(सूचना:- या किंवा अन्य कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीच्या लेखातील मतांशी किंवा शिफारशींशी मिपा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.)
शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?
तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे.
पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो. जोपर्यंत युरोपमधील आर्थिक संकट दुर होत नाही तो पर्यंत बाजारात तेजी येणे कठीण आहे, यावर मार्ग निघणार हे निश्र्चित, युरोपीअन देशाना तो काढावाच लागेल अन्यथा युरो चलन बंद करावे लागेल, व परत प्रत्येकाचे चलन जागतीक बाजारात व्यवहारासाठी वापरावे लागेल, हे कोणालाच परवडणारे नाही, मात्र किती काळ लागेल हे सांगता येत नाही. आपल्या देशात, सर्वच इमर्जींग देशात (BRIC Countries ब्राझील, रशीया, इंडिया व चीन) FII (Foreign Institutional Investors) गुंतवणूक करत आहेत, फार मोठी रक्कम त्यानी गुंतवलेली आहे. हे फक्त पैसा मिळवण्यासाठी येथे आलेले आहेत आणि आज बारावर त्यांचेच वर्चस्व आहे, तेच बाजाराची दिशा ठरवत आहेत म्हणूनच बाजार पुढील काही काळ १५% ते २०% या दरम्याने वर खाली होत रहाणार यातच त्याना पैसे मिळतात. स्वस्तात खरेदी करा व महागात विका हेच तत्वाने हे चालले आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे वर जाते ते खाली येणारच व जे खाली येते ते वर जाणारच हा अर्थशास्त्राचा नियम आहे, मात्र शेअर बाजारात स्टॉकची निवड महत्वाची असते.
सर्वसामान्य माणसाने या बाजारातून कसा जास्तीत जास्त फायदा मिळवावा?
हे करा:
1) संयम.
2) अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च लार्ज कँप शेअरची निवड करा ज्यात सर्वात जास्त उलाढाल होते व सर्वात जास्त चढ उतार होतात. (कृपया हे कोणते ते विचारू नका कारण मी हे फि घेऊनच सांगतो – मी ब्रोकर नाही फक्त सल्ला देतो).
3) आता या स्टॉकची किंमत खाली येऊ लागली कि थोडे थोडे गुंतवावयास लागा.
4) नुकसानीत विकू नका, सरासरी करत रहा.
5) तुम्हाला किमान ५% फायदा झाला कि विकून टाका.
6) फायद्याचे गणित करताना, ब्रोकरचे कमिशन व आयकराची गणना करा. लक्षात ठेवा नफा हा निव्वळ झाला पाहिजे.
7) हे वारंवार करा, ह्या संधी बाजारात नियमीत येत असतातच.
8) बाजाराचे (एफआयआय) च्या कलाप्रमाणेच निर्णय घ्या. प्रवाहाप्रमाणे पोहणेच फायद्याचे असते.
9) तुमच्याकडे असणा-या अतिरीक्त रकमेचीच गुंतवणूक करा, जी किमान एक वर्ष तरी लागणार नाही.
10) तुम्ही अगदी रु.दहा हजारानेही सुरुवात करु शकता.
11) लक्षात ठेवा बाजाराचे अचूक भाकीत कोणीच करु शकत नाही व जो असे सांगतो तो खोटे बोलतो.
12) शेअर बाजाराकडे तुमचे स्वत:चे किराणा दुकान आहे असे समजून व्यवहार करा, वाणी कधी कमी किमतीत विकत नसतो.
13) हे व्यवहार नफा मिळवण्यासाठीच करावचे आहेत हे विसरु नका.
14) बाजाराच्या कलाप्रमाणे बदलत रहा.
हे करु नका:
१) डे-ट्रेडिंग अजीबात करु नका.
२) मार्जीनच्या मोहात तर अजीबात पडू नका.
