केंद्र सरकारने नुकतीच पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधे काही बदल केल्याची घोषणा केली.
हा निर्णय छोट्या गुंतवणूंकदारांमधे उत्साह आणण्यासाठी केला आहे असे सांगण्यात आले आहे.
तर काय बदल उत्साहवर्धक बदल आहेत हे बघुयात:
1. 70,000 ही गुंतवणुकीची मर्यादा 100,000 वर नेण्यात आली आहे.
- जे लोकं 'डेट' मधे गुंतवणूक करतात त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल
- जे लोकं 'इक्वीटी' मधेही गुंतवणूक करतात आणि पोर्ट्फोलिओ 'डेट' प्रकारातही डायव्हर्सीफाय आता करू ईच्छितात
त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल
2. व्याजदर 8% वरून 8.6% असा शुधारित केला आहे.
- हे व्याज चक्रवाढ व्याज असते. त्यामुळे ह्या स्कीममधील थोडीशीही दरवाढ मस्त परतावा देउन जाते
- आता 8.6% ने 'यील्ड' काय येइल हे जाणकारांनीच स्पष्ट करावे हे उत्तम
3. ह्या खात्यावर मिळणारे व्याज हे Exempt-Exempt-Exempt ह्या मॉडेलनुसार करमुक्त असणार आहे.
- नो TDS ही भावनाच किती छान वाटते नं :)
नक्कीच हे बदल उत्साहवर्धक आहेत.
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 2:49 pm | पिलीयन रायडर
काय धागा आहे!!!! दिल खुश हो गया!!!
असलं काही वाचायला मिळतच नाही हो आजकाल....
अता मस्त पैकी महिना किती हजार टाकले की काही वर्षानी किती करोड मिळ्तील अशा मस्त पैकी चर्चा होउन जाउ देत...
15 Nov 2011 - 3:00 pm | स्मिता.
बातमी छान आहे... वाचून आनंद झाला.
आता माझा बेसिक प्रश्नः जर पीएफ खाते बंद असेल तर पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात का?
15 Nov 2011 - 3:44 pm | सोत्रि
पीएफ आणि पीपीएफ ह्या दोन्हीही सर्वस्वी भिन्न अशा स्कीम्स आहेत. त्यांचा एकेमेकींशी काहिही संबंध नाही.
दोन्ही खाती वेगळी असल्यामुळे आणि एकमेकांवर अवलंबून नसल्यामुळे नक्कीच पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात.
काही कारणामुळे पीपीएफ खातेच जर बंद असेल तर दंड भरून खाते नियमीत करून त्यामध्ये पैसे गुंतवता येतात.
- ( छोटा गुंतवणुकदार ) सोकाजी
15 Nov 2011 - 3:02 pm | विशाखा राऊत
अरे वाह.. चांगली बातमी आहे
15 Nov 2011 - 3:04 pm | दादा कोंडके
पीपीएफ बद्दल खूप उशिरा जाग आली. कुणीतरी (आयशीआयशीआयने) कान भरले होते की आता रिस्क घेउ शकता तर म्युच्युअल फंडात गुंतवा. तीन वर्षानंतर बघतो तर काय मुद्दलीपेक्षाही फंड वॅल्यु कमी! त्याला फोन करून विचारलतर तुम्ही मार्केटबघून प्रोफाईल का बदललं नाही म्हणून मलाच शिव्या दिल्या. म्हणलं, "अबे, तेव्हडी अक्कल आणि वेळ असता तर शेअर्स मध्येच गुंतवले नसते का?" नंतर परत म्हणाला की नवीन स्किम आली आहे त्यात आम्हीच मार्केट बघून बदल करतो. आता हे दुसरं वर्ष आहे. शहाण्या माणसाने पैसे पोस्टातच गुंतवावे हे पटलय आता. :)
15 Nov 2011 - 10:09 pm | निवेदिता-ताई
(आयशीआयशीआय) ला का शिव्या देताय???
15 Nov 2011 - 4:51 pm | शाहिर
मंजी रे काय भाउ ??
जरा मर्हाटी मंदी डीटेल सांग ना
15 Nov 2011 - 5:09 pm | हितु
हे अकाउंट कसे ओपन करायचे ?
