एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ?

प्रियाली's picture
प्रियाली in काथ्याकूट
24 Aug 2011 - 4:33 pm
गाभा: 

काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे,

"मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अ‍ॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत. नथुरामने गांधीजींचा नाही तर गांधीवादाचा खून केला सॉरी सॉरी हत्या केली, सॉरी सॉरी वध केला वगैरे विधाने मिपावर चमकत असत.

गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले वगैरे विषयांना १०० प्रतिसाद हमखास असल्याने आजही अशा विषयांची आठवण होते.

कालपर्यंत अहिंसेने प्रश्न सुटणार नाहीत म्हणणारे, गांधींना आणि गांधीवादाला भंपक म्हणणारे त्यांच्यापैकीच काहीजण आज अतिशय प्रेमाने दुसर्‍या गांधीवाद्याबद्दल लेख टाकत आहेत. उपोषणापूर्वी राजघाटावर जाऊन चिंतन करणार्‍या या नेत्याच्या सेवाव्रताला सलाम ठोकत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत, उपासाने त्यांच्या क्षीण होणार्‍या प्रकृतीची काळजी करत आहेत. भ्रष्टाचारावर अण्णांचा तोडगाच प्रभावी असल्याचे छातीठोक सांगत आहेत. अण्णांचा मार्ग हाच खरा मार्ग हे पटवून देण्याची अहमिका लागली आहे. उजवे-डावे सर्व एकत्र होऊन अण्णा विरोधकांचा समाचार घेत आहेत.

गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.

  • मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
  • अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
  • आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
  • की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 4:48 pm | छोटा डॉन

गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.

•मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
•अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
•आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
•की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?

नाही, ह्यातले काही असावे असे वाटत नाही.

सध्या आम्हाला अज्जिबात वेळ नाही हे आमच्या सहभाग नसण्यामागचे कारण आहे. जर ही परिस्थिती आली नसती तर तुम्हाला हा धागा काढावा लागावा नसता, आम्ही अनेकांच्या 'अपेक्षा' जरुर पुर्ण केल्या असत्या ;)

असो, सध्या चालु द्यात ;)

- (हम नहीं बदलेंगे वाला)छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Aug 2011 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रियाली-जी, तुमच्या सारख्या जुन्या (जाणत्या असे पण लिहिणार होतो पण नकोच, बर्‍याच लोकांचा आक्षेप असेल) सदस्येने असे लिहावे याचा खेद वाटला. गांधी विरोधक असतील, पण त्यांना का मन नाही? त्यांचे का मतपरिवर्तन होऊ शकत नाही? शिवाय आमच्या एका गुर्जींनी 'मोठे व्हा' चा एवढा सतत धोशा लावला होता की 'होतो मोठा, पण धोशा आवर' असंही त्यांना वाटलं नसणार का? हे मानवी मनाचे कंगोरे आता काय आम्ही तुम्हाला समजवून सांगायचे का? छे:, तुम्हारा चुक्याच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2011 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?

परिवर्तन हा तर सृष्टीचा नियम आहे, त्याला मिपा अपवाद कसे असेल....?

अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे ?

हम्म...! संदर्भ श्री अण्णांच्या आंदोलनाचा असेल तर लोकांना आपली चीड व्यक्त करण्याची एक योग्य पायवाट श्री अण्णांच्या आंदोलनातून दिसत आहे. अहिंसेचा आणि उपोषणाच्या मार्ग स्वीकारणार्‍याचा उद्देश अतिशय स्वच्छ आणि विश्वासास पात्र ठरणारा असा आहे असे वाटल्यामुळे लोक अहिंसेचे आणि उपोषणाचे समर्थन करत आहेत असे मला वाटते.

आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
निरंक
की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
निरंक

अवांतर : रामलीला मैदानावर पोलिसांची संख्या वाढवण्याचे काय कारण असेल बरं...? [खरडवहीत सांगा रे कोणीतरी]

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:01 pm | प्रियाली

परिवर्तन हा तर सृष्टीचा नियम आहे, त्याला मिपा अपवाद कसे असेल....?

लेख वाचलात ना??? तुमचे उत्तर सांगते आहे की मिपा गांधीवादी होऊ लागले आहे. ;)

बाबौ!!

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 5:04 pm | छोटा डॉन

>> तुमचे उत्तर सांगते आहे की मिपा गांधीवादी होऊ लागले आहे.

चूक !
कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ? ;)

- छोटा डॉन

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:10 pm | प्रियाली

कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ?

वैयक्तिक मत असायला हरकत नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे लक्षात घ्या कारण प्रश्न संपूर्ण मिपाबद्दल आहे. ;)

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 5:13 pm | छोटा डॉन

>>वैयक्तिक मत असायला हरकत नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे लक्षात घ्या कारण प्रश्न संपूर्ण मिपाबद्दल आहे

तेच की, पण एकदा वैयक्तिक मत आहे म्हटल्यावर ते 'सत्य' असेलच ह्याची खात्री देता येत नाही आणि तशी आकडेवारीही मांडता येत नाही, वैयक्तिक हे वैयक्तिकच असते आणि ते कधीच कुणाचे 'सेम' नसते ;)

असो, ते प्रातिनिधीक मत नाही हेच मला म्हणायचे आहे.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:14 pm | प्रियाली

ते प्रातिनिधीक मत नाही हेच मला म्हणायचे आहे

हे तुमचे वैयक्तिक मत झाले. बाकी, आम्हाला बिरुटेसरांच्या मताचा आदर आहे. ;)

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 5:20 pm | छोटा डॉन

बिरुटेसरांनी स्वतः खुलासा केल्याशिवाय 'बिरुटेसरांचे मत प्रातिनिधीक नाही' ह्या माझ्या मताला 'वैयक्तिक' ठरवता येणार नाही. ते जर ते प्रातिनिधीक असल्याचे मान्य करत असतील तर मग चर्चा वेगळ्या अनुषंगाने पुढे सरकु शकते व तेव्हा आम्ही अशी ढीगभर 'वैयक्तिक' मते मांडु.

तुर्तास बिरुटेसरांचा खुलासा येत नाही तोवर बिरुटेसरांच्या सो कॉल्ड प्रातिनिधिक मताबद्दलचे माझे मत हे 'वैयक्तिक' ठरु शकत नाही ;)

- छोटा डॉन

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:23 pm | प्रियाली

मत वैयक्तिक असण्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे सांगायचे आहे. आता शब्द निघून गेले आहेत, फिरवून फायदा नाही. म्हणून "लेख वाचला ना" असा प्रश्न सरांना केला होता. ;)

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 5:28 pm | छोटा डॉन

>>मत वैयक्तिक असण्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे सांगायचे आहे.

