हेलिकॉप्टर

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
20 Nov 2011 - 11:41 pm

संध्याकाळी साडेपाचचा सुमार असेल. चहा घेता घेता संगणकावर काहीतरी उद्योग चालु होता. म्हणजे कॉफी बनवायचे वीजेवर चालणारे यंत्र कसे वापरावे याचा शोध तू नळीवर घेत होतो. संगणकावर चित्रपट सुरू होऊन स्वागत आणि स्वगत संपवुन तो बुवा यंत्राविषयी काही सांगणार एव्हढ्यात हेलिकॉप्टरचा घरघराट, मागोमाग पक्ष्यांचा कलकलाट. नेमके जे ऐकायला हवे ते निसटले. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता हेलिकॉप्टर म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. खिडकीतुन डोकावायचा प्रयत्न केला पण आकाशात काहीच नव्हते. कदाचित ते इमारतीच्य बरोबर वरून गेले असावे. पुन्हा एकदा आवाज भरभरू लागला आणि अगदी स्पष्टपणे उजव्या बाजुने येताना जाणवु लागला. बघतो तर एक निळे पांढरे हेलिकॉप्टर भिरभिरत होते.

heli1 copy

हेलिकॉप्टर इतके खाली पाहुन मी जरा चक्रावलोच. काहीतरी लोच्या असावा, कदाचित आणीबाणीच्या परिस्थितीमुळे त्याला मधेच उतरणे भाग पडले असावे आणि तो खाली उतरायला मोकळी अशी सोयीची जागा पाहत असावा. सध्या मिपावर विमान अपघाताचा मोसम आहे, हे लखक्न डोक्यात चमकले आणि मी कॅमेरा काढला.

पोरं लहान असताना त्यांना घेऊन बाहेर पडताना, विशेषतः आपल्याला कुठे जाई असताना नेमेकी पोराची चड्डी ओली झालेली असते. मग आधी पोराची चड्डी बदला. अगदी हेच झाले. कॅमेर्‍यावर मॅक्रो होते. बरोबर. शेवटचे उद्योग कर्नाळ्यात केले होते. घाईघाईने ते उपटुन टेली चढवुन कॅमेरा सज्ज होईपर्यंत बेटं भिरभीरत येऊरच्या दिशेने जाताना दिसले. तिथे हवाईदलाचा तळ आहे हे माहित होते. कॅमेरा घेऊन मी बाहेरच्या खोलित कठड्यापाशी पोचे पर्यंत घरघ्रराट पुन्हा ऐकु आला. वर्तुळ फिरुन ते हेलिकॉप्टर परत माझ्याच दिशेने येत होते.
वैमानिक कसलेला दिसत होता. दाटीवाटीने इमारती असलेल्या वस्तीत बिन्धास्त खाली येउन गिरक्या घेत होता बेटा.

heli2 copy

वैमानिकाने मला फोटु घेताना पाहीले की काय ठाऊक पण बेटा क्षणात माझ्या दिशेने झेपावला व डोक्यावरून भुर्र झाला. त्याचा वेध घेत डाव्या बाजुला कॅमेरा फिरविताना अचानक ते डावीकडच्या ईमारतींआडुन बाहेर आले आणि उजवीकडे सफाईदार गिरकी घेत निघाले. त्याचे स्थान नक्की सांगायचे तर रामदासजींच्या अगदी डोक्यावर.

