ई॑ग्रजी आणि मराठी मधला साकव

छत्रपति's picture
छत्रपति in काथ्याकूट
13 Oct 2011 - 3:15 pm
गाभा: 

www.saakava.com हे संकेतस्थळ १ मे २०१० - महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी सुरू करण्यात आले. या संकेतस्थळावर इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर दिले जाते. हे भाषांतर साकव या संगणक प्रणालीद्बारा करण्यात येते. नियमितपणे या प्रणालीत आम्ही सुधारणा करत आलो आहोत आणि हे प्रयत्न आम्ही करतच राहू. या सुधारणा करताना, लोकांकडून आलेल्या वेगवेगळ्या सूचना आणि त्यांनी साकववर दिलेली वाक्ये यांचाही विचार करण्यात आला.
खरं तर संगणकीय भाषांतर प्रणाली विशेषतः वेगळ्या कुटुंबातल्या भाषांसाठी हा प्रचंड वेळखाऊ तसेच खर्चिक प्रकल्प आहे. अशा प्रकारचा मराठीतील हा बहुधा पहिलाच प्रकल्प असावा. निदान इतक्या सहजरीतीने वापरता येणारा तरी पहिलाच.
सध्या यामध्ये जवळपास दोन लाख शब्द (किंवा शब्दसमूह/वाक्प्रचार) आहेत. साधारणतः ज्या वाक्यरचना इयत्ता सातवीतील(मराठी माध्यम) विद्यार्थ्याला माहिती असणे अपेक्षित आहे, अशा वाक्यरचनांचा अंतर्भाव यामध्ये आहे. या प्रणालीत त्यानंतरच्या वाक्यरचनांचा अंतर्भाव करण्याचे काम सुरू आहे.
भाषांतर-क्षेत्राशी निगडित असलेल्या काही तज्ञांनी ई-पत्र पाठवून आम्हाला उत्तेजन दिले तसेच उपयुक्त अशा सूचनाही दिल्या. मुंबईची एक मुलगी दहावीला असून, मराठी ही तिची दहावीसाठी तिसरी भाषा आहे. साकव आपल्या मराठीच्या अभ्यासात उपयोगी पडल्याचे तिने आवर्जून लिहिले. यांमुळे आमचा हुरूप वाढला आहे. अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. या सर्वांचे मनापासून आभार.
मराठी दिनानिमित्त जे संस्करण सादर करत आहोत त्याचा एक विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित अशा पारिभाषिक शब्दांचा समावेश. त्यासंबंधी अधिक माहिती संकेत-स्थळावर दिली आहे. अर्थात काही इतर संकेतस्थळांवरही असे शब्द उपलब्ध आहेत. आणखी काही विषयांतल्या पारिभाषिक शब्दांचे काम चालू आहे. त्यातले काही म्हणजे व्याकरण, पर्यावरणशास्त्र आणि वैद्यकशास्त्र. पारिभाषिक शब्द संगणकावर लगेच उपलब्ध असणे हे खूपच उपयोगी आहे, त्याचा आपण जरूर उपयोग करून पहावा.

सदर उपक्रमात आपण वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होऊ शकता .
१. या संकेतस्थळाला आज तर भेट द्याच. सदर संकेतस्थळ वेळोवेळी वारंवार अद्ययावत केले जात असल्यामुळे, आज होण्या‐या चुका पुढच्या वेळी दुरुस्त झालेल्या असण्याची शक्यता आहे. म्हणून या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.
२. आपण भाषांतरासाठी दिलेली वाक्यं उपयुक्त असतात. त्यामुळे वेळवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना असणारी वाक्ये भाषातंरासाठी देऊन साकवला नवनवीन रचना शिकण्यास मदत करा.
३. एकाच प्रकारच्या वाक्यरचना जर चुकत असतील, तर Saakava.Suggestion@gmail.com या ठिकाणी आपण साकवच्या त्रुटी नोंदवू शकता.
४. हे ई-पत्र कृपया आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या परिचयाच्या अभ्यासकांना पाठवा, त्यामुळे साकवला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे शक्य होईल.
५ . भाषांतर, संगणकीय भाषांतर अशा प्रकारचे फोरम, ब्लॉग, ऑर्कुट/फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग यामध्ये साकवचा शक्य असल्यास उल्लेख करावा.