३) एकसारखे खरेदी विक्री करु नका, हे फक्त ब्रोकरच्या फायद्याचे असते.
४) जास्त मोह करु नका, फायद्यात असताना विकून टाका, जास्त फायद्याचा सोस धरु नका कारण संधी नेहमीच येत रहाणार आहे. जो जास्त व्याजाला भुलला तो मुद्दलाला मुकला.
५) बाजाराच्या कलाच्या विरुध्द वागू नका, प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याने फक्त लवकर दमछाक होते.
६) कर्ज काढून पैसे यात गुंतवू नका.
७) सर्व रक्कम एकदम गुंतवू नका.
८) आयपीओच्या वाटेला जाऊ नका (यात नुकसानच जास्त होते).
९) कोणत्याही शेअरच्या प्रेमात पडू नका.
१०) टिव्हीवर ब-याच आर्थीक वाहिन्या आहेत त्यावर नियमीत चर्चेचे गु-हाळ चालू असते, ते जरुर पहा पण त्यांच्या टिपवर विसंबून व्यवहार करु नका, यातील 50% टिप चुकीच्या असतात (कदाचीत मुद्दामच दिल्या जातात).
११) दुस-यानी (ब्रोकर वगैरे) दिलेल्या हॉट टिपच्या मोहात पडू नका, सारे काही स्वार्थासाठी चालते व ज्याला बाजाराची माहितीच नाही त्याचे का ऐकावे?
किती फायदा होऊ शकतो?
१) वर्षात किमान ४ ते ६ वेळा तुम्ही निवडलेल्या स्टॉक मध्ये १०% ते ४०% चढ उतार होत असतातच.
२) निर्णय महत्वाचा.
३) संयमाने वागल्यास वर्षात किमान २५% ते ४०% फायदा मिळवू शकता.
हे शक्य नसल्यास:
१) म्युच्युअल फंडात नियमीत दरमहा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहा.
२) २ किंवा ३ स्टॉक नियमीत खरेदी करत रहा Buy & Hold या तत्वाने वागा.
प्रतिक्रिया
14 Dec 2011 - 8:29 pm | रमताराम
काही प्रश्न
2) अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च लार्ज कँप शेअरची निवड करा ज्यात सर्वात जास्त उलाढाल होते व सर्वात जास्त चढ उतार होतात.
असे शेअर कुठे सापडतील. आमचा अनुभव असा की लार्ज कॅप शेअरमधे जास्त उलाढाल होते हे खरे असले तरी सर्वात कमी चढ-उतार होतात, सबब प्रॉफिट मार्जिन नेहमीच कमी राहते. याउलट ज्यात मोठे चढ-उतार होतात त्यात नेहमीच खरेदी-विक्रीची संधी मिळते असे नाही.
3) आता या स्टॉकची किंमत खाली येऊ लागली कि थोडे थोडे गुंतवावयास लागा.
आता अमूक स्टॉकची किंमत खाली येऊ लागली आहे हे कोणत्या ज्योतिष्याला विचारून ठरवता? आम्ही आपले आता हा शेअर खाली येऊ लागला बरं का म्हणे तो तो उडी मारून वर जातो.
7) हे वारंवार करा, ह्या संधी बाजारात नियमीत येत असतातच.
या संधी आहेत हे कोण नि केव्हा सांगणार हो. प्रश्न विचारण्यास कारण हे की तुम्ही टीव्हीवरच्या तज्ञांचे ऐकू नका म्हणताय. मग काय तुमच्यासारख्या फी घेऊन सल्ले देणार्यालाच ही संधी 'मी आलेय बरं का' असे कानात सांगून जाते?
8) बाजाराचे (एफआयआय) च्या कलाप्रमाणेच निर्णय घ्या. प्रवाहाप्रमाणे पोहणेच फायद्याचे असते.
