तीन विरंगुळ्या

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
19 Dec 2011 - 10:37 pm

सध्या दूरदर्शनवर
जाहिराती भारंभार -
सिरीयल बघतांना
भाजी करपते फार !

आता नव्या नवरीचे
लक्ष फेसबुकावर -
मित्र जमती पाच हजार
पोळ्या जमेनात चार !

पडूनिया खाटेवर
वाचते चारोळ्या चार -
कित्ती अरसिक नवरा
जांभयांनी करि बेजार !

अद्भुतरसचारोळ्यामौजमजा

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

20 Dec 2011 - 10:23 pm | पक पक पक

छान छान यमक छान जुळ्ले आहे.......