ए रोझ फॉर ए रोझ

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
28 Oct 2011 - 11:15 am


गुलाबांचा गुलाब.


गुलाबांचा डॉल्फीन.

माझे मनोगत :--- जुन्या प्रोजेक्टवर काम करताना माझे जगभरातील अनेक लोकांशी बोलणे होत असे...लोकांशी बोलुन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे (ट्रबल शुटिंग) हा माझ्या कामाचा भाग होता. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका अशा जगभरातील लोकांशी बोलण्याद्वारे माझा संबंध येत असे.त्याच बरोबर थर्डपार्टी सर्व्हीस प्रोव्हाडर (ज्यांचा माझ्या क्लायंटशी करार होता) त्यांच्याशी देखील माझे बर्‍याच वेळा बोलणे होत असे.मला मुळातच लोकांशी बोलायला आवडते...लोकांशी बोलुन बर्‍याच गोष्टी शिकता येतात शिवाय त्यांनाही अनेक गोष्टी सांगता येतात्.अश्या थर्डपार्टी व्हेंडर पैकी काही होते व्हेरिझॉन,डायमेनश डेटा,नियानेट इ.

राउटर,स्विचेस आणि अ‍ॅक्सेस पॉइंट संबंधी काही प्रॉब्लेम असेल तर मी या थर्डपार्टीवाल्यांशी आयपी फोन वरुन बर्‍याचदा बोलायचो...त्यात व्हेरिझॉन अग्रक्रमांकावर होते.एक दिवस फ्रान्स मधे गोलाइव्ह होते आणि पॅरीस मधला राउटर डाउन होता...काही झाले तरी तो मला कोणत्याही परिस्थीतीत अप करुन हवा होता,त्यासाठी पॅरीसमधल्या काही लोकांशी माझे बोलणे झाले आणि नंतर मी व्हेरिझॉनवाल्यांना फोन लावला...

रोझ कॉलवर आली...तिचा तो सुमधुर आवाज कानावर पडला आणि आमचे बोलणे सुरु झाले.रोझ आणि मी या आधीही बर्‍याच वेळा बोललो होतो,त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना चांगलेच ओळखायला लागलो होतो...जेव्हा ती आमच्या डेस्कवर फोन करायची आणि मी फोन उचलायचो तेव्हा फक्त माझ्या हॅलोवरुनच मी कॉलवर बोलतोय हे तिला लगेच कळायचे...अगदी गोड मुलगी होती ती :)

तर रोझला मी सांगितले की पॅरीसमधला राऊटर डाउन आहे,आणि मला हाय प्रायॉरिटीवर हा राउटर अप करुन हवा आहे तेव्हा कृपया मला मदत कर... ती म्हणाली हरकत नाही... मी प्रयत्न करते. यावर आमचे बरेच मेल एकमेकांना पाठवले गेले शेवटी राउटर अप झाला आणि त्याला मी पिंग करुन पाहिले.

तिने पाठवलेल्या शेवटच्या मेल मधे मी तिला धन्यवाद दिले आणि जालावरचा एक गुलाबाचा फोटो अ‍ॅटॅच करुन खाली एक ओळ लिहली आणि तिला मेल पाठवला.

ती ओळ होती...

ए रोझ फॉर ए रोझ... :)

तिच्या प्रयत्नांमुळे माझे काम पटकन झाले आणि तिला मी पाठवलेला मेल आणि मेल मधला गुलाब आवडला असे तिने मला कळवले...

पण एक गोष्ट माझ्या मनात राहिली ती म्हणजे गुलाबाचा तो फोटो... तो फोटो मी काढला नव्हता...त्यामुळे संधी मिळेल तसे गुलाब टिपण्याचा निश्चय मी त्यावेळी केला.

हाच माझा तो गुलाब टिपण्याचा एक प्रयत्न...

*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.

(हौशी फोटुग्राफर) ;)

मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Oct 2011 - 11:20 am | प्रचेतस

फोटू एकदम मस्त. गुलाबांचा डॉल्फिन विशेष आवडला.
कुठल्या बागेतले हे फोटू आहेत?


उटी मधे फिरत असताना तिथे एक रोझ शो लागला होता,मग काय मिला मौका मारा चौका. ;)

स्वानन्द's picture

28 Oct 2011 - 11:22 am | स्वानन्द

मस्त!. फोटू आणि किस्सा दोन्ही :)

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 11:49 am | नगरीनिरंजन

मस्त!. फोटू आणि किस्सा दोन्ही :)

आईगं...... गुलाब... म्हणजे माझा वीक पॉईंट आहे.... मस्तच एकदम... :)

jaypal's picture

28 Oct 2011 - 1:19 pm | jaypal

".त्यामुळे संधी मिळेल तसे गुलाब टिपण्याचा निश्चय मी त्यावेळी केला."
फारच छान(संधी साधु) फोटो आहेत.

स्मिता.'s picture

28 Oct 2011 - 1:26 pm | स्मिता.

सगळे फोटो अतिशय सुरेख आहेत.

तिसर्‍या फोटोपासून सगळे फोटो आवडले.

मोहनराव's picture

28 Oct 2011 - 5:55 pm | मोहनराव

मस्त फोटु!!

राजघराणं's picture

29 Oct 2011 - 6:10 pm | राजघराणं

पैसा's picture

29 Oct 2011 - 10:07 pm | पैसा

सगळे वॉलपेपर्स करून ठेवण्यासारखे आलेत.

सुहास झेले's picture

29 Oct 2011 - 10:58 pm | सुहास झेले

मस्त रे बाणा... सगळे आवडले :) :)

शिल्पा ब's picture

30 Oct 2011 - 7:40 am | शिल्पा ब

मस्त.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2011 - 6:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रोझ फॉर अ रोझ फ्रॉम मदन!!! लै भारी ;)

दत्ता काळे's picture

31 Oct 2011 - 6:12 pm | दत्ता काळे

फोटो मस्तं आहेत.

ह्या रोझेस सोबत त्या रोझचा तुम्ही टिपलेला एक फटु हवा होता असे वाटून गेले.... ;)
फुलं मस्त आहेत हे वे सां न ल....