पापणी का फडफडते?

रविंद्र गायकवाड's picture
रविंद्र गायकवाड in काथ्याकूट
16 Nov 2011 - 2:47 pm
गाभा: 

गेले (४-५)काही दिवस झाले माझ्या डाव्या डोळ्याची पापणी थोड्या थोड्या वेळाने सतत फडफडते. म्हणजे अगदी आपोआप हालायला लागते (पुर्णपणे बंद होत नाही, डोळे मारतोय असे समजू नये.)

कुणी अपशकुन म्हटले कुणी शकुन म्हणते. तसे असेलच तर पापणी फडफडण्याचे शकुण अपशकुन फले काय आहेत?
या मागचे शास्त्रिय कारण काय?
आणि एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण आल्यावर किंवा नाव ऐकल्यावरच का फडफडते?

प्रतिक्रिया

काही दिवस झोप नीट लागली नाही किंवा सतत तणाव होता का?

अविनाशकुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 2:51 pm | अविनाशकुलकर्णी

पापणी वरुन आंगठी फिरवा..
विवाहित स्त्रीया मंगळ सुत्राच्या वाट्या उलट्या करुन फिरवतात..
काहि दोष असेल तर दुर होईल. .....

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 2:57 pm | रविंद्र गायकवाड

मी पुढील उपाय केले आहेत. पण काही वेळने परत होते.

सोन्याचा स्पर्श करणे.
डोळे घट्ट बंद करणे.
तोंड धुताना मुद्दम साबन डोळ्यात जाऊ देने.
पापणिला चिमटे घेणे.
कागदाचा एक तुकडा थुंकी लावून चिकटवने. (काही वेळा तर कागद चिटकवूनही फडफडत राहते.)

अर्थात हा काही खूप त्रासदायक प्रकार नाही. फक्त या मागचे बायोफिकल किंवा मेडिकल कारण जाणून घेण्याची इच्छा झाली आहे एवढेच.

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 3:00 pm | रविंद्र गायकवाड

मा़झ्या एका प्रिय व्यक्तीच्या मते जेव्हा जेव्हा माझ्यावर मोठे संकट आले त्याच्या काही दिवस आधी त्या व्यक्तीची पापणी फडफडत असे. या वेळी असे झाले की त्यांची आणि माझी पापणी फ़डफडणे एकाच वेळी चालू झाले कालपासून त्यांचे बंद झाले आणि माझे वाढले.

चिरोटा's picture

16 Nov 2011 - 3:22 pm | चिरोटा

मा़झ्या एका प्रिय व्यक्तीच्या मते जेव्हा जेव्हा माझ्यावर मोठे संकट आले त्याच्या काही दिवस आधी त्या व्यक्तीची पापणी फडफडत असे

म्हणजे त्यांना चाहूल लागते तर संकटाची. जास्त बाहेर पडू नका. रात्री झोपताना दरवाजे,कड्या नीट लावा. रस्ता क्रॉस करताना सांभाळून. सात तास झोपा आरामात.

विवाहित स्त्रीया मंगळ सुत्राच्या वाट्या उलट्या करुन फिरवतात..

विवाहित स्त्रियांनी परपुरुषाच्या पापणीवरून वाट्या उलट्या करुन फिरवलेल्या चालतात का?

गार्गी_नचिकेत's picture

16 Nov 2011 - 3:07 pm | गार्गी_नचिकेत

साधारणपणे, शरीरतील वात वाढला असेल तर पापणी फडफडते. शरीरातील कोणत्या भागात वात साठून राहीला आहे, यावरही वाताचे ल़क्षण आवलंबून असते. उदा: हातात किंवा पायात वात साठला असेल, तर त्या भागात गोळा येतो. पोटात असेल तर पोट, छातीत असेल तर छातीत दुखते. तसेच, डोळ्याच्या आसपास वात जमला असेल, तर डोळ्याची पापणी फडफडते, अशी ही एक विचार धारा आहे.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2011 - 3:42 pm | धमाल मुलगा

वातप्रकोप.
नक्की हेच कारण असणार. लिखाणातूनही थोडंबहूत जाणवतंय.

रविंद्र गायकवाड's picture

16 Nov 2011 - 3:55 pm | रविंद्र गायकवाड

वैद्य (डॉक्टर) धमालराव. निदान तर चांगल केलंत आता उपचारही करा.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2011 - 4:01 pm | धमाल मुलगा

जरुर! (म्हणजे अवश्य अश्या अर्थानं!)
फक्त नव्या बाटलीतली जुनी दारु नक्की कोणती आहे ते कळालं की उपाय ठरवता येईळ. :) कशें?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2011 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वातप्रकोप.
नक्की हेच कारण असणार. लिखाणातूनही थोडंबहूत जाणवतंय.

धमु, काही उपचार आम्हाला करावे लागणार असे दिसते. ;)

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2011 - 8:18 pm | नगरीनिरंजन

वैद्य धमुंनी बरोबर नाडी पकडली आहे. आता वेळीच ओढा म्हणजे आळा बसेल. :)

जालावरील काही आयडींना पण अशी वायुबाधा होते...योग्य निदान होताच, त्यांची फडफड कायमची बंद होते असे माझ्या बघण्यात आहे.
बाकी चालु द्या...

सूड's picture

17 Nov 2011 - 7:26 am | सूड

असेच म्हणतो.

विनायक प्रभू's picture

16 Nov 2011 - 3:21 pm | विनायक प्रभू

घरात कुणी लहान मुलगा नाही का?
उपाय सांगतो. व्य. नी करा.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2011 - 3:40 pm | धमाल मुलगा

त्पापणी''पापणी' फडफडण्यावरचा उपाय हवा आहे. ;)
प्रभूविद्या देऊ नका. ;)

सर्वसाक्षी's picture

16 Nov 2011 - 3:31 pm | सर्वसाक्षी

रक्तदाब मोजा
डॉक्टरला गाठा
योग्य ते निदान व उपचार करुन घ्या
वेळ घालवु नका.

