माळशेज सहलीसाठी सल्ला हवा आहे -

कौन्तेय's picture
कौन्तेय in काथ्याकूट
30 Aug 2011 - 2:07 pm
गाभा: 

२४ - २५ सप्टें.चं माळशेज घाट एम टी डी सी चं आरक्षण केलंय. घरच्या गाडीने बायको, दोन मुलं नि बाबांसोबत जायचं आहे.
२४ला शनिवार दुपार पावेतो खोलीत सामान घुसवणे, दुपार संध्याकाळ आजूबाजूला टीपी करणे; दुसऱ्या दिवशी २५ सप्टें.ला दिवसभरात शिवनेरी आदि पुण्यस्थळदर्शन नि २६ सप्टें.ला सकाळी सकाळी मुंबई प्रस्थान असा कार्यक्रम आहे.

मुलं वयवर्षे अनुक्रमे ४ नि ८. डोंगर बिंगर चढायला अडचण नाय (जानेवारीत रायगड, कर्नाळा झालेलंय). माळशेज-अनुभवी मिपाकरांकडून पुढील सल्ल्याची प्रार्थना आहे -

१. मपविम.च्या निवासस्थानाची एकूण व्यवस्था कशी आहे, जेवण इ. संबंधी काही टिपा.
२. शनि. दुपार / संध्याकाळ मोकळीच आहे. एम टी डी सी निवासस्थानाच्या आजूबाजूला पायी फ़िरून आनंद घेण्यासारखे काही आहे का? वा गाडीने फ़िरून इतर काही?
३. रवि. २५ सप्टें.च्या पूर्ण दिवसात शिवनेरी सोबतच आणखी काही करता येईल का?
४. याउप्पर काही सल्ला असल्यास -

प्रतिक्रिया

सुनील's picture

30 Aug 2011 - 2:19 pm | सुनील

३. रवि. २५ सप्टें.च्या पूर्ण दिवसात शिवनेरी सोबतच आणखी काही करता येईल का?

पूर्ण दिवस मोकळा असेल तर शिवनेरीच्या जोडीला ओझर आणि लेण्याद्री हे अष्टविनायकांपैकी दोन पाहून घेता येतील.

४. याउप्पर काही सल्ला असल्यास -

घाटात धबधबे भरपूर आहेत. बाजूला गाडी लावून भिजण्याचा आनंद लूटा. मात्र संध्याकाळनंतर फार थांबू नका.

वपाडाव's picture

30 Aug 2011 - 6:30 pm | वपाडाव

घाटात धबधबे भरपूर आहेत. बाजूला गाडी लावून भिजण्याचा आनंद लूटा.

होच मुळी... असेच म्हणतो.....

अजुन एक महत्वाचे ::
जुन्नरच्या स्थानिक लोकांना विचारल्यास तेही मार्गदर्शन करतील....
म्हणजे वेळेत काही १९-२० झाल्यास (१-२ तास इकडे तिकडे) त्यांचा सल्ला घ्या....

परिकथेतील राजकुमार's picture

30 Aug 2011 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

४. याउप्पर काही सल्ला असल्यास -

धागा काढण्याआधी :-

१) भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात
:- श्री. योगेश२४

२) माळशेज घाटात :- श्री. वल्ली

ह्या दोन लेखकांशी वैयक्तिक व्यनीद्वारे अथवा खरडीद्वारे संपर्क केला असतात आणि थोडी वाट बघितली असतीत तरी चालले असते असे आपले माझे मत.

अर्थात आपण मिपावर नविन नसल्याने आपल्याकडून ही अपेक्षा केली आहे.

धन्यवाद.