बाजारात एफआयआय नि म्युच्युअल फंड्स परस्पर विरोधी ट्रेडिंग करताना दिसतात. जेव्हा एफआयआय शेअर्स विकतात तेव्हा फंड्स बहुधा खरेदी करत असतात. आता एफआयआय च्या कलाप्रमाणे निर्णय घ्या याचा अर्थ फंड्स म्यानेजर चुकीचे निर्णय घेतात असा होत नाही काय? असे असल्यास फंडातील गुंतवणूक हा मूर्खपणा आहे का?
12) शेअर बाजाराकडे तुमचे स्वत:चे किराणा दुकान आहे असे समजून व्यवहार करा, वाणी कधी कमी किमतीत विकत नसतो.
करेक्ट. पण बरेच दिवस पडून असलेला माल थोडे नुकसान सोसूनही - निदान मुद्दलाचा काही भाग तरी रिकवर व्हावा म्हणून - स्पेशल स्कीममधे तो काढून टाकत नाही काय? समजा हवी तेवढी किंमत मिळेतो विकणार नाही असे म्हटल्यास कदाचित कधीच विक्रीची संधी मिळणार नाही हे संभवत नाही काय?
८) आयपीओच्या वाटेला जाऊ नका (यात नुकसानच जास्त होते).
असहमत. अपवाद वगळता बहुतेक वेळा आयपीओ खरेदी फायद्यातच राहते असा बहुतेकांचा अनुभव आहे.
१) वर्षात किमान ४ ते ६ वेळा तुम्ही निवडलेल्या स्टॉक मध्ये १०% ते ४०% चढ उतार होत असतातच.
बाजाराबद्दल निश्चित विधान करणार्याचे ऐकू नये हा एक नियम तुम्हीच वर सांगितला ना?
३) संयमाने वागल्यास वर्षात किमान २५% ते ४०% फायदा मिळवू शकता.
याचा अर्थ संयमाने वागल्यास किमान २५% फायदा मिळतोच असा आहे का? की केवळ शक्यता-विधान आहे. तसे असेल तर २५ वा ४० याला फारसा अर्थ नाहीच. पण किमान २५% दावा असेल तर मी तुमच्या मार्फत पैसे गुंतवायला तयार आहे. माझ्या पैशावर तुम्ही १५% निश्चित फायदा (अर्थात 'व्याज', नुकसानीत माझा वाटा नाही.) मला द्यायचा उरलेला सारा फायदा तुमचा. जमतंय का. तुमच्याकडे असेल नसेल तो सारा संयम वापरा. तुम्हाला किमान दहा टक्के फायदा तो ही शून्य गुंतवणुकीवर, बघा सॉल्लिड प्रपोजल आहे. करता काय विचार?
ढुश्क्लेमरः मी स्वतः शेअर्समधे गुंतवणूक करीत नाही वा त्याविषयी पैसे घेऊन वा विनामूल्य सल्लाही देत नाही.
14 Dec 2011 - 8:41 pm | सदानंद ठाकूर
Refer this link
http://www.moneycontrol.com/ipo/ipoissues/ipoissues.php?s=LI
14 Dec 2011 - 8:57 pm | रमताराम
हे आकडे गेल्या सहा महिन्यातले आहेत. त्यावरून सार्वकालिक नियम कसा काय सांगता ब्वॉ? आता गेल्या वर्षभरात मार्केट रांगतेच आहे त्यामुळे हे अपेक्षितच आहे. आता या डेटावरून मार्केट नेहमीच खाली जाते असा सार्वकालिक नियम सांगाल काय?
आणि निव्वळ आकडे न पाहता 'पुट इट इन पर्स्पेक्टिव'. गेल्या वर्षभरात सर्वाधिक मार्केट शेअर असलेला रिलायन्सचा शेअर किती घसरला आहे पहा बरं जरा. त्या तुलनेत हे तोटे - कंपन्या तुलनेनेल खूपच छोट्या असल्याने अधिकच - अपेक्षित म्हणता येणार नाहीत का?