अहो तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजते आहे.
पण एखाद्याने संपुर्ण समाज/गट/संस्था ह्याबद्दल काही 'वैयक्तिक' मत बनवले तर त्याची व्याप्ती तितकीच रहाते असे आमचे म्हणणे आहे.

उदा : क्रिकेट हा भिकारडा खेळ आहे असे आमचे 'वैयक्तिक' मत आहे पण त्याने क्रिकेट खरोखरच १००% भिकारडे होत नाही ;)
भारतीय षंढ आहेत असेही काही जणांचे वैयक्तिक मत आहे पण त्याने समस्त भारतीय षंढ होत नाहीत ;)

तात्पर्य असे की 'वैयक्तिक' मत हे तेवढ्याच व्याप्तीपुरते व्हॅलिड असते असे आमचे ठाम 'वैयक्तिक' मत आहे

- छोटा डॉन

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:30 pm | प्रियाली

तात्पर्य असे की 'वैयक्तिक' मत हे तेवढ्याच व्याप्तीपुरते व्हॅलिड असते असे आमचे ठाम 'वैयक्तिक' मत आहे

आमची चर्चाही तेवढ्याच व्याप्तीत आहे तेव्हा आता चर्चेशी संबंधित प्रतिसाद येऊ द्या. ;) संपादकांनी फार अवांतर लिहिलेले आम्हाला रुचत नाही बॉ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2011 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ?

हो हो. ते माझं वैयक्तिक मत आहे. डॉन म्हणतोय तेव्हा बरोबरच असेल. :)

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

24 Aug 2011 - 5:22 pm | छोटा डॉन

धन्यवाद बिरुटेसर :)

प्रियालीतै, बघा बरं आम्ही काय म्हणत होतो ते. ;)

असो, आता गैरसमज मिटला ह्याचा आनंद आहे, 'भ्रष्टाचारमुक्त सरकार येऊ शकते व तसे पुढारी असु शकतात' असे गैरसमजही मिटले तर तत्सम आंदोलनांची व त्या अनुषंगाने येणार्‍या धाग्यांची गरजच पडणार नाही असे एक 'वैयक्तिक' मत मी इथे मांडतो. ;)

- छोटा डॉन

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:28 pm | प्रियाली

'भ्रष्टाचारमुक्त सरकार येऊ शकते व तसे पुढारी असु शकतात' असे गैरसमजही मिटले तर तत्सम आंदोलनांची व त्या अनुषंगाने येणार्‍या धाग्यांची गरजच पडणार नाही असे एक 'वैयक्तिक' मत मी इथे मांडतो.

असे गैरसमज मिटत नाहीत म्हणूनच धाग्यांची आवश्यकता भासते असे आमचे निदान आहे.

बाकी, तुमच्या वैयक्तिक मताचा आदर आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2011 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मिपा गांधीवादी होऊ लागले आहे.
मिपा हे कोणत्या एका विचाराचे आहे हेच मला मान्य नाही. वेगवेगळया वृती-प्रवृत्तीची माणसं इथे वावरतात. कोणी गांधीवादी आहे, कोणी डाव्या-उजव्या विचारांचे आहे, मिपावर असे कोणी आहे हे तर मला अजून कळले नाही. (असेल तर माहिती नाही) एक-एक विचार प्रत्यक्ष जीवनात येण्यासाठी तितका ध्येयवाद जिवनात यायला लागतो. आपण इथे सर्व समवयस्क लहान-थोर अजून विचारांच्या बाबतीत शिकतोय, समजून घेतोय असे मला वाटते.

असो, बाकी, चालू द्या......!

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

24 Aug 2011 - 5:33 pm | विनायक प्रभू

मी ना डावा ना उजवा
मी आपला 'मधला'

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:34 pm | प्रियाली

मी ना डावा ना उजवा
मी आपला 'मधला'

नक्की का?

विनायक प्रभू's picture

24 Aug 2011 - 5:40 pm | विनायक प्रभू

आता तुम्हालाच शंका असावी ह्यास काय म्हणावे ?
माझ्या मधल्या विचारसारीणी बद्दल कुणालाही कधीच शंका नव्हती.

सहमत....

विजुभाऊ's picture

24 Aug 2011 - 4:59 pm | विजुभाऊ

डॉन्याशी एकदम सहमत.
अग्दी माझ्या मनात्ले बोल्लास

ऋषिकेश's picture

24 Aug 2011 - 5:13 pm | ऋषिकेश

प्रश्न (माझ्यापुरते (तरी)) गैरलागू

गांधी तत्व् ज्ञान आणि व्यक्ती या भिन्न गो ष्ती आहेत ...तत्व ज्ञाना चा आदर आहे पण म्हणून त्या व्यक्ती ने केलेले सर्व बरोबर अशी आंधळी व्यक्ती पूजा नाहिये ...उद्या अण्णा हजारे नी चुकिची मागणी केली तर त्यांचे तत्व् ज्ञान पटत असुन सुद्ध त्यांना विरोध होइलच !

विजुभाऊ's picture

24 Aug 2011 - 5:16 pm | विजुभाऊ

धाग्याचे टी आर पी वाढवायची . २२/७ क्र. ची पॉलिसी सुरु झाली आहे

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:20 pm | प्रियाली

तुम्ही हातभार लावल्याबद्दल.

इनो घेत चला!

विजुभाऊ's picture

24 Aug 2011 - 5:30 pm | विजुभाऊ

इनो घेत चला!
न विचारता दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याबद्दल धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 5:43 pm | चेतन सुभाष गुगळे

<< इनो घेत चला! >>

ही जाहिरात समजायची का?

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 7:28 pm | प्रियाली

नाही. माझी इनोची एजन्सी नाही आणि कंपनीही नाही आणि मी माझा मोबाईलही दिलेला नाही.

तुम्ही मात्र मोठे व्हा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 7:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही मात्र मोठे व्हा!

तुमची काँप्लानची एजन्सी आहे काय? ;-)

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 7:47 pm | प्रियाली

तीही नाही आणि मी मोबाईल अद्यापही दिलेला नाही. ;)

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 7:54 pm | चेतन सुभाष गुगळे

किंवा तुम्हाला इनोनं ब्रॅंड ऍम्बॅसिडर म्हणून नेमलेलं असू शकतं (मुन्नीला नाही का झंडू बाम वाल्यांनी नेमलं).