15 Nov 2011 - 5:53 pm | सोत्रि
एसबीआय बॅन्क किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मधे हे खाते उघडता येते.
खाते उघडण्यास लागणारी कागदपत्रे:
1. पॅन कार्ड
2. फोटो आयडी
3. रहिवासी दाखला - लाईट बील किंवा तत्सम कागदपत्र
4. पूर्ण भरलेला पीपीएफ फॉर्म (हा बॅन्केत किंवा पोस्टात मिळेल)
- (पीपीएफ खाते असलेला) सोकाजी
अवांतर:
हे 'वांग' म्हणजे भाजीतले का?
15 Nov 2011 - 6:13 pm | पिलीयन रायडर
..तर सर्व Nationalized bank मध्ये हे खाते काढता येते..
कारण माझ्या नवर्याचे IDBI तर माझे HDFC मध्ये आहे...
15 Nov 2011 - 6:57 pm | शाहिर
हरे हरे ..
काळाच्या फारच मागे पडलो आम्ही :(
15 Nov 2011 - 7:33 pm | पिलीयन रायडर
मी चुकुन लिहिलं ते...
पण मला म्हणायच असय की ह्या बॅन्कांमध्ये सुद्धा खाते काढता येते...
Public-sector banks that have computerised branches have been allowed to handle Public Provident Fund and Senior Citizens Savings Scheme for the convenience of the public.
The government has also allowed institutionally promoted private sector banks – ICICI Bank, IDBI Bank, HDFC Bank and UTI Bank – to handle PPF and senior citizen scheme.
असं मी वाचलय हो... आणि माझं खातं पण आहे तिथे...!
15 Nov 2011 - 6:19 pm | हितु
धन्यवाद !!
पुण्यात आले की पहिले हेच काम करणार !!
""अवांतर:
वांग न आवडनारा !!!
हे 'वांग' म्हणजे भाजीतले का?"" होय !!
16 Nov 2011 - 2:10 pm | वपाडाव
ऐवजी जर कोंब आलेला असं लिहिलं असतं तरी चाल्लंच असतं की !!!!
15 Nov 2011 - 5:59 pm | रेवती
सुवार्तेबद्दल धन्यवाद!
मनाला गुदगुल्या झाल्या हे नाकारत नाही.;)
15 Nov 2011 - 10:02 pm | आशु जोग
इपीएफ, पीपीएफ भिन्न आहेत
"पी पी एफ उघडण्यासाठी काय करावे लागते" छान प्रश्न आहे
इच्छा असेल तर पीपीएफ सापडेल.
अनेकांना पीपीएफ हे जरा मागास वाटते
म्यु फं किंवा शेअर पेक्षा आहे त्यांना इथे कमी परतावा वाटतो
* दोन पीपीएफ उघडता येत नाहीत
15 Nov 2011 - 10:12 pm | निवेदिता-ताई
छान बातमी दिलीत हो
15 Nov 2011 - 10:48 pm | ५० फक्त
पिपिफ इज बेस्ट फॉर १५ वर्षे, पण दहा वर्षांचं म्हणत असाल तर सध्य एस्बिआय आर्डि अकाउत देतंय ९% ने. (९.२५% फॉर सिनियर सिटिझन) दर महिन्याला १००० ची आर्डि केली तर दहा वर्षात १२०००० चे १९१०८७/- होतात म्हणजे इफेक्तिव्ह१३ ६७ % यिल्ड होते. वर तीन वर्षानंतर या अकाउंटवर ओडि लोन काढता येते जमा रकमेच्या ८०% पर्यंत इफेक्टिव्ह रेट ०.७५ %, द चिपेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट. इथं पण एकुण रक्कम करमुक्त आहे (संदर्भ -https://www.corpbanknet.com/Recurr_deposit_Calc.html).
पिपिएफ मध्ये १० वर्षांनी १९४२००/- होतात पण ते सगळे दहाव्या वर्षी एकरकमी काढता येत नाहीत. आणि पिपिएफचा रेट ऑफ इंटरेस्ट बदलु शकतो, पिपिफच्या अकाउंटवर लोन मिळु शकत नाही. (संदर्भ - http://www.ratekhoj.com/ppf-calculator.php)
या बाबतीत सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे एचार वाल्याला पटवुन पगारातला इपिएफ मॅक्स लिमिट्ला वाढवुन घेणे, कारण यात आपली कंपनी बेसिकच्या १२% त्यात टाकत असते. पण यामुळे रिटर्न्स मध्ये फार काही दाखवता येत नाही, १०००००/- च्या लिमिट मध्ये. आणि हे फुकटातलं सेव्हिंग असतं कारण यासाठी अकाउंट उघडा आणि मेंटेन करा असल्या भानगडी कंपनीच करते.