14 Dec 2011 - 8:43 pm | मराठी_माणूस
अगदी थोडे म्हणजे २ किंवा ३ च लार्ज कँप शेअरची निवड करा
हाच विचार करुन एल्&टी घेतला होता. त्या नंतर तो सतत खाली जात आहे.
14 Dec 2011 - 8:50 pm | सदानंद ठाकूर
अभ्यास करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच मिळतील. काही दिवस फक्त याचा अभ्यास त्रयस्थपणे करा, ट्रेडींग करु नका, तुमच्या सा-या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच मिळतील. आयपीओबाबत अभ्यास असेल तरच गुंतवणूक करा, ८०% आयपीओमध्ये (गेल्या ५ वर्षात आलेल्या) नुकसानच व ते सुध्दा काही मध्ये ९०% पर्यंत झालेले आहे. पीएसयु व काही एथीकल कंपन्यांचा अपवाद आहे.
14 Dec 2011 - 8:54 pm | अन्या दातार
कसा करावा हेही जरा सांगा ना. समजा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली आणि जर दिशा चुकीची मिळाली तर काय करावे? मोघम अभ्यास वाढवा हे सांगणे सोपे आहे. अनेक कन्सल्टंट यावरच आपली प्रॅक्टीस चालवतात.
14 Dec 2011 - 9:15 pm | आत्मशून्य
आत्ता ज्यांची किंमत ३० च्या आस्पास आहे व कंपन्या ज्यांचे चांगले नाव व इतीहास आहे, म्हणजेच मॅनेजमेंटने कधी गोधळ घातला नाहीये अशा कंपन्या, त्यात डोळे झाकून गूतवणूक करा, मंदी सरताच यांचे भाव डबल झालेले असतील (५५ सपोर्ट लेवल तर पकडून चला उदा युनिटेक वगैरे वगैरे ) . अगदी ६०-७० हजार शेअर्स जरी खरेदी केले तरी हरकत नाही. अत्यंत सूरक्षीत गूतवणूक. फक्त मंदी संपे पर्यंत तग धरून रहायची तयारी ठेवा... मंदी सरल्या सरल्या लगेच चमकाल.... बक्कळ पैका....
बाकी डे ट्रेडिंगला सगळ्यात टाइअमपास शेअर म्हणजे इस्पात, (महा)मंदीतही ९ च्या खाली जात नाय तेजीत ११च्या वर जात नाय... रोज १ पाँइटचा डीफरन्स घेऊन शेअर पून्हा सरासरी १० वर.... मज्या येते एकदम सूरक्षीत व दरामधे फार फरक पडत नसल्याने इंट्राडे ट्रेडिंगलाच सर्वोत्तम शेअर जवळपास शून्य जोखीम.
सूचना :- सदरील शिफारस वैयक्तीक अनूभवावर केलेली आहे, गूतवणूकदाराची जोखिमही वैयक्तीक असेल, मी ब्रोकर नाही अथवा सल्लागारही नाही, एक अतिसामान्य शेअर गूंतवणूकप्रेमी आहे.
14 Dec 2011 - 11:00 pm | मन१
असे कै च्या कै सल्ले नका देउ साहेब.
आत्ता ज्यांची किंमत ३० च्या आस्पास आहे
म्हणजे काय? कुणाची किंमत ३० असूनही p/e ratio पार अत्युच्च पातळिस आधीच ओलांडून गेला असेल तर काय?
जर कंपनीचे म्यानेजमेंट व्यव्स्थित असेल, पण अचानक काही टेक्नॉलॉजिकल शिफ्ट मुळे गोत्यात आली तर काय?
किंवा सरकारी धोरण किंवा इतर एखादी आपत्ती ह्यात अडकली असेल तर काय?
कुनाची किंमत ३०० असेल आणी मग १ is to 10 होउन split झाले असेल, व मग ३० वर आले असेल तर काय?