थोडक्यात मोबाईल नंबर न देताही जाहिरात करता येते (मुन्नी कुठं देते? तरीही झंडू बाम खपवतेच ना?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली पुढच्या धाग्याचं शीर्षक सुचवते, "आंतरजालावरील सुप्रसिद्ध शद्बप्रयोग"

काही शब्दप्रयोगांचा अंतर्भाव करच. उदा:

  • इनो घेणे
  • (काँप्लान घ्या आणि) मोठे व्हा
  • समाज ही गुंतागुंतीची चीज आहे
  • सडके
  • 'प्रेरणा'
  • आंतरजालावर कोणी कोणाचे मित्र नसतात, असतात ते फक्त हितचिंतक
प्रियाली's picture

24 Aug 2011 - 8:55 pm | प्रियाली

तुम्ही कशाला रक्त आटवताय उगीच मला ब्रँड अँबॅसेडर बनवून आणि समभाग देऊन? याला फक्त स्वप्नांचे इमले बांधत बसणे म्हणतात. पुरे करा. काही उपयोग नाही.

मोबाईल देऊन जाहीरात तुम्हीच करताय अद्याप ;) खरं सांगा!

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 10:22 pm | चेतन सुभाष गुगळे

मी कशाला रक्त आटवू?

<< मोबाईल देऊन जाहीरात तुम्हीच करताय अद्याप खरं सांगा!>>

आता तुम्ही सांगाच मी कसली जाहिरात करतोय ते. कारण जाहिरातीचा उद्देश जनतेत आपल्या व्यवसायाची माहिती देणे हा असतो. जर तुम्ही मी कुठल्या व्यवसायाची जाहिरात करतोय ते सांगु शकलात तर मी तुमचा आरोप मान्य करीन, अन्यथा तुम्ही हा आरोप बिनशर्त मागे घ्या.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 11:50 pm | प्रियाली

प्रशिक्षणासाठी संपर्क करा अशी जाहीरात नाही का केली भौ तुम्ही मग्गाशी?

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 11:59 pm | चेतन सुभाष गुगळे

उलट तुम्हीच शिकवणी केव्हा चालु करायची? असं मला विचारलंत तेव्हा मी आश्चर्याने

<<अच्छा तुम्हाला कळले तर>>

असा उद्गार टंकला होता याचाच अर्थ मी "इथे किंवा इतरत्र कोठेही या संकेतस्थळावर उल्लेख न करताही तुम्हाला कसे कळले" असा अभिप्रेत होता.

तुमच्या माहितीकरिता सांगतो - तो माझा व्यवसाय नाहीच मूळी. ते काम मी हौसेखातर करतो, त्याचा कुठलाही मोबदला घेत नाही. चरितार्थाचे साधन दुसरेच आहे. त्याचाही कुठेच उल्लेख केलेला नाहीय.

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 12:01 am | प्रियाली

तो माझा व्यवसाय नाहीच मूळी. ते काम मी हौसेखातर करतो, त्याचा कुठलाही मोबदला घेत नाही. चरितार्थाचे साधन दुसरेच आहे. त्याचाही कुठेच उल्लेख केलेला नाहीय.

मोबदला मिळाला तरच जाहीरात केली जाते असे थोडेच आहे का? जाहीरात काय प्रसिद्धीसाठीही होते. तुम्ही ते करत असाल.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 12:11 am | चेतन सुभाष गुगळे

<< जाहीरात काय प्रसिद्धीसाठीही होते. तुम्ही ते करत असाल. >>

व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय कधी प्रसिद्धी होते का?

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 12:36 am | प्रियाली

ही जाहीरात तुम्हीच केलीत ना? वर मला आमंत्रणही दिलंत.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 7:39 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्हीच तसा प्रस्ताव मांडलात. सगळं पुन्हा नीट क्रमवार वाचा. (अर्थात त्यामागचा तुमचा छुपा उद्देश वेगळाच होता. मलाच मनोरूग्ण ठरवून माझी शिकवणी घेण्याचा, जो मी उधळून लावला.)

धन्या's picture

25 Aug 2011 - 11:04 am | धन्या

कॉमेडी अवांतराचा शेवट मात्र ट्रॅजेडी झाला ;)

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 2:50 pm | प्रियाली

तुम्हीच तसा प्रस्ताव मांडलात.

मी मोठ्या वयाच्या बालीश बुद्धीच्या लोकांना शिकवण्यात रूची आहे असे लिहिले होते. तुम्ही ते होता म्हणून तुम्हाला त्यात छुपा उद्देश दिसला काय? म्हणून मी काय करावे - प्रशिक्षिका व्हावे असे तुम्हीच सुचवून सल्ले देत होता.

मोठ्या वयाचे बालीश बुद्धीचे पुरुष फक्त असायलममध्ये दिसत नाहीत हेच खरे दुखणे असावे. ;)

पण..... जाहीरात तुम्हीच केलीत. ;)

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 3:10 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुम्ही ते होता म्हणून तुम्हाला त्यात छुपा उद्देश दिसला काय?>>

तुमच्यापासून शिकवणीची सुरूवात करते असं विधान तुम्हीच आधी मांडलंत आणि मला यात बळेच ओढलंत. माझ्यावर कसला जाहिरातीचा आरोप करताय?

स्वत: दुसर्‍याला इनो घ्यायचा सल्ला देऊन पुन्हा तिसर्‍यावर जाहिरात केल्याचा आरोप करता. भलत्याच 'इनो'दी बाई आहात तुम्ही

<<म्हणून मी काय करावे - प्रशिक्षिका व्हावे असे तुम्हीच सुचवून सल्ले देत होता.>>

सल्ला न मागता दिला नव्हता. तुम्ही इथे सर्वच वाचकांना उघड प्रश्न विचारला होता - कुठे मिळतील असे पुरूष? म्हणून. पुढे तुम्हाला हवे तसे पुरूष दुर्मिळ आहे हे कळल्यावर तुम्हालाच ते तसे घडवावे लागतील या करिता हा सल्ला दिला होता. अशा पुरूषांची तुम्हाला खरंच रिक्वायरमेंट आहे का? असल्यास माझ्याशी वाद कशाला घालता, उलट मी मदत करतोय याचे आभार तरी माना की; नसल्यास माझा सल्ला मागे घेतो म्हणजे मग विषयच संपला.

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 3:11 pm | प्रियाली

तुमच्यापासून शिकवणीची सुरूवात करते असं विधान तुम्हीच आधी मांडलंत आणि मला यात बळेच ओढलंत. माझ्यावर कसला जाहिरातीचा आरोप करताय?

