सल्ला हवाय

वाटी's picture
वाटी in काथ्याकूट
22 Dec 2011 - 9:02 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,

काल मला केलेल्या मदती बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असो सध्या १ समस्या घेउन मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत आहे.

अर्धवट मिळालेली माहीती

त्याचं झालं असं की माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र मागच्या आठवड्यात माझ्या ऑफीसच्या येथे भेटला. काही कामानिमित्त तो तेथे आला होता आणि आमची भेट झाली. तो भेटल्यावर आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पा चालू असतांना तो पहिल्या सारखा मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत नाही हे मी ओळखले. त्याला म्हण्टले काय रे काही प्रॉब्लेम आहे का? तर आधी काहीच बोलला नाही. मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो. तीथे बसून ऑर्डर दील्यावर मला म्हणाला की अरे हो जरा एक प्रॉब्लेम झाला आहे.

मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो.

त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते. झाले असे की, त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला. सहाजिकच ह्याच्याकडे त्या मुलीचा नंबर नव्हता. म्हणून ह्याने माझ्या मित्राने त्या अन नोन नंबर वर कॉल केला. समोरून त्या मुलीने कॉल उचलला. आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला. ती मुलगी त्याला म्हणाली की अरे मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते.
आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल. तर तीचे बोलणे माझ्या मित्राने शांतपणे ऐकून घेतले.
ती सांगत होती की तुला तुझे आई बाबा काही बोलले नाहीत का? आणि खरच त्याच्याशी त्याच्या घरच्यांचे बोलणेही झाले नव्हते संबंधित विषयावर त्यामुळे तो बिचारा फारच कावरा बावरा झालेला. आणि ह्याचेही घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे आहे त्यामुळे ह्याचा त्याच्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे तोही जाणतो आणि मीही.

ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे.

सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे.
तुम्हाला काय वाटते? भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती.

आपला नविन मिपाकर,

वाटी

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Dec 2011 - 9:13 am | प्रचेतस

कावरा बावरा होण्याचे काहीच कारण नाही. सरळ मुलीला भेटावे, एकमेकांना पसंत असेल तर लग्न करावे. मग चांदीचे पेले वैग्रे आहेतच.

sagarpdy's picture

22 Dec 2011 - 9:38 am | sagarpdy

+१

कपिलमुनी's picture

22 Dec 2011 - 11:28 am | कपिलमुनी

लग्न म्हणल कि मि पा कर सल्ले देण्याच्या बाबतीत पेटतात ..

किती सांगु आणि काय सांगु असे होते ...

पक पक पक's picture

23 Dec 2011 - 10:51 am | पक पक पक

मग चांदीचे पेले वैग्रे आहेतच.

काय आहेर करणार आहात वाट्त...?

प्रचेतस's picture

23 Dec 2011 - 10:54 am | प्रचेतस

नाही.
आहेराचे कॉन्ट्रेक्ट किचेनताईंकडे आहे.
तुम्हाला हवेत काय पेले?

नको नको राहु द्या तुम्हालाच गरज आहे त्याची.......

प्रचेतस's picture

23 Dec 2011 - 11:58 am | प्रचेतस

मग तुम्ही करणार ना आहेर मला?

चम्याच म्हणायचा की हा तुमचा मित्र. चक्क मुलगी स्वतःहून लग्न करायचं म्हणते तर हा कावरा बावरा होतो.

मुलगी ओळखीतील आहे. जमण्यासारखं असेल तर हो म्हणायचं नाही तर नाही सांगायचं. हाकानाका.

एव्हढ्या छोट्या अनुभवाने जर हा कावरा बावरा झाला तर तुमचा हा मित्र भारत मॅट्रीमोनी, जीवनसाथी, शादी डॉट कॉम वेग्रे वेग्रे संस्थळांवर स्थळांसाठी नोंदणी केल्यानंतर तसेच इतरही बर्‍याच ऑफलाईन वधुवरसुचक संस्थाचे उंबरठे झिजवल्यानंतर आणि त्याहीनंतर प्रत्यक्ष स्थळं पाहताना जे अनुभव येतात त्यांनी तर हा चक्क ब्रम्हचारी राहतो असेच म्हणेल. ;)

किचेन's picture

25 Dec 2011 - 5:12 pm | किचेन

+१00000000 सहमत.

काहीतरी फशीवगंडीव प्रकार वाटतो आहे मला हा... म्हणजे धागा नव्हे, त्यातल्या पोरीची ष्टोरी..

क्षमा असावी पण तुमचे मत पटले नाही त्यातल्या पोरीची ष्टोरी म्हणजे जे घडलं आहे त्याच्याबाबत तेच तर मी ईथे मांडले आहे. ह्यात फसवेगिरीचा काहीच प्रकार नाही.

तुम्ही किंवा तुमचा मित्र नव्हे हो.. मी त्या मुलीविषयी म्हणतोय..

एकतर मुलाच्या घरच्यांना माहीतही नाही असा विषय ती सांगतेय.. जर घरच्यांना माहीत असता तर त्यांनी उलट आईस ब्रेक करण्याची उत्तम संधी म्हणून यानिमित्ताने तुमच्या मित्राला सगळं सांगून टाकलं असतं.