तुम्ही उदाहरण दिलेले खुद्द युनिटेकच असेच स्प्लिट होउन आलेले आहे.
IFCI,Hotel leelaa,Unitech हे सर्वच तुम्ही सांगितलेल्या ३० ते ६० च्या रेंजमध्ये खेळणारे शेअर्स दिसतात हे खरे. मीही त्यात कधीएकाळी हात धुवून घेतला होता. पण "आता ३० वाला घ्या, नंतर ६०च्या घरात विका" हे छातीठोकपणे केलेले विधान म्हणजे कहर आहे.
चांगली म्यानेजमेंट म्हणजे काय? धरला जाण्यापूर्वी रामलिंगा राजू हाही सज्जनच गणला जायचा. त्याची म्यानेजमेंटसुद्धा सात्विक्,सज्जन मानली जात होती.
थोडक्यात, "बाजारातून पैसे कमवेनच" असं म्हणणं अत्यंत धाडसाचं विधान आहे. विशेषतः कमावायचे असतील तर तेव्हढा कंपनीच्या fundamentals चा अभ्यास, हापिसात कितीही workload असलं तरीही बाजारावर बारिक लक्ष ठेवायच्ची सवय व थोडेफार नशीब इतके सर्व गाठिला असेल तरच मार्केटात उतरणं उचित. sweeping statement अत्यंत धोकादायक.
खरेतर ठकूर साहेबांनी लेखातच "हे करू नका " मध्ये जे सांगितले आहे, विशेषतः १,२,३,६,७,१० क्रमांच्या सूचना ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तिकडे आधी बघा.
14 Dec 2011 - 11:39 pm | आत्मशून्य
पण "आता ३० वाला घ्या, नंतर ६०च्या घरात विका" हे छातीठोकपणे केलेले विधान म्हणजे कहर आहे.
आहे ना कहर ? याला स्वानूभवातून निर्माण होणारा आत्मविश्वास म्हणतात. काठावर बसून पाण्यात असलेल्याला हात-पाय मारायचे सल्ले देणार्या अथवा उंटा वरून शेळ्या हाकणार्या माणासांच्या डोक्याला पचनी पडणारी ही गोश्ट न्हवे. त्यांनी दूसर्याच्या खाद्यावर बंदू ठेवणेच बरे रे. तसही शेअर मार्केट हे अशा लोकांसाठी नक्किच नाही, बाकी चालूदे तूमचं....
चांगली म्यानेजमेंट म्हणजे काय? धरला जाण्यापूर्वी रामलिंगा राजू हाही सज्जनच गणला जायचा. त्याची म्यानेजमेंटसुद्धा सात्विक्,सज्जन मानली जात होती.
व्वा, चोर पकडा गया, तूमचं हे विधानच तूम्हाला प्रत्यक्श ट्रेडींगचा असलेला अननूभव दाखवतं. जो यातला खरा खेळाडू आहे तो सत्यम सारखं अपघाती उदाहरण साधं चर्चेलाही घेणार नाही. अपघात हे अपघातच असतात, म्हणूनच सत्यमच उदाहरण व उद्या भूकंप होऊन मि मेलो तर असा विचार करणे यातील अनिश्चीतता ही एकाच तराजूत तोलने होय. मग आता जर तूमच्या अंदाजानूसार उद्या तूम्ही मरणारच आहात तर आज कशाला जेवता रे ?
असे कै च्या कै सल्ले नका देउ साहेब.
त्याच असं आहे की अमूक अमूक केल की शेअरमधे फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असले पूळचट सल्ले देणं आणी मानणं आपल्याला जमत नाही. ज्यांना जमत त्यांच्या बद्दल आदर आहेच. तेव्हां तूमची अमूल्य घंटा तूमच्याकडेच राहूद्या मला ति नको, तिला लसूण घासत बसला तरी चालेल असं म्हणतो मी.
