा अद्याप विचारच झालेला नाही?

२) किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत?

३) किंवा या संदर्भातील तांत्रिक आव्हानांना अद्याप सारे प्रयत्नशील तंत्रज्ञ अपुरे पडत आहेत/पडले आहेत..?

कृपया या विषयाबाबत येथे विषयाला अनुसरूनच विस्तृत चर्चा व्हावी. असंबद्ध प्रतिसाद देणार्‍यांना ईश्वराने तूर्तास क्षमा करावी व सद्बुद्धी द्यावी.

ता. क. - पक पक पक यांसारख्या सन्माननीय मिपा सभासदांनी या धाग्याचे स्वतंत्र विडंबन केल्यास तो निश्चितच एक निखळ विरंगुळ्याचा धागा ठरावा, अशी आम्हाला आशा आहे. सबब, त्यांचेही स्वागतच आहे!

-- कॉमॅ.

प्रतिक्रिया

मनिष's picture

17 Jan 2012 - 11:31 am | मनिष

गुगल गॉगल्स बद्द्ल ऐकलय का?
http://www.google.com/mobile/goggles/#text

तिथला व्हिडिओ अवश्य पहा!

कॉमन मॅन's picture

17 Jan 2012 - 11:39 am | कॉमन मॅन

आपण सांगितल्याप्रमाणे सदर संस्थळावर गेलो होतो परंतु तेथे 'प्रतिमा शोधा' हा पर्याय दिसत नाही.

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2012 - 11:50 am | नगरीनिरंजन

पॅटर्न मॅचिंग तंत्रज्ञानात जोमाने संशोधन चालू असून लवकरच चढवलेल्या इमेजवरूनच काय तर हातात धरलेल्या चित्रावरून/वस्तुवरून सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल (कदाचित त्या वस्तुवरच किंवा तुमच्या चष्म्यातल्या किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या स्क्रीनवर)
"sixth sense technology" या संज्ञेचा शोध घेऊन पाहावे.

मराठी_माणूस's picture

17 Jan 2012 - 11:53 am | मराठी_माणूस

प्रतिमा शोधणे हे थोडे अवघड आहे असे वाटते.
प्रत्येक अक्षाराला , संगणकात एक युनिक कोड दिलेला असतो जो मॅच करणे सोपे असते.
प्रतिमा शोधणे म्हणजे पॅटर्न मॅच करणे , ते खुप क्लिश्ट आहे. एखाद्या अक्षराचा आकार (font/size) बदलला तरी त्याचा कोड तोच रहातो, पण तुम्ही दिलेल्या आंब्याचा उदाहरणात आंब्याचा आकार बदलला तर , संगणकाच्या दृष्टीने ती एक सर्वस्वी वेगळी प्रतिमा असेल.

प्रचेतस's picture

17 Jan 2012 - 11:58 am | प्रचेतस

हो, आणि त्यात तोतापुरी, बदाम, हापूस, पायरी, लंगडा, मलगोवा, दशहरी, गोटी, रायवळ अशांच्या प्रतिमा टाकल्या तर परत बोंबाबोंब.

ओ काय बोंबाबोंब व्हत नाय. फकस्त तुमच्या त्या क्याम्पुटरच्या पोग्रामला ह्या सगल्या पजतीच्या आंब्याच्या जातींची म्हायती आदीच देवून ठेवली का झाला. हाय काय आनी नाय काय. :)

एखाद्या सराईत कोंकणी म्हातार्‍यासारखा हापूसच्या देठाचा खड्डा पाहून आणि हवेत गंध हुंगून कैरी "उतरवायला" झाली आहे का हे शोधणारं गूगल अ‍ॅप निघेल का?

( या अ‍ॅपला अण्णा म्हणायला हरकत नाही.. )

धन्या's picture

17 Jan 2012 - 1:19 pm | धन्या

कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटराइज्ड मेडीकल इक्विपमेंट जनरेटेड रीपोर्टच्या खाली एक डिस्क्लेमर असतं.

"या रीपोर्टमधील माहितीचा उद्देश फक्त उपचारांमध्ये मदत करणे इतकाच आहे. ही माहिती निष्णात डॉक्टरच्या अनुभवावर आधारीत निष्कर्षाची जागा घेऊ शकत नाही" :D

सू डोकू's picture

18 Jan 2012 - 12:15 am | सू डोकू

आन त्यात्नं बी ज्या कँप्युटर्ला डायबिटीस का फिटीस आसलं त्यो त्वाँड बी न्हाय लावनार त्या आंब्यास्नी. मंग तुमी कितीबी भारी आंबे त्याला दावा.

