बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in काथ्याकूट
22 Nov 2011 - 11:34 am
गाभा: 

बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय
नुकतेच रिझर्व्ह बँकेने बचत खात्यावरील व्याजाचा दर नियंत्रणमुक्त केलेला आहे, त्यानंतर यस बँकेसारख्या काही खाजगी बँकानी बचत खात्यावरील व्याज ६% पर्यंत वाढवले आहे मात्र राष्ट्रीयकृत व प्रमुख खाजगी बँकानी याबाबत काहीही धोरण जाहीर केलेले नाही. या बदलामुळे बँकांची नफाक्षमता कमी होणार असल्यामुळे या बँकानी कदाचीत वेट अँण्ड वॉच हे धोरण अवलंबलेले असावे. या बाबत या बँका निर्णय घेतील तेव्हा घेतील. सध्या बाजारात व्याजाचे दर वाढलेले असल्यामुळे मनी मार्केट सिक्युरिटीज, बॉण्डस्, कर्जरोखे, कमर्शिअल पेपर (सीपी) जे प्रामुख्याने कॉर्पोरेटस् त्यांच्या अल्पमुदतीच्या गरजेपुर्तीसाठी जारी करतात तसेच सर्टिफिकेटस् ऑफ डिपॉझीटस् (सीडी) जी बँका जारी करतात या सर्वच साधनांवरील व्याजाचे दरही चांगलेच (९% पेक्षा जास्त) वाढलेले आहेत. मात्र यातील गुंतवणूक हि फार मोठी असल्यामुळे या पर्यायात सर्वसामान्य माणसाला गुंतवणूक करता येत नाही. मात्र अप्रत्यक्षपणे या गोष्टीचा फायदा सामान्य माणूस करुन घेऊ शकतो, तेच या लेखात पाहुया.

म्युच्युअल फंडामध्ये विवीध प्रकारच्या योजना प्रत्येकाच्या गरजेनुसार उपलब्ध आहेत या पैकी लिक्वीड फंड योजना हि प्रामुख्याने बचत व चालू खात्याला अतिशय उत्तम पर्याय आहे. लिक्वीड फंडात लिक्वीड व लिक्वीड प्लस अशा दोन योजना असतात. दोन्ही योजना या अल्प व अत्यल्प मुदतीसाठी उपयुक्त असतात. अशा योजनेत जमा होणारे पैसे हे जास्तीत जास्त ९१ दिवसांच्या मुदतीच्या निश्र्चित परतावा देणा-या अल्प मुदतीच्या सिक्युरिटीजमध्येच गुंतवले जातात, यामध्ये प्रामुख्याने सीडी, सीपी या मनीमार्केट सिक्युरिटीजचा समावेश असतो. जास्तीत जास्त पैसे जे सीडीमध्ये व काही पैसे उच्च पतदर्जा असणा-या सीपीमध्ये गुंतवले जातात. यावर किती व्याज मिळणार हे गुंतवणूक करतानाच ठरलेले असते, तसेच मुदतही ठरलेली असते जी कमीत कमी दोन दिवस व जास्तीत जास्त ९१ दिवस असते. म्हणजेच या गुंतवणूकीत जोखीम जवळपास शुन्यच असते. बॉण्डसच्या बाबत असे म्हणता येत नाही कारण व्याजाचे दर वाढले कि बॉण्डसे बाजारमुल्य कमी होते व व्याजदर कमी झाले कि बॉण्डसे मुल्य वाढते, हि जोखीम लिक्वीड फंडात नसते कारण गुंतवणूक अल्पमुदतीच्या साधनातच केलेली असल्यामुळे व्याज दराच्या बदलाचा होणारा परिणाम हा अगदी नगण्य असतो. म्हणूनच लिक्वीड फंडाची गुंतवणूक हि बॉण्डस् मध्ये केली जात नाही. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर शेअर बाजाराच्या चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही कारण यात शेअर बाजारात कोणत्याही स्वरुपात गुंतवणूक केली जात नाही.