14 Dec 2011 - 11:39 pm | मन१
काही प्रश्न व काही शंका लिहिल्या आहेत वरती.
त्याबद्द्ल काही लिहिलं असतत तर बरं झालं असतं.
तोवर sweeping statements वर विशेषतः शेअरबाजारबद्दल डोळे झाकून भरवसा ठेवणं धोकादायक ठरू शकतं ह्याचा पुनरुच्चार करत आहे.
15 Dec 2011 - 12:18 am | आत्मशून्य
शेअरबाजारबद्दल डोळे झाकून भरवसा ठेवणं धोकादायक ठरू शकतं ह्याचा पुनरुच्चार करत आहे.
असूरक्षित संभोग केला तर एड्स होउ शकतो याचा मी सूध्दा आता उच्चार व लगेच पुनरुच्चारही करत आहे. अर्थात सूरक्षित संभोग म्हणून जरी निरोधाचा आधार घेतला तरी ते मधे फाटू शकते अथवा त्यात बारीकसा (अति सूक्ष्म) बाय-डिफॉल्ट डिफेक्टही असू शकतो, अथवा केवळ तोंडात जरी जखमा असतील तरीही त्याने एड्स पसरू शकतो. अथवा इतर प्रकारेही आपली काहीही चूक नसताना एड्स होऊ शकतो, पण जरी हे धोके कायम असले तरी खर्या रसिकाने जर भरभरून आयूष्य जगायच असेल तर अनूभव व अभ्यासपूर्ण सूरक्षित संभोगाची माहीती टाळणे वा भिती बाळगणे म्हणजे जरा अतिच होय की नाही ?असो...
काही प्रश्न व काही शंका लिहिल्या आहेत वरती. त्याबद्द्ल काही लिहिलं असतत तर बरं झालं असतं.
मी विशीष्ट शेअर बद्दल बोललो त्यातही मी यूनीटेकच नाव उघड घेतलच आहे, म्हणून तर माझ्या अभ्यासावर मी ठाम आहे ज्यात तूम्हा असलेल्या धोक्यांचा मी यथा शक्ती व मती विचार करूनच फायद्या बाबत विधान केले आहे.
आपण हा धागा बूकमार्क करून ठेऊया, आज जर तूम्हि हा शेअर घेतला व तेजी सूरू होइ पर्यंत राखून ठेवला तर हा शेअर आत्ता आहे त्याच्या दूप्पट वर जाइल हे मी ठामपणे अधोरेखित करतो. जर हे घडलं नाही, तर तूम्ही म्हणाल ते.... आणि जर घडलं तर केवळ जोब स्विच करणे म्हणजे सिंदबाद होणे न्हवे तर जॉब करणे कायमच सोडून देऊन व्यवसाय टाकणे अथवा तो कोणत्याहे परीस्थितीत पून्हा कूठेही जॉब न करायचा निर्णय घेणे म्हणजे खरं सिंदबाद होणे होय असं तूम्ही लेखि मान्य करायचं, ठरलं ?
15 Dec 2011 - 9:56 am | मन१
"मी थेट युनिटेकचे नाव वगैरे घेतोय" असे म्हणणे ठिक पण आता मला खरचं वरील धाग्यातील "हे करू नका" मधल्या १० व ११ क्रमांकाचे नियम महत्वाचे वाटताहेत. इतरांनीही केवळ कुणी मिपाकर किंवा कुणी अजून एक म्हणतो म्हणून बेलाशक हा शेअर घ्यावा असे होत नाही. सांगणार्याने स्वतः ते शेअर्स घेतले असल्याने सर्वत्र जाउन त्याबद्दल जमेल तितके चांगले बोलणे हे स्वाभाविक आहे, जेणेकरून आपल्या शेअरची प्रतिमा व किंमत य्तातल्या त्यात बरी राहिल.