शोधयंत्र मागासलेली नक्कीच नाहीत...गुगल हे शोधयंत्र लाखो अल्गोरीदम्स च्या मदतीवर चालतं...तरी सुद्धा रोज शेकडो सुधारणा करण्याची गरज त्यात भासते !
टेक्स्ट सर्च या क्षेत्रातच अजून बराच काही करण्यासारखा आहे, ' इमेज रेकॉग्निस तंत्रज्ञान ' यावर या शोधयंत्रांनी काम सुरु केला आहे...लवकरच हि सेवा चालू होईल ...

गुगलच्या शोधयंत्रात सदर प्रतिमेची जेपीजी चढवून 'शोधा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये? गुगलचे शोधयंत्र जसे दिलेल्या शब्दावरून तो शब्द ओळखून त्यानुसार त्या शब्दासंबंधी जमेल तितकी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे गुगलचे शोधयंत्र दिलेली प्रतिमा ओळखून त्यानुसार माहिती पुरवण्यास आजच्या घडीला असमर्थ का?

गुगल कडे हि सेवा नसली तरी http://www.tineye.com/ या शोधयंत्रा कडे हि सेवा आहे...प्रतिमेची जेपीजी चढवून 'शोधा' हा पर्याय तुम्ही वापरू शकता !

- मालोजीराव

कॉमन मॅन's picture

17 Jan 2012 - 12:12 pm | कॉमन मॅन

गुगल कडे हि सेवा नसली तरी http://www.tineye.com/ या शोधयंत्रा कडे हि सेवा आहे...प्रतिमेची जेपीजी चढवून 'शोधा' हा पर्याय तुम्ही वापरू शकता !

आमच्या मते ही सेवा काहीच उपयोगाची नाही. आम्ही तेथे आमच्या संगणकावर उपलब्ध असलेल्या सचिन तेंडुलकरची प्रतिमा चढवून शोध घेऊन पाहिला परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सदर शोधयंत्र आम्हाला सचिनची आम्ही चढवलेलीच प्रतिमा वारंवार दाखवत आहे. तिच्याशी मिळत्याजुळत्या, किंवा चेहेर्‍याशी साधर्म्य असणार्‍या अन्य कोणत्याही प्रतिमा त्या शोधयंत्राने आम्हाला दाखवल्या नाहीत.

अद्याप हे तंत्र खूप म्हणजे खूपच कच्चं आहे हे म्हणण्यास आता वाढता वाव दिसतो आहे.

धन्या's picture

17 Jan 2012 - 12:03 pm | धन्या

असे करणे शक्य आहे.

आम्ही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना मॅटलॅब मधून "चेहरा ओळखा" चा प्रकल्प केला होता. जो बर्‍यापैकी यशस्वी झाला होता.

यामध्ये प्रणालीला आधी एकाच चेहर्‍याची दहा - बारा चित्रे दाखवून प्रशिक्षीत केले जाते. नंतर त्याच चेहर्‍याचं पुर्णपणे नविन छायाचित्र प्रणालीमध्ये उर्ध्वप्रक्षेप केलं की प्रणाली तो चेहरा ओळखते.

आमची प्रकल्प परीक्षा होईपर्यंत प्रणाली ठीक ठाक होती. नंतर तिच्यावर कुणीतरी भानामती केल्यामुळे तिला आदान माध्यमातून काहीही माहिती पुरवली तरी ती बोंब मारु लागली.

मालोजीराव's picture

17 Jan 2012 - 12:19 pm | मालोजीराव

नंतर तिच्यावर कुणीतरी भानामती केल्यामुळे तिला आदान माध्यमातून काहीही माहिती पुरवली तरी ती बोंब मारु लागली.

कितीही आधुनिक तंत्रज्ञान असलं तरी...एकदा भानामती झाली कि काईच करू शकत नाई...धनाजीराव,
मग दोन्ही हात वर करायचे... ;)
माझ्या अश्या शेवटच्या वर्ष्याच्या बर्च्याच प्रकल्पांना भानामती लागली...शेवटी भक्त्याला (univer. supervisor ) ला दक्षिणा दिली आणि प्रकल्पावर शिक्कामोर्तब झाले

- मालोजीराव

मला अजून एक शोधप्रणाली अपेक्षित आहे.

