गाभा:
नमस्कार मंडळी,
मिसळपावच्या समस्त सदस्यांना माझा नमस्कार,
ए़क विनोद
संताने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उदास संता बंताला म्हणाला, यार... आधी माहिती असतं, तर लग्न पण कर्ज काढून केलं
मिसळपाव वर माझा हा पहिले लिखाण आहे. तेव्हा चुक भुल देणे घेणे!
सोना
प्रतिक्रिया
28 Sep 2011 - 6:45 pm | मृत्युन्जय
सूंडर विनोड. पुजिशु.
28 Sep 2011 - 7:21 pm | गणपा
रे मृत्युंजया अस करु ने बाबा. सदस्या नवीन आहेत.
आणि सगळेच मटा उघडतात असं नाही.
लगेच असा ही आणि ही प्रतिसाद नको देउस.
त्यांनाही आपलं म्हणा. :)
28 Sep 2011 - 7:24 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय हि & हि प्रतिसाद.
त्यांचे नाव सोना-शार्वील आहे; सोना-शार्वीलक नाही ;)
नवसदस्य + लेखकांना प्रोत्साहन द्या गणपाशेठ.
28 Sep 2011 - 7:33 pm | गणपा
घ्या आता आम्ही काय वाकडे हि & हि बोलीलो?
उलट आम्ही तर त्यांच स्वागतच करतोय मिपा परिवारात.
तुम्हालाच एक आगाऊ सल्ला : चष्मा बदला.
28 Sep 2011 - 7:35 pm | मृत्युन्जय
घ्या आता आम्ही काय वाकडे हि & हि बोलीलो?
उलट आम्ही तर त्यांच स्वागतच करतोय मिपा परिवारात.
तुम्हालाच एक आगाऊ सल्ला : चष्मा बदला.
28 Sep 2011 - 7:40 pm | गणपा
जौ दे खाजगीत बोलु. ;)
28 Sep 2011 - 7:28 pm | शाहिर
अतिशय अप्रतिम अशा स्वरूपची मार्मिक टीप्पणी केली आहे.
भारतिय विवाह संस्थेमधल्या विवाहव्यच्छेदक विचारधारेच्या विसंगती वर लेखकाने नेमके बोट ठेवले आहे..
:D
28 Sep 2011 - 7:36 pm | सोना-शार्वील
मी लोकसत्ता वाचतेना,आणि सगळेच मटा उघडतात असं नाही म्ह्णजे ?
28 Sep 2011 - 7:45 pm | रेवती
ओ तै,
तुमचं मिसळपाववर स्वागत!
मिपाचे धोरण वाचायला हवे.
दोन ओळींचे धागे सुरु करायला मनाई आहे.
वरील लेखनातून आपल्याला काय साध्य करायचे आहे?
लोक आता चेष्टा केल्याशिवाय राहतील का?
अर्थात तीही हलकी घेतलीत तर ठीक आहे.
सध्या मटा कसा असतो? वाचवतो का तो पेपर?
28 Sep 2011 - 7:49 pm | मृत्युन्जय
सध्या मटा कसा असतो? वाचवतो का तो पेपर?
विनोड सुंडर असतात. आणि मुख्य म्हणजे ११ रुपायत ४ महिने मिळतो (आपके जमाने की याद आ गयी ना ) ;)
28 Sep 2011 - 7:50 pm | रेवती
धन्य आहात!;)
28 Sep 2011 - 9:42 pm | नितिन थत्ते
>>सध्या मटा कसा असतो? वाचवतो का तो पेपर?
लोकसट्टाची सायट अपडेट होत नाही त्यामुळे मटा वाचावा लागतो.
परवा मटाचे वडील (पक्षी-टॉई) संपूर्ण पिवळ्या रंगाचे कपडे* घालून आले होते.
(मजबूर) नितिन थत्ते
*टीप : सदर शब्दसमूह रंग या विषयी आहे. 'पिवळा रंगा' नावाचा कोणी इसम माझ्या माहितीचा नाही. ;)
29 Sep 2011 - 10:53 am | विसुनाना
पिवळ्या रंगाचे कपडे घालून नव्हे हो, पांढर्या रंगाचे कपडे काढून आले होते असे म्हणा.;)
28 Sep 2011 - 8:00 pm | स्मिता.
मला हा विनोद प्रचंड आवडला. आधी कधी ऐकलाच नव्हता. पहिले १० मिनीट हसून घेतलं आणि मग ही प्रतिक्रिया लिहायला घेतली.
अजूनही हसतेच आहे. कुठुन सापडतात हो असे मार्मीक विनोद?
28 Sep 2011 - 8:00 pm | सोना-शार्वील
आभारी आहे,अहो मी खरच मटा नव्ह्ता वाचला,नवीन आहे परीवारात अजुन्,समजुन घ्या
29 Sep 2011 - 7:07 pm | तिमा
मिपा परिवारात स्वागत.