बाकी एड्स काय, संभोग काय, मी ह्या मुद्द्यावर थांबतोय.
सिंदबाद चा, व्यवसायाचा अन् स्विचचा इथे शेअर बाजराशी इथं संबंध काय?
लेखी देणं वगैरे काय?
ह्या सगळ्यानी चुकीच्या दिशेला चर्चा जाते आहे असे वाटत असल्याने मी पुन्हा इथे प्रतिसाद द्यायला येइनसे वाटत नाही.
have a good day
15 Dec 2011 - 4:41 pm | आत्मशून्य
सांगणार्याने स्वतः ते शेअर्स घेतले असल्याने सर्वत्र जाउन त्याबद्दल जमेल तितके चांगले बोलणे हे स्वाभाविक आहे, जेणेकरून आपल्या शेअरची प्रतिमा व किंमत य्तातल्या त्यात बरी राहिल.
मि युनिटेकचे शेअर्स खरेदी केलेत अथवा नाही यासंबधि मी एक शब्दही लिहला आहे काय ? उलट तूम्हीच यात हात धूऊन घेतला आहे असं तूम्ही सूचित केलं आहे. म्हणूनच आता वरील शेअरची प्रतिमा व किंमत वगैरे विधान एखाद्या सूज्ञ शाहण्या वा अभ्यासू माणसाने केले असते तर मी नक्किच भडकून तूम्ही बिनबूडाचे आरोप कसे काय करत आहात वगैरे वगैरे चांगलच सूनवलं असतं, पण आपणास इतकच बोलतो की नूसतं चांगले वा वाइट बोलून एखाद्या शेअरची प्रतिमा व किंमत घटवता वधारता येण्याची ताकत मी राखली असती तर मला तूम्हीच काय अख्या भारताने "साहेब" असं संबोधले नसते काय ? खिक्क.... असो.
बाकी एड्स काय, संभोग काय, मी ह्या मुद्द्यावर थांबतोय.
एड्स , संभोग व निरोध यांचा संदर्भ मी धोका पत्करणे असणे या मूद्याचा अनूशंगाने प्रस्तूत केला आहे आहे.. कारण धोका, (रिस्क-फॅक्टर) हा शेअर्सच्या व्यवहारांचा अविभाज्य भाग होय. म्हणून जर वरील मुद्द्यावर थांबलात तर शेअरबाजारात संपलात हे पक्कं ध्यानी ठेवा.
सिंदबाद चा, व्यवसायाचा अन् स्विचचा इथे शेअर बाजराशी इथं संबंध काय ? लेखी देणं वगैरे काय ?
त्याचं असं आहे की लेखि देणं वगैरे अशासाठी कि तूमचं हस्ताक्षर फार सूरेख आहे असं मलातरी वाटतं, आणि "सिंदबाद द सेलर" माझं थोडसं आवडत गाणं आहे.. हाच काय तो संबंध आहे. हे स्पश्टीकरण आपणास पूरेसे आहे काय ? नसेल तर ... तूम्ही एक गोश्ट समजून घ्या मि शेअर्सबाबत जि विधाने या धाग्यावर केली त्याला प्रोबाबिलीटी म्हणतात आणी तूम्ही ठळक करत असलेले जे मूद्दे आहेत त्याला पॉसीबीलीटी म्हणतात... पण Possible means something may happen or may not happen, who knows. ??? But Probable means there is pretty fair definite chance that this is really gonna happen soon... म्हणूनच तूम्ही ठळक करत असलेल्या नियमांचे मूद्दे माझी शेअर्सच्या गूतवणूकीबाबतची विधाने खोडून काढू टाकायला/ घंटा वाजवायला असमर्थ ठरतात हे जेव्हां आपल्याला जाणवेल तो शेअरबाजारासाठी सूदिन, हाच काय तो संबंध आहे. धन्यवाद.
14 Dec 2011 - 11:18 pm | आत्मशून्य
.