म्युच्युअल फंड गुंतवणूकीची काळजी कशी घ्यावी?
ज्याप्रमाणे गुंतवणूक कोठे करावी हा जसा महत्वपुर्ण निर्णय आहे त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ती योजना योग्यप्रकारे काम करत आहे हे तपासणे हे सुध्दा अतीशय महत्वाचे आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणा-या ब-याच व्यक्तींचा असा समज असतो कि एकदा का म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या कामगीरी करणा-या योजनेत गुंतवणूक केली कि आपले काम संपले व त्यानंतर त्या गुंतवणूकीचे व्यवस्थापनाचे काम फंड मँनेजर्स पहातील. बहुतांशी हि गोष्ट खरी असली तरी हे धोरण धोकादायकही ठरु शकते का तेच आपण येथे पहाणार आहोत.
योजनेची कामगीरी, मुख्यत्वेकरुन समभाग आधारीत म्युच्युअल फंड योजनेची, हि प्रामुख्याने फंड मँनेजर्स कशा प्रकारे व कोणकोणत्या समभात गुंतवणूक करतात व कोणत्या वेळी करतात यावर अवलंबून असते. जर का तुमचा फंड मँनेजर नोकरी सोडून गेला, बदलला व तर त्याजागी येणा-या फंड मँनेचरचे गुंतवणूकीचे धोरण अथवा पध्दत बदलू शकते ज्यामुळे योजनेच्या कामगीरीत फरक होऊ शकतो. म्हणून अशी घटना घडल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणूकीच्या कामगीरीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते, आणि जर का योजनेची कामगीरी बाजारातील तशाच प्रकारच्या योजनेच्या तुलनेत घसरू लागल्यास तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडून दुस-या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या हिताचे होईल.
आता असा प्रश्र्न पडू शकतो कि हे मी करावे कसे? सर्व एएमसी तुम्हाला दर वर्षी वार्षीक/अर्धवार्षीक अहवाल पाठवत असतात त्याचप्रमाणे मासिक/त्रैमासिक फँक्ट शीटही पाठवत असतात. त्याचप्रमाणे योजनेचे मालमत्ता मुल्य रोजच्यारोज अँफी, एएमसीच्या वेबसाईटवर व आर्थीक वर्तमानपत्रामध्येही प्रकाशीत होत असते. मालमत्ता मुल्याधारे तुमची योजना योग्य परतावा देत आहे कि नाही हे समजते. महत्वाचे म्हणजे फँक्टशीट आधारे तुम्हाला तुमच्या योजनेची गुंतवणूक कोण कोणत्या शेअर्समध्ये झालेली आहे हे जास्त चांगल्या प्रकारे समजते. या आधारे तुमच्या योजनेच्या कामगीरीची तुलना बेंचमार्कशी व बाजारातील समान प्रकारच्या योजनेशी करुन तुम्ही कामगीरी तपासू शकता. तुमच्या योजनेचा फंड मँनेजर काही तुम्हाला योजनेतून केव्हा बाहेर पडावयास हवे हे सांगायला येणार नाही. म्हणून तुमचा निर्णय तुम्हीच घेतला पाहिजे अथवा तुमचा गुंतवणूक सल्लागारही तुम्हाला यासाठी मदत करु शकतो, मात्र त्यासाठी तुम्ही त्याच्याशी नियमीतपणे संपर्कात राहून तुमच्या गुंतवणूकीची चर्चा त्याच्याबरोबर केली पाहिजे. कारण तो सुध्दा प्रत्येकाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भेटून स्वत:हून हे मार्गदर्शन करू शकत नाही, हि वस्तुस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे. शेवटी पैसे तुमचे आहेत म्हणून तुम्हीसुध्दा तुमच्या गुंतवणूकीबाबत सतर्क रहाणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
2 Dec 2011 - 5:20 pm | मराठी_माणूस
ह्या साठि काही थंब रुल्स उपलब्ध आहेत का ?
2 Dec 2011 - 9:41 pm | निवेदिता-ताई
छान माहिती