लिक्वीड फंड योजना या नेहमीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असल्यामुळे यात केव्हाही पैसे ठेवता येतात तसेच ते केव्हाही काढताही येतात. हा व्यवहार जर ऑनलाईन केला तर तो अधीकच सोईचा होतो कारण जर का आपण दुपारी २.३० पुर्वी नेट बँकींगव्दारे या योजनेत गुंतवले तर आदल्या दिवसाची एनएव्ही मिळते (लिक्वीड प्लस योजनेत) व पैसे काढावयाचे असतील तेव्हा याचप्रकारे दुपारी २.३० पुर्वी सुचना दिल्यास कामकाजाच्या दुस-या दिवशी दुपारी १२ वा. पुर्वी आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतात. म्हणजेच बचत खात्यासारखीच तरलता या योजनेत आहे व मिळणारा परतावा पाहिला तर गेले एक वर्ष तो ८.५०% ते ९% या दरम्याने मिळत आहे जो बचत खात्यापेक्षा तसेच अल्पमुदतीच्या बँक ठेवींपेक्षाही जास्त आहे. आणखीन एक फायदेशीर गोष्ट म्हणजे या योजनेतून पैसे काढताना टिडिएस कापला जात नाही. ज्यांचे वार्षीक करपात्र उत्पन्न हे ३०% च्या स्लँबमध्ये येते त्यानी या योजनेत गुंतवणूक केली तर करपश्र्चात मिळणारा परतावा हा वार्षीक ७.९५% अधीक मिळतो, कारण जरी कराचा दर सारखा असला तरी म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेतून मिळणा-या डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनवरील टँक्स गणनेची पध्दत वेगळी असते. म्हणून अशा व्यक्तीनी डिव्हीडंड पेआऊट अथवा डिेव्हीडंड पुनर्गुंतवणूक हा पर्याय गुंतवणूक करताना घ्यावा. या योजनेत डिव्हीडंड दैनंदीन, मासीक, त्रैमासीक इ. मिळण्याची सुवीधा आहे. ज्यांचे करपात्र उत्पन्न कमी आहे त्यांनी ग्रोथ हा पर्याय घ्यावा कारण त्यात करआकारणी (म्युच्युअल फंडामार्फत) केली जात नाही, ती वैयक्तीक पातळीवर करावयाची असते.

या योजनेत सर्वसाधारणपणे बँक ठेवींचा जो प्रचलीत दर असतो त्यापेक्षा थोडे जास्तच व्याज (परतावा) मिळत असतो. बचत खात्यावर तर ४%च व्याज मिळते व चालू खात्यावर तर अजिबात व्याज मिळत नसते, म्हणून ज्या व्यक्ती/संस्था/आस्थापने बचत खात्यात अथवा चालू खात्यात अतिरिक्त पैसे ठेवतात त्यानी या सुवीधेचा लाभ घेतलाच पाहिजे. लिक्वीड फंडाच्या काही योजनेत किमान रु.एक लाख गुंतवावे लागतात तर काही योजनेत किमान रु.पांच हजार गुंतवूनही चालतात. सर्वच म्युच्युअल फंड कंपन्याच्या योजनेत जवळपास सारखाच परतावा मिळतो, फरक फारच थोडा असतो, सध्या हा दर ८.५०% ते ९% या दरम्याने आहे. ज्या संस्थाचे खात्यात असणारी अतिरिक्त रक्कम ते अगदी शुक्रवारी गुंतवून लगेचच पैसे काढण्याची सुचना देऊन ४ दिवसांचे व्याज मिळवू शकतात. (सोमवारी पैसे जमा होत असल्यामुळे व गुंतवणूक गुरुवारच्या मालमत्ता मुल्याने होत असल्याने व मिळणारे पैसे रविवारच्या मालमत्ता मुल्याने मिळत असल्याने ४ दिवसांचे व्याज मिळते – या योजनेचे मालमत्ता मुल्य प्रत्येकदिवशी अगदी रविवार व सुटीच्या दिवशीसुध्दा जाहिर होत असते व बदलत – वाढतच असते). वर्षात सर्वसाधारणपणे १०४ दिवस शनिवार रविवारचे व १५ बँक सुट्यांचे असे ११९ दिवस हि सुविधा अशा लोकांना वापरता येऊ शकते जेव्हा पैसे नुसतेच पडून असतात.