मी करते असा आशावाद व्यक्त केला. संपर्क साधण्यासाठी तुम्ही सांगितलेत. मोबाईल तुम्ही देता. जाहीरात तुम्ही केलीत. :-)

कुठे मिळतील असे पुरूष? म्हणून. पुढे तुम्हाला हवे तसे पुरूष दुर्मिळ आहे हे कळल्यावर तुम्हालाच ते तसे घडवावे लागतील या करिता हा सल्ला दिला होता. अशा पुरूषांची तुम्हाला खरंच रिक्वायरमेंट आहे का? असल्यास माझ्याशी वाद कशाला घालता, उलट मी मदत करतोय याचे आभार तरी माना की; नसल्यास माझा सल्ला मागे घेतो म्हणजे मग विषयच संपला.

कुठे मिळतीलचे उत्तरही मी कवितेत शेवटी दिले होते. त्यामुळे तुमचे आभार मानायची गरजच नाही पण तुम्ही सल्ला मागे घेत असलात तर थोडे "मोठे" झालात असे म्हणायला वाव आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 3:38 pm | चेतन सुभाष गुगळे

<< मी करते असा आशावाद व्यक्त केला. संपर्क साधण्यासाठी तुम्ही सांगितलेत. मोबाईल तुम्ही देता. जाहीरात तुम्ही केलीत.>>

नाही आशावाद नुसता व्यक्त केला नाहीत तर चक्क कधीपासून शिकवणी चालु करताय असा प्रश्न टाकला. मी उत्तर दिलं नसतं तर पलायनवादी म्हणून आरोप करायला मोकळ्या, म्हणून उत्तर. आता शिकवणी चालु करायची म्हणजे तुम्हाला माझ्याशी संपर्क करायला हवाच म्हणून माझा संपर्क तपशील खाली आहे एवढंच सूचित केलं. (तो नेहमीच माझ्या स्वाक्षरीत असतो. मुद्दाम वेगळा दिला नाही.) अर्थातच ती जाहिरात ठरत नाही कारण त्यात कुठलेही अर्थकारण सूचित होत नाही (जसे की तुमच्या 'इनो'दी सल्ल्यातून सूचित होते - इनोच्या विक्रीचे).

<<कुठे मिळतीलचे उत्तरही मी कवितेत शेवटी दिले होते. त्यामुळे तुमचे आभार मानायची गरजच नाही >>

हा कृतघ्नपणा झाला. तुमच्या कवितेचा शेवट नीट पाहा.

<<कुठे मिळतील असे पुरुष?,
इतिहासात दुर्मिळ होते
वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत>>

कुठे भेटतील याचं उत्तर नाहीच दिलेलं. आता तुम्ही खोटेपणाच करायचं ठरवताय.

<< पण तुम्ही सल्ला मागे घेत असलात तर थोडे "मोठे" झालात असे म्हणायला वाव आहे. >>

तुमची मापन निकषता काय आहे? आणि तुमच्या ठरविण्याने मी लहान / मोठा ठरणार आहे का? आणि तुम्ही किती मोठ्या हे कोण ठरवणार? तेही तुम्ही स्वत:च का?

याला म्हणतात मुद्दा नसला की गुद्यावर उतरणे. तुम्ही उतरला असलात तरी मी सुसंस्कृत असल्याने या गुद्दा गुद्दीत उतरू इच्छित नाही.

तुमचं चालु द्या. (तसेही उपप्रतिसादाला उपप्रतिसाद देत देत हे उपुपुपुप्रतिसाद बरेच संकुचित होत चालले आहेत (जरा यांची रूंदी पाहा). असल्या संकुचितपणात मला रस नाही. तेव्हा माझ्याकडून मी आता या विषयावरचा संवाद थांबवित आहे. म्हणजे गांधीवाद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या या धाग्यावरील ही वादावादी तरी संपुष्टात येईल.

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 3:46 pm | प्रियाली

आता शिकवणी चालु करायची म्हणजे तुम्हाला माझ्याशी संपर्क करायला हवाच म्हणून माझा संपर्क तपशील खाली आहे एवढंच सूचित केलं. (तो नेहमीच माझ्या स्वाक्षरीत असतो. मुद्दाम वेगळा दिला नाही.) अर्थातच ती जाहिरात ठरत नाही

मोबाईल तुम्ही दिला की नाही? म्हणजे जाहीरात तुम्ही केलीत. मी माझा संपर्क दिला नाही म्हणजे जाहीरात नाही. अर्थकारणासाठीच जाहीरात होते असे नाही.

तुमची मापन निकषता काय आहे? आणि तुमच्या ठरविण्याने मी लहान / मोठा ठरणार आहे का? आणि तुम्ही किती मोठ्या हे कोण ठरवणार? तेही तुम्ही स्वत:च का?

मोठे झालात हे तुमचे कौतुक होते. तुलना नै कै. पण ठीक आहे तुम्हाला तुमचे कौतुक नको असेल तर नाही करत.

याला म्हणतात मुद्दा नसला की गुद्यावर उतरणे. तुम्ही उतरला असलात तरी मी सुसंस्कृत असल्याने या गुद्दा गुद्दीत उतरू इच्छित नाही.

खोखोखोखो! तुम्ही सुसंस्कृत? ही देखील जाहीरात का?

जसे की तुमच्या 'इनो'दी सल्ल्यातून सूचित होते - इनोच्या विक्रीचे

चला तुम्हीही पटकन इनो घेऊन टाका.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 5:16 pm | चेतन सुभाष गुगळे

ती लढाई परक्यांविरूद्ध असल्याने त्यावेळी त्यांना अहिंसेचा मार्ग चूकीचा वाटला असेल. आता ही लोकनियूक्त सरकारविरूद्ध असल्याने हा मार्ग बरोबर वाटत असेल. हा मुद्दाही ध्यानात घ्यायला हवा.

माझे वैयक्तिक मत : शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग चूकीचा आहे. त्याला त्या मार्गाने हरविणे वेळखाऊ असते. तर जनतेने निवडून दिलेल्या सरकारला वेठीस धरण्याकरिता शांततामय मार्गाने केलेले आंदोलनही चूकीचे असते. स्वत: निवडणूका लढवून लोकप्रतिनिधी बनून संसदेत जाणे / न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणे असे घटनात्मक मार्ग उपलब्ध असतातच ना.

नंदन's picture

24 Aug 2011 - 5:20 pm | नंदन

हा 'चक्रनेमिक्रमेण'मधला प्रकार असावा काय? :)
बाकी जाणकार सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

राम राम मिपाकरहो,

यापुढे मिपावर मोहनदास करमचंद गांधी, जे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि काही लोक ज्यांचा उल्लेख 'महात्मा गांधी' असा करतात,

त्यांच्याविषयी या पुढे मिपावर काहीही (सविस्तर) लिहिण्यास, चर्चेचा कोणताही धागा काढण्यास पूर्णत: बंदी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..

