सर्वसामान्य आजाराबद्दल माहिती न देणे विमा रक्कम नाकारण्याचे कारण असू शकत नाही

यकु's picture
यकु in काथ्याकूट
3 Oct 2011 - 3:24 am
गाभा: 

आयुर्विमा घेताना प्रस्तावकाला पूर्वीपासूनच असलेल्या सर्वसामान्य आजाराबद्दल विमा कंपनीला माहिती दिली नाही, हे कारण विमा रक्कम व विम्याचे इतर लाभ नाकारण्यास पुरेसे ठरू शकत नाही. विशेष म्हणजे "सर्वसामान्य आजारात" सर्वोच्च न्यायालयाने मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार ग्राह्य धरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेऊन एका ग्राहक मंचाने दिलेला निर्णय नुकताच माझ्या हातात पडला, करिता हा प्रपंच. विमा धारकाने एका खासगी विमा कंपनीचा विमा काढताना कंपनीच्या वैद्यकीय प्रश्नावलीत त्याला पूर्वीपासून असलेल्या आजाराबद्दलच्या प्रश्नात "नाही" असे उत्तर दिले होते. कंपनीच्या डॉक्टरकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, व विमा मंजूर करण्यात आला. विमाधारकाला ६ वर्षांपासून मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते, व तो त्यासाठी उपचारही घेत होता. विमा घेतल्यापासून वर्षभराच्या आतच विमाधारकाचा मृत्यू झाला. नॉमिनी असल्याने विमाधारकाच्या पत्नीने कंपनीकडे विम्याची रक्कम व विम्याच्या इतर फायद्यात असलेली रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल केला. कंपनीने केलेल्या छाननीत विमाधारकाने त्याला असलेल्या आजाराबद्दल लपवून ठेवल्याचे आढळून आले, व तसे कारण देऊन कंपनीने नॉमिनीचा दावा नाकारला. हा निर्णय मंजूर नसल्यास विमा लोकपाल कार्यालयात तक्रार करण्याचा मार्गही मोकळा असल्याचे कंपनीने नॉमिनी पत्नीला सुचीत केले.

त्याप्रमाणे तिने विमा लोकपाल कार्यालयाकडे दाद मागितली. तिला सुमारे दोन वर्षाने या कार्यालयाने पत्र पाठवले, ज्यात तिला न्याय मिळण्याची शक्यता नाही असे दिसून आले.

पुढे तिने "सेवा देण्यात त्रुटी" केल्याबद्दल नुकसानभरपाई व विमा रक्कम मिळावी म्हणून विमा कंपनी व विमा एजंटविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तिथेही विमा कंपनीने विमाधारकाने पूर्वी पासून असलेले आजार लपवून ठेवले व तक्रार विहित कालावधीत केल्याचे कारण देत मंचाला तिची तक्रार फेटाळण्याची विनंती केली.
कंपनीने मयत विमाधारक मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारासाठी उपचार घेत असलेल्या डॉक्टरांची प्रमाण पत्रेही पुरावा
म्हणून मंचासमोर मांडली. विमाधारकाचा मृत्यू ज्या डॉक्टरांचा उपचार चालू असताना झाला होता त्यांचेही प्रमाणपत्र कंपनीने मंचासमोर मांडले. त्यात त्या डॉक्टरांनी विमाधार्काचा मृत्यू "ब्रेन स्ट्रोक" मुळे झाल्याचे म्हटले होते. मंचाने ही बाब अधोरेखित केली.
मयत अर्जदाराची पत्नी, विमा कंपनी व एजंट यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्राहक मंचाने आदेश दिला तो असा -
१. आदेशापासून ३० दिवसाच्या आत विमा कंपनीने नॉमिनीला विम्याची रक्कम रु. १ लाख, विम्याचे इतर फायदे व रक्कम देणे टाळल्यापासून विमा रकमेवर ९ टक्के दराने व्याज द्यावे.
२. तक्रारदार नॉमिनीस विमा कंपनीकडून झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. २००० व तक्रार दाखल करण्याच्या खर्चापोटी रु. १००० द्यावेत.
या आदेशासाठी ग्राहक मंचाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला. ज्यात मंचाने म्हटले आहे की, "खरे पाहता डायबेटीस व रक्तदाब सर्वसामान्य आजार आहे, तो कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषास होतो. या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयांनी रिपोर्टेड केसेस मध्ये व्यक्त केलेली मते अर्जदाराच्याही प्रकरणात तंतोतंत लागू पडतात." ती अशी :-
१. रिपोर्टेड केस २००७ (२) सी.पी.जे. पान ४५२ (दिल्ली)
Point: Maladies like diabetes, hypertension being normal wear and tear of cannot be concealment of it pre-existing disease - insured not bound to disclose diseases easily detectable by basic test ECG - no suppression of material facts.
तसेच ए.आय.आर. २०११ पान ५४९ (सर्वोच्च न्यायालय) आणि रिपोर्टेड केस २००८ (३) पान २८४ (महाराष्ट्र राज्य आयोग) सर्वोच्च न्यायालयाने आणि महाराष्ट्र राज्य आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, प्रपोजल फोर्म मधील प्रश्नावलीतील उत्तरात प्रकृतीबाबत खरी माहिती दिली नाही हे तांत्रिक कारण नेहमीच देऊन सबळ पुराव्याशिवाय क्लेम नाकारता येणार नाही.

