पुण्याबाहेरचे पुणे- भाग १....रांजण-खळगी.....

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
20 Dec 2011 - 10:52 am

प्रचलित नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.)

कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.

वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...

रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब....

जाताना बघण्यासारखे :
१) वाघोलीतले वाघेश्वरीचे मंदीर...ईथे एक पेशवेकालीन समाधीही आहे..बोटींग आहे...
२) तुळापुर ::जायच्या मुख्य रस्त्यापासुन ६ किमी आत...ईतर काहीही सांगण्याची गरज नाही.
३) कोरेगाव भीमा : नदीच्या कठड्यावर वसलेले गाव...
४) रांजणगावचा गणपती : अष्टविनायकांपैकी एक

जाताना हे बघुन डोक्याला शॉट लागला...मीठाबरोबर थेट मिरच्या..

....घोडनदीच्या किनार्‍यावर ....शिवकालीन मंदीरे आणे एक अपुर्ण राजवाडा....

धोके आणी सुचना :
१) रांजणगावपासुन थेट टाकळी हाजी पर्यंत,मुख्य रस्त्यावर दुचाकी-चारचाकीचे गॅरेज नाही.थोडस गावात शिरावं लागत..आठ ते नऊ किमी...

२) खळगी वरुनच पहावीत...खोलात शिरु नये...रांजणखळग्यांमध्ये प्रवाहात अनेक जण वाहुन गेलेत,त्यांची शव देखील मिळाली नाहीत.......काही दिवसांपुर्वी...पावसाळ्यात वाळुचा ट्रक वाहुन गेलाय...तो आख्खा ट्रक सापडला नाही...आता पाणी आटलेले असले तरी पाण्याचा प्रवाह कुठुन सुरु होतो आणी कुठुन नाहीसा होतो ते कळत नाही.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 10:57 am | प्रचेतस

मस्त फोटो
अतिशय अद्भूत ठिकाण
एकदा भेट द्यायलाच पाहिजे.

सोत्रि's picture

20 Dec 2011 - 11:38 pm | सोत्रि

वल्ली,
एक ट्रीप ठरवा इथली. नक्की जाऊयात.

- (भटक्या) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

वल्ली... मारू ना एखादी वन डे,येत्या काही दिवसात...!

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 8:28 am | प्रचेतस

आता लवकरच जाऊयात तिथं.

मी-सौरभ's picture

21 Dec 2011 - 7:04 pm | मी-सौरभ

पुढच्या वर्षी ठरव बरं का...

sneharani's picture

20 Dec 2011 - 11:06 am | sneharani

जबरदस्त आलेत फोटो!
बघायला आवडेल नक्की!
:)

किसन शिंदे's picture

20 Dec 2011 - 11:59 am | किसन शिंदे

जबरा रे,

मघाशीच त्या प्रतिसादात माझ्याजवळील रांजण खळग्यांचा फोटो टाकण्याचा मोह अनावर झाला होता. पण ते काम तु केलसं त्याबद्दल धन्यवाद! :)

दरवर्षी चैत्रात तिथे मळगंगा देवीची मोठी यात्रा भरते तेव्हा या कुंडात सगळे भावीक मोठया भक्तीभावाने स्नान करतात.

गावतल्या मळगंगा मंदिरात एक बारव आहे. त्या बारवबद्दल एक आख्यायिका अशी आहे कि तिच्या (देवीच्या) उत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता त्या बारवमधून एक घागर आपोआप 'प्रकट' होते.

हे माझ्याजवळील काही फोटो...

काही काही ठिकाणी तर इतकी मोठी खळगी आहेत कि संपुर्ण माणूस त्यात सहज उभा राहू शकतो.