अनेक घन्यवाद,

==================================================
हे राहून राहून आठवत आहे आज.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:26 pm | प्रियाली

परा हा धागा गांधींबद्दल नसून एका गांधीवाद्याबद्दल आहे. नीट वाच बघू!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

निट वाच ग तै.

त्यांच्याविषयी या पुढे मिपावर काहीही (सविस्तर) लिहिण्यास, चर्चेचा कोणताही धागा काढण्यास पूर्णत: बंदी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..

त्यांचे नाव आले का नाही ? विषय संपला ;)

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 5:35 pm | प्रियाली

थांब! तुझ्या चर्चेत गांधींचे नाव घेते. ;)

शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग चूकीचा आहे. त्याला त्या मार्गाने हरविणे वेळखाऊ असते. तर जनतेने निवडून दिलेल्या सरकारला वेठीस धरण्याकरिता शांततामय मार्गाने केलेले आंदोलनही चूकीचे असते.
जयप्रकाश नारायणानी पोलीस आणि सैन्याला हुकूम न मानण्याची विनन्ती केली होती त्याची आठवण झाली.
सरकार जनतेने निवडून दिलेले असते हा गैरसमज आहे. जे निवडून येतात ते मिळून सरकार बनवतात किंवा येत नाहीत ते सरकार बनवतात.आनि नंतर निवडून येतात.
शांततामय मार्गाने आंदोलन करणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहे असा आजवरचा इतिहास आहे.
संघर्ष रक्तपात करून जे निवडून येतात ( जिंकतात) त्यांचा शेवट सुद्धा तसाच होतो.( उदा: तालीबान) हा देखील इतिहास आहे.( अपवाद औरंगजेब)
गुगळे जी आपले विचार फारच क्रान्तीकारक आहेत. कदाचित आणखी तीस चाळीस वर्षांनन्तर ते लोकाना आपलेसे वाटू शकतील

शाहजी,

एकतर माझ्या प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रत्युत्तर न देता इथे दिलेत आणि तेही चूकीचे..

<< संघर्ष रक्तपात करून जे निवडून येतात ( जिंकतात) त्यांचा शेवट सुद्धा तसाच होतो.( उदा: तालीबान) हा देखील इतिहास आहे.( अपवाद औरंगजेब) >>

मी रक्तपाताचा मार्ग सूचविलेला नाहीच. फक्त आंदोलनाला (ते शांततामय मार्गाने असले तरी) घटनात्मक चौकटीतला पर्याय सूचविला आहे. पुन्हा एकदा नीट वाचा.

<<स्वत: निवडणूका लढवून लोकप्रतिनिधी बनून संसदेत जाणे / न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणे असे घटनात्मक मार्ग उपलब्ध असतातच ना.>>

अवांतर : तुम्ही पण भविष्यवेत्ते आहात काय?

<< गुगळे जी आपले विचार फारच क्रान्तीकारक आहेत. कदाचित आणखी तीस चाळीस वर्षांनन्तर ते लोकाना आपलेसे वाटू शकतील>>

नाही असं भविष्य कसं काय वर्तविलंत?

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2011 - 4:29 pm | llपुण्याचे पेशवेll

शांततामय मार्गाने आंदोलन करणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहे असा आजवरचा इतिहास आहे.
सहमत आहे. शिवाजी महाराजांनी आग्र्यामधे औरंगजेबाच्या कैदेत असताना केलेल्या आमरण उपोषणामुळेच औरंगजेबाने त्यांची सुटका केली होती. आज आण्णा रामलीला मैदानावर त्याची पुनरुक्ती करत आहेत.

विसोबा खेचर's picture

24 Aug 2011 - 5:37 pm | विसोबा खेचर

की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?

मे बी..!

बाकी चालू द्या.. :)

तात्या.

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 7:50 pm | प्रियाली

सांगा की जरा एक्श्प्लेन करून. तुमच्या मौलिक प्रतिसादासाठीच तर केला हा सर्व खटाटोप. ;)

राजेश घासकडवी's picture

24 Aug 2011 - 5:39 pm | राजेश घासकडवी

मिपावर गेल्या दीडेक वर्षात प्रचंड बदल झालेले आहेत याबाबत वादच नाही. त्यातले कुठचे चूक कुठचे बरोबर वगैरे चर्चा न करता, काही नमूद करू इच्छितो. त्यावरून हे स्पष्ट होईल की मिपा आता तारुण्य संपून मध्यमवयीन व्हायच्या मार्गावर आहे.

- एके काळी मिपाच्या मुखपृष्ठावर खादाडीबरोबर उत्तान सुंदरीचा फोटो यायचा. आता काही पाशवी शक्तींच्या उदयामुळे पुरषांचे अर्धनग्न फोटो येतात. वर ती आपली संस्कृतीच कशी आहे याचं स्पष्टीकरणही येतं. लिंगसमानतेच्या बाबतीत पारडं दुसऱ्या बाजूला झुकलेलं आहे की काय अशी शंका येते.
- एके काळी लेखांना, प्रतिसादांना गलिच्छ कॉमेंट्स येण्याचं प्रमाण खूपच जास्त होतं. आता ते कमी झालेलं आहे.
- मध्यंतरी संपादक मंडळावर सदस्यांचा हल्ला व त्याला संपादक मंडळाचं आधिकारिक धोरणातून प्रत्त्युत्तर असा लढा चालू होता. आता सदस्यप्रवृ्त्ती जरा मऊ झालेली आहे. व्यवस्थापनानेही स्वयंसंपादन वगैरे परत देऊन गुण्यागोविंदाने रहाण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
- गांधीवादाविषयी लेखात उल्लेख आला आहेच.

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांवरून मिपाची मध्यमवयाकडे वाटचाल सुरू झाली हे दिसून येतं. सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे हे मधूनमधून मिपा दमून झोपलेलं असतं यावरून दिसून येतंच. लवकरच मिपाला डायेबिटीस, रक्तदाब वगैरेंचाही त्रास सुरू होईल असं भविष्य वर्तवतो.

Dhananjay Borgaonkar's picture

24 Aug 2011 - 5:50 pm | Dhananjay Borgaonkar

तुमच भविष्य खोट ठरो हीच प्रार्थना. मिपा कायम तरुणच राहीली पाहिजे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

'घासु गुर्जी होण्यापेक्षा मला जॉन अब्राहम व्हायला का आवडेल?' ह्या धाग्याची वाट बघत आहे.