कळावे, ही विनंती.
आपला,
साकव.

ता.क.
मी आपला एक सामान्य निरोप्या...!!!

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

13 Oct 2011 - 3:21 pm | किसन शिंदे

ट्राय करून पाहीलं पण..

Server Error in '/' Application. असा एरर दाखवतयं.

छत्रपति's picture

13 Oct 2011 - 3:24 pm | छत्रपति

ईयत्ता ७ वी पर्यंत च्याच वाक्यरचना तिथे सद्ध्या बघायला मिळतिल. एखादा नुसता शब्द टाकून पहा...!!!

धन्या's picture

13 Oct 2011 - 5:25 pm | धन्या

छान प्रयत्न.

परंतू विषयांच्या खालीटाक यादीमध्ये (ड्रॉपडाऊन लिस्ट ;) ) पॅथॉलोजीलॉजीचे विकृतीशास्त्र असे भाषांतर खटकले.

पैसा's picture

13 Oct 2011 - 6:59 pm | पैसा

हळूहळू सुधारणा होतीलच!

बहुगुणी's picture

13 Oct 2011 - 8:52 pm | बहुगुणी

'साकव' हा उत्तम प्रयत्न आहे. मला स्वतःला या प्रयत्नांमध्ये यथाशक्ति भाग घ्यायला आवडेल.

सहज test केलेल्या प्रयत्नांचा थोडक्यात अनुभव इथे देतोय, संस्थळ-कर्त्यांना सविस्तर निरोपही पाठवेनच.

१. Medicine हा पर्याय विषयांमध्ये नाही, म्हणून heart attack, diabetes हे शब्द Physiology (शरीरशास्त्र) किंवा pathology (विकृतीशास्त्र) या विषयांमध्ये शोधले. heart attack या शब्दाचा कुठेच अर्थ मिळाला नाही (pathology मध्ये heart साठी 'हृदय' असा योग्य शब्द दिसला), 'diabetes' साठी Physiology मध्ये मधुमेह असा योग्य शब्द दिसला.

२. 'cancer' चं 'कर्करोग' असं योग्य रुपांतर आढळलं, पण ते 'physiology' विभागामध्ये आहे, (diabetes प्रमाणेच) ते 'pathology' मध्ये असायला हवं असं वाटतं.

३. psychology हा शब्द 'शरीरशास्त्रा'त 'मानसशास्त्र' असा बरोबर रुपांतरित केलेला आढळला, पण pathology मध्ये 'प्स्य्चोलोग्य' असं दिसतं.

४. 'शरीरशास्त्र' हे रुपांतर मला वाटतं 'anatomy' साठी योग्य ठरेल, 'physiology' साठी नाही. ['Physiology' ला काय म्हणावं, 'शरीर-कार्य शास्त्र'? कारण physiology मध्ये function of living systems अभिप्रेत आहे. आणि त्याच पद्धतीने विचार केला तर 'anatomy' साठी 'शरीर-रचना शास्त्र' असा शब्द योग्य ठरावा.]

५. 'mechanical' या शब्दाचं रुपांतर 'civil engineering' 'general scientific terminology, किंवा 'physics' यांपैकी कुठेच दिसलं नाही.

पण एकंदरीत, चांगला उपक्रम आहे, संस्थळ-कर्त्यांना अभिनंदन आणि आभार जरूर कळवा (मीही लिहीनच.) माहितीबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2011 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला उपक्रम. शुभेच्छा.

बाकी, संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बहुदा उघडत नाही. :(

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 1:38 pm | अत्रुप्त आत्मा

I love you च भाषांतर- मी प्रेम तू(तुम्ही). असं आलं :-(

प्रत्यय येण्यासाठी सामान्य हा पर्याय ठेउन ,,, काही प्रयोग केले,पण काही भाषांतरे आली,,,काही विस्कळीत रचनेची रुपांतरे आली,,,काही शब्दांतरे आली... तर काही भाष्यांतरे ही आली... उदा- इंग्रजीत 'प्रोफाइल' असं लिहिल्यावर = प्रोफिले हे प्रत्ययाला आलं ...