16 Nov 2011 - 9:37 am | मराठी_माणूस
या बाबतीत सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे एचार वाल्याला पटवुन पगारातला इपिएफ मॅक्स लिमिट्ला वाढवुन घेणे, कारण यात आपली कंपनी बेसिकच्या १२% त्यात टाकत असते
तुम्हाला व्हीपिएफ म्हणायचे आहे का? कारण कंपनीचा हिस्सा ठरलेला असतो त्यात बदल होउ शकत नाही.
16 Nov 2011 - 10:23 am | ५० फक्त
येस सर, आपलाच हिस्सा. आपण बेसिक + डिएचा किती % द्यायचं हे आपल्या हातात असतं, पण कंपनीचा हिस्सा १२%च राहतो. फक्त हा हिस्सा वाढवणं करियरच्या सुरुवातीच्या काळात फार चांगले रिटर्नस देउन जातात.
16 Nov 2011 - 9:57 am | मनिष
RD उर्फ रिकरींग डिपॉझीटला कर लागू आहे - फक्त होत TDS नाही. ९% मधून ३०% वजा केले तर ६.३ होतात. अगदी १०% वजा केले तर ८.१ होतात (शिवाय सेस लागेलच, त्यामुळे अजूनच कमी) ज्याच्यापेक्षा पीपीएफ चे ८.६% जास्त आकर्षक आहे.
म्हणूनच गॅरंटीड रीटर्न्ससाठी पीपीएफ बेस्ट! :-)
16 Nov 2011 - 10:28 am | ५० फक्त
मी पुन्हा चेक करतो एस्बिआय मध्ये, माझ्यासाठी यावर एक सोल्युशन आहे,
आता मी अकाउंट काढतो माझ्या आईच्या नावानं सिनियर सिटिझन म्हणुन जास्त व्याज मिळतं आणि त्या खात्याला नॉमिनी माझ्या मुलाला करतो, म्हणजे ज्यावेळी अकाउंट मॅच्युअर होईल तेंव्हा सुद्धा कुणालाच टॅक्स बसणार नाही.
17 Nov 2011 - 9:46 pm | मनिष
टॅक्स लायेबिलीटी दर वर्षी मिळणार्या व्याजावर असते रे! :-)
17 Nov 2011 - 10:26 pm | अन्या दातार
इन द हँड्स ऑफ रिसिपियंट असते ना. वरच्या केसमध्ये अकाऊंट ५०फक्त यांच्या आईच्या नावे आहे.आता त्या काही नोकरी वगैरे करत नाहीत असे गृहित धरु शकतो (सिनिअर सिटीझन असल्याकारणाने) पीपीएफ अकाऊंटवरील व्याजाच्या हक्कदारही त्याच असणार. त्यामुळे २,५०,०००/- पर्यंतचे त्यांचे इन्कम करमुक्त असणार, ज्यात या व्याजाचाही अंतर्भाव होतो.
केस २:
मृत्युनंतर नॉमिनी म्हणून ५० यांच्या मुलाचे नाव आहे. समजा, पीपीएफ अकाऊंट मॅच्युअर व्हायच्या आत खातेधारकाचा मृत्यु झाला तर मॅच्युरिटीनंतरची सगळी संपत्ती नॉमिनीच्या नावे होईल, पण त्याच्यावरचा टॅक्स ५० फक्त यांना भरावा लागेल (क्लबिंग ऑफ इन्कमच्या क्लॉजप्रमाणे). त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे रु. १५००/- मात्र त्यांना डीडक्शन मिळेल.
अकाऊंट मॅच्युअर झाल्यानंतर जर रक्कम रु. २,५०,५००/- पेक्षा जास्त असल्यास खातेधारकास टॅक्स भरावा लागेल.
त्यामुळे ५०फक्त म्हणतात ते जास्त योग्य आहे.