*धाग्याची वाट बघत आहे, गुर्जींच्या फोटूची नाही ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 7:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 9:18 pm | प्रियाली

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांवरून मिपाची मध्यमवयाकडे वाटचाल सुरू झाली हे दिसून येतं. सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे हे मधूनमधून मिपा दमून झोपलेलं असतं यावरून दिसून येतंच. लवकरच मिपाला डायेबिटीस, रक्तदाब वगैरेंचाही त्रास सुरू होईल असं भविष्य वर्तवतो.

गुर्जींच्या विश्लेषणाने ड्वाळे पाणावले. देव करो आणि मिपा लवकरच बरं होवो!

आनंदयात्री's picture

24 Aug 2011 - 11:56 pm | आनंदयात्री

मध्यमवयीन मिपा हे कदाचित वयस्कर कार्यकर्त्यांची उठबस वाढल्यानेही असेल :)

(छिद्रान्वेश्यांसाठी: कृपया आमच्यात आणि कार्यकर्त्यांमधे भांडण लावायचे उद्योग करु नयेत, उपरोल्लेखित कार्यकर्त्ये वेगळे)

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 11:56 pm | प्रियाली

कार्यकर्ते वयस्क झाले आहेत याच्याशी बाडिस.

श्रावण मोडक's picture

25 Aug 2011 - 10:51 am | श्रावण मोडक

शेवटी त्यानं ऐकलं माझं. ;)

Dhananjay Borgaonkar's picture

24 Aug 2011 - 5:47 pm | Dhananjay Borgaonkar

जसा रोग तस औषध. सगळीकडेच तुमचा हा गांधीवादीपणा कसा उपयोगी पडेल याचे क्रुपया स्पष्टीकरण द्यावे.
आण्णांच्या सध्याच्या लढ्यात हिंसा करुन काहीच साध्य होणार नाही. बसेस जाळुन तोड्फोड केली तर सरकार अट्क नाही का करणार? आणि अशा परीस्थितीत जनतेचा पाठिंबा मिळण केवळ अशक्य होईल.

आता मला सांगा उद्या मुंबई बाँब्स्फोटातला गुन्हेगार सापडला तर त्याच्याशी अहिंसेने वागणार का?

आणि तुम्ही जे वर जे खोचकपणे म्हणालात की वध, खुन हत्या हे त्यावेळी करण अतिशय आवश्यक होतच. कारण देशापेक्षा गांधी त्याचा वाद मोठा नाही. असो हे खुप अवांतर होतय. बाकी तुमची चर्चा चालुदे.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2011 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll

आता मला सांगा उद्या मुंबई बाँब्स्फोटातला गुन्हेगार सापडला तर त्याच्याशी अहिंसेने वागणार का?
हो आम्ही त्याच्यासमोर रोज उपोषणाला बसू. :)

आणि तुम्ही जे वर जे खोचकपणे म्हणालात की वध, खुन हत्या हे त्यावेळी करण अतिशय आवश्यक होतच. कारण देशापेक्षा गांधी त्याचा वाद मोठा नाही. असो हे खुप अवांतर होतय. बाकी तुमची चर्चा चालुदे.
चुकता आहात माणसावरून देश ओळखला जातो. आम्ही की नै आमच्या काऊंटीतल्या शॉपिंग मॉल मधे जातो तेव्हा गोरे लोक विचारतात कुठले हो तुम्ही? आम्ही म्हणतो "आम्ही इंडीयाचे". मग त्यांना काहीच कळत नाही. मग आम्ही म्हणतो "आम्ही गांधींच्या देशातले". मग बरोब्बर कळते त्यांना. त्यामुळे तुमचे म्हणणे पटले नाही.

विनायक प्रभू's picture

24 Aug 2011 - 5:47 pm | विनायक प्रभू

डायबेटीस, रक्तदाब वगैरे चा त्रास सुरु झाल्यावर होणारी इतर डीस्फंक्शन्स वर औषधाचा साठा करावा काय?

दत्ता काळे's picture

24 Aug 2011 - 6:02 pm | दत्ता काळे

आता काही पाशवी शक्तींच्या उदयामुळे पुरषांचे अर्धनग्न फोटो येतात. वर ती आपली संस्कृतीच कशी आहे याचं स्पष्टीकरणही येतं. .. हे एकूण मतप्रवाहातून उलट्या दिशेने वहातंय, असं वाटतंय.
अगोदरची काही वैचारीक खुन्नस आहे कां ?

श्रावण मोडक's picture

24 Aug 2011 - 6:56 pm | श्रावण मोडक

हे राम!!!

चतुरंग's picture

24 Aug 2011 - 7:03 pm | चतुरंग

लोकांच्यात काड्या सारायला! ;)

काडीरंग

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 7:11 pm | चेतन सुभाष गुगळे

देखो ओ दीवानों तुम यह काम न करो; राम का नाम बदनाम न करो।

http://www.youtube.com/watch?v=IautKhwCjq0&playnext=1&list=PL187870CC401...

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 7:27 pm | प्रियाली

या सर्व प्रकाराचे दोषी हेच आहेत. ;)

घासुगुर्जी आता मोकळा श्वास घ्या.

राम का नाम बदनाम न करो।
मुहमे राम बगल मे ....... असे एक वाक्य डोळ्यापुढे चमकून गेले

आत्मशून्य's picture

24 Aug 2011 - 7:34 pm | आत्मशून्य

की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?

बरोबर. (हा धागा कौल असायला हवा होता)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2011 - 7:35 pm | धमाल मुलगा

एव्हढं कशाला डोकेफोड करुन घ्यायची? एका वाक्यात उत्तर देता येईल.

मिपा हे समाजाच्या एका सरमिसळलेल्या मोठ्या भागाचे प्रतिबिंब आहे, आणि समाज ही एक गुंतागुंतीची चीज आहे.

शिंपल!

अवांतरः एकुणातच, पडलेले प्रश्न हे हितचिंतेमधून पडले असावेत काय?

