झोपला का ग?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Dec 2011 - 12:52 pm

झोपला का ग?
तेंव्हा आमच घर लहान होत.
वन बेडरुम, किचन..
बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता
मी त्यावेळी २-३ रीत असेल
बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो.
झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला..
मी रात्री जाम झोपायचो नाहि..
ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची..
सारखे दोघेपण झोप झोप करायचे...
उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची
मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे..
झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो"
मी मानांत हसायचो....
मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....

[कल्पना स्त्रोत.प्रतिसाद.. मित्रवर्य ली]
अविनाश....

बालगीत

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

21 Dec 2011 - 12:55 pm | किसन शिंदे

मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....

तुम्हाला जर माहिती होतं तर मग याला बालगीत का म्हणावं??

शेवटचे बालगीत असे म्हणावे काय?

"संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ ?! ;)

सुहास झेले's picture

21 Dec 2011 - 1:34 pm | सुहास झेले

हा हा हा :D :D

>>संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ

हो, पण दुसरी- तिसरीत असताना ?? जरा जास्तच लवकर नाही वाटत ??

रामपुरी's picture

21 Dec 2011 - 10:18 pm | रामपुरी

हे काहीच नाही. चेतन सुभाष गुगळे यापेक्षा भारी होते दुसरी- तिसरीत असताना. त्यांचे धागे वाचा...

प्रास's picture

21 Dec 2011 - 1:02 pm | प्रास

क्वोटिंग उपकरणाचा उपयोग करणं जमू लागलं की भाऊ!

बालगीत म्हणून काकाश्रींनी धागा जनातलं मनातलं मध्ये टाकलाय म्हणजे ते त्यांच्या बालपणीचं मनातलं गीत का काय असं का म्हणू नये?

बाकी मला तरी ते काकाश्रींच्या मनातलं मुक्तक त्यांनी नेहमीप्रमाणे जनातलं केलंय असं वाटतंय.

काय, बरोबर ना, काकाश्री?

:-)

मी त्यावेळी २-३ रीत असेल

खुप लहानपणीच मोठे झालात तुम्ही!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2011 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार

हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे.

गणपा's picture

21 Dec 2011 - 1:52 pm | गणपा

;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे. :-D निर्वाण प्राप्त झाले आहे :-D

दादा कोंडके's picture

21 Dec 2011 - 1:44 pm | दादा कोंडके

"शांतेचं.." मधला संवाद आठवला, सुधीर जोशी लक्षाकडे ( तो झोपेतून उठताना) बघून म्हणतो, हा लहान असल्यापासून असा मध्येच उठतो, म्हणून याला लहान भावंडं झालं नाही!

दिपक's picture

21 Dec 2011 - 1:51 pm | दिपक

हा हा हा

"खबरदार" चित्रपटातला संजय नार्वेकरचा "आता उठुन काय फायदा?" चा सिन आठवला :-)

मनराव's picture

21 Dec 2011 - 2:24 pm | मनराव

:D :D :D :D :D :D :D :D :D

मग शेवटी एकुलते एकच राहिलात का....?

मराठी_माणूस's picture

21 Dec 2011 - 7:39 pm | मराठी_माणूस

हीन दर्जा

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2011 - 8:19 pm | इंटरनेटस्नेही

वा वा चान चान. एक जोक सुचला आहे, इच्छुकांनी व्यनि करावा.

शिल्पा ब's picture

21 Dec 2011 - 10:13 pm | शिल्पा ब

काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 10:22 pm | अन्या दातार

काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?

कधी नव्हते? :shock:

मी-सौरभ's picture

22 Dec 2011 - 4:49 pm | मी-सौरभ

>>मी त्यावेळी २-३ रीत असेल
म्हंजे तुम्ही बर्‍याच वेळा नापास झाले होतात १ली त असताना :)

आदिजोशी's picture

23 Dec 2011 - 6:54 pm | आदिजोशी

लेखातून वा हे जे काही आहे त्यातून नक्की काय सांगायचंय?