सुहास झेले's picture

20 Dec 2011 - 11:30 am | सुहास झेले

सही रे... बघायला हवंच :) :)

झकासराव's picture

20 Dec 2011 - 12:21 pm | झकासराव

मस्त आहे हे ठिकाण आणि सुहास्याने काढलेले फोटोहि. :)

मी जाउन आलोय पण माझ्याकडे त्यावेळी कॅमेरा नसल्याने फोटो नाहियेत.
हे ठिकाण फोटोपेक्षाही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे, :)

मनराव's picture

20 Dec 2011 - 1:00 pm | मनराव

झक्कास...... ठिकाण आणि फोटो...........

हा काहीतरी जिऑलॉजिकल घटनेतून/ रासायनिक प्रक्रियेतून दगडांना आलेला आकार असणार.. काय असेल कोण जाणे..

खूपच इंटरेस्टिंग.. अद्भुत..

स्मिता.'s picture

20 Dec 2011 - 5:23 pm | स्मिता.

ही खळगी खळाळत्या पाण्यासोबत वाहून आलेल्या दगड-गोट्यांच्या घर्षणाने तयार झाली आहेत. मोठ्या दगडावरील एखाद्या लहानश्या खड्ड्यात हे वाहून आलेले दगड अडकून पाण्याच्या प्रवाहाने ते त्यात गोल फिरत. त्या घर्षणामुळे लहान खड्डे हळूहळू मोठे झाले आणि अडकलेल्या लहान दगडांची माती होवून वाहून गेली. वर्षानुवर्षांच्या या प्रक्रियेतून ही खळगी तयार झाली आहेत असे कुठेतरी वाचनात आले होते. आता संदर्भ आठवत नाहिये पण तर्क पटण्यासारखा आहे.

चार वर्ष पुण्यात राहूनही हे ठिकाण बघितलं नाहीये. आता कधी संधी मिळेल कुणास ठाऊक!

गवि's picture

20 Dec 2011 - 5:38 pm | गवि

धन्यवाद...

विलासराव's picture

20 Dec 2011 - 11:12 pm | विलासराव

बरोबर.
४-५ वीच्या भुगोलाच्या पुस्तकात यावर धडाही आहे.
निघोज हे आमच्या पारनेर तालुक्यातील सीमेवरील गाव. दुसर्या बाजुने टाकळी हाजी.
आता तिथे एक झुलता पुलही झालाय.
तसेच पाबळच्या आसपास चिंचोली ( मोराची) हे गावही मोरांसाठी प्रसीद्ध आहे.

सर्वप्रथम मिपा की मीम वरच या रांजण-खळगी बद्दल वाचलं आणि फोटो पाहिले आहेत.
एकवार भेट द्यायला नक्की आवडेल.

इथेच, इथेच वाचले असेल.
हा पहा ५० रावांचा तो रांजणखळग्यांचा धागा.
http://www.misalpav.com/node/16602

अमोल केळकर's picture

20 Dec 2011 - 5:35 pm | अमोल केळकर

सुंदर ठिकाण

अमोल केळकर

पुष्करिणी's picture

20 Dec 2011 - 7:30 pm | पुष्करिणी

सुंदर ठिकाण आणि फोटो. मस्तच आहे.

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 7:58 pm | इंटरनेटस्नेही

माहितीपुर्ण लेखन. :)

पैसा's picture

20 Dec 2011 - 11:22 pm | पैसा

काय सुंदर फोटो आहेत! तिथे कसं जायचं याची डिटेल माहिती दिली हे फार छान!

हे असे आकार कशामुळे तयार झालेत? आणि त्यात अख्खा ट्र्क वाहून गेला तो कुठे गेला असेल?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

झक्कास वृत्तांत आणी फोटोही... :-)

कौशी's picture

21 Dec 2011 - 12:08 am | कौशी

फोटो मस्तच आलेत.

या वेळी तरी भाग २ टाकशील का रे?
का उभारू थडगं पुन्हा. ;)

सुधांशुनूलकर's picture

22 Dec 2011 - 10:36 pm | सुधांशुनूलकर

छान फोटो आणि माहिती
एकदातरी जायलाच हवं असं वाटतंय...