आनंदयात्री's picture

24 Aug 2011 - 8:18 pm | आनंदयात्री

सहमत आहे. मिपा मोठ्या समाजाचे प्रतिबिंब आहे :)
मोठ्या समाजात डावे, उजवे, अतिरेकी छुपे देशद्रोही हे सगळे येणारच .. अंमळ टाईमपास करायचा असेन तेव्हा वाचेन इतर प्रतिक्रिया सविस्तर.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2011 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll

इतर प्रतिक्रिया सविस्तर.
हे देखील सध्याच्या प्रवाहाला अनुसरून लिहीण्याची पद्धत आहे का?
पळा मारतंय आता. ;)

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2011 - 7:51 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ

नगरीनिरंजन's picture

25 Aug 2011 - 3:16 am | नगरीनिरंजन

काही का असेना. काँग्रेसवाल्यांनाच आता गांधीवाद/दी नडतोय याचाच आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. ;-)

ह्म्म्म....
माझ्या टाळक्यातले इचार :---
गांधीवादी असो वा सावरकरवादी देशाचे काही तरी भले झाले पाहिजे असा विचार टाळक्यात का नसावा ?
व्यक्ती विरोध आणि व्यक्तीच्या विचारांना विरोध या दोन गोष्टी आहेत... प्रत्येकाचे प्रत्येक विचार पटायलाच हवे असे नाहीत्,तसेच त्या व्यक्तीचे काही विचार पटायलाही हरकत नसावी...
अण्णा भगतसिंग आणि राजगुरु यांना विसरु नका असे देखील त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत... अण्णा स्वतः गांधीवादी असुन त्यांनी ही नावे घेतली आहेत.
असो...
जाता जाता :--- सध्या आंदोलन शांतता मार्गाने चालु आहे, परंतु असामाजिक तत्व अशाच संधीच्या शोधात असतात ! उद्या जर या स्थितीचा फायदा घेउन कोणी हिंसाचार सुरु केला तर तो थांबवणे महाकठिण जाईल... परिस्थीती चिघळण्याच्या आधीच तोडगा निघायला हवा असे वाटते आहे. अण्णांची सध्याची प्रकॄती पाहुन काळजी वाटते आहे.
कालाय तस्मे नमः !

धनंजय's picture

24 Aug 2011 - 9:52 pm | धनंजय

थोडा फरक आहे, थोडा नाही.

अण्णा हजारे आंदोलनाबाबत एका धाग्यात अभय बंगांनी* केलेल्या विश्लेषणाबाबत (ते पटले म्हणून) माझी आणि अन्य दोन-तीन सदस्यांची मते आली.
अभय बंग यांनी बिनायक सेन* यांच्याबाबतही असेच काही विश्लेषण केले होते. सरकारचे आणि कोर्टाचे चुकल्याचे म्हटले होते. (अभय बंग या बाबतीत स्वतःशी सुसंगत आहेत.) परंतु त्या बाबतीतले विश्लेषण मिसळपावावर अनेकांनी एक तर ऐकले नव्हते, नाहीतर न पटूनही बंगांबाबतच्या आदरामुळे बिनायक सेन विरोधी मत असलेल्या लोकांनी सरसकट दुर्लक्षिले होते.

अण्णा हजारे आंदोलनानंतरच्या पुढल्या विषयात गांधीवाद/घटना-अधिकार्‍यांचे सार्वभौमत्व वगैरे सगळ्या बाबतीत लोक पुनर्विचार करतील. वेगवेगळे लोक पुन्हा वेगवेगळी मते मूलभूत तत्त्वे म्हणून मांडतील.

आणि वयोमानानुसार आणि जुन्या ओळखीनुसार तर फरक आहेच. दोन-तीन वर्षांचे जालीय वय म्हणजे जुने-जाणतेपणच होय. कित्येक जुन्या-जाणत्या लोकांचे एकामेकांत तावातावाने "तात्त्विक" भांडून झाले आहे. आता त्यांच्या आपापसातल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांत थोडीफार सबूर दिसून येते.

- - -
(*वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे. मला पटणारी प्रथा आहे.)

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 11:37 pm | प्रियाली

वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे म्हणून बंगांना डॉ. बंग म्हणू नये या व्यतिरिक्त असणारा वरील प्रतिसाद मला कोणीतरी मराठीत भाषांतरित करून द्यावा. अनुवादही चालेल. शक्य असल्यास चर्चेशी त्याचा संबंधही सांगावा.

मंडळ आभारी असेल. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 12:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 12:38 am | प्रियाली

म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.

आणि प्रा. डॉनी? ;)

असो.

डॉक्टरांचं कळलं पण बाकी प्रतिसादाचा अर्थ कळला नाही असं म्हणायचं होतं.

प्रस्तावातील प्रश्न : मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
प्रतिसादातील उत्तर "थोडा फरक आहे, थोडा नाही." राजेश घासकडवी यांनी गेल्या दोन-तीन वर्षांतली काही परिवर्तने नमूद केली आहेत. त्याला जोड म्हणून मी हे नमूद केले आहे की जुने-जाणते पूर्वी तितक्या अटीतटीने एकमेकांच्या विरोधातले मुद्दे मांडत नसावेत. (म्हणजे थोडा फरक झाला.) हे वातकुक्कुट होणे नव्हे. विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही. (म्हणजे थोडा फरक नाही.)

प्रस्तावातील प्रश्न : अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
मिसळपावावरील बर्‍याच चर्चांत उपोषणाचा उल्लेख सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र, घटनात्मक लोकशाही वगैरे प्रक्रियेला ब्लॅकमेल करण्याचे तंत्र वगैरे, अशा प्रकारे वाद झालेले आहेत. याबाबतीत अण्णा हजारे प्रकरणात उपोषणासारख्या "घटनाबाह्य" दबावतंत्राचे समर्थन करण्यासाठी अभय बंग यांची मुलाखत दाखला म्हणून दिली गेली. माझा मुद्दा आहे, की "घटनाबाह्य वैयक्तिकरीत्या शांततामय दबावतंत्राचे" महत्त्व हे मिसळपावावरती अगदी हल्लीच, बिनायक सेन प्रकरणात सर्वमान्य नव्हते. अभय बंगांचे बिनायक सेन यांना समर्थन आहे, ही बाब लक्षणीय आहे. मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे, असे माझे स्पष्टीकरण आहे.

प्रस्तावातील प्रश्न : आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
नाही. कुठल्या राजकीय गन्तव्यांना समर्थन देऊ याबाबत बहुतेक मिसळपाव सदस्यांचे मत स्थिर आहे. वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्या गन्तव्याच्या समर्थनात असले, तेव्हा त्यांचे महत्त्व समजून येणे, मात्र वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्यावेगळ्या गन्तव्याच्या समर्थनात असल्यास त्यांचा धोका समजणे : हे वातकुक्कुट नसून स्थैर्य आहे.

प्रस्तावातील प्रश्न : की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
हा प्रश्न अलंकारिक वाटतो, उत्तर अपेक्षित नसावे :-)

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 3:09 am | प्रियाली

विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही.

हे लक्षात आले आहेच. पूर्ण मतपरिवर्तन न होणे धोकादायक वाटते. तो संधीसाधूपणाही असू शकेल.

मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे

शक्य आहे.

