कलचाचणी

भिकापाटील's picture
भिकापाटील in काथ्याकूट
11 Jan 2012 - 11:13 pm
गाभा: 

--------------------------------------------------------------
मित्रांनो आमची कंपनी ग्रामीण भागात सीएसाअर अंतर्गत पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यासाठी संगणक व तांत्रिक प्रशिक्षण देते. सीएसआर अंतर्गत ह्या महिन्यात दि. ३/१/२०१२ रोजी एका गावातील शाळेत दहावीच्या विद्यार्थांना कलचाचणी व करियर मार्गदर्शन आयोजन केले होते. दहावीनंतर्चे करिअर मार्गदर्शनासाठी मला आमंत्रण होते.

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कल चाचणी करिता पुण्याहून एका संस्थेतील तज्ञ शिक्षक आले होते. त्यांनी दि २/१/२०१२ रोजी चाचनी घेतली होती. ३ ता.ला कलचाचणीचा निकाल वाटप झाले. त्या निकालप्त्रात शेवटी एक वाक्य होते. कलचाचणीचा निकाल हा तुम्ही दिलेल्या प्रामाणिक उत्तरांवर अवलंबून आहे त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे दिली नसतील तर हया निकालाला महत्व देवू नये.

कलचाचणी मधे बुध्यांक, आवड, विश्लेषणक्षमता, भाषाप्रभूत्व, कल्पकता, मनोविश्व इ. अनेक गोष्टींचा विचार केलेला आढळला. तसेच ह्यानुसार कोण सर्टीफिकेट्/डिप्लोमा/डिग्री साठी योग्य आहे तेही सांगितले.

या चाचणीचे मला विशेष अप्रूप वाटले कारण आजही शहरातील शाळांतही कलचाचणीची सोय नसल्याचे ऐकीवात आहे. मला दहावीला असताना अशी काही चाचणी असते हे माहीत नव्हते. म्हणून एका खेड्यातील मुलांना मोफत कलचाचणी करुन मिळते नि त्यात आपला खारीचा वाटा आहे याचा आनंद झाला.

दुसर्‍या बाजूला यात अनेक मुलांना जसे शब्द संग्रह नाही म्हणून उत्तम संभाषणकौशल्य नसल्याने त्याला आवड असणार्‍या क्षेत्रात न जाण्यास सांगण्यात आले. ही गोष्ट मला खटकली. ज्या प्रांतात आपण अभ्यास वाढवून कौशल्य मिळवू शकतो त्यात आज जरी काही न्यूनता असली तरी उद्या त्यात निश्चित प्रगती करु शकतो. इतक्या लौकर कलचाचणी घेणे योग्य आहे का?
कारण जिवनाचा मोठा टप्पा अजून पार करायचा आहे.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

11 Jan 2012 - 11:43 pm | कवितानागेश

शहरी पालकांनी आधीच ठरवून टाकलेले असते, की आपल्या मुलाला/ मुलीला काय करायचे.
आणि त्याप्रमाणे त्यांचे कोचिंग क्लासेस वय ५ ते १० या वर्षांमध्येच सुरु झालेले असतात.

मृगनयनी's picture

12 Jan 2012 - 12:07 am | मृगनयनी

कारण आजही शहरातील शाळांतही कलचाचणीची सोय नसल्याचे ऐकीवात आहे.

असहमत!!! :(

महाराष्ट्र मन्डळ, पुणे ३० येथे दर ३ महिन्यांनी कलचाचणी- अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जातात.
वयोगट : ८- २० वर्षे. हा उपक्रम गेल्या २०-२५ वर्षांपासून आहे. तसेच विमलाबै गरवारे, आपटे प्रशाला इ सारख्या नामान्कित शाळांमध्ये अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते... :)

"या चाचणीचे मला विशेष अप्रूप वाटले कारण आजही शहरातील शाळांतही कलचाचणीची सोय नसल्याचे ऐकीवात आहे"
अश्या चाचण्या शहरातही उपलब्ध असतात.
"ज्या प्रांतात आपण अभ्यास वाढवून कौशल्य मिळवू शकतो त्यात आज जरी काही न्यूनता असली तरी उद्या त्यात निश्चित प्रगती करु शकतो"
हे जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांना थोड्याफार प्रमाणात लागू होते. अगदी कला क्षेत्रात सुद्धा आपण प्रगती करु शकतो. कदाचित अपेक्षित उंची गाठली जाणार नाही. माझ्या अनुभवानुसार कलचाचणीची ही फक्त "कल" दाखवते. तुमची शक्तीस्थळे (स्ट्राँग पॉईंटस) निदर्शनास आणून देते. त्यानुसार तुम्ही तुमचा मार्ग ठरवू शकता. अर्थात आवड वेगळी असेल तर त्या प्रांतात अभ्यास करून कौशल्य मिळवू शकता. ही चाचणी मार्गदर्शक नव्हे तर फक्त तुमच्यातील गुणांचा ती तुलनात्मक अभ्यास करते.

रेवती's picture

12 Jan 2012 - 12:20 am | रेवती

मलाही हा प्रकार मी शाळेत असताना माहित नव्हता. पण पुण्यातल्या मुक्तांगण शाळेत जाणार्‍या माझ्या अतेबहिणींची अशी टेस्ट झाल्याचे नक्की माहित आहे. या गोष्टीला बरीच वर्षे झालीत. सगळ्या शाळंमध्ये नसू शकेल पण काही शाळांमध्येतरी नक्कीच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 2:30 am | प्रभाकर पेठकर

माझी कधी कलचाचणी वगैरे झाली नाही.

