डर्टी पिक्चर च्या धाग्यांवर विचार करताना जाणवलं:-
स्त्री च्या निव्वळ शरीराचं हपापलेल्या पुरुषांना आकर्षण असतं असं म्हटलं जातं.
हरेक जाहिरातीत स्त्री लागतेच. शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीतही स्त्री हवीच.
अशाच काही विशेष गोष्टी पुरुषांनीच वापरायच्या असूनही त्याच्या जाहिरातीत फक्त स्त्री आणि केळ वापरून जाहिरात केली गेली होती. इथे पुण्यात मोठे मोठे बॅनर्स लागले होते त्या उत्पादनाचे.(नंतर जोरदार वाद होउन ती केळे व स्त्री दोन्ही काढून टाकले होते.) पुरुषाच्या अंतर्वस्त्राच्या जाहिरातीतही तरुणी हवीच.
स्त्रियांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिरातीत मात्र निव्वळ स्त्रियाच दिसतात.
तर सांगायचं हे की, वस्तू विकायची असेल तर "ती वस्तू स्त्रीच्या शेजारी ठेवून विकायला काढा, हातोहात खपेल." हे आजचे मार्केटिंग तंत्र. आता गंमत अशी की आपण कितीही म्हटले "एकविसावे शतक आले", "बरोबरीचे युग" वगैरे पण एखादा "डर्टी पिक्चर" एखाद्या पुरुषाला मध्यवर्ती भूमिका देउन काढता येइल का? म्हणजे, विविध स्त्रिया त्याचा गैरवापर वगैरे करतात ह्या कल्पनेवर. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशा धर्तीवरचा एकमेव पिक्चर म्हणजे "ऐतबार".
एरव्ही कधीही असे काही दिसले नाही.
आता पडणारा प्रश्न हा की आकर्षक स्त्री जाहिरातीत का हवी?
जगाच्या समस्त पुरुषांना म्हणजे थेट ५०% टक्के जनतेला आकर्षित करायला?
पण मग तेच आकर्षक पुरुष ठेवला तर उरलेली ५०% जनता आकर्षित होणार नाही का?
आता हा केवळ समाजाचा दृष्टीकोन म्हणून असे आहे की खरोखरीच मुळात कुठल्याच पुरुषासोबत असे काही होत नाही असे काही आहे? की मुळात स्त्री आणी पुरुसहची जडणघडणच इतकी प्रचंड विभिन्न आहे?
म्हणजे उद्या समाज बदलत गेला तर एखाद्या पुरुषावरही येत्या पन्नासेक वर्षात असा चित्रपट निघू शकेल का?
की मुळात त्याच्यासोबत स्त्रियांनी "तसं" केलं तर त्याला ते हवंच असेल?
प्रतिक्रिया
9 Dec 2011 - 4:23 pm | सुहास..
देसी बॉईज ?
9 Dec 2011 - 4:48 pm | इरसाल
"बाईला तिच्या सगल्या इच्छ्यांसाठी एक बुवा पुरेसा अस्तु , पण बुवाला तेच्या एका इच्छेसाटी सगल्या बाया पायजेल असत्यात."
हित बुवा म्हंजी पुरुष .
9 Dec 2011 - 5:43 pm | चिरोटा
कारण त्याने माल खपण्याची शक्यता वाढते. निदान त्या उत्पादनाकडे अनेकांच्या नजरा वळू शकतात. ज्या जाहिरातींमध्ये आकर्षक स्त्री दिसते त्या जाहिराती मुख्यत्वे consumer items/luxury items च्या असतात. ह्यांना माल खपवण्यासाठी युक्त्या कराव्या लागतात. शेविंग क्रीम जिलेट बरे की ओल्ड स्पाईस? गुणवत्तेत दोन्ही सारकेच असावेत्.मग ज्याची जाहिरात जास्त नजरा खेचणारी असेल त्याचा माल जास्त खपणार. महाग उत्पादनांमध्ये तसे नसावे. गाड्यांच्या/लॅपटॉपच्या जाहिरातीत पुरुषही दिसतात.
9 Dec 2011 - 6:03 pm | दादा कोंडके
उद्या लिपस्टीकच्या जाहिरातीत जॉन अब्राहम (कमी कपड्यातला) दाखवला तर खप वाढेलही! :)
9 Dec 2011 - 7:22 pm | snowy
एका सिमेंट च्या जाहिरातीत समुद्रातून पोहून निघताना एक बिकिनी कन्या दाखवली होती . त्याचा अर्थ अजुन कळलेला नाही.
9 Dec 2011 - 10:11 pm | अप्पा जोगळेकर
सगळ्या मॅगझिन्सच्या कव्हर्सवर स्त्रीच का असते ?
बहुतांश रिसेप्शनिस्ट स्त्रियाच का असतात ?
टेलिफोन ऑपरेटर्स स्त्रियाच का असतात ?
पराक्रम गाजवून आलेल्या माणसाला ओवाळायला सुवासिनी (म्हणजे पुन्हा स्त्री)च का लागतात ?
शाळेच्या गॅदरिंगमधे येणार्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करायला पुष्पगुच्छ हातात घेतलेल्या मुलींनाच का उभे करतात ?
बहुसंख्य रेडिओ जॉकी स्त्रियाच का असतात ?
असे अनेक प्रश्न या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात घुमले.