कौन्तेय's picture

30 Aug 2011 - 5:16 pm | कौन्तेय

धन्यवाद! दोन्ही दुवे छानच आहेत.
कुठल्याही संकेतस्थळावर फ़ॅक्‌ (FAQ) मधे नवीन प्रश्न टाकताना आधी ज्याप्रमाणे अपेक्षित उत्तर त्याच्या इतिहासात अगोदरच आहे का हे चाचपून पहावे तद्वतच मिपा.वर माळशेज हा शोध मारून पाहिला. पण काही गवसलं नाही म्हणून नवीन धागा काढला. तसेही माझ्या वर उल्लेख केलेल्या शंकांची उत्तरं तुम्ही सुचवलेल्या दुव्यांत मिळाली नसती. त्यामुळे मिपा.करांना पुन्हा त्रास दिला म्हणून फ़ार वाईट वाटत नाही. व्य.नि.ने करता आले असते, पण ठीके हो, आमच्या बडबडीचा बाकीच्यांनाही थोडाफ़ार फ़ायदा होईलच की. दुव्यांसाठी पुन्हा आभार.

शाहिर's picture

30 Aug 2011 - 3:11 pm | शाहिर

टवाळ आनि दारुड्या ग्रुप पसुन लाम्ब रहा ...माल्शेज मधे वाइट अनुभव आहेत लोकांचे .
निसर्ग छान आहे ..एंजॉय करा ..फोटु टाका

योगप्रभू's picture

30 Aug 2011 - 3:11 pm | योगप्रभू

१) घाणेरडे पब्लिक आणि कुत्र्यांनाही लाज वाटेल असे चाळे करणारी जोडपी आडवाटेवर दिसण्याची शक्यता (किंवा खात्री) आहे. मुले कदाचित विचारु शकतील 'बाबा ते काय आहे?' त्यावर 'सिनेमाचे शूटिंग' असे सांगून तिथून काढता पाय घ्या.
२) जोडून सुट्या आल्या असतील तर पक्ष्यांपेक्षा माणसांचे थवे जास्त असतात. मनाची तयारी ठेऊन जा.
३) बायको बरोबर असताना आजूबाजूला दिसणार्‍या मानवी हिरवळींकडे टक लावून पाहू नका. स्लटवॉक दिसला तर बघुनही आपले लक्ष नाही, असे दाखवा आणि तोंडाने बालकविंची 'श्रावणमासी हर्ष मानिसी' ही कविता म्हणा. शीळ घालू नका किंवा ' ट्टॉक' करु नका. तसे केल्यास सहलीवरुन परतल्यावर 'माळ हाच शेज' असा भोग आपल्या वाट्याला येऊ शकतो.
४) धबधब्यांच्या काठावर दारुड्यांचा धिंगाणा सुरु असतो. मुंबईच्या ट्रेनमधले गर्दुल्ले आणि हे पेताड यांच्यात फारसा फरक नसतो. अशा टोळक्यांकडे रोखून/नापसंतीने पाहू नका. ते अंगावर येण्याची शक्यता असते.
५) पायवाटांवर दारुच्या बाटल्यांच्या काचा फोडून टाकलेल्या असतात. पिल्लांना मुक्त बागडू देताना वाटेवर लक्ष ठेवा.
६) सायंकाळच्या आत मुक्कामाच्या ठिकाणी परता.
७) ट्रेकसाठी आलेले निसर्गप्रेमी अथवा आपल्यासारखेच कुटुंबवत्सल ग्रुप यांच्याखेरीज इतरांशी आपणहून ओळख वाढवू नका.
८) जाण्यापूर्वी गाडी चेक करुन घ्या.

शुभास्ते पंथानः सन्तु
(अर्थ : शुभा जाते त्या रस्त्यावर सन्तु थांबलेला असतो.) :)

हेच सर्व म्हणतो. आता निघालेच आहेत आणि बुकिंगही केले आहे तर कशाला नाउमेद करा म्हणून तळ्यात मळ्यात होऊन गप्प बसलो होतो.

सर्व मुद्दे +१००

प्यारे१'s picture

30 Aug 2011 - 3:26 pm | प्यारे१

गविंचा जाहिर 'णिशेढ'.

