प्रतिमास्फोट

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
23 Oct 2011 - 2:56 pm

धनंजय यांच्या चित्रावरुन मला 'गती' या प्रकारातील प्रतिमास्फोट हा चित्रणप्रकार आठवला.

या चित्रणप्रकारातले चित्र पाहताना त्या प्रतिमेचा किंबहुना विषयाचा केंद्रापसारी स्फोट होउन चित्रकण वेगाने सर्व दिशांना फाकत आहेत असा आभास निर्माण होतो आणि वेगाची जाणीव होते. चित्रणातील वस्तू (विषय) आकाशात उंच गेल्यावर बाण फुटुन सर्वत्र रंगीबेरंगी प्रकाश पसरतो तशी केंद्रापासुन बाहेर झेपावत आहे असा आभास होतो.

हे चित्रण करताना भरारीभिंग वापरावे लागते. अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण कालावधीतच फरारीभिंगाचे नाभीय अंतर बदलावे लागते म्हणजे प्रतिमादर्शन लांबुन जवळ व जवळुन लांब करावे लागते. थोडक्यात कळ दाबणे व भरारीभिंगाचे चलन हे एकसमयावच्छेदेकरुन साधावे लागते.

या प्रकारातला हा माझा एक प्रयत्न.

sphot

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

झालेल्या स्फोटामुळे प्रतिमा नष्ट झालेली दिसतेय!

आत्मशून्य's picture

23 Oct 2011 - 3:46 pm | आत्मशून्य

"फरारीभिंगाचे नाभीय अंतर", "अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण" वगैरे "टर्म्स" साध्या सोप्या मराठीत लिहल्या असत्या तर लेख माझ्या सारख्या सामान्य बूध्दी जनांना जास्त व्यवस्थीत कळला असता.

मोहनराव's picture

23 Oct 2011 - 4:16 pm | मोहनराव

सहीच!!

अविनाशकुलकर्णी's picture

24 Oct 2011 - 10:46 am | अविनाशकुलकर्णी

कुठलाही काढलेला फोटो फोटो शोप मधे टाकून हवा तसा बदलता येतो...अनेक प्लग इन व फिल्टर उपलब्ध आहेत.
मग सदर फोटो पेन ड्राइव्ह मधे सेव्ह करुन तो बाहेर प्रिंट हि करता येतो.....टिळक रोड वरचा हिरा फोटो स्टुडीओ ह्या साठी प्रसिद्ध आहे..
असो .........फोटो मस्त जमला आहे

मर्द मराठा's picture

25 Oct 2011 - 8:37 am | मर्द मराठा

प्रयत्न आवडला... माझ्या मते कमी आहे ती फक्त स्पष्टतेची.. मध्यभागी असलेले फुल जरका अजून स्पष्ट आले असते... तर तो केंद्रापसारी आभास अधिक परिणामकारक झाला असता..
वरील छायाचित्र हातपकडीचे असेल तर आयएसओ वाढवून आणि नसेल तर भक्कम तिपाई वापरून काढले असते अधिक स्पष्ट आले असते असे वाटते.

आत्मशुन्यः
सोप्या मराठीत सांगायचे कॅमेर्‍याची झूम लेन्स पूर्ण झूम करावी... छायाचित्रणकाल थोडा वाढवायचा आणि छायाचित्रणासाठी कळ दाबायची.. त्याच वेळी झूम सरर्र्कन आत खेचावी... . 'पहा व टिपा' प्रकारच्या छायाचित्रणात हे जमणे शक्य नाहीये.. कारण त्यात छायाचित्रणकाळ वाढवणे शक्य नसते... एसएलआर प्रकारच्या कॅमेर्‍यात ते करणे शक्य होईल.
झूम आत खेचताना <कळ दाबणे व भरारीभिंगाचे चलन हे एकसमयावच्छेदेकरुन साधावे लागते > म्हणजे कंटीन्युअस फोकस ठेवावा म्हणजे ज्या विषयापासून केंद्रापसारी आभास करायचा आहे ते सूस्पष्ट येईल.