अजुन एक उपायः मायनर चाईल्डच्या नावे पीपीएफ अकाऊंट उघडून दरवर्षी फक्त रु. १५००/-भरायचे. जाता जाता एक टॅक्स बचतीचा उपाय. :)
(मिपावर मी लिहिलेला पहिलाच इतका मोठा प्रतिसाद असेल)
18 Nov 2011 - 8:25 am | ५० फक्त
करेक्ट स्पष्टीकरण आहे हे. धन्यवाद रे अन्या.
16 Nov 2011 - 9:31 am | मराठी_माणूस
हा बदल कधी पासुन अमंलात येणार आहे . म्हणजे मि जर ह्या वर्षी ७०००० आधीच भरले असतील तर मि अजुन ३०००० मार्च २०११ च्या आत भरु शकतो का?
17 Nov 2011 - 7:22 pm | तिमा
लहानपणापासूनच पीपीएफ मधे पैसे भरावे, म्हणजे म्हातारपणी मुद्दल आतच राहून, फक्त व्याजाच्या रकमेवर आरामात रहाता येते.
23 Nov 2011 - 9:35 pm | आशु जोग
पोस्ट आणि बँक मधील पी पी एफ यामधे सेवा अधिक कोणाची चांगली असते.
23 Nov 2011 - 9:47 pm | अन्या दातार
तुमची आर्थिक गरज जी स्किम जास्त चांगल्या तर्हेने पूर्ण करेल, ती सेवा अधिक चांगली. :)
दुर्दैवाने इथे एकच फिक्स उत्तर नाही
23 Nov 2011 - 10:41 pm | सोत्रि
दोन्ही सरकारी कारभार असणार्या संस्था आहेत. त्यामुळे एकीला झाकावी अन दुसरीला काढावी असा मामला आहे. :)
खरंतर बॅन्केला काही फायदा नसतो अश्या अकाउंट्समुळे त्यामुळे प्रचंड टाळाटाळ केली जाते सर्व्हिस देताना
- ( एस्बीआयचच्या सर्व्हिसने प्रचंड वैतागलेला ) सोकाजी
23 Nov 2011 - 11:06 pm | कुंदन
कशाल वैतागताय....
एक्दाच पैसे भरायचे , एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात.
नंतर फकत पासबुक अपडेट करायचे एकदा.
सारखे सारखे कशाला जायचे त्यांना त्रास द्यायला.
23 Nov 2011 - 9:59 pm | आशु जोग
दातार
इथे स्कीम दोन्हीकडे एकच असते दोन्ही पी पी एफ एकच असतात
फक्त
आउटलेट्स भिन्न असतात
8 Oct 2012 - 11:44 pm | आशु जोग
या धाग्या बाबत एक शंका
अनेक प्रतिसादांमधे शीर्षक, स्वाक्षरी इ. दिसते आहे
पण प्रतिसादामधील आशय, कंटेंट दिसत नाहीये.
8 Oct 2012 - 11:44 pm | आशु जोग
पी पी एफ अकौंट एका बँकेकडून दुसर्या बँकेकडे ट्रान्स्फर करायचे असेल तर
आधीच्या बॅकेने काय करायला हवे.
दोन्ही बँका(ब्रांचेस) एकाच शहरात आहेत. अर्थिक वर्षाच्या मधेच ट्रान्सफर साठी अर्ज केला आहे.
तर रक्कम पाठवताना ड्राफ्टने पाठवावी की चेकने. ड्राफ्ट चार्जेस घ्यावे का ?
रक्कम देताना व्याजासकट रक्कम द्यावी की व्याज केवळ वर्षाअखेरच दिले जावे
असे काही प्रश्न आहेत
17 Apr 2013 - 8:14 pm | प्रकाश घाटपांडे
कशाला ट्रान्स्फर करताय. एसबीआय मधे असेल तर आता ऑनलाईन पैसे भरता येतात.
http://www.jagoinvestor.com/2011/12/ppf-account-online-investing-netbank...
नंतर वर्षातुन/दोनवर्षातुन एकदा आपले पासबुक अपडेट करायचे
17 Apr 2013 - 8:43 pm | आशु जोग
अहो
म. बॅकेला वैतागलो.
भरलेले पैसे पासबुकात दिसतच नाहीत.