मुलगा मुलगीची प्रत्यक्ष भेट फार झाली असेल नसेल.. पण तरीही ती एवढी अ‍ॅग्रेसिव्ह स्टेप घेतेय, यावरुन संशयास्पद हेतू वाटतो असं म्हटलं... म्हणजे काहीवेळा फाजील पोरंपोरी पैजा लावून एखाद्याला बकरा / पोपट बनवून दाखवतो, असं काही असण्याची शक्यता आहे असं म्हणणं आहे.

बरं ती मुलगी लग्नाचा विषय काढतेय म्हणजे तिला हवंय की नकोय ते स्पष्ट होत नाहीये. कदाचित तिचं दुसरीकडे असेल आणि घरात या मुलाविषयी चर्चा ऐकून ती चिंतित झाली असेल.. त्याला भेटायला बोलावून तूच नकार दे असं विश्वासात घेऊन सांगायचं असेल.. वगैरे..

( गविकाकांचा सल्ला असं सदर सुरु करण्याचं मिपा व्यवस्थापन का बरे मनावर घेत नाही.. )

पिवळा डांबिस's picture

22 Dec 2011 - 11:41 am | पिवळा डांबिस

गविकाकांचा सल्ला असं सदर सुरु करण्याचं मिपा व्यवस्थापन का बरे मनावर घेत नाही.. )
नाय तर काय! भित्रे मुलखाचे!!!!
:)
गविकाका, तुम्ही असं सदर जरूर सुरु करा, आम्ही त्यावर उपसल्ला देत जाऊ....
जरा धमाल उडवुया मिपावर, तिच्यायला!!!!!
:)

मी-सौरभ's picture

22 Dec 2011 - 3:10 pm | मी-सौरभ

गवि, ५० फक्त, बिका यांना गुरु करुया

पि.डा. अन रामदास काकांना 'महागुरु' करुया :)

बाकी आम्ही आहोतच टाळ्या वाजवायला.

सुरु होईल मिपाचा सुखी संघ (मराठीत हॅप्पी क्लब)

मन१'s picture

22 Dec 2011 - 3:38 pm | मन१

हे मनाच्या श्लोकाच्या ष्टायलित बसवून पाहतोय.(गुरुंचा शिष्य होण्याकडे तेवढेच एक पाउल)
("नमू शारदा मूळ चत्वार वाचा" च्या लायनीवर)

गवि, पन्नास्,बिका जनांसी |
मिपाकरेही गुरुराज मानी ||

पिडा रामदासीं महागुरु करोनी |
शिष्यत्व ते थोर मिळाले म्हणती||

नमावे तयासी टवाळे ध्यांसी |
टवाळें म्हणती "मास्टरें" ह्यांसी ||

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या सर्वांबरोबरच 'महावस्ताद' म्हणून श्री. पाषाणभेद ह्यांना देखील सामिल करावे अशी विनंती.

मन१'s picture

22 Dec 2011 - 3:48 pm | मन१

वरच्यास पुरवणी...
("मनाचा मवाळु स्नेहाळु कृपाळु जनीदासपाळु " ह्या ओळींच्या लायनीवर)

टवाळू वस्तादु महाभांडखोरू |
कजागु टंकाळु प्रतिसादपाडु ||

असे पाभे धाग्यावरी ज्या |
दंगा नित्य तये नाम त्याचा ||

सांगतो परा नाना कळा ह्या |
प्रतिसाद ह्याचे धो धो नळा ह्या ||
ह्याच्या उपरोधी समजु कोण जाणे |
तया अंतरि श्री चेतन राहे !!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार

धनवाद हो मनोबा.

सांगतो परा नाना कळा ह्या
आमच्या जोडीलाच आमच्या परम मित्राचे नाव पाहून अंमळ हळवा झालो आहे.

नान्या भाड्या कुठे आहेस रे?

मोहनराव's picture

22 Dec 2011 - 6:43 pm | मोहनराव

_/\_

निवेदिता-ताई's picture

22 Dec 2011 - 8:32 pm | निवेदिता-ताई

मनोबा......मानल बाबा तुम्हाला....

उदय के'सागर's picture

22 Dec 2011 - 10:18 am | उदय के'सागर

१. जर घरच्यांचे त्याच्याशी खेळीमेळीचे वातावरण आहे तर मग त्याने स्पष्ट घरच्यांना विचारावे ना कि खरंच असं काहि बोलणं झालय का ते. आणि त्या वर त्याने ठरवावे त्या मुलिला भेटावे कि नाहि. किंवा त्यानुसार तो त्या मुलिला response देऊ शकेन.