मला गाण्याची चाल माहीत आहे पण शब्द किंवा टायटल माहीत नाही अशी एकदोन गाणी आहेत. तेव्हा मी माईक जोडून गूगलला "नाना नि नि दा दा दि दी" असं गुणगुणून दाखवलं की त्याने त्या चालीच्या गाण्याचे शब्द, एमपीथ्री आणि अन्य काहीकाही शोधून मला द्यावं.

होईल का शक्य?

उदा. अली हैदरच्या चाहत या जुन्या आल्बममधे "झूमेंगे जब यहां, मिलके हम सब यहां" असं एक गाणं होतं. त्याच चालीचं एक इंग्लिश (ओरिजिनल) गाणं आहे. त्याच्या शब्दांविषयी मला अजिबात आयडिया नाही कारण मी ते कुठेतरी ओझरतं ऐकलं होतं. पण ते मला हवंय.

अशीच इतरही आहेत.

मी-सौरभ's picture

17 Jan 2012 - 6:38 pm | मी-सौरभ

तुम्ही गाणं म्हटलतं तर नाही पन तुमच्याकडे गाण्याची अर्धवट क्लिप असेल तर तुम्ही 'shazam' हे अ‍ॅप्लिकेशन वापरुन बघा...

सोत्रि's picture

17 Jan 2012 - 11:44 pm | सोत्रि

गवि अशी प्रणाली अस्तित्वात आहे.

http://www.shazam.com/

आयफोन किंवा अ‍ॅन्ड्रॉइड फोन्सवर ही प्रणाली मस्त चालते.
सध्या ब्लॅकबेरीसाठीही प्रणाली ह्यांनी आणली आहे.

ह्या प्रणालीला गाणे ऐकवायचे की ही प्रणाली त्या गाण्याची कुंडली समोर आणते :)
पण ही प्रणाली फु़कट नाहीयेय.

- (तांत्रिक) सोकाजी

तुषार काळभोर's picture

19 Jan 2012 - 9:56 pm | तुषार काळभोर

गुगल आता वॉईस सर्चची सुविधा देतंय. म्हणजे आपण बोललेला शब्द गुगल सर्च करून देतं.

तुषार काळभोर's picture

19 Jan 2012 - 9:57 pm | तुषार काळभोर

गुगल आता वॉईस सर्चची सुविधा देतंय. म्हणजे आपण बोललेला शब्द गुगल सर्च करून देतं. म्हणजे तुम्ही म्हणता तशा प्रणालीकडे वाटचाल सुरू आहे.

चिरोटा's picture

17 Jan 2012 - 12:37 pm | चिरोटा

प्रयत्न नक्कीच झाले आहेत्.(आता लिंक्स नाहीत नंतर देईन). अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा,संगणक शास्त्राचा मक्ता फक्त गूगल, माय्क्रोसॉफ्टकडे असल्याचा गैरसमज असल्याने तसे वाटते.

सुमो's picture

17 Jan 2012 - 12:44 pm | सुमो

खरंच माहीती हवी आहे असं समजून हा प्रतिसाद.... कारण गूगल इमेजेस मधे हा पर्याय आहे...

http://www.google.co.in/imghp?hl=en&tab=wi इथे तुम्हाला हवा तो फोटो सर्च करता
येतो...ह्या धाग्यावर जे कॅमेराचं चित्र आहे तिथे क्लिक केल्यावर आपल्याला हव्या त्या फोटोची लिंक देता
येते.

गल्ली चुकलो काय????

JAGOMOHANPYARE's picture

17 Jan 2012 - 1:16 pm | JAGOMOHANPYARE

त्याने सर्च केले. काही वेळेला बरोबर येत. काही वेळेला काहीतरी वेगळेच मिळते.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2012 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

मजा आली वाचून.

एकदम खुसखुशीत लिखाण.

अभ्यास वाढवा. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jan 2012 - 1:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>अभ्यास वाढवा.
ते अभ्यासच वाढवत आहेत. तुमचा आधीच या विषयावर अभ्यास असेल तर मटेरियल पुरवून मदत करा.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2012 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

ते अभ्यासच वाढवत आहेत. तुमचा आधीच या विषयावर अभ्यास असेल तर मटेरियल पुरवून मदत करा.