heli3 copy

heli4 copy

रामदासना साद घातलीच पाहिजे असा विचार आला पण उजवीकडे इमारतींपासुन जेमतेम शे - पन्नास फुटांवर उडताना पाहिल्यावर त्याला टिपणे महत्वाचे, रामदासंना काय? सांगेन नंतर की, की डोक्यांवर हेलिकॉप्टर उतरु पाहत होते. वैमानिक खरोखरच कुशल असावा. अगदी नाका समोरच्या बांधकाम सुरू असलेल्या २२-२५ मजली इमारतीच्या ३/४ उंचीवरून त्याला इमारतीच्या जवळुन जाणारे ते हेलिकॉप्टर पाह्ताना अगदी ९/११ च्या दृश्याचा भास झाला. इतका धोका पत्करून तो वैमानिक खाली उतरुन इमारतींच्या अवती भवती का फिरत असावा असा विचार सुरू असतानाच त्या हेलिकॉटरमधुन पुष्पवृष्टी होतान दिसली. ते टिपेपर्यंत म्हणजे इमारतींना पार करुन ते मोकळ्या जागेत येईपर्यंत बरीचशी पुष्पवृष्टी संपत आली होती. मग लक्षात आले. मागील बाजुस वर्तक नगरातल्या साई मंदिराला २५ वर्षे झाल्यानिमित्त मोठा उत्सव सुरू होता. रस्त्यावर कमानी उभारल्या होत्या, त्या आठवल्या. बाहेरच्या दर्शनी बाजुला पुढार्‍यांची थोबाडे आणि आतल्या बाजुला साईबाबांची चित्रे होती.
heli 5 copy

heli 6 copy

heli7 copy

अखेर तो सोहळा संपला आणि पुन्हा एकदा ते हेलिकॉप्टर भिरभिरत आले आणि दूर निघुन गेले. जाता जाता त्याचा वेध घेत असताना पक्ष्यांचा एक थवा जाताना दिसला. बहुधा मोठ्या आवाजाने ते अस्वस्थ झाले असावेत.

heli8 copy

मौजमजाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त.
साधी घटना, पण खुलवून सांगण्याची हातोटी आवडली. :)

रेवती's picture

21 Nov 2011 - 1:11 am | रेवती

भारी, एकदम भारी.
मजा वाटली.
भारतातही लोकांना हे भव्यदिव्य (आणि खर्चिक) प्रकार करण्यात धन्यता वाटू लागलेली दिसते.

चतुरंग's picture

21 Nov 2011 - 1:27 am | चतुरंग

एकदम भारीच. मला वाटले काही इमर्जन्सी होऊन तो एखाद्या बिल्डिंगच्या वरती वगैरे उतरला असा काही शेवट असेल, तर हे भलतेच निघाले प्रकरण!
फोटू आवडले आणि वर्णनही! :)

(चॉपरप्रेमी) रंगा

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2011 - 2:14 am | प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षीजी,

मस्तं आहेत छायाचित्रे. नेमके सापडले ते हेलीकॉप्टर तुमच्या कॅमेराच्या तावडीत. अभिनंदन.

सन्जोप राव's picture

21 Nov 2011 - 5:18 am | सन्जोप राव

साधा प्रसंग सांगण्याची शैली आवडली. बाकी फोटो काय, नेहमीप्रमाणे उत्तम. फोटोवरची लफ्फेदार 'बळवंत पटवर्धन'ही मर्दानी स्वाक्षरी परत एकदा आवडली

आत्मशून्य's picture

21 Nov 2011 - 6:17 am | आत्मशून्य

पहीलं चित्र बघून सूरूवातीला खेळण्यातील हेलिकॉप्टर आहे असच वाटलं पण आपल्या नॅरॅशन सोबत प्रत्येक प्रसंग व्यवस्थीत खूलला.

अवांतर :- १ला फोटो सोडून इतर फोटोही फोटोशॉप केलेत की फक्त त्यावर सही टाकलीय ?

सुहास झेले's picture

21 Nov 2011 - 6:44 am | सुहास झेले

सही... :) :)

रामदास's picture

21 Nov 2011 - 8:30 am | रामदास

वाचत होतो .अजून चारच अध्याय झाले होते तेव्हढ्यात घरघर ऐकू आली.
मी म्हटलं जय हो !!
आलं वाटतं विमान.

विसुनाना's picture

21 Nov 2011 - 12:06 pm | विसुनाना

राँग नंबर असावा.

प्रचेतस's picture

21 Nov 2011 - 8:38 am | प्रचेतस

मजा आली वाचून.

सुंदर !!!!

प्रसंग छान खुलवून सांगितला आहे. हेलिकॉप्टरचे फोटो तर सुरेख घेतले आहेत. !!!

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 9:18 am | अन्या दातार

मस्त फोटो * सुरेख वर्णन = वाचनानंद

सविता००१'s picture

21 Nov 2011 - 12:20 pm | सविता००१

सही आहे. फोटो आणि वर्णन दोन्ही :)