गरजूला मदत करावी का?

मन's picture
मन in काथ्याकूट
3 Nov 2011 - 12:52 pm
गाभा: 

गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील.
आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे?
http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली.
पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते.
अर्थातच आपण वीज देणार म्हणजे निव्वळ जनहितार्थ देणार असे नाही. ती वीज"विक्री"च असेल. पण सध्या आपले आणि "त्यांचे" संबंध लक्षात घेता, हे करणे पटते का? आपण स्वतःच पाकिस्तानमार्गे येणार म्हणून इराणच्या अत्यंत उपयुक्त, किफायतशीर इंधनाच्या पापलाइनला टाळतोय. ह्याहून अधिक सांगण्याची ती काय गरज? शेजारी देश आणि आपले संबंध कसे आहेत, ह्यावार आधीच इथे प्रचंड चर्चा झाली आहे. ते पुन्हा लिहायची गरज वाटत नाही.

एक गट भावनिकतेतून म्हणतो की हा आपला शत्रू आहे. शत्रूशी संबंध ठेउ नयेत.
दुसरा मुत्सद्द्यांचा गट म्हणतो की असे हितसंबंध गुंतवणे हा कलह शांतपणे सोडावायचा व कलहात आपली कमीत कमी हानी करून घेण्याचा राजमार्ग आहे. जर आपली भरपूर देवाण घेवा॑ण असेल, तिथली अर्थव्यवस्था व समाजजीवन मोठ्या प्रमाणावर आपल्यावर अवलंबून असेल, तर तिथल्या जनतेलाच आपल्याशी वैर परवडणार नाही. शिवाय योग्य त्या वेळी आपल्याला त्यांचे नाक दाबायचीही सोय होइल.(कारण आपली अर्थव्यवस्था कैकपट मोठी आहे.)
साधारणतः ह्याच भावनेतून पाश्चात्त्य देशांनी, "दोस्त राष्ट्रांनी" दुसर्‍या महायुद्धानंतर आपले आर्थिक संबंध गुंतवून घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रिओय पातळीवर ह्या गोष्टीचा पुरस्कार केला.

एक उदाहरण म्हणजे आज ते वीज घेताहेत व हळुहळु संबंध वाढत जाउन त्यांची निदान काही भागातली का असेना जनता मोठ्या प्रमाणात आपल्यावर अवलंबी होणार. त्यावेळेस जर ह्यांनी कुरापत काढली, तर एक गोळीही न चालवता आपण फक्त सप्लाय थांबवून त्यांना बेजार करु शकतो.(अमेरिका-चीन आपसात असेच काही करत कुरघोडी करायचा छुपा प्रयत्न करताना सतत दिसतात.)तसेही प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता आपण नगण्ञच धरून चाल्लोत.थोडक्यात, वीज हे एक अदृश्य हत्यार असेल.

अजून एक आयाम म्हणजे, मुळात भारतात स्वतःलाच पुरेल इतकी वीज नाही. मग दुसरीकडे कशाला द्यावी? ह्या अजस्त्र विक्सनशील अर्थव्यवस्थेची उर्जाभूक दिवसेंदिवस तशीही वाढनारच आहे.

तुम्हांस काय ठीक वाटते?

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 Nov 2011 - 1:44 pm | पैसा

आपल्याला पुरेशी वीज आहे का? जास्त असेल तर विकायला हरकत नाही, पण भारतात तुटवडा आहे, भारनियमन चालू आहे अशा अवस्थेत तोटा सोसून (सबसिडी वगैरे देऊन स्वस्तात विक्री) कोणालाही वीज किंवा इतर अन्नधान्य वगैरे पुरवू नये.

आपल्याच आडात वीज कमी असताना ह्यांना वीज द्यायची कुठून. बाकी खाजगी वीज विक्री केंद्रांनी चढ्या दराने ह्यांना वीज विकली तर ठीक आहे. बाकी फुकट काही द्यायची गरज नाही.

- पिंगू

कच्ची कैरी's picture

3 Nov 2011 - 2:11 pm | कच्ची कैरी

पैसा यांच्याशी पूर्णपणे सहमत .

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 2:41 pm | धमाल मुलगा

इराणहून येणार्‍या गॅसलाईनच्या प्रकरणात पाकिस्तानातून पाईपलाईन येणार असल्याने त्यांचा वरचष्मा, आणि आपण अवलंबून राहणार होतो. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन त्या प्रकल्पातून भारताने माघार घेतली. 'पाकिस्तानातली सुरक्षा' हा कळीचा मुद्दा जवळपास सर्वच देशांसाठी अविश्वसनीय आहे, मग पाकिस्तानाच्या पारंपारिक शत्रूसाठी तर ते अधिकच धोकादायक ठरणार ना?

पण पाकिस्तानाला वीजविक्री करणे ह्यामध्ये बरोब्बर उलट चित्र दिसतंय. वरचष्मा भारताचा राहील. कारण काही प्रमाणात का होईना पाकिस्तानाचा काही भाग वीजेसाठी परावलंबी होईल. आणि मनोबाच्या म्हणण्याप्रमाणे वीज हे एक दबावतंत्राचे हत्यार म्हणून काम करु शकेल.

साधारणतः ह्याच भावनेतून पाश्चात्त्य देशांनी, "दोस्त राष्ट्रांनी" दुसर्‍या महायुद्धानंतर आपले आर्थिक संबंध गुंतवून घ्यायला सुरुवात केली. एक उदाहरण म्हणजे आज ते वीज घेताहेत व हळुहळु संबंध वाढत जाउन त्यांची निदान काही भागातली का असेना जनता मोठ्या प्रमाणात आपल्यावर अवलंबी होणार.

हे जरी खरं असलं, तरी त्यामध्ये असलेला मोठा धोका म्हणजे अशा व्यवहारातून हळूहळू जसं गरजू राष्ट्राला अवलंबून रहावं लागतं, तसंच पुरवठादार राष्ट्रालाही उत्पादित वस्तूची विक्री सातत्यानं होत राहण्यासाठी अवलंबून रहावं लागेल. मग एकतर नाक दाबण्याची क्लुप्ती दोन्ही बाजूंनी वापरली जाण्याची शक्यता जास्त वाढेल. किंवा विळ्याभोपळ्याची मोट बांधून ठेवली तरी ती फार काळ न टिकता दोहोंबाजूंना नुकसान सोसत बंद करण्याचीही वेळ येऊ शकते.

अर्थात ही माझी वैयक्तिक आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय असलेली सर्वसामान्य मतं आहेत. अधिक आणि योग्य मतं आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि अशा विषयांमधले तज्ज्ञ देतीलच.
अगदीच रहावलं नाही म्हणून आम्ही आपली आमच्या मताची पिंक टाकली इतकंच. फार शिरेसली घेऊ नये. :)