फडफडण्या मागचे शास्त्रीय मलाही जाणुन घ्यायचे आहे.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला हा फडफडण्याचा त्रास आहे. गंमत म्हणजे हे फडफडणे केवळ भुवई/पापणी/डोळा पुरता मर्यादीत नाही. बिचार्‍याचा कुठलाही अवयव कसलीही पुर्वसुचना दिल्या बीगर कधीही फडफडू लागतो.

बरं.. कोणी डॉक्टर येईस्तोवर हे पहा

या प्राथमिक निदानासाठी डॉक्टरची गरज नाही. जास्त काळ आणि नवनवी लक्षणे वाटल्यास किंवा एकूण काळजी फार वाटल्यास मात्र दाखवा डॉ.ला.

याहून वाईट कारणे अत्यंतच वाईट आणि तितकीच अत्यंत रेअर असल्याने त्यांचा विचार अन उगाच काळजी पहिल्या एकदोन आठवड्यातच करायची गरज नाही..

धन्यवाद गवि, तुम्ही दिलेला दुवा मित्रास धाडत आहे.
तसा डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला मी त्याला आधिच दिला आहे. पण नुसतेच फडफडणे आहे त्यासाठी डॉक्टर कशाला असे त्याच म्हणणे आहे.

नरेश_'s picture

16 Nov 2011 - 6:08 pm | नरेश_

हे वाचा.
टंकायचा कंटा ळा आलाय.

विजुभाऊ's picture

16 Nov 2011 - 7:51 pm | विजुभाऊ

गंमत म्हणजे हे फडफडणे केवळ भुवई/पापणी/डोळा पुरता मर्यादीत नाही. बिचार्‍याचा कुठलाही अवयव कसलीही पुर्वसुचना दिल्या बीगर कधीही फडफडू लागतो.


नॉ कॉमेन्ट्स =))

=))

५० फक्त's picture

16 Nov 2011 - 4:08 pm | ५० फक्त

पापणी फडफडणं हे मोक्ष मिळण्याची पहिली पायरी आहे, काही काळजी करु नका. फक्त मोक्ष मिळाला की इथं अपडेट करा म्हणजे झालं.

सोत्रि's picture

16 Nov 2011 - 6:01 pm | सोत्रि

पापणी फडफडणं हे मोक्ष मिळण्याची पहिली पायरी आहे

चोक्कस!

- (पापणी न फडफडणारा पक्षी मोक्षप्राप्तीस मुकलेला) सोकाजी :(

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 5:19 pm | आत्मशून्य

माझ्या पूरत म्हणाल तर ज्याबाजूची पापणी फडफडतै तीकडे तूम्हाला पॅरालीसीस होणार हे नक्की ;)

निवेदिता-ताई's picture

16 Nov 2011 - 7:02 pm | निवेदिता-ताई

आणी दोन्ही बाजूच्या फडफड्ल्या तर काय होईल????

आणी दोन्ही बाजूच्या फडफड्ल्या तर काय होईल????

ठ्ठो!!!!

पूर्णांगवायू!

lakhu risbud's picture

16 Nov 2011 - 8:56 pm | lakhu risbud

(मुंबईत रहात असाल तर) मुंबई सोडा !

मीली's picture

16 Nov 2011 - 9:15 pm | मीली

माझ्या पण नवर्याची पापणी फडफडते ..मग तो पण कधी कधी विचार करतो कि काही वाईट तर होणार नाही ना! खरे मला तर काही पटत नाही ..पण असे ऐकून मनात पाल चुकचुकते कि सगळे नीट घडायला हवे ..बरीच माहिती मिळाली या धाग्यावर....ती सांगून बघते..धन्यवाद !

चंबा मुतनाळ's picture

16 Nov 2011 - 9:32 pm | चंबा मुतनाळ

कमित कंमी ३ पॅग मारा आवडत्या दारूचे. सगळे फडफडणे बंद होईल!

रविंद्र गायकवाड's picture

18 Nov 2011 - 10:51 am | रविंद्र गायकवाड

फडफड चालू झाल्यापसून आत्ता पर्यंत ७ खंबे रिकामे केलेत दोघांत.

मलाही असेच होते आहे गेले काही महिने..
अनियमित झोप, पाणी कमी पिणे, जास्त कॉफी पिणे हि कारणे आहेत असा मला आंतरजालावरुन कळाले व मी यावर नियंत्रण केले व त्याचा उपयोग झाला.

कपिलमुनी's picture

17 Nov 2011 - 4:04 pm | कपिलमुनी

अल्कोहोलचा प्रमाण कमी झाला कि होता असा ..
इकडे ये ...रीपेयर करु तुला

मोहनराव's picture

17 Nov 2011 - 7:40 pm | मोहनराव

मुनीवर आपल्या तोंडी असले बोलणे शोभत नाही बरे!! ;)

अतिशय माहितीपूर्ण धागा !! याहून अधिक माहितीसाठी लतादीदींचं 'माजो लवतांय डावां डोळां' हे गाणं ऐका. चित्रपट महानंदा'

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2011 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा

प्रति-क्रीया वाचुन आमच्या दिन्ही पापण्या फडफडु लागल्या... ;-)

भास्कर केन्डे's picture

19 Nov 2011 - 4:00 pm | भास्कर केन्डे

धागा वाचून पापण्यांच्या विज्ञानासोबतच सर्वंकष कारण मिमांसा काय असते हे ही शिकलो.
प्रभो, धन्य हो!