ते लग्नाच्या पहिल्या रात्री मटेरीयल पुरवण्यायेवढे सोपे आहे का काय ? ;)

आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेले ज्ञान असे फुकट का द्यावे ? त्यांना थोडे कष्ट घेऊ दे की. अशी सोय उपलब्ध आहे, हे आम्ही कळवले आहे. आता त्यांना जरा शोधा शोध करू दे. नाहीच जमले तर करू की मदत.

सुहास झेले's picture

17 Jan 2012 - 1:16 pm | सुहास झेले
तुषार काळभोर's picture

17 Jan 2012 - 6:10 pm | तुषार काळभोर

शक्य तर आहेच शिवाय बरेच जुनेही आहे.
गुगल-इमेजेस वर जा. जेथे आपण शब्द टंकतो त्या जागेच्या शेवटी एक कॅमेर्‍याचे चिन्ह आहे, त्यावर क्लिक करा. एक छोटा पॉप अप उघडेल. त्यात अपलोड अ‍ॅन इमेज असा पर्याय आहे. त्यावर क्लिक करून फाईल सिलेक्ट करा. (किंवा सरल एखादी इमेज फाईल उचलून त्या मोकळ्या जागेत टाका... ) गुगल त्या प्रतिमेचा शोध घेऊन त्यासारख्या इतर प्रतिमा शोधेल, तसेच या प्रतिमा जेथे आहेत, त्या वेबपेजेसचीही माहिती मिळेल.

www.tineye.com/ हासुद्धा एक पर्याय आहे, पण याचे निकाल गुगलहून थोडे कमी असतात.

Nile's picture

18 Jan 2012 - 12:51 am | Nile

इमेज प्रोसेसिंग मध्ये बराच रिसर्च सुरु आहे आणि त्यात प्रचंड यशही आलेलं आहे. दोन हुबेहुब इमेजेस घेतल्या त्यातली एक एका डिग्रीने रोटेट केली तरी त्यातले साम्य ओळखंणं किंवा तिला पुन्हा सरळ करणं असल्या गोष्टी मॅटलॅबवर आता बीई, बीटेकचे मुलं सेमीस्टर प्रोजेक्टसाठी करतात.

पण ते असो. गुगलचं पिकासा वापरून पहा. हजार दोन हजार फोटो घ्या, त्यातल्या पाच दहा फोटोत स्वतःला आणि मित्रांना टॅग करा आणि पिकासाला उरलेल्यांना टॅग करायला सांगा, आणि पहा.

गुगल गॉगल्स मी बरेचदा वापरला आहे, समोर असलेल्या गोष्टीचा फोटो घेऊन शोध घेण्याकरता. रिझल्ट बरे होते.

आश्चर्य आहे.कोणीही काहीही अवांतर न लिहिता मदत करत आहेत,हवी ती माहिती पुरवातायत.यांचा काही प्लान-ब्लिन तर नाहीये.सांभाळून राहायला हव.

तुषार काळभोर's picture

23 Jan 2012 - 7:23 am | तुषार काळभोर

तर झाली..

चिगो's picture

23 Jan 2012 - 12:30 pm | चिगो

तांत्रिक बाबतीत फारशी माहिती नसल्याने माझा पास..
पण>> भारतीय संविधानाच्या कलम २१-अ - Right to education चा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो
हे मात्र कळलं नाही.. माझ्या माहितीप्रमाणे कलम २१-अ नुसार प्रत्येक ६ ते १४ वयोगटातील मुलाला (ह्यात मुलीही आल्या) शिक्षणाचा अधिकार आहे व त्यासाठी सरकारने कायदेशीर पाऊले उचलायला हवीत. (ह्याचसाठी "शिक्षण अधिकार कायदा" आलाय. म्हणजे आता ६ ते १४ वयोगटातील मुल त्याला शिक्षण न मिळाल्यास सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागु शकते. (वयोमर्यादा उल्लेख असलेला हा एकमेव मुलभुत अधिकार आहे.)

आता ह्या कल्माचा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी काय संबंध? "माहितीचा अधिकार" ह्या अर्थाने बोलायचं झाल्यास त्याचा कलम १९ (अ)(१)मध्ये उल्लेखित "विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्याशी येतो कारण की माहितीच नसेल तर अभिव्यक्ती कशी करणार?