हल्ली रिलायन्स म्युच्युअल फंडामार्फत तर अत्यंत आकर्षक सुवीधा मिळत आहे, जर का आपण रिलायन्स लिक्वीड फंड ट्रेझरी प्लान (गेल्या एक वर्षातील याचा परतावा ८.२५% पेक्षा जास्त आहे) किंवा रिलायन्स मनी मँनेजर फंड (गेल्या एक वर्षातील याचा परतावा ८.८०% पेक्षा जास्त आहे) या पैकी कोणत्याही लिक्वीड योजनेत वरीलप्रमाणेच गुंतवणूक केली तर अकाउंटस् स्टेटमेंट सोबतच आपल्याला एक एटिएम डेबीट कार्ड मिळते. या दोन्ही योजनेत किमान रु.५००० (पाच हजार) भरुन खाते सुरु करता येते. यासाठी कोणताही आकार द्यावा लागत नाही, कार्ड अगदी मोफत मिळते. या कार्डाचा वापर करुन अगदी कोणत्याही बँकेच्या एटिएम मधून पैसे रोख काढता येतात ज्यासाठी सध्यातरी कोणताही आकार पडत नाही. तसेच हे कार्ड वापरुन डेबीट कार्डाप्रमाणेच खरेदी सुध्दा करता येते. हे कार्ड भारतात कोठेही व परदेशातही वापरता येते मात्र परदेशात पैसे काढल्यास प्रत्येक वेळी ६९ रुपये आकारले जातात. म्हणजेच या कार्डामुळे बचत खात्याची जवळपास सारी सुविधा (चेक बुक सोडून) मिळते.
सध्यातरी एटीम कार्डची सुवीधा फक्त रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून मिळत आहे मात्र मला तरी असे वाटते कि लवकरच हि सुविधा बाकीचे फंड हाऊसही घेऊन येतील, काही काळाने तर चेक सुविधाही मिळू शकेल कारण अशी सुविधा परदेशात दिली जाते कारण तेथे ७५% पेक्षा अधिक लोकं बँकेपेक्षा याच योजनेचा वापर करत असतात. भारतात मात्र फक्त मोठे व कॉर्पोरेट गुंतवणूकदारच लिक्वीड फंड योजनेचा प्रामुख्याने फायदा घेत असतात. आता वेळ आली आहे कि प्रत्येकानेच या सुविधेचा फायदा घेण्याची.

लिक्वीड फंडाचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे केव्हाही गुंतवणूक करता येत असल्याने जेव्हा जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तेव्हा यात गुंतवता येतात व हवे तेव्हा काढताही येतात व डेबीट कार्डमुळे सुविधाही वाढली आहे. ज्याना नेट बँकींग करणे शक्य नसेल त्यानी यात एसआयपीव्दारे गुंतवणूक करावी, ज्या दिवशी पगाराची रक्कम जमा होते त्यानंतरची तारीख एसआयपीसाठी घ्यावी म्हणजे झाले, यासाठी शक्यतो रिलायन्स म्युच्युअल फंडच्या मनी मँनेजर योजनेचा पर्याय घेणे उत्तम कारण मिळणारी डेबीट कार्डची सुविधा.

या पुढील लेखाचे विषय १) बँक एफडी ला फायदेशीर पर्याय – एफएमपी २) प्रस्तावीत डायरेक्ट टँक्स कोड अँक्ट.

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

22 Nov 2011 - 11:43 am | अन्या दातार

>>आणखीन एक फायदेशीर गोष्ट म्हणजे या योजनेतून पैसे काढताना टिडिएस कापला जात नाही. ज्यांचे वार्षीक करपात्र उत्पन्न हे ३०% च्या स्लँबमध्ये येते त्यानी या योजनेत गुंतवणूक केली तर करपश्र्चात मिळणारा परतावा हा वार्षीक ७.९५% अधीक मिळतो, कारण जरी कराचा दर सारखा असला तरी म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेतून मिळणा-या डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनवरील टँक्स गणनेची पध्दत वेगळी असते.

हे नीट कळले नाही. जरा इस्कटून सांगा. डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशनवरील टॅक्स कसा काढतात? त्याचा करपश्चात परताव्यावर काय परिणाम होतो??

मराठी_माणूस's picture

22 Nov 2011 - 11:55 am | मराठी_माणूस

अत्यंत माहीतिपुर्ण अर्थसाक्षरता वाढवणारा लेख. धन्यवाद.