एखाद्यानं अंधारात पाण्याची म्हणून टिक २० ची बाटली हाती घेतली आहे, आता घेतली आहे ना? कशाला बोला, जाऊ दे, पिऊ दे.... असे म्हटल्या'सारखे' वाटले.

टिक ट्वेंटीची बाटली नाही अगदी..

एरंडेलाची म्हणू..

मग काय करायचं अशावेळी.. ? ;)

मृत्युन्जय's picture

31 Aug 2011 - 1:24 pm | मृत्युन्जय

मग काय करायचं अशावेळी.. ?

किमान कागद, पाणी, दगड यांची तयारी ठेवा असा सल्ला तरी देता आला असता की नाही ;)

श्रावण मोडक's picture

30 Aug 2011 - 5:47 pm | श्रावण मोडक

१) घाणेरडे पब्लिक आणि कुत्र्यांनाही लाज वाटेल असे चाळे करणारी जोडपी आडवाटेवर दिसण्याची शक्यता (किंवा खात्री) आहे. मुले कदाचित विचारु शकतील 'बाबा ते काय आहे?' त्यावर 'सिनेमाचे शूटिंग' असे सांगून तिथून काढता पाय घ्या.
३) बायको बरोबर असताना आजूबाजूला दिसणार्‍या मानवी हिरवळींकडे टक लावून पाहू नका. स्लटवॉक दिसला तर बघुनही आपले लक्ष नाही, असे दाखवा आणि तोंडाने बालकविंची 'श्रावणमासी हर्ष मानिसी' ही कविता म्हणा. शीळ घालू नका किंवा ' ट्टॉक' करु नका. तसे केल्यास सहलीवरुन परतल्यावर 'माळ हाच शेज' असा भोग आपल्या वाट्याला येऊ शकतो.

'योग''प्रभू'! आयडी सार्थ करणारा असा प्रतिसाद हल्ली वाचण्यात नव्हता. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 8:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

... फार बोलतो तो!

कौन्तेय, माझा साधारण अनुभव, एम.टी.डी.सी.च्या खासगी पद्धतीने चालवलेल्या कॅण्टीन्समधे जेवण चांगलं असतं, तेव्हा त्याची चौकशी करून घ्या. मी माळशेजला शेवटचं जाऊन आठेक वर्ष झाली आहेत त्यामुळे मला आम्ही तेव्हा खाण्यापिण्याचं काय केलेलं हे आठवत नाही. आमचा गट वीसेक लोकांचा होता त्यामुळे बेवड्या-पेताडांचा काही त्रास झाला नाही. (आमचा त्रास त्यांना झाला असेल तरी आमच्या एवढ्या लोकसंख्येसमोर कोण आवाज करणार होतं? आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो होतो त्यामुळे आजूबाजूला भटकंती केली नाही.)

साबु's picture

30 Aug 2011 - 4:00 pm | साबु

माझे एक मित्र कुटुम्बासहित गेले होते...१५ औगस्ट ला... त्यान्च्या गाडीसमोर येउन.. उठाबशा काढ , जोर काढ ..असले प्रकार केले दारु पिलेल्या लोकानी.... शेवटि कुठेहि गाडी न थाम्बवता परत आले.

जपुन रहा...मजा करा...

नावातकायआहे's picture

30 Aug 2011 - 4:31 pm | नावातकायआहे

तिथे आणी नंतर ताप होन्यापेक्शा दुसरे ठिकान शोधा.

प्रचेतस's picture

30 Aug 2011 - 5:23 pm | प्रचेतस

जायला काहीच हरकत नाही. वर उल्लेखलेले काही प्रकार २ वर्षांपर्यंत भरपूर होत होते. पण हल्ली पोलीसांचा भरपूर बंदोबस्त असतो. त्यामुळे अगदी निर्धास्त होवून जा.
२५ तारखेला शिवनेरीबरोबरच तिथून ३२ किमी असलेल्या सातवाहनकालीन नाणेघाटात जाउन येउ शकाल. रस्ता तसा थोडासा खराब आहे पण गाडीने जाण्यासारखा आहे. अर्थात गाडी व्यवस्थित चेक करून स्टेपनी वैग्रे घेउनच जा.
किंवा जवळच लेण्याद्री, ओझर करता येईल. जुन्नर च्या अलिकडे मानमोडी म्हणून लेण्यांचा गट आहे तोही बघता येईल.