२. जर त्याचे कुठे दुसरी कडे काहि प्रकरण नसेल तर त्या मुलिला प्रत्यक्ष भेटुन काय ते निर्णय घ्यावे. (दुसरी कडे काहि प्रकरण नसेल तर मुळातच "कावरे-बावरे" का व्हावे ते कळतच नाहि)

३. आणि माफ करा पण त्याच्या ह्या मामुलि समस्ये मुळे तुम्हि हि "भारावुन" गेलात हे म्हणजे "उघड्या कडे नागडं गेलं आणि थंडिने कुडकुडुन मेलं" असं काय म्हणतात ते तसं ते झालं कि वो.... ;)

बाकि त्याच मुलि बरोबर तुमच्या मित्राचे लग्न जमल्यास, त्या मुलिस माझ्या शुभेच्छा!!! :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि माफ करा पण त्याच्या ह्या मामुलि समस्ये मुळे तुम्हि हि "भारावुन" गेलात हे म्हणजे "उघड्या कडे नागडं गेलं आणि थंडिने कुडकुडुन मेलं" असं काय म्हणतात ते तसं ते झालं कि वो....>>> :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...बा बौ,,,बा बौ....काय हा मार्मिक प्रतिसाद... मेलो हसुन हसुन

प्रभाकर पेठकर's picture

22 Dec 2011 - 10:33 am | प्रभाकर पेठकर

त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते.

ह्यात समस्या काय आहे हे समजले नाही. हम्म्म्म्म! तो पाचवी-सहावीत असताना (किंवा वयाच्या पंचाहत्तरीत) हे घडले असते तर समस्या.

त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते.

सरकारी खात्यात नोकरी करणार्‍यांच्या घरी त्यांचे मित्र येत नाहीत का? की त्यांना मित्रच नसतात?

मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते.आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल.

'मधे एकदा' म्हणजे किती काळ आधी? आणि लग्नाचा विचार सुरू झाला की प्रथम ओळखितल्या मुलींचाच विचार केला जातो. काही कारणाने त्या नाकारल्या गेल्या तर शोधशोध सुरू होते.
त्या मित्राची मुलगी लग्नाची आहे पण ह्याच्या घरचे तिचा विचार करीत नाहीत म्हणजे त्या मुलीत काही तरी खोट आहे असे ह्याच्या घरच्यांना वाटत असावे. आणि, ह्याच्या घरचे वातावरण अगदी खेळीमेळीचे असूनही, ह्याच्याशी चर्चा नाही म्हणजे 'ह्याच्या मनांत ती असावी' असा घरच्यांना संशय असेल आणि आपण नाकारल्याने आई-वडील आणि मुलामध्ये कांही भावनिक समस्या निर्माण होऊ नयेत असा विचार त्या मागे असेल.

सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे.

मग संपूर्ण माहीती काय आहे? इथे ही अर्धवट माहीतीवर चर्चा कशी करणार?

पाषाणभेद's picture

22 Dec 2011 - 10:57 am | पाषाणभेद

प्रिय वाटी,

ही समस्या तुझ्या मित्राची आहे की तुझी हे मनमोकळेपणे सांगावे. डॉक्टरकडे अन वकिलाकडे काही लपवू नये असे म्हणतात. 'ताईचा सल्ला' हे सदरही असेच आहे. त्यामुळे न लाजता सांग.
आता त्या मुलीबद्दल. ती मुलगी तुला (किंवा मित्राला) खरच आवडते का? तसे असल्याशिवाय ती मुलगी स्व:त विचारणार नाही. आग असल्याशिवाय धुर निघत नाही.
तुमचे घराण्याचे संबंध असल्याने जास्त नाण न घेता वडीलधार्‍यांना विचारून काय ते ठरवावे.

तुझीच,

ताई

ही समस्या तुझ्या मित्राची आहे की तुझी हे मनमोकळेपणे सांगावे.

काय हे पाभेकाका.. ?? अहो समस्या त्यांचीच आहे हे समजून घेऊनच उपाय सुचवणे चालू आहे.. मित्राची आहे असं इथे कोणाला वाटतंय का ?

फारच स्पष्ट विचारता बुवा तुम्ही.. ;)

फारच छान प्रतिसाद येत आहेत.. पण पुन्हा एकदा येथे नमूद करावेसे वाटते की मिपाकरहो आम्ही आधीच बेड्यात अडकले गेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जो समज करून घेतलाय तो निव्वळ गैरसमज आहे तुमचा. येथे फक्त वैचारीक मतांचे आदान प्रदान व्हावे हाच शुद्ध हेतू आहे तरी क्रुपा करून या प्रकरणात मला गोवण्यात येऊ नये ही नम्र विनंती.

आपला मिपाकर,

वाटी

येथे फक्त वैचारीक मतांचे आदान प्रदान व्हावे .

आता तुम्च्या प्रश्नावर लगेच सल्ला मिळाला तर मग वैचारिक मतांचे आदान प्रदान कसे होणार ? जरा कळ काढा , आणी प्रश्न तुम्हि इतक्या काकुळतीला येउन विचारला आहे संशयाची सुइ थेट तुम्च्यावरच येउन थांबली ना....