शाळेत मला भाषा विषय आणि विज्ञानाची आवड होती. अकरावी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश धेतला पण उनाडक्या करून आपटी खाल्ली. नंतर नोकरी करता करता वाणिज्य शाखेची पदवी घेतली. (आवडी विरुद्ध पण काळाची गरज म्हणून). पुढे संगणक प्रणाली शिकलो. शाळेत असताना हा विषयच माहित नव्हता. त्यामुळे तिकडे कल असण्याचा संबंध नव्हता. पण नोकरी निमित्ताने इडिपी खात्यास भेटी दिल्याने मनात संगणक प्रेम उद्भवले. पुढे अरबस्थानात एका कंपनीत लेखाविभागात नोकरी केली. तिथल्या व्यावसायिक राजकारणांना कंटाळलो, वैफल्यावस्था आली. त्याच काळात, आपल्याला पाककलेत गती असल्याचे जाणवले. झाले. त्याच्या मागेच पडलो. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना फुटकळ स्टॉल लावता लावता नोकरी सोडून उपहारगृह सुरू केले. नशिबाने साथ दिली आणि बाकी सर्व मागे पडले.

परीस्थिती नुसार कल बदलत गेले आणि सर्वस्वी वेगळ्याच व्यवसायात स्थिरावलो.

खरंच, कलचाचणीचा उपयोग व्यवसाय निवडीसाठी होतो?

रेवती's picture

12 Jan 2012 - 3:14 am | रेवती

पेठकरकाका,
तुमच्या या प्रवासाबद्दल एक लेख (मालिका) लिहाल का?
इतरांपेक्षा वेगळ्या वाटेने नक्कीच झाला असणार.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 3:26 am | प्रभाकर पेठकर

अरे बापरे! हे म्हणजे आत्मचरित्र लिहीणे झाले. कधीतरी लिहीन एवढ्यात नको.

सध्या एक दोन इतर प्रवासवर्णने विचाराधीन आहेत. त्याच्याच जोडणीत व्यस्त आहे.

खरंच, कलचाचणीचा उपयोग व्यवसाय निवडीसाठी होतो?

मला वाटतं असा उपयोग संकुचित म्हटता येईल. धागा-लेखकाने उल्लेख केलेली कलचाचणी काय-काय आणि कशी तपासते हे ठावूक नाही पण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे आणि आयआयटी पोवई, मुंबई येथे घेतल्या जाणार्‍या कलचाचण्यांमधून तुमचा विशिष्ट क्षेत्राकडे कल आहे का कसे ही सुचना केवळ एक भाग असतो. त्या चाचणीच्या 'निकालपत्रात' तुमच्या स्वभावाचे विविध पैलू सुद्धा उलगडून दाखविलेले असतात.
ह्या चाचण्यांमधून अधोरेखित केल्या जाणार्‍या तुमच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात करून घेता येईलच. उदा. समजा चाचणीचा निकाल दाखवत असेल की तुमच्यात उत्तम विश्लेषण-क्षमता आहे तर ती क्षमता तुम्हाला विज्ञान,कला किंवा वाणिज्य क्षेत्रातील व्यवसाय/नोकरी निवडल्यावर कुठे ना कुठे हमखास उपयोगी पडणारच.
त्यामुळे कलचाचणीत सुचविलेले क्षेत्रच निवडावे - न निवडल्यास इतर क्षेत्रात प्रगतीची सुतराम शक्यता नाही असा अर्थ कलचाचणीसारख्या प्रज्ञा-मानस (सायकॉलोजिकल) परिक्षांचा कधीच काढू नये असे मला वाटते.

सविता००१'s picture

12 Jan 2012 - 9:28 am | सविता००१

रेवतीताइशी पूर्णपणे सहमत मी पण. लिहाच तुम्ही अशी मालिका!

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 9:55 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद सविता. जरूर लिहीन कधीतरी.

वयाने काहीश्या मोठ्या लोकांची कलचाचणी कुठे होते का?

म्हणजे शिक्षण वगैरे संपून आणि बेनसन जानसनमधे चिकटून दहापंधरा वर्षे झालेल्या धोंडो भिकाजी जोशींची?

मला करुन घ्यायची आहे. मला कालापव्यय अन श्वासोच्छवासाखेरीज कशातच फार रस नाही त्यामुळे पहिला कलहीन व्यक्ती म्हणून माझा रिपोर्ट येईल असं वाटतं.

हा प्रतिसाद उपरोधात्मक नाही..

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही फारच 'उडता' बुवा..!

घ्या हो गवि....तुम्ही कुठल्या दिशेने कललेले आहात...त्याची फु..क्..ट चाचणी करून मिळाली!!!!

विजुभाऊ's picture

12 Jan 2012 - 4:07 pm | विजुभाऊ

मलादेखील माझी अशी कल चाचणी करून घ्यावयाची आहे.
मी आपण नक्की काय करावे अशा संभ्रमात आहे.
एस ए पी /नाटक /काउन्सेलिंग /मास्तरकी / सॉफ्ट स्कील ट्रेनिंग की अन्य काही