ग्राहक मंचाच्या आदेशाच्या सत्यप्रती -
पान १, पान २, पान ३
पान ४, पान ५, पान ६, पान ७, पान ८

(वरील सत्यप्रतीत वास्तविक नावे, विमा कंपनी व ग्राहक मंचाचे नाव खोडले आहे. संदर्भासाठी नावे न खोडलेली प्रत आवश्यक वाटल्यास ती मिळू शकेल.)

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

3 Oct 2011 - 6:40 am | नेत्रेश

धन्यवाद.

उदय's picture

3 Oct 2011 - 7:20 am | उदय

माझ्या मते हा चुकीचा निकाल आहे आणि विमा कंपनीने त्याविरुद्ध अपील केले पाहिजे.

"सर्वसामान्य आजारात" सर्वोच्च न्यायालयाने मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार ग्राह्य धरले आहेत.

वरील विधानामुळे हे रोग गंभीरपणे न बघण्याची शक्यता वाढेल. सर्वोच्च न्यायालयाने हे विधान करण्यापूर्वी मेडिकल बोर्डाचा सल्ला घेतला होता का, याबद्दल जाणून घ्यायला माहिती कुठे मिळू शकेल का?

५० फक्त's picture

3 Oct 2011 - 1:03 pm | ५० फक्त

+१०० टु उदय,

''वरील विधानामुळे हे रोग गंभीरपणे न बघण्याची शक्यता वाढेल. सर्वोच्च न्यायालयाने हे विधान करण्यापूर्वी मेडिकल बोर्डाचा सल्ला घेतला होता का, याबद्दल जाणून घ्यायला माहिती कुठे मिळू शकेल का?''

या बरोबरच हे रोग फार सामान्य आहेत हे खरे पण मग या रोग असतील तर जास्त प्रिमियम घेण्याची कंपन्यांना मुभा दिली गेली पाहिजे.

शैलेन्द्र's picture

4 Oct 2011 - 11:48 pm | शैलेन्द्र

रक्त तपसनी होते तेंव्हा जर हे रोग आढळले तर तसा वाढीव प्रीमियम घ्यायची सोय असतेच ना? खरतर डायबेटीस व रक्तदाब आधीपासुन होता की नाही हे सिद्ध करणे हे कटकटीचे आहे.

मन१'s picture

3 Oct 2011 - 7:37 am | मन१

खूपच कामाची गोष्टय भौराव.

...., व तो त्यासाठी उपचारही घेत होता. विमा घेतल्यापासून वर्षभराच्या आतच विमाधारकाचा मृत्यू झाला.
>>मृत्यु कुठल्या आजाराने झाला? म्हणजे समजा एखाद्याने एक पूर्वस्थित्/पूर्वोद्भवित(preexisting) रोग लपवला व त्याचा दुसर्‍याच कारणाने मृत्यु झाला, असे झाले का? की जो रोग लपवलाय त्यानेच मृत्यु झालाय.

विमाकंपनीचे नाव इथे देता येइल का?

विमा लोकपाल कार्यालयाकडे
>>विमालोकपाल म्हंजे नक्की कोण? काही government body वगैरे आहे का?
. त्यात त्या डॉक्टरांनी विमाधार्काचा मृत्यू "ब्रेन स्ट्रोक" मुळे झाल्याचे म्हटले होते.
>> ब्रेनस्ट्रोक डायबेटिस मुळे झाला का?की दुसरे काही कारण?

त्यातला त्यात सरकारी किंवा Public Sector Unit सोबतच विमा वगैरेचे संबंध ठेवावेत असा आमच्या वडीलधार्‍यांचा नेहमीच सल्ला असतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Oct 2011 - 9:12 am | श्री गावसेना प्रमुख

नावे न खोडलेली प्रत कोठे मिळेल ?
तुमच्या कडे का ग्राहकमन्चा कडे????????????????(तुमच्या कडुन एक चुक झाली,पान न.६ वाचा

>विमालोकपाल म्हंजे नक्की कोण? काही government body वगैरे आहे का?

