पाट्यांसाठी भारी !!!!!!

स्वतन्त्र's picture
स्वतन्त्र in काथ्याकूट
5 Nov 2011 - 2:35 pm
गाभा: 

पुण्याच्या रविवार पेठेत दिवाळीच्या खरेदी साठी गेलो होतो.दिवाळीच्या फराळाचा दिवाळीआधीच 'ओवरडोस' झाला असल्याने घसा जरा दुखत होता.म्हणून 'विक्स' घ्यायला तिथल्याच मेडीकल दुकानात गेलो.
हल्ली काही लोकं डॉक्टरांच्या प्रेस्क्रीपशन शिवाय औषध घेतात.त्यासाठी तेथील दुकानदाराने काचेच्या टेबलाखालीच गोळ्या आणि त्यावर पाट्या लावल्या होता.
फोटो मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले आहेत त्यामुळे जरा धूसर आहेत.तेवढा कृपया सांभाळून घ्या.

सगळ्या पाट्या आणि गोळ्या.

त्यातल्या काही निवडक..
पोटदुखी भारी गोळी.

सर्दी डोकं ताप भारी गोळी,जुलाब साठी भारी.

आणि हि शेवटची....

चांगलीच सोय केली आहे.......

प्रतिक्रिया

स्वतन्त्र's picture

5 Nov 2011 - 2:36 pm | स्वतन्त्र

क्षमा करा,चूकून काथ्याकुट मध्ये टाकला गेलं आहे.....

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2011 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा

बा बो... खतरी गोळीबार हाय हो... ;-)

सुहास झेले's picture

5 Nov 2011 - 8:27 pm | सुहास झेले

:D :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी खत्रा गोळीबार. :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Nov 2011 - 6:55 pm | पैसा

पण या सगळ्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देतात?

स्वतन्त्र's picture

5 Nov 2011 - 7:15 pm | स्वतन्त्र

तो विक्रेता ह्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देतोय !
बर्याच दुकानात हा प्रकार चालतो.

विवेक वाटवे's picture

18 Nov 2011 - 11:49 pm | विवेक वाटवे

या गोल्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेत्ल्या म्हणुन काही फरक पदत नही.

अहो तुम्हाला काय माहीत काही फरक पडतो की नाही ते ? अन चुकून माकून काही झालं तर त्याला जबाबदार कोण ?

आनंदी गोपाळ's picture

6 Nov 2011 - 11:48 pm | आनंदी गोपाळ

काय वाट्टेल ते मेडिसिन बिना प्रिस्क्रिप्शनचे मिळते. बाकी नावावरून बरी औषधं वाटताहेत. पण बॉम्बे मार्केट..

पैसा's picture

6 Nov 2011 - 11:53 pm | पैसा

इथे गोव्यात साध्या औषधांसाठी सुद्धा, अगदी ओळखीचा केमिस्ट असला तरी डॉक्टरचं नाव विचारून व्यवस्थित बिलात सगळं लिहूनच देतो!

विवेक वाटवे's picture

18 Nov 2011 - 11:55 pm | विवेक वाटवे

ज्योती बाई

अगाच काहि सान्गु नका. मि पन गोव्यालाच राहतो ईथे पण त्या सहज मिल्तात.

पैसा's picture

19 Nov 2011 - 8:04 pm | पैसा

फोंड्यातल्या एकाही दुकानात मिळत नाहीत.

विवेक वाटवे's picture

24 Nov 2011 - 11:47 pm | विवेक वाटवे

फोन्डा म्हणजे पुर्ण गोवा नव्हे पणजी, म्हापशात ही औष्धे सहज मिळ्तात.

पाषाणभेद's picture

7 Nov 2011 - 2:01 am | पाषाणभेद

पेप्रात कधी कधी अमुक अमुक कंपन्यांच्या तमुक तमुक फॉर्मुल्यावर बंदी किंवा 'अमक्या अमक्या' ठिकाणी बोगस औषधांवर छापा घातला असल्या बातम्या येतात. महाराष्ट्रात असले प्रकार होतात काय? अन्न-औषधे तपासणारे इन्स्पेक्टर्स कशा पद्धतीने कामे करतात? एकुणच केमिस्ट-ड्रगीस्ट व्यवसायाबद्दल सामान्यजनांना फार कमी माहीती असते. हा व्यवसाय अवाजवी नफा देणारा असावा असा अंदाज आहे. डॉक्टर-औषधकंपन्या-केमिस्ट-ड्रगीस्ट-होलसेलर्स-रिटेलर्स हि साखळी फार मजबूत आहे. या धाग्याच्या निमीत्ताने कुणी अधिकारीव्यक्ती या सार्‍यांवर लेख लिहून अधिक प्रकाश टाकू शकेल.

त्याने काय होईल पाभेजी?
इन्स्पेक्टर लोक नीट कामे करू लागतील, की फार्मा कंपन्या तुम्हाला लुटणे थांबवतील? आहेच अवाजवी नफा त्यात. पण सध्या तरी पाकीस्तानात जी अ‍ॅस्पिरिन ची गोळी ७५रुपयांना मिळते ती आपण ५० पैशांत विकत घेऊ शकतो, यात सुख मानावे!

अन ती लोकं , शेजारच्या देशाची डोकेदुखी वाढवत आहेत त्याचे काय ?
बाकी पाकीस्तानात डोकेदुखी हा रोग सर्वात जास्त ओपीडी रुग्णालयात दिसून येतो असे ऐकून आहोत.

आधी वाटल चुकुन पाभेचाच धागा उघडला की काय?

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 9:37 am | मदनबाण

ह्म्म... प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या मिळतात हे वास्तव आहे.