सोत्रि's picture

22 Nov 2011 - 12:12 pm | सोत्रि

लिक्वीड फंडाचा फायदा समजावून दिल्याबद्दल खूप खूप आभार.
विषेश म्हणजे शुक्रवरी पैसे टाकून सोमवारी काढून व्याज मिळवायची आयडिया भन्नाटच.

पण त्यासाठी पडून असलेला पैका हवा, आणि आमचे घोडे नेमके ईथेच पेन्ड खाते. ;)

- (लिक्विडीटी नसलेला) सोकाजी

मन१'s picture

22 Nov 2011 - 12:28 pm | मन१

हे काहितरी नाविन्यपूर्ण समजले. एक शंका अशी राहते की आजवर मी ज्या विविध ब्यांकेतील व्यक्ती, माझ्या सी ए चे एजंट्स ह्याम्ना भेटलो ते काही ठराविक प्रॉडक्टच कसे फायद्याचे आहे, हे सांगत, त्यातले बहुतांश युलिप छाप असत.(अत्यंत गुंतागुंतीचे,एकाच रकमेत म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्स कोंबू पाहणारे, शांतपणे विचार केल्यास ज्यात फारसे तथ्य नाहे असे जाणवणारे).
युलिप शहाण्यामाणसाला पटणारे वाटत नसल्याने माझा भर प्रामुख्याने पीपीएफ, फ्लॅट वगैरे कडेच असे.
कित्येकदा रक्कम तर असे, पण ही माणसे सांगायची तशी मी काही रक्कम पाचेक वर्षे लॉक
मी पुनः पुनः "ह्याशिवाय अजून कुठकुठले प्रॉडक्ट तुमच्या आस्थापनाकडे किंवा मार्कॅट मध्ये इतरत्र आहेत?" हे विचारूनही ही मंडळी तीच तीच प्रॉडक्ट नव्हते.बहुदा त्यात त्यांना अधिक कमिशन मिळत असावे. ह्याबद्दल कुणीही बोलले नव्हते.वैतागून फारशी अक्कल नसतानाही थेट शेअर मार्केटमध्ये उतरलो, सुदैवाने बर्‍यापैकी नफ्यात असताना मोकळाही झालो.
असो. हे लिहित असतानाच एका मनी प्ल्यानिंगवाल्याशी बोललो. तो म्हणतोय की साधरणतः एफ डी च्या जवळपास जाणारे रिटर्न्सच ह्यातूनही मिळतील्.खूप जास्त वगैरे नाही.(माझे मत नाही, त्याने मला कॉलवर सांगितले.)

सदानंद ठाकूर's picture

22 Nov 2011 - 1:47 pm | सदानंद ठाकूर

In this scheme commission is approx. 0.5% to 0.20% on annualized basis i.e. if you keep money for one year distributor is getting 20 paise for every hundred no upfront commission. Insurance is not at all investment product. In traditional schemes agents are getting upto 40% of first year's premium, 10% for 2nd year and 5% thereafter till you are paying premiums, for which no efforts are required, you are paying future premiums otherwise your insurance cover will discontinue & you will receive only surrender value, which is very less. As far as ULIP commission is upto 15%. Insurance companies are paying commissions from your pocket only still people are purchasing these schemes. Actually you should get insured through Term Plan and invest in any investment avenue as per your risk taking aptitude.

आत्मशून्य's picture

22 Nov 2011 - 12:32 pm | आत्मशून्य

बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

पोस्टामधे जरा चौकशी करता काय ? कारण योजनेच नक्कि नाव आता आठवत नाही पण ठेवलेल्या रकमेवर ८.५% व्याज देत आहेत ते. सध्या तरी संपूर्ण जोखिम वीरहीत व जास्त परतावा देणारी गूंतवणूक फक्त तिथेच होऊ शकते. पण त्यांची काही लाखांची मर्यादा आहे(बहूतेक १०-१५) ति ओलांडता येणार नाही. जाणकारांनी उ़जेड टाकावा.

सदानंद ठाकूर's picture

22 Nov 2011 - 1:53 pm | सदानंद ठाकूर

Returns on FD with Bank or Post are taxable as per prevailing rate. These returns are for specific period, whereas in Liquid Fund there is no term, you can withdraw at any time and there is no risk as amount is invested in money market security for less than 91 days. So far in the history no Liquid fund has given negative returns. These funds have always delivered positive returns over and above bank/post FD. No limitation for investment. Indian corporate have invested approx. 1.76 Lacs Cr. in this schemes. It is overall industry AUM of liquid fund.