विमा लोकपाल म्हणजे इन्शुरन्स ऑम्बुड्समन.. सरकार नियुक्त असतो. किमान २० व्र्षे न्यायदानाचा अनुभव असलेली पात्र व्यक्ती असते. त्यांचे ऑफिस जीवन सेवा अनेक्सी, सांता क्रुझ येथे आहे.

लपवलेला आजार व मृयुत्युचे कारण यात काही लिंक असेल तर तर क्लेम रिजेक्ट करणे योग्य असते.. पण डायबेटिस आणि ब्रेन हिमोरेज याच्यात या केस मध्ये संबंधित लोकपालाला काही संबंध मिळाला नसेल.

पण खरे तर उच्च रक्त्दाब हे ब्रेन हिमोरेजचे कारण होऊ शकते. क्लेम खरे तर रिजेक्ट व्हायला हवा होता.. :) पण डोक्टरने मृयुत्य्चे कारण स्ट्रोक इतकेच दिले... इतर कारणाममध्ये बी पी मेन्शन नाही केले तर संशयाचा फायदा क्लेमंटला मिळतो.

श्रावण मोडक's picture

3 Oct 2011 - 1:52 pm | श्रावण मोडक

मधूमेह व उच्च (किंवा कमी) रक्तदाब हे मुळात आजार किंवा रोग आहेत का? आजार किंवा रोग म्हणजे डीसिज या अर्थी. या दोन्ही कंडिशन्स आहेत, अशी माझी माहिती होती.

अन्या दातार's picture

3 Oct 2011 - 4:05 pm | अन्या दातार

>>या दोन्ही कंडिशन्स आहेत, अशी माझी माहिती होती.
पण या दोन्हीही अ‍ॅबनॉर्मल कंडीशन्स आहेत ना. त्यालाच तर डीसीज म्हणतात की!

म्हणजे तुमच्या तर्कानेही क्लेम रिजेक्ट होणेच संयुक्तिक आहे असे म्हणता येईल.

या प्रकरणात मंचाने त्यांच्या निर्णयाची सविस्तर कारणे दिली आहेत, पण मी इथे ती तेवढ्या तपशीलवार लिहीलेली नाहीत. दुव्यावरील पानात ती वाचता येतील.
फक्त एकट्या मंचाचा निर्णय असता तर ही बाब तेवढी महत्वाची ठरली नसती. पण मंचाने या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाची सायटेशन्स घेतली आहेत जी (अशा ) प्रकरणाला तंतोतत लागू पडतात. म्हणूनच हे लिहिण्याचा खटाटोप केला.

केवळ "पूर्वीपासून आजार लपवले" या एकाच कारणावरुन कंपनीने क्लेम नाकारला आहे.
मंचासमोर बाजू मांडताना विमा कंपनीकडूनच काही त्रुटी राहिल्या आहेत.
१. कंपनीच्या डॉक्टरने मयत विमेदाराची योग्य ती मेडीकल केली होती - त्यात कंपनीला विमा नाकारता आला असता. पण कंपनीने मयताला पॉलीसी दिली. ( खरे म्हणजे बहुतांश विमा कंपन्यांच्या मेडिकल्स जुजबी असतात.. एजंटला टार्गेट गाठण्यासाठी बकरा पाहिजे हे डॉक्टरलाही माहीत असते... सगळी मिलीभगत असते.. पण कोर्ट आणि कागदपत्रांचा मुद्दा येतो तेव्हा सगळे विसरून जावे लागते )
२. यामुळे विमेदाराने हेतूतः पूर्वीचे आजार लपवले हा विमा कंपनीचा दावा मंचाने निरर्थक मानला आहे.
३. ज्या डॉक्टरांनी विमेदारावर मधुमेह, हायपरटेन्शनचे उपचार केले त्यांची फक्त प्रमाणपत्रे मंचासमोर दाखल करण्यात आली.. केस पेपर किंवा हिस्ट्री चार्ट दिले नाहीत. त्यांची शपथपत्रेही दिली नाहीत. कंपनीच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडताना फक्त सायटेशन्सचा उल्लेख केला.. पण मंचाला कोणतीही प्रत दिली नाही.

त्यामुळे निकाल अर्जदार नॉमिनीच्या बाजूने गेला.
बाकी कंपनी अपीलात गेली आहेच.
पण मंचाने दाखवून दिलेल्या त्रुटी व सर्वोच्च न्यायालयाच्या रिपोर्टेड केसेस मधील सायटेशन्समुळे पुढेही निकाल कंपनीच्या बाजूने येण्याची शक्यता नाही.
कंपनीकडे एकच युक्तीवाद आहे तो म्हणजे पूर्वीचे आजार लपवले.. तो तोकडा पडतो.

