आमची प्रेरणा http://misalpav.com/node/19646.
धनाजीरावांच्या नायकाच्या मनातील भावना व्यक्त करणे हे तसे अवघडच आहे मात्र
(( Sonar of Thoughts ! ))
. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा धनाजीरावंचा नायक.
त्यानी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. असे आवाहन केले होते
त्या तिथे जवळच नायकाने नुकत्याच खाल्लेल्या कागदावर या ओळी टंकलेल्या होत्या
सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**)..... हे पुस्तक देण्याचे कबूल केले आहे. मात्र चुकून माकून कविता उत्तम वाटली तर हे पुस्तक बक्षीस म्हणून घेण्याची आफत येवू नये म्हणून आम्ही कविता लिहुनही कवितेखाली आमचे नाव मात्र मुद्दामच लिहीलेले नाही.
त्या तिथे पलीकडे;ते प्रियेचे गोठडे.
ये लवकरी गे सखये घालतो तुज हे साकडे
ये अशी हंबरत. वार्यापरी हुंदडत.
पाहु दे सगराला येताना सौदामिनी कडाडत
पाहीले मी काल तुला; काळ्या माझ्या कळीला
ओल्या सागराने तत्क्षणी श्वास माझा जाळीला
चाखु तिथे गवत वाळके दोघे वरल्या आळीला
कंटाळलो किती आता रोजच्याच भाजी पोळीला
असता तू अशी सखये प्रदीर्घ माझ्या सोबतीला
रोज रोज वाटेल मला दिवस खुशीचा बैलपोळा
ऐक सखये सांगतो तूस तोड दावे, सोड गोठा
वाट पाहून गे आला फेस माझीया ओठा
सांगतो सखे ऐक आता गुपीत एक कानी
चरताना मी गात असतो..हंबरत तुझीच गाणी
...............................................................
प्रतिक्रिया
21 Nov 2011 - 6:40 pm | धन्या
चला, एक परीक्षक सापडले. तुम्ही ही कविता त्या धाग्यावर न दिल्यामुळे ही कविता त्या स्पर्धेसाठी पात्र नाही. आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्या स्पर्धेसाठी परीक्षक होणार का असं विचारू शकतो. ;)
बाकी कविता अगदी झक्कास आहे हे सांगणे न लगे. :)
22 Nov 2011 - 4:41 pm | विजुभाऊ
हा हा हा....
का उगाच परीक्षक बनवुन आमचे हाल करताय ;)
22 Nov 2011 - 8:08 pm | पैसा
=)) वाकडेबुवानी बर्याच जणाना कामाल लावलंय!