गाभा:
अण्णांच्या उपोषणाच फलीत काय आहे, हे खूप विचार करुन सुध्धा कळत नाहीए.
अल्प स्वल्प बुध्दीला अस वाटायला लागल आहे की ' बादशहाचा पोपट आणि बिरबल ' आणि ' राजा, त्याचा सोन्याचा अंगरखा आणि लहान मुलगा ' या दोन गोष्टींच तात्पर्य आणि 'अण्णांच उपोषण ' यांच्यामध्ये काही तरी समान धागा आहे. तुम्हाला काय वाटत ?
प्रतिक्रिया
1 Sep 2011 - 10:52 pm | अविनाशकुलकर्णी
अण्णांच्या उपोषणाच फलीत काय आहे,
...........................................................................
अहो .......लोकपाल विधेयक संमत होईल हे ही नसे थोडके...
सुरवात तर झाली.....
एव्हढे निराश वादी नका होवु......
जाहिरात्ल्या लहान मुलासारखे सार्खे सारखे....तो फिर उस्से क्या होगा..असे विचारु नका...
2 Sep 2011 - 12:22 am | आशु जोग
मनिमोहनच्या कारकीर्दीचे फलित काय ?
कलमाडी शीला दीक्षीत कडे राष्ट्रकूल स्पर्धा देण्याचे फलित काय ?
2 Sep 2011 - 7:53 am | नगरीनिरंजन
आपला (म्हणजे बहुसंख्य लोकांचा) दुटप्पीपणा आणि निष्क्रीयता अधोरेखित झाली. लोकांनी ठरवलं तर सध्याच्या व्यवस्थेला दामटून कार्यक्षम करू शकतात हे सिद्ध झाले.
2 Sep 2011 - 10:55 am | रणजित चितळे
मागे एक धागा काढला होता त्यातला भाग देत आहे ..............
जनलोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने आपल्या देशात जो भ्रष्टाचाराचा राक्षस फोफावला आहे तो मारला जाणार नाही हे मान्य. जनलोकपाल विधेयक किंवा लोकपाल विधेयक भ्रष्टाचाराच्या रोगावरचे हमखास औषध नव्हे. पण ते आणल्याने थोडा तरी फरक पडेलच. निदान संघटनात्मक भ्रष्टाचार स्वैर चालणार नाही व त्यावर अंकुश बसेल. पूर्णपणे नाही पण काही अंशाने फरक पडेल. हे ही नसे थोडके. लोकपाल विधेयकाने भ्रष्टाचार कमी होण्यात थोडेपण यश आले तर चांगलेच आहे. जन लोकपाल विधेयक आणण्यासाठी अण्णा हजारेंनी छेडलेले आंदोलन हे जनजागृतीचे फार महत्त्वाचे काम करत आहे. भ्रष्टाचारा विरुद्ध लोकजागृती करण्याचे. हल्ली लाचलुचपत व भ्रष्टाचार इतका फोफावतो आहे की एखाद्याला पैसे कसे चारायचे व एखाद्या कामासाठी पैसे कसे घ्यायचे हे एक प्रशासन तंत्र म्हणून उद्या व्यवस्थापन शिकवणाऱ्या महाविद्यालयातल्या पाठ्यक्रमात सुद्धा येऊ शकते. लाच देणे व घेणे इतके स्वैर होऊ लागले आहे की लोकांची मानसिकता बधिर होऊ लागली होती. जास्त पैसे कमावण्याच्या नादात व इतरांच्या पुढे जाण्याच्या धुंदीत आपण मूलभूत नीतिमत्ता विसरायला लागलो होतो. लाच घेणे व देणे हे अनैतिक कृत्य आहे हेच आपण विसरायला लागलो होतो. उलट जो लाच घेतो व लाच देतो तो ‘स्मार्ट’ व जो लाच देत नाही व घेत नाही तो मागासलेला व हल्लीच्या समाजरचनेत राहायला नालायक असा आपला समज होऊ चालला होता. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते. लाचखोरी करून आपल्याला "दुसऱ्याने मला लाच घ्यायला लावली" असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, लाच खातो तो इसम जास्त मोठा शत्रू. मग इतरवेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. अण्णा हजारेह्यांच्या उपोषणांनी समाजाला ह्या विसरत चाललेल्या नीतिमत्तेची जाग आली. लाच देणे व घेणे चांगले नाही व कधीच नव्हते ह्याची जाण आणवून दिली. लाच घेणाऱ्या कोडग्यांना सुद्धा जाग आली की ते करत आहेत तो ‘स्मार्टनेस’ नव्हे पण नैतिकतेने व कायद्याने चुकीचे आहे. अण्णांच्या उपोषणाने निदान ही पिढी तरी लाचखोरी किती चुकीची आहे ते समजली. पुढच्या पिढीसाठी कोणी दुसरा अण्णा हजारे होईल त्याची चिंता आता नको.
पुढे वाचण्या साठी
http://www.misalpav.com/node/18993 आहेच