@ उदय - वर दिलेल्या / लिंकमधील रिपोर्टेड केस टाकून गुगलवर शोध घेतला तर अधिक तपशील मिळतील.
@ मन १ - विमा कंपनीचे नाव मॅक्स न्यूयॉर्क लाईफ आहे.
@ श्री. गावसेना प्रमुख - संदर्भासाठी नावे न खोडलेली प्रत माझ्याकडे आहे. ई - मेल आयडी व्यनि करा.. पाठवतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Oct 2011 - 8:54 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही सर्व नावे खोडली पण प्रत न.६ वर शामराव हे नाव राहुन गेलय ते सांगतोय(बाकी चुक भुल देणे घेणे)

रक्तदाब, डायबेटिस वगैरे कंडिशन्समुळे हार्ट अ‍ॅटॅक, ब्रेन स्ट्रोक, न्युरोपॅथी, गँग्रीन, किडनी फेल्युअर, लिव्हर डेमेज आणि व्हर्चुअली कोणत्याही आजाराचा धोका असतो. त्यामुळे या दोन्ही कंडिशन कशाशीही "मूळ कारण" म्हणून जोडल्या जाऊ शकतात. आता:

१) या दोन्ही कंडिशन्स इतक्या सामान्य आणि मोठ्या संख्येने आहेत की त्यांना इन्क्लूड केल्याशिवाय इन्श्युरन्स कंपन्या भारतात धंदाच करु शकणार नाहीत.
२) तस्मात प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स (बी.पी. डायबेटिस इ) विमा घेतल्यापासून चार वर्षांनंतर कव्हर होतील असा नियम इन्श्युरन्स रेग्युलेटरी ऑथोरिटीकडून झालेला आहे. अशा वेळी मेडिकल टेस्टचीही गरज रहात नाही. ते सोयीचं पडतं. तसाही रक्तदाब ईसीजीत दिसत नाही आणि गोळी घेऊन टेस्टला गेलं की तो नॉर्मल येऊ शकतोच. डायबेटिस मात्र त्यामानाने लवकर टेस्टद्वारे डिटेक्ट होतो. विशेषतः फास्टिंग शुगरमधे.
३) या प्रकारची लक्षणे असलेल्यांना कव्हरेज मिळाले पाहिजे, पण अधिक प्रीमियम (रिस्कच्या प्रमाणात) मागायचा हक्क विमा कंपनीला पाहिजे.
४) अन्यथा दर काही सेकंदांना होणार्‍या डायबेटिस संबंधी मृत्यूंमधले अधिकाधिक इन्श्युअर्ड व्हायला लागले की सगळ्यांचे क्लेम सेटल करता करता कंपनीच बुडेल. (जरी निरोगी लोकांचा प्रीमियम जमा होत असला तरी, कारण डायबेटिस आणि बीपीचं प्रमाण खूप वाढतं आहे.)
५) वरील केसमधे व्यक्ती एका वर्षातच मरण पावली आहे. त्यामुळे या चार वर्षाच्या नियमात (जो अ‍ॅक्सेप्टेबल वाटतो) ती व्यक्ती बसत नाही. तरीही कोर्टाने निकाल दिला आहे म्हणजे तोच कायद्यासारखा वापरला जाईलच. पण प्रत्येकाला आपले आजारपण सोडून कोर्टात भांडत बसावे लागेल. रक्कम सुखासुखी मिळणार नाहीच. तस्मात आपले आजार आणि कंडिशन्स पॉलिसी घेताना डिक्लेअर कराव्यात हे उत्तम. हा विश्वासावर चालणारा व्यवसाय आहे.

मन१'s picture

5 Oct 2011 - 7:53 am | मन१

"पूर्वीचे आजार डिक्लेअर करणे उत्तम" ह्याच्याशी सहमत.
सरधोपट मार्ग आहे.

पैसा's picture

6 Oct 2011 - 7:55 pm | पैसा

बरोबरच यशवंतचा पूरक प्रतिसाद आणि गविंचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला.

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 8:31 pm | क्रेमर

न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम म्हणून विमाकंपन्या प्रिमियम वाढवतील, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. हा वाढीव प्रिमियम रक्तदाब किंवा मधूमेह असे आजार नसलेल्या व्यक्तिंनाही सोसावा लागेल. बाकी यासंदर्भात माझी काहीच नैतिक भुमिका नाही.

मग विषय संपला. कंपनीने भरपाइ देणे आवश्यक. कारण हा कंपनीचा हलगर्जीपणा आहे......