माननीय सोकाजीरावांची माफी मागून हा छोटासा धागा काढत आहे ... कारण आम्ही पेठेतले, द्राक्षासवातील मद्यार्काच्या प्रमाणावर चर्चा करणारे 'पुणेकर' ...
परवा झुरिचच्या मुख्य रेल्वेस्टेशनवर (हा "मी सध्या झुरिचला राह्तोय" हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही) एका घरगुती वाईन चा स्टॉल पाहिला. धुंद करून टाकणारा त्या वाईनच्या सुवासामुळे आणि हे घरगुती प्रकरण काय आहे ते बघावे ह्या नसत्या चौकसपणामुळे नकळतच तिकडे गेलो.
स्टॉलजवळ अनेक रसिक त्या वाईनचा स्वाद घेत गप्पा मारत उभे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाच्या कपमधून चक्क वाफा बाहेर पडत होत्या. स्टॉलच्या काउण्टरवर 'साखर' भरलेली बाटली होती आणि लोक त्यातील साखर त्या वाईनच्या कपात घेवून चक्क 'गरम' आणि 'गोड' वाईन घेत होते.
हा प्रकार माझ्या पेठेतील वाईटमनावर चांगलेच बाल परिणाम करणारा ठरला. मग मीदेखील त्या रसिकांच्या गर्दीत सामील होवून थोडे गोड आणि गरम मद्यप्राशन केले ... आणि काय सांगू महाराजा .... ती वारूणी त्या थंडीत एकदम एक सुखद ऊब देऊन गेली. आता एव्हढी उच्च वाटणारी ती वाईन घरी घेऊन आलो.
तेव्हाच सोकाजीरावांची आठवण येत होती, म्हटलं रावांकडून ह्या "ग्ल्युवाईन" बद्दल थोडं ज्ञानार्जन झाल्यास बरं
प्रतिक्रिया
10 Dec 2011 - 4:26 pm | चिरोटा
मस्तच.
सागरा प्राण तळमळला.
अवांतर- झुरिचला झुरिख म्हणतात का?
10 Dec 2011 - 4:29 pm | michmadhura
चिरोटा,
स्पेलिंग Zurich आहे, पण उच्चार झ्युरिक असा होतो.
10 Dec 2011 - 5:24 pm | स्वाती२
मल्ड वाईन?
10 Dec 2011 - 6:17 pm | सोत्रि
सागर,
ही Gluhwine (फोर्टीफाइड वाइन) एक मस्त प्रकरण असते. चाखण्याचा अजुन योग आला नाहीयेय.
तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही ते ऐन थंडीत चक्क त्या वाइनच्या माहेरघरी चाखलीत.
अधिक माहिती माझ्या वाइन गाथेच्या एका प्रतिसादात आलेली आहे.
- (Gluhwine चाखण्याची ईच्छा असलेला) सोकाजी
10 Dec 2011 - 11:23 pm | मोहनराव
मस्त प्रकार आहे तो महाराजा!! आमच्या कंपनीत सध्या दर गुरुवारी ही वाईन देतात. नंतर हापिसात काम होतच नाही हे सांगायला नकोच!! ;)
(Gluhwine आवडणारा) मोहन.
10 Dec 2011 - 6:19 pm | सोत्रि
फोटो टाकले असतेत तर अजुन मजा आली असती.
- (वाइनप्रेमी) सोकाजी
10 Dec 2011 - 7:44 pm | sagarparadkar
करून बघितला .... आता लिन्क देवून बघतो ....
https://picasaweb.google.com/103325572443547880354/December102011#568444...
तुम्ही मदत कराल का हा फोटो वरील लिंक्वरून घ्यायला? आगाऊ धन्यवाद ....
10 Dec 2011 - 8:07 pm | सोत्रि
- (Gluhwine चा फोटो बघून आनंदलेला) सोकाजी
10 Dec 2011 - 10:14 pm | स्वाती दिनेश
जर्मनीत ख्रिसमसआधी १ला अॅडव्हेंट आला की ख्रिसमस मार्केट सजू लागतात आणि ग्लु वाईनचे गाळेही.. ग्लु वाईन मध्ये अनेक प्रकारही दिसतात, चेरीवाइन, रास्पबेरीवाइन, प्लम वाईन अशा अनेक प्रकारच्या वाइन्स गरम करुन, उकळून ,त्यात विशिष्ट मसाले घालून कपातून प्यायला देतात. कडाडत्या थंडीत अशी वाइन प्यायला बहार येते. मुलांसाठी असलेला किंडर पंच, हा नॉनाल्कोहोलिक प्रकारही तेथे मिळत असल्याने कुटुंबासकट सगळे ख्रिसमस मार्केटला गर्दी करतात! गरमागरम चेस्ट नट्स (मारोनी), राकलेट, फाँड्यु.. असे अनेक स्टॉल्स असतातच!
रेडवाईन + ग्लु वाईनचे विशिष्ट मसाले घालून घरीही ग्लु वाईन बनवू शकतो.
स्वाती
10 Dec 2011 - 10:18 pm | गणपा
वाह!!
मग येऊदे की एक फक्कड रेशिपी :)
11 Dec 2011 - 1:50 am | स्वाती२
+१
11 Dec 2011 - 10:09 am | सुहास झेले
वाह... सहीच !!!