खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर

Primary tabs

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
5 Oct 2011 - 4:38 pm

मिसळपाववर लेखन करण्यासाठी काही संकेत आहेत. त्यानुसार सामाजीक संकेतांचे पालन करून येथे जाहीर लेखन केलं जातं. यासोबतच मिसळपाववर खरडवही आणि खरडफळा अश्या सोई दिलेल्या आहेत. यापैकी खरडवही जरी सदस्याची व्यक्तीगत असली तरी त्यावरचा मजकुर अन्य सदस्यांना दिसतो.त्यामुळे खरडवही आणि खरडफळा या दोन्ही जागी काही लिहायचे असल्यास त्यावर सुध्दा मिपाचे नियम लागू होतात.

गेल्या एकदोन दिवसांत मिपावर जो काही प्रकार चालू आहे तो चुकच आहे. मात्र त्या लिखानात तांत्रीक दृष्ट्या तरी चुक काढता येत नाही. मात्र त्याला विरोध म्हणून खरडवहीत जे खालच्या पातळीवर लिहील्या गेलं आहे ते तर १००% चुकच आहे. अश्या किंवा अन्य कुठल्याही घाण लिखाणाला मिसळपाववर स्थान नाही. ज्यांनी असे प्रकार केले आहेत त्यांना ही जाहीर सूचना आहे की त्यांनी आपलं वागणं सुधारावं. अश्याच प्रकारे चुक पुन्हा झाली तर सूचना न देता कारवाई करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.

तसेच तांत्रीक दृष्ट्या जरी बरोबर असला तरी या संदर्भातील लेखाचा रोख सुध्दा कळून येतो. सबब त्या लेखासाठी सुध्दा अशीच सूचना देण्यात येते की उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:05 pm | आण्णा चिंबोरी

लै मज्जा मज्जा चालू आहे.

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 9:24 pm | क्रेमर

मिपावर सुरू असलेल्या खरडलढायांतून उरलेल्या काही खरडी वाचनात आल्या. त्यातील भाषा ही अत्यंत हीन दर्जाची आणि अवमानास्पद आहे. सदस्यांवर कारवाई करावी किंवा करू नये ते मालक आणि त्यांच्या मंडळांनी ठरवावे. काहीतरी केल्याचा आव मात्र आणू नये, अशी किमान अपेक्षा आहे. ही निव्वळ अपेक्षाच आहे, मागणी नाही.

___
ज्या खरडीवरून हे सर्व सुरू आहे ती खरड वाचनात आली. तो किळसवाणा मजकूर पूर्ण वाचवला गेला नाही. संपादनाशी संबंधित काही लोकांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे. त्यातील काहींची लंगडी समर्थने वाचली. यापुढे काही अपेक्षा नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रेमर यांच्या संपूर्ण प्रतिसादाला +१

सदर खरड काही मित्र-मैत्रीणींनी वाचलेली नाही, पण ती त्यांना पाठवावी असं मला वाटत नाही. त्यांनीही ती खरड पाठवली नाहीस तरी चालेल असंच उत्तर दिलेलं आहे.

प्रियाली's picture

5 Oct 2011 - 9:28 pm | प्रियाली

उलट ती खरड पाठवावी. आपण ज्या संकेतस्थळावर वावरतो तिथे कोणत्या प्रकारचे विकृत लोक वावरतात हे जाणण्याचा हक्क सर्वांना आहे.

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:30 pm | आण्णा चिंबोरी

श्री. क्रेमर कृपया ती खरड मला पाठवावी. मी आपला आजन्म उपकृत राहीन. मराठी भाषेतील सध्याचा किळसवाणा मजकूर कसा असतो हे जाणण्याची उत्सुकता मला आहे.

आण्णा चिंबोरी

या धाग्यावर पुरेशी चर्चा झाल्याने वाचनमात्र करण्यात येत आहे.