मन१'s picture

22 Dec 2011 - 11:10 am | मन१

पेठकर काका आणि गवि ह्यांचा तर प्रतिसाद आवडला होताच.
पण ह्यास तोड नाही
--/\--

"ताईं"चा वाचक

अय्या पाभे ,तू ऐगोनी आन्टी कधी पासून झालास रे?
तु पण http://myagonyaunt.com/ असे काही तरी चालू कर ना ...
मग तुझ्याकडे सगळे येतील रिलेशनशिप अ‍ॅडवाईज, मैरेज अ‍ॅडवाईज , टिनएज अ‍ॅडवाईज मागत ..'काय करावे बरे ?' असे विचारत ;-)
बघ ताई जमतं का ..छान आहे हा काउंसलिंग चा उद्योग

कपिलमुनी's picture

22 Dec 2011 - 11:33 am | कपिलमुनी

तुम्ही पण राव अर्धवट माहीती दिलित आम्हाला .. ष्टूरी रंगवायची ना ..
जरा डीटेल मध्ये सांगा

आणि किचेन तै चा सल्ला घ्या...त्या एक्स्पर्ट आहेत

सर्वसाक्षी's picture

22 Dec 2011 - 11:36 am | सर्वसाक्षी

एसेमेस करणारी व जिला तुम्ही फोन केलात ती खरोखरच वडिलांच्या मित्राची मुलगी आहे की कुणी तुमचा पंचरंगी पोपट करतय ते बघा.
('त्या' मेसेज मध्ये तिने काय लिहिले होते ते सांगितले नाहीत?)

जर तसे खरेच असेल आणि मुलगी पसंत असेल त हो म्हणा. नसेल तर गप बसा (उगाच खाजवुन खरुज कशाला काढावी?)

छ्या! एका मुलीचा एक मेसेज तो काय आणि बबडु गोंधळतो काय. काही खरे नाही.

पैसा's picture

22 Dec 2011 - 11:46 am | पैसा

ची आठवण झाली!

रामदास's picture

22 Dec 2011 - 10:12 pm | रामदास

हे प्रकरण म्हणजे नायजेरीयन फ्रॉडची म्याट्रीमोनीअल एडीशन वाटते आहे.

वाहीदा's picture

23 Dec 2011 - 11:48 am | वाहीदा

नायजेरीयन फ्रॉडची म्याट्रीमोनीअल एडीशन

=))

शाहिर's picture

22 Dec 2011 - 11:46 am | शाहिर

>>मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो.
जरा कशाला ?

>>मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो.

काय वाक् प्रचार आहे

>>त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता
वेल सेटल्ड असणे ही समस्या आहे का ?

>> त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते.
सरकारी ठिकाणी कामाला असेल तर मित्रांचे येणे जाणे नसते का?

>>त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला.

आमच नशीब फुटका ...आमच्या वयात येण्याच्या वेळेस योग्य वय असलेली मुलगी असणारे एकही मित्र नव्हते वडिलांना ..

( की आम्ही वयात आलो हे बघुनच रस्ता बदलला त्यांनी ;) )

>>तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला
>>ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे.

एका वेल सेटल्ड मुलाला एका परीचयामधल्या मुलीने लग्नासाठी विचारला तर गोंधळायचा काय ?

>>भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला.
का बरे ? अशी वेळ सर्व बॅचलर पोरांवर / पोरींवर यावी...हीच सदिच्छा

तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती.
हे मिपाकर देतीलच

चिगो's picture

22 Dec 2011 - 1:18 pm | चिगो

नंबर एक प्रतिसाद, शाहीर..
बाकी, वेल सेटल्ड आणि वयात आलेल्या तरुणाला त्याच्या ओळखीतल्या तरुणीने लग्नाबद्दल विचारले तर त्यात गोंधळायचे काय? का तिच्या ह्या सो कॉल्ड बोल्डनेसमुळे ती पाठीमागे लागेल अशी ह्या दोन्ही गोंधळलेल्या आणि भारावलेल्या मित्रांची कल्पना आहे? च्यायला, झकडमच आहे सगळं..

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा

@->>भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला.>>>
<<<का बरे ? अशी वेळ सर्व बॅचलर पोरांवर / पोरींवर यावी...हीच सदिच्छा..... :-D

शाहिर यांस आमचे पूर्ण अनुमोदन ;-)

चिरोटा's picture

22 Dec 2011 - 12:55 pm | चिरोटा

लग्नाचे मुहुर्त आता संपत आलेत. पुढे एकदम एप्रिल्/मे मध्ये. तेव्हा मित्राला शांत मनाने विचार करायला सांगा.
भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला
असल्या प्रसंगाची तर अनेक जण वाट बघत असतात साहेब. वर म्हंटल्या प्रमाणे त्यामुलीने कोणाबरोबर तरी पैज लावली असण्याची शक्यता नाकरता येत नाही. पण घरोबा असल्याने मुलगी सरळ वळणाची आहे की कशी हे त्याचे आई-वडिल नक्कीच सांगु शकतील.

एक प्रामाणिक शंका तुमच्या मित्राला 'मुलीच' आवडतात ना हो?
इंडिया 'मागासलेला' राहिला नाही हो आता. ;)

अश्लील अश्लील!! ;)

गणपा संपादक आहे असे कुठेतरी ऐकलय.. खरं का रे?