पप्पु अंकल's picture

30 Aug 2011 - 10:37 pm | पप्पु अंकल

पण आता उत्तरार्धात तेव्ह्ढा बंदोबस्त असतो का?
मला माहित नाहि पण फक्त एक शंका.

कौन्तेय's picture

30 Aug 2011 - 5:24 pm | कौन्तेय

सर्वांचे आभार!
चर्चा इथेच थांबवायची गरज नाही, पण हे सगळं ‘रस’भरित वर्णन वाचून मुलांच्या शाळा बुडवून हा उद्योग शनि-रविऐवजी कामाच्या दिवसांत करावासं वाटू लागलं आहे.
दारुड्यांच्या वर्णनाचे आणखी रंजित अनुभव येऊ द्या ... म्हणजे शाळा बुडवण्यासाठी सौ.ला राजी करणं सोपं होईल! :-D

धमाल मुलगा's picture

30 Aug 2011 - 7:12 pm | धमाल मुलगा

वर वल्लीनं सांगितलं आहेच की पोलिस बंदोबस्त असतो म्हणून.
पण तरीही घाटात, आडोसे पाहून किंवा गाड्या लाऊन तिथंच पी पी पिऊन टल्ली झालेले लोक भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रा-मित्रांसोबत जायचं असेल तर गोष्ट वेगळी, पण बायका-पोरं घेऊन जाताना, उगाच डोक्याला ताप नको. मग सगळ्या ट्रिपचा विचका झाल्यासारखं वाटायला लागतं.

मी तर म्हणेन आडवारीच जाणं उत्तम! काय डोक्याला ताप करण्यापेक्षा पोरांची दोन दिवस सुट्टी झाली तरी काय टेन्शन नाय. :)
काय म्हणता?

तू सेल्स्मन का नाही झालास रे? आपला मुद्दा अगदी मुद्देसूदपणे ....... :)

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 1:36 pm | धमाल मुलगा

नाय गो! मला कधी आमच्या तिर्थरुपांच्याही गळी एखादी गोष्ट धड उतरवणं नाही जमलं! सेल्समनगिरीसाठीची चिकाटी आणि बेरकीपणा नाय जमत तितकासा. प्रयत्न करुन पाहिला करियरच्या सुरुवातीला... सगळ्यांनी लाथा घालून हाकलून दिलं. :D

इंटरनेटस्नेही's picture

30 Aug 2011 - 5:58 pm | इंटरनेटस्नेही

कसली शाळा आणि कसलं काय घेऊन बसलात राव? जायचंच असेल तर मधल्या दिवशी जा अन्यथा जाऊ नका.
अ‍ॅज सिंपळ अ‍ॅज दॅट!

रेवती's picture

31 Aug 2011 - 1:11 am | रेवती

अरे त्यांना कुणीतरी खाण्याबाबतही सल्ले द्या! (प्रश्न क्र. १)
पिण्याचं कळ्ळं........बरोबर लहान मुले आणि शिनियर आहेत म्हट्ल्यावर जेवणाच्या व्यवस्थेचं काय?
मला काही फार अनुभव नाहिये अश्या सहलींचा!

अभिजीत राजवाडे's picture

31 Aug 2011 - 3:42 am | अभिजीत राजवाडे

शिवनेरी करुन तुम्ही संध्याकाळी (जर तुमची सरकारी ओळख असेल तर) माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र पाहायला जाऊ शकता.

इथे बिबट्या व अन्य वन्य प्राणी आहेत.

ओझरचे देवस्थान ही पाहु शकता.

तुम्हाला तुमच्या सहलीसाठी शुभेच्छा!!!

माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र ला भेट देण्यासाठी खालिल उत्कंठावर्धक पाटी पाहावी :)

[IMG_4049.jpg]

शुचि's picture

31 Aug 2011 - 3:55 am | शुचि

=)) सॉलीड आहे पाटी =))

चतुरंग's picture

31 Aug 2011 - 4:01 am | चतुरंग

अगदी अगदी!

क्र.१ तर भन्नाटच आहे! ;)
शिवाय 'कृपया मागे पहा' हे देखील मला ज्याम आवडले! =)) =))

-रंगा

इरसाल's picture

31 Aug 2011 - 11:03 am | इरसाल

पुणेरी पाटी पेक्षा कहर आहे आहे हा.
बरय पान पलटा किंवा बोर्ड पलटा असे नाही लिहिले.

कृपया मागे पहा.
तुमच्या मागे बिबट्या उभा आहे.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 2:07 pm | धमाल मुलगा

हे बिबटेपण अरबी असतायत होय?
मला नव्हतं माहिती.

विनायक प्रभू's picture

31 Aug 2011 - 3:19 pm | विनायक प्रभू

धम्या हाल कटा लय भारी.

अभिजित, माझ्या माहितीप्रमाणे बिबट्या संवर्धन प्रकल्पाच्या परिसरात थेट जाता येत नाही, कुणाचीतरी परवानगी वगैरे लागते त्याला, त्याबद्दल माहिती दे जरा. जर थेट जाता येत असेल, म्हणजे ओणवे न होता, तर जाउन येइन म्हणतो.

मृत्युन्जय's picture

31 Aug 2011 - 1:26 pm | मृत्युन्जय

खाली बसताना व ओणवे होताना सतर्क रहावे

अर्रे देवा हा बिबट्या नक्की काय करतो?

डेडली पाटी.

ही वाचून कोण ओणवे व्हायला किंवा खाली बसायला धजावेल देव जाणे.

सदासर्वकाळ उभ्याउभ्यानेच वावरत असतील सगळे.

प्यारे१'s picture

31 Aug 2011 - 11:40 am | प्यारे१

>>>>ही वाचून कोण ओणवे व्हायला किंवा खाली बसायला धजावेल देव जाणे.

ओणवे होणे म्हणजे नक्की कसे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Aug 2011 - 12:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शाळेत अंगठे (पायाचे) धरून उभे रहायची शिक्षा असते ना, त्या पोज ला ओणवे होणे म्हणतात.

माझीही शॅम्पेन's picture

31 Aug 2011 - 12:57 pm | माझीही शॅम्पेन

अरे त्यालाच योगा मधे उत्तानपादासन म्हणतात का रे ? :)

शाहिर's picture

1 Sep 2011 - 11:01 am | शाहिर

प्र.का.टा.आ.

अभिजीत राजवाडे's picture

31 Aug 2011 - 5:51 pm | अभिजीत राजवाडे

५० फक्त मी आधीच मी दिलेल्या माहितीमधे ते लिहिले आहे.

आम्ही जीवधन-नाणेघाट ट्रेक केला होता, तेंव्हा ज्यांच्याकडे राहिलो होतो, त्यांनी सरपंचाना सांगितले. सरपंच स्वतः आमच्याबरोबर आले आणी आम्ही उभ्याउभ्याने आत जातो कि नाही याची काळजी घेतली.

पण मी आधी सांगितल्याप्रमाणे सरकारी ओळख लागते. नाहीतर दुसरा सरपंच शोधा.

(टिप - मिपा चे सरपंच चालणार नाही)

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा

>>(टिप - मिपा चे सरपंच चालणार नाही)
मिपाच्या सरपंचांनी येक आर्डर काढली तर ती नाकारायची फारेष्ट हापिसरांना पावर नाय. ;)

कौन्तेय's picture

1 Sep 2011 - 8:32 am | कौन्तेय

पिऊन टल्ली झालेल्या लोकांच्या चाळ्यांना दोष देता देता ही चर्चाही डॉगी स्टाईलवर घसरल्याने माझ्याकडून इथेच थांबतो. आभारी आहे. ही सहल वास्तवात आलीच तर चित्रे टाकीन मिपा.वर नवीन धाग्याद्वारे वा पिकासाची लिंक देईन.