तुम्ही ते टॉम अँड जेरीचं कार्टून बघितलंय का ? ज्यात जेरी मॅनहटनला जातो आणि रात्री रस्त्यावर फेकला गेल्यावर थोडासा आवाज केल्यावर सभोवताली अनेक मांजरांचे डोळे चमकू लागतात, सगळी टपूनच बसलेली असतात. जेरी अर्थातच हुशार असल्याने तिथून सटकतो.
तर अशा कार्टून्सपासून मी नेहेमीच बोध घेत असतो. सूज्ञास अधिक सांगणे नलगे.
28 Sep 2011 - 8:03 pm | वेताळ
विनोद वाचताना मी चा पित होतो तो फुरर्र्र्कन समोरच्या स्क्रिनवर उडला.अजुन विनोद येवुद्यात.
3 Oct 2011 - 11:26 pm | सूर्यपुत्र
मी कॉफी. बाकी सेम. ;)
-सूर्यपुत्र.
28 Sep 2011 - 8:54 pm | विशाखा राऊत
संता बंता झिंदाबाद :)
29 Sep 2011 - 2:51 am | खेडूत
मटा वाचा की नको पण इथल्या प्रतिक्रिया मात्र मटा मटा वाचून संपवतो!
30 Sep 2011 - 11:42 am | निवेदिता-ताई
मी पण !!!!!!
29 Sep 2011 - 10:32 am | विसोबा खेचर
फारच मजेशीर! :)
मिपावर तुमचं मनापासून स्वागत..
(संस्थापक) तात्या.
29 Sep 2011 - 11:21 am | इरसाल
सोना-शार्विक...
मिपावर आपले हार्दिक स्वागत.
हवांतर: हा सोना-शार्विक ह्यांचा कदाचित पहिला आणि शेवटचा धागा न ठरो म्हणजे मिळवली.
29 Sep 2011 - 12:01 pm | मी ऋचा
सोना-शार्वील- छान विनोद. पहिल्याच धाग्याबद्दल अभिनंदन आणि मिपावर स्वागत.मात्र आता धीर एकवटून प्रतिक्रियांना सामोरं जा आणि वात्रट प्रतिक्रियांनी खट्टू होऊ नका. कारण त्या भरपूर येणार आता ;)
29 Sep 2011 - 12:08 pm | वपाडाव
तुमच्या हातात कथलाचा वाळा आहे काय हो !!!
(समजले नसल्यास सपशेल सोडुन द्या)
29 Sep 2011 - 12:17 pm | गवि
छान आहे सुरुवात. सर्वांना हसवून सुरुवात करण्याची इच्छा छान.
मलाही काही विनोद आठवले:
............
चिमटा..
पती: अगं आपण रंगीत टीव्ही घेऊया का?
पत्नी: नको बाई. एका धुण्यातच रंग उडून जायचा..
.........................
गुच्चा:
गुरुजी: बाळ तुझे नाव सांग
विद्यार्थी क्र. १: पांडू.
गुरुजी: बाळ.. नुसतं पांडू म्हणू नये.. पांडुरंग असं पूर्ण सांगावं.
गुरुजी: (पुढील विद्यार्थ्यास) बाळ तुझे नाव सांग बघू
विद्यार्थी क्र. २: बंडुरंग.
...................
टोला:
गुरुजींनी मुलांना विचारले "सातव्या हेन्रीने काय केले"
"आठव्या हेन्रीस जन्म दिला." चुणचुणीत संजू ताडकन उत्तरला.
.......................
29 Sep 2011 - 2:36 pm | उदय के'सागर
हाहाहाहाहाहाहाहाहा!!!हहपुवा!!! बापरे सोना-शार्वील जी, काय विनोद (?) होता :-|
बाकि आपले मिपावर स्वागत :)
29 Sep 2011 - 2:47 pm | वपाडाव
ह्यावर विनोद बाणखेले यांची काय प्रतिक्रिया येत्येय त्याची वाट बघतोय......
29 Sep 2011 - 2:53 pm | किसन शिंदे
मटामध्ये आधीच हा जोक वाचला असल्याने तुमच्या पहिल्यावहिल्या धाग्याबद्दल निराशाच झाली... आशा आहे यापेक्षाही चांगले धागे पुढे तुम्ही काढाल.
असो..
मिसळपाववर आपले हार्दिक स्वागत.!
3 Oct 2011 - 10:22 am | ब्रिटिश टिंग्या
विनोद चांगला आहे!
शुभेच्छा मात्र समजल्या नाहीत!
4 Oct 2011 - 1:15 am | Nile
>>नमस्कार मंडळी,
मिसळपावच्या समस्त सदस्यांना माझा नमस्कार,
ए़क विनोद
जाहीर बोलीत तिसर्या ओळीत विनोद म्हणजे पुणेरी दिसता?