"इस वख्त मैं तुम्हारे सामने एक संपादक नही बल्कि एक दोस्त की हैसियत से खडा हूं.."

असं दिलीपकुमारछाप वाक्य गणपाशेटसाठी सुचवून पाहतो.

शाहिर's picture

22 Dec 2011 - 3:24 pm | शाहिर

तुच ना तो ..

अशा कणेकरी छाप वाक्य आम्ही ग विं साठी सुचवतो

गवि जाओ पहेले उसे धुंड लागो जिसने मेरे हाथोंपे ये लिख दिया....

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

ये हाथ...ये हाथ हमको दे देठाकुर ;-)

मोहनराव's picture

22 Dec 2011 - 6:36 pm | मोहनराव

ये हाथ नही फांसी का फंदा है. बचके रहीयो!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार

भेंडी =))

च्यायला ! 'ती मुलगी बॉबी डार्लींग नाही ना ?' असे विचारले नाहीस हे आमचे नशिब.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा

तुमच्या मित्राला 'मुलीच' आवडतात ना हो? :bigsmile:

सगळे प्रतिसाद म्हणजे हंड्यांवर हंड्या फोडल्या जातायत,पण गणपानी तर पाण्याची अख्खी टाकिच फोडलीये... :-D

मी-सौरभ's picture

22 Dec 2011 - 3:17 pm | मी-सौरभ

नाहीतर हा मित्र वाटी घेऊन जरा हॉटेलात का गेला असता???

तरी बरं चमचा / उलथना घेऊन नाही गेला

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा

तरी बरं चमचा / उलथना घेऊन नाही गेला :bigsmile: आई गंsssss मेलो मेलो रे हसून... नुसतं चमचा ल्याहायचं ना..? ते उलथनं कशाला... ते म्हणे पुढुन पसरट असतं असं म्हणतात :-D

मी-सौरभ's picture

22 Dec 2011 - 7:35 pm | मी-सौरभ

पसरट बाजू हातात पण धरता येऊ शकते ना ,,, ;)

निवेदिता-ताई's picture

22 Dec 2011 - 8:40 pm | निवेदिता-ताई

..अरे काय चाललय काय?????????

आता चमचा /उलथना झाला आता डाव, भातवाढी पण येउद्यात...........;)

ह. ह. पु. वा.

दादा कोंडके's picture

22 Dec 2011 - 9:19 pm | दादा कोंडके

ओ तै जाउद्या. वाटीची ताटली होइल.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा

पसरट बाजू हातात पण धरता येऊ शकते ना ,,, >>> अरं तिच्यायला... ह्ये पण हतात येऊ शकतं नव्हं का हो :-p ध्येनातच नाई आलं बगा अमच्या ;-)

पक पक पक's picture

25 Dec 2011 - 5:01 pm | पक पक पक

सांड्शी .......?

मोहनराव's picture

22 Dec 2011 - 6:37 pm | मोहनराव

सौर्‍या जमंतय.. लई भारी.

देविदस्खोत's picture

22 Dec 2011 - 6:49 pm | देविदस्खोत

महोदय, आपणांतील बर्‍याच जणांनी ज्या काळात जन्म घेतला (?) तो काळच वेगळा होता. त्या काळी एखाद्याचा विवाह जमविणे, यासाठी समाजात एक वेगळीच अदृष्य यंत्रणा कार्यरत होती. समाजाचे स्वःताचे काही नियम, अटी होत्या. त्याविरुध्द जावून काही करण्याचे धाडस फारसे कुणी करीत नव्हते. आपण (आपल्या सर्वच संबंधीत) लोकांचे विवाह बारकाईने पाहिले -तर या यंत्रणेचा किती मोठा धाक लग्नाळू मुला-मुलींवर होता हे दिसेल. समाजातील सर्वच घटक आपापल्यातर्‍हेने, काहि हेतू मनांत ठेवून, काही तर कसलीही अपेक्षा न ठेवता यात सहभागी होत. त्याकाळी अर्थाजन किंवा मग त्या मुलाच्या मागे उभी असलेल्या आर्थिक "ताकदीचाच" प्रामुख्याने विचार केला जाई. सर्व सामान्यपणे मुलाने अर्थाजन करावे, व मुलीने आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निटनेटका संसार करुन दाखवावा अशी अपेक्षा केली जाई. विवाह जमविण्याच्या प्रक्रीयेत मुलाचे मतही फारसे विचारात घेतले जात नसे. मुलीच्या मताला तर नगण्य किंमत होती. या समाजव्य्वस्थेच्या विरुध्द जाण्याचे कुणी धाडस दाखविलेच तर त्यांचे काय होते त्याची उदाहरणेही आजुबाजूला पहावयांस मिळत. समाजाच्या खालपासून वरपर्यत हीच मांडणी लक्षात येईल. आपल्या मित्राच्या बाबत येथेच गोची होतेय !! पुढे काळ बदलला !! नको तितका बदलला !! आर्थिक आघाडीवर मुलांच्या नशिबी उपेक्षा आली. किंबहुना मुली आर्थिक बाबतीत खूपच नशिबवान ठरल्या. एका दॄष्टीने हे ठीकच होते. मुलींना आता कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हल्ली कुणी कुणाला फारसे विचारत नाही. वर उल्लेखिलेली विवाह यंत्रणा पूर्णतः लोप पावली. कुणाचा कुणाला धरबंद राहिला नाही समाजाचा पूर्वी जो एक " अदृष्य " धाक होता. तो नाहिसा झाला. ज्यांनी हा बदल स्वीकारला त्यांचा काहिहि प्रश्न नाही. पण आपल्या मित्रांसारखी जी पूर्वापार संस्कृतीत जगणारी मंड्ळी आहेत, त्यांना मात्र हा बदल न पेलणारा आहे हे खरंय!!!! महोदय, आपण म्हणता त्याप्रमाणे त्या मुलीशी त्यांचे घरगुती संबध आहेत. तर तुमच्या मित्राने घड्लेली घटना स्पष्ट्पणे सांगावी. दोन्ही घरांतील " जाणत्या " व्यक्तींनी एकत्र बसावे . म्हणजे सर्वे बाबींचा उलगडा होईल. मुलीने इतके धाड्सी पाऊल कसे उचलले का त्यामागे कुणाचा निव्वळ "चेष्टा" करणे हा हेतू होता हेही उघड्कीस येइल. जर सर्वांचेच समाधान झाले तर मग........... "पटलं ..तर....होय....म्हणा .... नाही तर सोडून द्या.".....!!!!! बाकी या गोष्टीवर जास्त विचार करु नका..दोस्त !!!!!!!!!!