धमाल मुलगा's picture

1 Sep 2011 - 10:30 am | धमाल मुलगा

वहिनीसाहेब लेकरांची शाळा बुडवायला तयार नसतील तर भंडारदर्‍याचा पर्याय कसा वाटतो? दोन दिवस मस्त बॅकवॉटर, (आवड असल्यास) थोडं लांब जाऊन अमृतेश्वर मंदीर वगैरे पाहता येईल.

सध्या तिथे फार गर्दीही नसल्यानं बुकिंगही मिळण्याचे चान्सेस खूप असावेत. आणि पावसाळ्यात भंडारदरा म्हणजे एकदम खल्लास प्रकरण दिसतं राव!

शाहिर's picture

1 Sep 2011 - 11:03 am | शाहिर

भंडारदरा हा अप्रतिम पर्यय आहे ..पण हॉटेल ची संख्या मर्यादीत आहे ..अम्रुतेश्वर मंदीर खुप सुन्दर आहे

अजितजी's picture

2 Sep 2011 - 2:38 am | अजितजी

माळशेज घाट सहली संबंधात -----१- MTDC चे गेस्ट हाउस चांगले आहे पण विजे ची खात्री नाही . battery जरूर जवळ ठेवा .२-प्रचंड ढग असतात आणि रूम मध्ये येतात आणि सगळी हांतरून पान्गरून ओले आणि थंड होतात .३- गिझर आहे पण वीज असली तर उपयोग ४-जेवण चांगले असते -नाश्ता पण ---त्या गेस्ट हाउस जवळच एक कडा आहे तेथे पाण्याचे धब धबे वाऱ्या मुले उलटे वर येतात ते मस्त आहेत

कौन्तेय's picture

2 Sep 2011 - 1:39 pm | कौन्तेय

वा अजीतजी,
बहुदा याच नेमक्या सल्ल्यांची मी वाट बघत होतो. धन्यवाद.

धम्माल, शाहीर,
भंडारदराही विचारात आहे. सुट्टीवर भारतात पोहोचल्यावर सारासार विचार करून ठरवतो. पण मुख्य अजेंडा हा शिवनेरी आहे. त्यामुळे माळशेजलाच बहुमत जाईलसं वाटतंय. भंडारदर्‍याहूनही जुन्नर - शिवनेरी करता येण्यासारखं आहे असं ऐकून आहे. पण तरीही बहुदा माळशेजच :-) !

सर्व चर्चार्थींना तुमच्या सर्व आगामी मोहिमांसाठी "शुभास्ते पंथानः"

शैलेन्द्र's picture

3 Sep 2011 - 12:16 am | शैलेन्द्र

फारसा विचार करु नका, ईतक घाबरण्यासारख काही नाही..

तुम्ही मुंबईवरुन जाणार का? म्हणजे कल्याणवरुन..
सकाळी तासभर लवकर निघा..टोकावडा सोडला की वैशाखरे लागतं, तिथुन एखाद किलोमीटर गेलात की उजव्या हाताला, नानेघाट ही पाटी दिसेल, गाडी बाहेर लावुन चालत आत जा.. छान हीरवी कुरण दिसतील, वहीनींना आणि मुलांना हा भाग खुप आवडेल. अजुन थोडे पुढे गेलात तर एक छान ओढा लागेल(पहीला नाही दुसरा). मुलांना मस्त अर्धा तास खेळु द्या पाण्यात.. गर्दी अजिबात नसते, आणि असले तरी ट्रेकर असतात.. तिथुन वरती धुक्यात हरवलेल्या नाणेघाटाचे फोटो काढा आणि परत फिरा.. एक तास जाईल पण सत्कारणी लागेल.