काही शंका आहेत, विचाराव्या म्हणतोय.
इथे द्यायचा नसेल तर व्यनि करु शकता.

सदानंद ठाकूर's picture

22 Nov 2011 - 1:25 pm | सदानंद ठाकूर

९४२२४३०३०२

वपाडाव's picture

22 Nov 2011 - 12:42 pm | वपाडाव

वाचनखुण साठवुन ठेवली आहे.....

निवेदिता-ताई's picture

22 Nov 2011 - 10:29 pm | निवेदिता-ताई

मी पण ...:)

सदानंद ठाकूर's picture

22 Nov 2011 - 1:20 pm | सदानंद ठाकूर

व्याजाचे उत्पन्नावर कर आकारणीची गणना खालीलप्रमाणे केली जाते:
मिळणारे व्याज (उत्पन्न) X कराचा दर
उदा: व्याज दर १०% असेल तर १० X ३२.४४५%
= होणारा कर ३.२४४५ = ३.२५
मिळणारे करपश्र्चात उत्पन्न १० – ३.२५ = ६.७५%

डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टँक्सची गणना खालीलप्रमाणे केली जाते:
जर डिव्हीडंडचा दर १०% असेल तर होणारे रु.१० उत्पन्न हे १३२.४४५% धरले जाते म्हणजेच जरी मिळणारा परतावा (व्याज) १०% ऐवजी ७.५५%
आणि डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टँक्सची गणना रु.१० वर न होता ७.५५ X ३२.४४५% = २४.४९५ या दराने होते
म्हणून होणारी करआकारणी = १० X २४.४९५% या दराने होते
= होणारा कर २.४४९५ = २.४५
मिळणारे करपश्र्चात उत्पन्न १० – २.४५ = ७.५५%
करपश्र्चात जादा उत्पन्न (७.५५ – ६.७५) = ०.८० जादा = ८% परंतु डेसीमल मध्ये येते (३२.४४५ - २४.४९=) = ७.९५%

माझ्या नातेवाईकांनी सल्ला दिल्याने मी लिक्विड एम एफ मध्ये काही महिने पैसे ठेवले होते. साधारणतः कमी मुदतीच्या एफ डी मध्ये मिळतो त्यापेक्षा सुमारे दिड पट परतावा मिळाला. (३ महिने - ३ टक्के प्रत्यक्ष म्हणजे सुमारे १२ टक्के .. किमान ९ टक्के वार्षिक) रिडिम स्लिप दिल्यावर तिसर्‍या दिवशी पैसे जमा झाले मूळ खात्यावर.
रिलायन्स च्या डेबिट कार्डचा फायदा सोडला तर इतर काही लिक्विड एम एफ हे रिलायन्स पेक्षा नक्कीच जास्त चांगला आणि भरवशाचा परतावा देतील असा अंदाज आहे --

एच डि एफ सी (ग्रोथ / टॉप २०० किंवा तत्सम फंड जो लिक्विड मध्ये उपलब्ध असेल)
कॅनरा रोबेको
एस बी आय

डेबिट कार्ड मात्र खूपच सोयीचे आहे. काही अजून माहिती मिळू शकेल का...
एकूणात हा लिक्विड एम एफ पर्याय मात्र खूप उत्तम आहे. परंपरागत पैसे अडकून राहणार्‍या पद्धतीपेक्षा किंवा कमी व्याज देणार्‍या सुरक्षित पर्यायांपेक्षा..

सदानंद ठाकूर's picture

23 Nov 2011 - 8:24 pm | सदानंद ठाकूर

लिक्वीड फंड मध्ये सगळ्यांचे परतावे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.
एचडिएफसी कँश मँनेजमेंट फंड – ट्रेझरी प्लान,
एसबीआय अल्ट्रा शॉर्ट टर्म कँश फंड
अधिक माहिती व टॉप स्किमसाठी http://www.valueresearchonline.com/funds/repcard.asp
या दुव्यावर जावे. हे संकेतस्थळ सर्वात विश्वासार्ह आहे. मात्र गुंतवणूक करताना शक्यतो ज्या फंड हाऊसची पँरेंट कंपनी बँक किंवा मोठे आस्थापन आहे असे निवडणे चांगले.