मन१'s picture

22 Dec 2011 - 7:01 pm | मन१

दोन्ही घरांतील " जाणत्या " व्यक्तींनी एकत्र बसावे .

ह्याच्याशी जाम सहमत होतील सगळे. इथेही बरेच जण एकत्र "बसतात". :)

मला आपलं नाव काय आहे ते कळालंच नाही.....
डेव्हिड स्कॉट का देविदास खोत ??

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Dec 2011 - 7:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

परिच्छेद पाडा ना हो काका !!!!

प्रभाकर पेठकर's picture

22 Dec 2011 - 7:28 pm | प्रभाकर पेठकर

@ श्री. देविदास खोत,

समाजाचे स्वःताचे काही नियम, अटी होत्या. त्याविरुध्द जावून काही करण्याचे धाडस फारसे कुणी करीत नव्हते. आपण (आपल्या सर्वच संबंधीत) लोकांचे विवाह बारकाईने पाहिले -तर या यंत्रणेचा किती मोठा धाक लग्नाळू मुला-मुलींवर होता हे दिसेल. समाजातील सर्वच घटक आपापल्यातर्‍हेने, काहि हेतू मनांत ठेवून, काही तर कसलीही अपेक्षा न ठेवता यात सहभागी होत. त्याकाळी अर्थाजन किंवा मग त्या मुलाच्या मागे उभी असलेल्या आर्थिक "ताकदीचाच" प्रामुख्याने विचार केला जाई. सर्व सामान्यपणे मुलाने अर्थाजन करावे, व मुलीने आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निटनेटका संसार करुन दाखवावा अशी अपेक्षा केली जाई. विवाह जमविण्याच्या प्रक्रीयेत मुलाचे मतही फारसे विचारात घेतले जात नसे. मुलीच्या मताला तर नगण्य किंमत होती. या समाजव्य्वस्थेच्या विरुध्द जाण्याचे कुणी धाडस दाखविलेच तर त्यांचे काय होते त्याची उदाहरणेही आजुबाजूला पहावयांस मिळत. समाजाच्या खालपासून वरपर्यत हीच मांडणी लक्षात येईल. आपल्या मित्राच्या बाबत येथेच गोची होतेय !!

मुलीचा एस्. एम्. एस्. आला होता आणि मुलीने लग्नाविषयी स्वतःच तडक प्रश्न विचारला आहे. म्हणजे कथा नायक आणि नायिका ह्या आजच्या (बदललेल्या) काळात वावरत आहेत.

तेंव्हा वरील पुर्ण असंबद्ध परिच्छेदामुळे प्रतिक्रियेतील जागा व्यापण्यापलीकडे काहीही साध्य होत नाहिए.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2011 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा

@-ह्याच्याशी जाम सहमत होतील सगळे. इथेही बरेच जण एकत्र "बसतात".>>>
<<<मनोबा आपणास अमचे साष-टांग नमन

देविदस्खोत's picture

22 Dec 2011 - 7:12 pm | देविदस्खोत

ब॑होत खूब !!!!!!!! मान लिया उस्ताद आपको............!!!!!!!!!!

देविदस्खोत's picture

22 Dec 2011 - 7:14 pm | देविदस्खोत

देविदास खोत....

अप्रतिम's picture

22 Dec 2011 - 7:16 pm | अप्रतिम

फेसबूकवर त्या मुलीचा सर्च मारायला सांगा...

सुहास..'s picture

22 Dec 2011 - 7:22 pm | सुहास..

फेसबूकवर त्या मुलीचा सर्च मारायला सांगा...