फरारीभिंगाचे नाभीय अंतर : झूम लेन्सची फोकल लेंग्थ.. २४-७० मी.मी. ची लेंस असेल पूर्ण झूम करायची.. नाभीय अंतर= ७०
मी.मी. आणि अनावरण काल दीर्घ ठेवून छायाचित्र घेत असताना (म्हणजे लाँग शटरस्पिड) झूम आत खेचावी नाभीय अंतर = २४ मी.मी.

सर्वसाक्षी's picture

25 Oct 2011 - 11:43 pm | सर्वसाक्षी

तिपाई असूनही असे झाले तेव्हा कदाचित अगदी जवळुन टिपल्याने असावे. पुन्हा प्रयत्न करतो!
धन्यवाद

जागु's picture

25 Oct 2011 - 12:26 pm | जागु

छान.

विजुभाऊ's picture

25 Oct 2011 - 11:12 pm | विजुभाऊ

अनावरण काल = अ‍ॅपरेचर टायमिंग.
फरारी भिंग म्हणजे काय हो. आमच्या सारख्या भाषादरिद्री माणसाला उमजेल असे सांगा की म्हाराज

सर्वसाक्षी's picture

25 Oct 2011 - 11:49 pm | सर्वसाक्षी

म्हणजे एक्सपोजर (शटर स्पीड/ ग्रहणछिद्राचा आकार याचे फलित)!
भरारी भिंग म्हणजे झूम लेन्स. ज्या भिंगाच्या भरारीमुळे कॅमेरा आणि विषय यातले अंतर कमी जास्त करता येते ते भरारी भिंग. थोडक्यात म्हणजे पल्ला विस्तृत असलेले व अनेकविध भिंगांचा समन्वय असलेला भिंगसंच.

धन्यवाद

पाषाणभेद's picture

26 Oct 2011 - 7:49 am | पाषाणभेद

आपण जशा प्रकारे मराठी शब्दांचा वापर केला आहे तो कौतूकास्पद आहे.

सर्वसाक्षी's picture

29 Oct 2011 - 4:56 pm | सर्वसाक्षी

अभिप्रायासाठी आभारी आहे.

धनंजय's picture

27 Oct 2011 - 11:23 pm | धनंजय

छान तंत्र.

ज्या विषयांमध्ये (कथानकामध्ये) केंद्रबिंदू आहे अशा चित्रांसाठी एक चांगले तंत्र आहे.

खरे तर प्रकाशाच्या दृष्टीने हे थोडेफार "पॅनिंग/ट्रॅकिंग"शी समांतर आहे : जर अनावरणकालात कथाविषयाकडे धावत जाता आले असते, तर हाच परिणाम साधला असता. फरारीभिंगामुळे हे "पळणे" बसल्याजागी होते.

यशोधरा's picture

29 Oct 2011 - 6:36 pm | यशोधरा

चांगला प्रयत्न. हे करुन पाहीन. धन्यवाद,

एक विनंती आहे की तुमचा तंत्रशुद्ध मराठी वापरण्याचा आग्रह समजू शकते, पण कंसामध्ये इंग्लिशमध्ये किंवा देवनागरीतच नेहमीचे प्रचलित इंग्लिश शब्द लिहिले तर तंत्र समजून घेण्यास थोडे अधिक सोपे जाईल. धन्यवाद.

मदनबाण's picture

31 Oct 2011 - 9:39 am | मदनबाण

यशोशी सहमत...
पण हा प्रयोग मला करुन पाहता येणार नाही,कारण माझ्याकडे लेन्स्वाला कॅमेरा नाही. :(

(प्रयोगशील)

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2011 - 10:52 am | सर्वसाक्षी

उत्तम सूचना, यापुढे अवश्य लक्षात ठेवीन.
धन्यवाद