जमीर इब्राहीम 'आझाद''s picture

23 Dec 2011 - 1:39 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'

खूपच अद्भुत आणि इंटरेस्टिंग....
नतमस्तक व्हायला लावणारी अशी निसर्गाची किमया...!!!
मानवाच्या जादुई मेंदूमध्ये सुद्धा अशीच वेगवेगळी रचना काम करत असते आणि प्रत्यक्षात तिथे जाउन तर इतके सगळे विविध प्रकारचे आकार पाहुन तर मन हरखून जाते...!!!!
जुन्या आठवणी जाग्या झाल्या..!!! आनंद वाट्ला..!

परंतु सुहास ते "अख्खा ट्रक गायब होणे" खरे आहे काय..?
हे जर खरे असले तर रिस्की सुद्धा आहे ..!!!!

:-)

चिगो's picture

23 Dec 2011 - 4:22 pm | चिगो

अतिशय अद्भुत आहे हे.. एका फोटोत काठावर एक बाई उभी आहे, त्यावरुन ह्यांच्या आकाराची आणी रौद्र सौंदर्याची कल्पना येते.. सुपर्ब. नक्कीच भेट देण्यासारखं..

थँक्यु, सुहास...

मयुरपिंपळे's picture

24 Dec 2011 - 10:24 pm | मयुरपिंपळे

अदभुत :)

सन्जोप राव's picture

25 Dec 2011 - 6:12 am | सन्जोप राव

छान छायाचित्रे व माहिती.
निघोजला नाशिक रोडनेही जाता येते. नारायणगावची सुप्रसिद्ध मटण-भाकरी खाणेही याच ट्रीपमध्ये जमू शकते.

सचिन भालेकर's picture

12 Oct 2012 - 7:15 am | सचिन भालेकर

फोटो दिसत नाहित........................... :)

पन्कज's picture

11 Nov 2012 - 12:06 pm | पन्कज

छान..............

कुलभूषण's picture

13 Dec 2012 - 3:08 pm | कुलभूषण

जगातील अतिशय मउ व ठिसूळ खडका पैकी एक हा खडक आहे. संतगतीने हे खडक नष्ट होत आहेत. मळगंगा मंदिर व झूलता पूल ही इथे अतिशय सुंदर आहे. या झूलत्या पुलाच्या एका बाजूस अहमदनगर जिल्हा आणि दुसर्‍या बाजूस पुणे जिल्हा आहे.

अनिल तापकीर's picture

14 Dec 2012 - 10:07 pm | अनिल तापकीर

खुप सुंदर,त्याबद्दल महिति आहे पण अजुन जाण्याचा योग आला नाहि .तुमचे फोटो पाहिल्यानंतर इछा तीव्र झाली आहे

हारुन शेख's picture

14 Dec 2012 - 11:01 pm | हारुन शेख

त्या दोन मंदिरांची वास्तुकला चक्क बंगाली वळणाची वाटतेय. दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिराच्या परिसरात आहेत अशी मंदिरं. पण पुण्याजवळ ते पण रांजणखळगी मध्ये कशीकाय बुवा ?

शशिकांत ओक's picture

15 Dec 2012 - 12:49 am | शशिकांत ओक

पिवळ्या साडीतील एका बाईंच्या उभे राहण्यावरून तेथील खडकांची खोली व भीषणता कळून येते. याची निर्मिती कशी व किती लाख वर्षे काळापुर्वी त्याचा अंदाज शोधता आला तर कोणी सांगावा.

शित्रेउमेश's picture

15 Dec 2012 - 11:37 am | शित्रेउमेश

रविवार चा बेत ठरला...कोणी आहे का अजून सोबत यायला तयार?

मनराव's picture

18 Dec 2012 - 12:59 pm | मनराव

अजुनहि बघयचं रहिलंय याची खंत वाटते.....

फोटोमध्ये जेसीबी मशिन दिसत आहे. हे खळगे जेसीबी मशिनने बनविले आहेत अशी शंका येते.
धागा वर्षापूर्वीचा आहे. आशा करुया त्या जेसीबी मशिनने हे खळगे अजुन कमकुवत बनवले नसतील.