हे ही दिवस जातील.

??? ????? ?????

मन१'s picture

22 Dec 2011 - 7:26 pm | मन१

फुटलो...

मी-सौरभ's picture

22 Dec 2011 - 7:38 pm | मी-सौरभ

फुटलास तर .....
हे ही दिवस जातील....

असेच एका कार्यक्रमात एका मुलीने रात्री काय करता? येता का म्हणुन विचारले होते त्याची आठवण झाली.ते मिपाकर सध्या वानप्रस्थात गेले आहेत.
तुमच्या मित्राचे पण तसेच झाले आहे. गावाला विचारत बसण्यापेक्षा एकदा तिलाच हॉटेलला(परत तुम्ही जावु नका) फिरायला घेवुन जा म्हणाव. आवडली तर होय नाहीतर नाही. तुमच्या मित्रापेक्षा त्या मुलीचे मला कौतुक वाटते.

ईन्टरफेल's picture

22 Dec 2011 - 9:17 pm | ईन्टरफेल

आसे सारखे मदत मागत फिरु नका . व खुप प्रतिसाद येतात ह्या भ्रमात देखिल राहु नका!
ईथे खुप वर नेउन खुप खालि घालनारे टपुन बसलेले आसतात !
हुरळुन जाउ नका . तुमचे स्वताचे लेख आनुभव जरुर लिहा !
आवड्ले तर ऊचलुन धरतिल नाहि तर जबर आपटवतिल !
हि मिपचि स्टईल आहे !
आपन नविन दिसता आहात म्हनुन हा सल्ला ! (डु आय डी आसेल तर चालु दे )

धन्या's picture

22 Dec 2011 - 10:58 pm | धन्या

ईथे खुप वर नेउन खुप खालि घालनारे टपुन बसलेले आसतात !

अहो काय हे. शिव शिव शिव. काय ही भाषा. ;)

अप्पा जोगळेकर's picture

22 Dec 2011 - 10:55 pm | अप्पा जोगळेकर

भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला.
ह्या वाक्याला आक्षेप आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

ह्या वाक्याला आक्षेप आहे.

अशी वेळ वारंवार यावी अशी आमच्या अप्पाची इच्छा आहे ;)

तसेही परवा त्यांना जिमखान्यावरील काही टेनीसपटू फारच आवडल्याचे आम्हाला जाणवले होतेच ;)

मृत्युन्जय's picture

23 Dec 2011 - 11:11 am | मृत्युन्जय

तुमच्या मित्राचे कावर्रे बावरे होण्याचे कारण कायः

१. त्या मुली मित्र ओळखत नाही
२. ती मुलगी मित्राला ओळखत नाही
३. तिच्याकडुन तुय्मच्या मित्राला या वर्तणुकीची अपेक्षा नव्हती
४. तुमचा मित्र लग्नाला घाबरतो किंवा लग्नानंतरच्या एखाद्या "समारंभाला" घाबरतो
५. तुमच्या मित्राला ती मुलगी आव्डत नाही
६. तुमच्या मित्राला मुलीच आव्डत् नाहीत
७. त्या मुलीला मुलीच आवडतात
८. ती मुलगी लग्नाला तयार नाही
९. तुमच्या मित्राला बेड शेयर करण्याची सवय नाही.
१०. त्या मुलीचे माहेरचे आडनाव कावरे किंवा बावरे आहे?

दिपक's picture

23 Dec 2011 - 11:36 am | दिपक

११. तुमचा मित्र लाजरा आहे का?
१२. मित्राचे दुसर्‍या कुणावर प्रेम आहे का?
१३. मुलीने डायरेक्ट विचारले म्हणुन तो कावरा बावरा झाला का?

मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे.

अर्धवट माहिती मिळाली हे तुम्हाला कसे माहित? तुम्ही मुलीला ओळखता का?

आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला.

किती पुढे जाऊन?

कवितानागेश's picture

23 Dec 2011 - 4:17 pm | कवितानागेश

१४. मित्र १२ वर्षांचा आहे! ;)

१५. मुलीचा SMS येण्याची पहिलीच वेळ आहे का..?

! नेमकि कोणति माहिती अर्ध वट मिळालि ?????????????????????????????????

! नेमकि कोणति माहिती अर्ध वट मिळालि ?????????????????????????????????

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2011 - 5:36 am | बिपिन कार्यकर्ते

च्यायला! वाटीत चमचा... आय मीन खोदा पहाड निकला चूहा! ;)

तो एसेमेस मला फॉरवर्ड करायला सांगा, पुढ्चं मी बघुन घेतो..

मृत्युन्जय's picture

24 Dec 2011 - 11:18 am | मृत्युन्जय

छत्रपती वाटीच्या चमच्याने आपलं ते मित्राने तुम्हाला तो इमेल पाठवला तरी तुम्ही बघुन बघुन काय बघु शकणारे? अहो त्या मित्राला तो मेसेज एका मुलीकडुन आला होता तुम्हाला मुलाकडुनच येणार आहे हो . अर्थात मित्राने काहितरी सेटिंग लावुन ओरिजिनल सॉर्स कडुन तुम्हाला मेसेज पाठवला तर गोष्ट वेगळी.