माणसं अति उर्मट, कुठल्याही छोट्या क्वेरीसाठी अनेक टेबले हिंडवणार.
पी पी एफ साठी बँकेत फार जावे लागत नाही. तरी एवढे !
सेविंग्ज अकौंट वाल्यांचे तर काय होत असेल.
9 Oct 2012 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे
का हो? पीपीएफ ची मुदपुर्ती झाल्यानंतर मिळणारी रक्कम पुर्णपणे करमुक्त आहे का? वर म्हटलय की रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागेल. आता त्यात काही नवीन सुधारणा झाल्यात असे ऐकतोय ते खर आहे का?
अवांतर. बहुतांशी प्रतिसादातील मजकूर दिसत नाही
9 Oct 2012 - 3:39 pm | अत्रुप्त आत्मा
@वर म्हटलय की रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागेल. आता त्यात काही नवीन सुधारणा झाल्यात असे ऐकतोय ते खर आहे का?>>> +१
9 Oct 2012 - 11:52 pm | चतुरंग
व्याजदर ८.८% आहे (१ एप्रिल २०१२ पासून).
संपूर्ण व्याज हे करमुक्त असते - अडीच लाखाची लिमिट नाहीये.
10 Oct 2012 - 12:16 am | आशु जोग
माझ्या परेशानीचे उत्तर भेटले असते तर उपकृत झालो असतो
11 Oct 2012 - 7:33 am | पाषाणभेद
अरे मी तर माझे PPF चे अकांउंट मागेच बंद केले होतो. आता चालू करायला हरकत नाही.
30 Apr 2013 - 12:18 pm | वामन देशमुख
बेसिक पगार, नोकरी करणाऱ्याचा हिस्सा, कंपनीचा हिस्सा, पी एफ मुद्दल, पी एस मुद्दल, व्याज, एकूण शिल्लक राशी इ. सर्वांचा अंतर्भाव असलेली सर्वंकष एक्सेल शीट कुणाजवळ असेल तर कृपया लिंक द्या किंवा मला व्यनि करा .
1 May 2013 - 11:14 pm | दिपस्तंभ
माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त एसबीआय बॅन्क आणि जवळच्या पोस्ट ऑफिस मधेच हे खाते उघडता येते. बाकी बॅन्कामधे हि सुविधा नाहि. तसेच,एसबीआय बॅन्क मधे हि अट आहे कि बचत खाते असल्या शिवाय पीपीएफ खाते उघड्ता येत नाही......
2 May 2013 - 12:39 am | सुहास
नाही. एसबीआय आणि पोष्टांव्यतिरिक्त आणखी इतरही ब्यान्कांमध्येही ही (पीपीएफ अकाऊंट)सोय आहे. उदा. आयसीआयसीआय आणि युनियन (या ब्यान्कांमध्ये मी स्वतः चवकशी केलीय आणि आयसीआयसीआयमध्ये पीपीएफ अकाऊंट २-१/२ महिन्यापूर्वी उघडलेय).
-- सुहास
2 May 2013 - 12:35 pm | पिलीयन रायडर
माझे आयडिबीआय मध्ये आहे.. २ वर्षा पासुन..
Public-sector banks that have computerised branches have been allowed to handle Public Provident Fund and Senior Citizens Savings Scheme for the convenience of the public.
The government has also allowed institutionally promoted private sector banks – ICICI Bank, IDBI Bank, HDFC Bank and UTI Bank – to handle PPF and senior citizen scheme.
2 May 2013 - 12:41 pm | पिलीयन रायडर
आणि हो..
माझे त्या बँकेत बाकी कुठलेही खाते नाही..
2 May 2013 - 12:37 am | सुहास
नाही. एसबीआय आणि पोष्टांव्यतिरिक्त आणखी इतरही ब्यान्कांमध्येही ही (पीपीएफ अकाऊंट)सोय आहे. उदा. आयसीआयसीआय आणि युनियन (या ब्यान्कांमध्ये मी स्वतः चवकशी केलीय आणि आयसीआयसीआयमध्ये पीपीएफ अकाऊंट २-१/२ महिन्यापूर्वी उघडलेय).
-- सुहास
2 May 2013 - 1:58 pm | निवेदिता-ताई
बातमी छान आहे... वाचून आनंद झाला.