9 Dec 2011 - 10:40 pm | पैसा
आपली भारतीय संस्कृतीच पुरुषप्रधान आहे. आणि बर्याच वेळा वस्तू विकत घ्यायचे निर्णय पुरुषच घेतात. आपल्या मुलीचे/बायकोचे कपडे आणून देणारे "पुरुषोत्तम" मला माहिती आहेत. सगळ्या जाहिराती या निर्णयाचा अधिकार प्रामुख्याने ज्याला असतो, त्याला म्हणजे पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या असतात. त्यामुळे त्याला म्हणजेच पुरुषाला सगळ्यात जास्त आकर्षित करणारी 'वस्तू' म्हणजे आकर्षक बाई, ती बहुतेक जाहिरातीत असलीच पाहिजे. (हे वाक्य १००% पुरुषांना लागू नाही, काही 'सरळ नसलेल्यांना' वगळून आहे)सगळ्या पुरुषांनो, आपल्या आजूबाजूला आणि घरातही असणार्या अतिविशाल महिलांची कल्पना एखाद्या जाहिरातीत केवळ उदाहरण म्हणून करून बघा, आणि मग ते उत्पादन घ्यावंसं वाटतं का ते प्रामाणिकपणे सांगा!!
9 Dec 2011 - 11:11 pm | विनोद१८
माझ्या मते स्त्रीचा 'आकर्षकपणा' हे एक त्याचे मुख्य कारण असावे, त्यामुळेच सगळ्या जाहिराती अधिक आकर्षक होण्यासाठी स्त्रीयान्चा वापर केला जात असावा, जेणेकरुन समाजातील सर्व पुरुषान्चे व स्त्रीयान्चे लक्ष वेधुन त्या वस्तूची जाहिरात अधिक परिणामकारक व्हावी असे मला वाटते. जर नुसते पुरुषच दाखविले तर तिकडे कोण बघणार ???
माझ्या मते ' कमी कपड्यातल्या पुरुषान्पेक्षा जास्त कपड्यातल्या स्त्रीयासुध्धा अधिक आकर्षक असतात व दिसतात ' हे कोणीही नाकारु शकते काय ??
बरे हा प्रश्न मान्डणारे मन१ काय किवा त्यावर प्रतिसाद देणारे मिपाकर काय सगलेच 'बाप्येच' आहेत. अजुन तरी कोणा स्त्रीने ह्याची दखल घेतली असे दिसत नाही.
विनोद१८
10 Dec 2011 - 10:14 am | प्रभाकर पेठकर
अंतिम उपभोक्ता आणि खरेदीदारांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक आकर्षणाचा, स्त्री सौंदर्याचा, विषय हा जाहिरातीच्या केंद्रस्थानी असतो असे एक निरीक्षण आहे.
लहान मुलांची उत्पादने खरीदणारी, खरेदीवर प्रभाव पाडणारी (भले पुरूष आर्थिक झळ सोसणारा असला तरी) स्त्री, एक आई, असते. आयांची त्यांच्या बाळांप्रती असणारी भावना अत्यंत तिव्र असते. ह्याच भावनांचा उपयोग लहान मुलांची उत्पादने निर्मिणारे, विकणारे करून घेतात. एखाद्या कल्पित धोक्यापासून वाचवण्यासाठी, बाळाच्या स्वास्थासाठी, शारीरिक वाढीसाठी, तल्लख बुद्धीसाठी एखादे उत्पादन कसे प्रभावी आहे हे पटवताना एखादे आरोग्यदायी, चटकन उचलून घ्यावेसे वाटणारे बाळ किंवा चुणचुणीत मुलगा जहिरातींच्या केंद्रस्थानी असतो.
स्त्रियांची सौंदर्य प्रसाधने निर्मिणार्या कंपन्या आपल्या प्रसाधनांचा सुयोग्य परिणाम होऊन पुरुष कसे आकर्षित होतात हे दाखविण्यासाठी पुरुषांचा वापर करून घेतात.
म्हातारवयातील व्याधींवरील औषधे विकणार्या आस्थापना वयाने वृद्ध पण शरीराने तरूण अशा मॉडेल्सचा उपयोग करतात.
तात्पर्य, आपल्या उत्पादनांचे अंतिम उपभोक्ता कोण आहे आणि त्यांना आकर्षण कसले आहे ह्यावर विचार करून जाहिराती बनविल्या जातात.
10 Dec 2011 - 10:15 am | मन१
@सुहासः- म्हंजे?
@इरसालः- भारीच तत्वज्ञान.
@ चिरोटा:- एकूणात पुरुषांचे प्रमाण कमीच आहे. ही कसली बरोबरी? आकर्शक म्हणजे काय? पुरुषाचे बळकट व सुदृढ शरीर स्त्रियांना आकर्षक वाटणार नाही का?
@दादा कोंडके :- तोच तर सवाल आहे. सध्या का दाखवत नाहितर""उद्या दाखवला तर" म्हणजे काय?
@obama bin laden:- इतकी छान कन्यका पाहूनही आपल्याला सिमेंटच लक्षात राहिले हे आश्चर्य!
@अप्पा:- तेच तर प्रश्न आहेत. वाचून अजूनच वाढताहेत.
@पैसा तै:-
आपली भारतीय संस्कृतीच पुरुषप्रधान आहे. हे वाचल्यावर आधी "वरवर पाहता" हा पूर्वार्ध जोडावासा वाटला :)
आकर्षक "वस्तू"चा तर्क मान्य आहे.
आणि बर्याच वेळा वस्तू विकत घ्यायचे निर्णय पुरुषच घेतात.
तरीही हे पटले नाही. असे झाले तर भारतातील ९०% विक्री थंडावेल हो. असे गैरसमज पसरवू ना.
माझ्या माहितीत जी शांततेत नांदणारी घरी आहेत तिथे तरी पुरुषच खरेदी करतात बायकांच्या मताने!
बाकी दिलेली उदाहरणे पाहून आश्चर्य वाटले.
10 Dec 2011 - 1:03 pm | गणपा
कदाचीत हे कारण असावं. ;)