विनायक प्रभू's picture

24 Dec 2011 - 11:35 am | विनायक प्रभू

"पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे"
असे काही (मुलीने) म्हटले असते तर सल्ला मागण्यात अर्थ आहे.

मृत्युन्जय's picture

24 Dec 2011 - 11:46 am | मृत्युन्जय

च्यामायला मग कसला सल्ला मागायचा?
बाजारात जायचं एक चांदीचा पेला (वाटी आधीच आहे), अर्धा तोळा केशर, पाव लितर दूध, ५० ग्राम बदाम, २ पांढरे कांदे (क्षमतेनुसार), १० पाकळ्या लसूण (क्षमतेनुसार) आणी एक कोलगेट आणली की काम झाले. हाकानाका

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

च्यामायला मग कसला सल्ला मागायचा?
बाजारात जायचं एक चांदीचा पेला (वाटी आधीच आहे), अर्धा तोळा केशर, पाव लितर दूध, ५० ग्राम बदाम, २ पांढरे कांदे (क्षमतेनुसार), १० पाकळ्या लसूण (क्षमतेनुसार) आणी एक कोलगेट आणली की काम झाले. हाकानाका

त्यातून बाजारात एखादा धनगर भेटला की कामंच झाले. तुम्ही दोन तासात उर्ध्वरेता ;)

शाहिर's picture

24 Dec 2011 - 4:15 pm | शाहिर

तुळशीच्या मंजुळा राहिल्या ना बे

यक्कु रागावतील ना

प्रभाकर पेठकर's picture

24 Dec 2011 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर

"पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे"

म्हणजे, मुली 'इस्तेमाल' करण्याची गोष्ट आहेत असे आपले मत आहे काय?

विनायक प्रभू's picture

24 Dec 2011 - 6:02 pm | विनायक प्रभू

असे माझे मत नाही.
प्रतिसादावरुन तुम्ही तसे मत केलेत की काय?

प्रभाकर पेठकर's picture

24 Dec 2011 - 7:36 pm | प्रभाकर पेठकर

असे माझे मत नाही.

धन्यवाद श्री. विनायक प्रभू.

गैरसमजाबद्दल क्षमस्व.

मन१'s picture

24 Dec 2011 - 6:11 pm | मन१

त्यांनी "पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे"
असे काही (मुलीने) म्हटले असते तर सल्ला मागण्यात अर्थ आहे.

असे म्हटले आहे. म्हणजे मुलीची तशी विचारसरणी असेल तर.

विनायक प्रभू's picture

24 Dec 2011 - 11:49 am | विनायक प्रभू

मी पेप्सोडेंट वापरतो.

स्वातीविशु's picture

24 Dec 2011 - 1:04 pm | स्वातीविशु

सोप्पय.....

पटलं ..तर....होय....म्हणा .... नाही तर सोडून द्या.".....!!!!! बाकी या गोष्टीवर जास्त विचार करु नका..

मयुरपिंपळे's picture

24 Dec 2011 - 4:07 pm | मयुरपिंपळे

लग्न एकदाच करता येते त्यामुळे तुमचा मित्रानी शांत होऊन विचार केला पाहीजे.

एखाद झाड आणी नदीचा आसरा घेतला तर ऊत्तम ( विचार करण्यासाठी) :)

किचेन's picture

25 Dec 2011 - 5:33 pm | किचेन

आयला ( हा शब्द चालतो न? नाहीतर पुढच्या वेळपासून **ला लिहित जाईल.) जर दोन मित्राचं अगदी घरी येण जाण आहे तर मग त्यांच्या मुलांची मैत्री नाहीये? बर ठीक आहे नसेल कदाचित मुलगा कुठेतरी लांब जाऊन सेटल झाला असेल.त्याच्या अनुपस्थितीत दोनाचे चार हात करायचं ठरलं.मुलीच्या घरी तसा विषय निघाला पण नंतर काहीच चर्चा नाही...मग कदाचित तोंडदेखल हो बोलले असतील.मुलीच्या आई-वडिलांना वाईट वाटू नये म्हणून! मुलाच्या आई वडिलांना मुलगी पसंत नसेल.म्हणून मुलाजवळ विषय काढला नसेल.दुसरी गोष्ट हा फोन मुलीच्या वडिलांनी किवा आईने करायला हवा होता.बर पत्रिका बघितली होती का त्या मुलीने? किती गुण जुळले?मंगळ -बिन्गळ काही?

अवांतर: मला खोतांनी लग्नाला बोलावलं नाही.म्हणून मी कोणत्याही मिपाकराच्या लग्नाला जाणार नाही आणि गेलेच तर चांदीचा काय प्लास्टिकचा पण पेला देणार नाही.फार तर बुफे मध्ये जो कांदा ठेवलेला असतो तो देईल.

कपिलमुनी's picture

26 Dec 2011 - 7:42 am | कपिलमुनी

अरे वा !!
अब आयेगा डायरी पढने का मजा ;)