गाभा:
प्रिंट मिडिया सध्या सातत्याने अण्णाच्या विरोधी लिखाण करतो आहे (इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तुलनेत). उदाहरणार्थ आजच्या सर्व पेपरमध्ये अण्णाच्या चळवळीवर पातळी सोडून टीका आली आहे(अमेरिकेचे हस्तक, जातीयवादी). ह्याचे कारण माझ्या मते प्रिंट मिडीयाचे राजकारण्यांची असलेले घट्ट आर्थिक संबंध.आपल्याला काय वाटते?
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 8:40 am | चिरोटा
शक्यता आहे.पण इंग्रजी प्रिंट मिडिया अण्णांच्या बाजूनेच लिखाण करतो आहे. जेवढे वाचले आहे त्यावरून मराठी प्रिंट मिडियावाले विरोध करता आहेत असे दिसते.त्यातही तथाकथित ज्येष्ठ पत्रकार अण्णांना 'समजावून' सांगत आहेत आर्थिक संबंधांबरोबर पोटदुखी हेही कारण नाकारता येत नाही. टीम अण्णा कसे काम करते माहित नाही पण पत्रकार लोकांना टीम अण्णा भाव देत नसावी.
16 Aug 2011 - 9:15 am | विकास
पण इंग्रजी प्रिंट मिडिया अण्णांच्या बाजूनेच लिखाण करतो आहे. ...
सहमत. मात्र अजूनही प्रांतिक भाषिक वृत्तपत्रेच जास्त लोकसंख्येपर्यंत पोचतात असे वाटते.
पण पत्रकार लोकांना टीम अण्णा भाव देत नसावी.
किंवा (पत्रकार लोकांना) सत्ताधारी जास्तच भाव देत असावेत. :-)
16 Aug 2011 - 10:01 am | वेताळ
पाकिट असते. ते एकदम पाकिटावर लाथ नाही मारु शकत.
16 Aug 2011 - 11:00 am | अनंत छंदी
अण्णांच्या या पूर्वीच्या आंदोलनानंतर ममो यांनी देशातल्या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांच्या संपादकांची एक बैठक घेतल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे आठवते. त्यात "अर्थपूर्ण" चर्चा झाली असावी. त्यामुळे सर्व मिडियाचे अचानक मतपरिवर्तन झाले असावे. एरवीही "अर्थपूर्ण" चर्चेनंतर मिडियावाल्यांचे मत पालटते असा अनुभव आहे.
16 Aug 2011 - 11:00 am | नितिन थत्ते
मराठी वर्तमानपत्रांना अण्णांची जुनी ओळख आहे. त्यामुळे असेल. ;)
17 Aug 2011 - 9:11 am | कोदरकर
कारण इलेक्त्रोनिक चे आणि प्रिन्ट मीडिया असे युद्ध आहे....
17 Aug 2011 - 10:37 am | सविता
प्रिंट मिडिया अण्णाच्या विरोधात आहे का?
- मला तरी गेले दोन तीन दिवस मटा वाचून असे वाटत नाही.