बाकी घाटात धबधबे असतातच.. आणी गर्दीही असते. जमलं तर आनंद घ्या, नाही तर पुढे सरळ गेस्ट हाउसला जा.. एम टी डी सी वर खुप छान ढग येतात. मस्त बसुन कॉफी वगैरे प्या.. घाट उतरुन पलीकडे जा, पिंपळगाव जोगा धरण आहे, तिथे शेजारी बांधावर बसुन संध्याकाळ घालवा.. खुप सुंदर भाग दिसतो. सक्काळी लवकर उठा.. पाच वाजता.. सुर्य उगवायच्या आत सहकुटुंब धबधब्यावर जा, कोणीही नसते. मनोसोक्त आनंद घ्या. मग पुढे शिवनेरी वगैरे करा.. लेण्याद्रीपण जमेल. येताना जमल्यास नारायण्गावजवळ वाईन व सॅन्ड्वीच छान मिळते(पुणे नाशीक रोड्वर) त्याचा अस्वाद घ्या. दुसर्‍या दिवशी पहाटे परत धबधबे, मग मुंबईला परत..

बिन्दास जा.. काही प्रोब्लेम नाही.

कौन्तेय's picture

4 Sep 2011 - 8:15 am | कौन्तेय

शैलेन्द्र ... पिक्चरपरफेक्ट.
संशयो मनीचा ढळला!
धन्यवाद - श्येश्ये - आरिगातोऽ

एक प्रश्न.
आपण नाणेघाट चढून वर गेल्यावर, खिंड ओलांडून तो दगडी रांजण लागतो. त्यापुढे मोठ्ठं पठार आहे. त्यावर काही हौशी लेकुरवाळे लोक मागच्या एका रस्त्याने गाड्या घेऊन आलेले दिसतात. तिथे गाडीने कसं पोहोचायचं?

शैलेन्द्र's picture

4 Sep 2011 - 1:21 pm | शैलेन्द्र

जुन्नरवरुन, तिथे जाता येइल.. रस्ता जरा खराब आहे.. जुन्नरवरुन, घाट्घरला जायच्या रस्त्याने जावे, घाटघरच्यापुढे नानेघाट.. एखाद तास लागावा जुन्नरवरुन. शिवनेरी पाहुन झाल्यावर सहज नानेघाट करु शकता. (तिथुन कल्याण व माळाशेज इतक जवळ वाटत, की त्या खिंडीतुनच गाडी उतरवायचा मोह होतो.. ;) )

कौन्तेय's picture

5 Sep 2011 - 7:42 am | कौन्तेय

हे शैलेन्द्रा,
काय वाट्टेल ते माग.
कसला नोस्ट्याल्जिया (मराठी शब्द काय योजावा यासाठी) उफ़ाळून आला राजे हो ... !
आता तिथे गेलंच पाहिजे. नॉस्टॅल्जिया शमवण्यासाठी तर खरंच, पण बाजारात जाऊन उगीचच याचा भाव काय त्याचा काय करून काहीही न घेता जाणाऱ्या गिऱ्हाईकाच्या वाट्याला येणारा तळतळाट पदरी पडू नये म्हणूनही.
काम्‌साहाम्‌निदा ... !

शैलेन्द्र's picture

5 Sep 2011 - 10:12 am | शैलेन्द्र

"पण बाजारात जाऊन उगीचच याचा भाव काय त्याचा काय करून काहीही न घेता जाणाऱ्या गिऱ्हाईकाच्या वाट्याला येणारा तळतळाट पदरी पडू नये म्हणूनही."

हेहेहे.. बरोबर.. पण खरच जा माळशेजमधे.. आणि फोटु टाका इथे.

दुसरं म्हणजे भंडारदर्‍याहुन शिवनेरी करायच्या फंदात पडु नका. भंडारदरा परीसर पुर्ण पाहण्यासाठी कमीत कमी तिन दिवस हवेत(चालायची- फिरायची तयारी असल्यास).