मुक्तसुनीत's picture

24 Aug 2011 - 10:04 pm | मुक्तसुनीत

"मिपा गांधीवादी बनते आहे का ?"
या प्रश्नाचे अनेक अर्थ असू शकतात. मिपाचे चालक गांधीवादी बनलेत का ? मिपाचे प्रशासकीय अधिकारी तसे बनले आहेत का ? मिपाचे अधिकाधिक सभासद गांधीवादी बनलेत का ? मिपाचे सर्व सभासद गांधीवादी बनलेत का ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या मते "नाही" अशीच आहेत. एकंदर मिपावर - आणि अन्य संस्थळांवर देशकालसंदर्भातल्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब पडताना दिसते. वर्तमानकालीन परिस्थितीमधे अण्णा हजारे या गांधीवादी व्यक्तीच्या आंदोलनाचा प्रभाव भारतीयांच्या मनावर आहे हे उघड आहे. याचंच प्रतिबिंब इथे पडताना दिसतंय, इतकंच.

उद्या कुठल्या अन्य स्वरूपाच्या विचारसरणीतल्या व्यक्ती/घटना ठळक बातम्यांमधे यायला लागल्या तर तशा स्वरूपाच्या चर्चा उद्भवतील.

प्रियाली's picture

25 Aug 2011 - 12:09 am | प्रियाली

अण्णांचा प्रभाव पडणे याच्याशीच संबंधित आहे हा विषय. जर मला स्मगर्लस पसंत नसतील तर मला दाउद पसंत नसेल आणि वीरप्पनही पसंत नसेल पण एखाद्याला गांधी पसंत नसतील तर त्यांना अण्णा पसंत का असावेत? जर गांधींच्या उपोषणाने आणि उपासाने देशाचे प्रश्न सुटले नाहीत, सुटणार नसतील तर अण्णांना पाठिंबा का बरे? :)

मुक्तसुनीत's picture

25 Aug 2011 - 12:22 am | मुक्तसुनीत

अहो उद्या कदाचित "दाऊदभाई जरा जपा" इतपत येतील धागे. म्हणजे काही पाठिंबा नव्हे ! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Aug 2011 - 4:40 pm | llपुण्याचे पेशवेll

अरे यावरून आठवले मिपा सदस्या गांधीवादी बरेच दिवसात मिपावर फिरकेलेले दिसत नाहीत.

पिवळा डांबिस's picture

24 Aug 2011 - 10:04 pm | पिवळा डांबिस

काही असो, मिपावर जास्तीत जास्त वातकुक्कुट (आणि वातकुक्कुट्या!!) असाव्यात असं आम्हाला नेहमीच वाटतं...
आमच्या सागुतीसाठी उपयोगी पडतात हो!
-राक्षस ऑफ पाताळविजयम्
;)

पैसा's picture

24 Aug 2011 - 11:26 pm | पैसा

आधी कोंबडी की आधी अंडं या प्रश्नाइतकाच कठीण प्रश्न प्रियालीला पडलाय खरा... पण पिडांकडे याचंही उत्तर आहे... ;)

प्रियाली's picture

24 Aug 2011 - 11:28 pm | प्रियाली

प्रश्न कठीण नाही पण उत्तर किती कठीण आहे ते कळतंय. ;)

आम्हाला वातकुक्कुटच आवडतात. कोंबडी या स्त्रीलिंगी सतत अत्याचार झाल्याने वातकुक्कुटींना बाजूला ठेवावे आणि वातकुक्कुटाचीच सागुती करावी. आमंत्रण द्यायला विसरू नका.

पैसा's picture

25 Aug 2011 - 12:01 am | पैसा

"ही पाकृ अंडी न घालता करावी" आणि रासवट खिचडीला जसे खिचडा म्हणण्यात येते, तसंच वातकुक्कुटाच्या सागुतीला सागुती न म्हणता "तो सागुता" म्हणण्यात यावे अशी उपसूचना मांडण्यात येत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2011 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा...भक्षस ऑफ विजयीपाताळम :wink: ....ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

Nile's picture

25 Aug 2011 - 4:28 am | Nile

साम्यं आहे पण त्याचा अन गांधीवादाचा फार संबंध नाही असं आमचं मत आहे. आता आम्हाला अजून मोठं व्हायचं आहे त्यामुळे आमच्या मताला कीती महत्त्व द्यायचं ते मोठ्यांनीच ठरवावे (आणि मोठे नसल्याने कसंही असलं तरी आमचं मत आम्ही देणारचं)

गांधींमुळे देशाचं आणि पर्यायाने प्रत्येक भारतीयाचं (म्हणजे 'माझं') मोठं नुकसान झालं असा एक समज बर्‍याच लोकांमध्ये दिसतो. तद्वतच, ह्या भ्रष्टाचारामुळे देशाचं अन (पर्यायाने 'माझं') फार नुकसान होत आहे (मग आम्ही लायसन काढायाला स्वखुशीने १०० च्या नोटा देत असलो तरी) असा पक्का समज जनमानसात आहे असे दिसते.

साम्य हे की, गांधीविरोधी मते प्रकट करून किंवा त्या विरोधात (जमेल तितका) सक्रीय सहभाग घेऊन आपण आपले देशप्रेम व्यक्त करतो आहोत असे मान'सीक' समाधान लोकांना लाभत असावे. तसेच (रोजच्या भ्रष्टाचाराला मदत करत असूनही) या अण्णांच्या लढ्याला समर्थन दिल्याने आपण देशासाठी काहीतरी करत आहोत (आणि भ्रष्टाचाराला हातभार लावल्याच्या पापाचे क्षालन करीत आहोत) असे लोकांना वाटत असावे असे आमचे मत झाले आहे.

खरं तर सामान्य माणूस समर्थन देताना प्रत्येक वेळी माझे समर्थन कोणत्या 'वादाला' आहे याची काळजी करत असेल असे आम्हाला वाटतच नाही. 'वरलीया रंगाला' भूलून्/प्रेरीत होऊन तो समर्थन करत असतो. दूरगामी परिणामाची चिंता विचारवंत/जंत इत्यादींनी करावी असे त्याने गृहीतच धरलेले असावे. असो.

वसईचे किल्लेदार's picture

25 Aug 2011 - 9:58 am | वसईचे किल्लेदार

आजचे आंदोलन गांधीवादी आहे कि नाही हा मुद्दा बाजूला ठेउन गांधींबद्द्ल थोडेसे ...
गाधींना बोलण्याआधी अवीनाश धर्माधीकार्यांचा आवाज जरुर ऐकावा.
http://www.esnips.com/web/MahatmaGandhi-AvinashDharmadhikari