हॅकींग उत्तरप्रदेशच्या गन्ना शोध परिषदेची !!

यकु's picture
यकु in काथ्याकूट
15 Aug 2011 - 2:39 am
गाभा: 

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, काश्मिरमधील लोकांना पाठिंबा देण्याचा दावा करणार्‍या / काश्मिरच्या स्वांतत्र्याची मागणी करणार्‍या तथाकथित एक्स्ट्रिमिस्ट हॅकर्सनी एक भारतीय संकेतस्थळ हॅक केले आहे. कुठले? तर उत्तर प्रदेश गन्ना शोध परिषदेचे!
आत्ता सहज संदर्भ शोधण्यासाठी या संकेतस्थळावर गेलो तर ही साईट हॅक झालेली दिसली (कदाचित अजून ही बातमी झालेली नसावी). ही साईट विकिपिडीयावर उत्तर प्रदेश शासनाचे संकेतस्थळ म्ह्णून नोंद आहे.

भारत सरकारची इतर संकेतस्थळेही तपासून पाहिली, ती व्यवस्थित चालू आहेत.
वरील संकेतस्थळ तसे सुरक्षा उपायांच्या बाबतीत दुर्लक्षित असे मानण्यास भरपूर वाव आहे - कारण हॅक करुन काय केले तर गन्ना शोध परिषद !

हॅक झालेले संकेतस्थळ : http://www.upcsr.org

यथावकाश उत्तर प्रदेश शासन योग्य ती पावले उचलून ही साईट हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त करील अशी आशा आहे.
पण हॅकींग सारख्या बाबतीत येथील रथी-महारथींची चर्चा ऐकण्यास उत्सुक आहे.

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

15 Aug 2011 - 4:07 am | गंगाधर मुटे

अजून ते प्रशासनाच्या लक्षातच आलं नसावं.

आत्मशून्य's picture

15 Aug 2011 - 4:18 am | आत्मशून्य

Registrant Name:Ahmad Jamal Siddiqui असे दाखवत आहे. साइट यापूर्वी पाहीली होती काय ? तेव्हांच्या आणी आताच्या मजकूरात फरक नसेल तर कोणीतरी विकीपीडीयावर माहीतीमधे छेड्छाड केली आहे असं वाटतं.

Domain ID:D156226950-LROR
Domain Name:UPCSR.ORG
Created On:25-May-2009 09:45:01 UTC
Last Updated On:20-May-2011 08:55:04 UTC
Expiration Date:25-May-2012 09:45:01 UTC
Sponsoring Registrar:Directi Internet Solutions Pvt. Ltd. d/b/a PublicDomainRegistry.com
(R27-LROR)
Status:OK
Registrant ID:DI_8289030
Registrant Name:Ahmad Jamal Siddiqui

साइट यापूर्वी पाहीली होती काय ? तेव्हांच्या आणी आताच्या मजकूरात फरक नसेल तर कोणीतरी विकीपीडीयावर माहीतीमधे छेड्छाड केली आहे असं वाटतं.

पूर्वी पाहिली नव्हती. विकिपिडीया वर जोडलेले संकेतस्थळ उ. प्र. शासनाचेच आहे असे वाटते.

या साईटचं मेंटेनन्स सिद्दिकी साहेबांकडे दिलेलं असावं. लिंक्डइन वर सिद्दीकींबद्दल हा मजकूर आहे-

Ahmad Jamal Siddiqui
Managing Director, MARG Software Solutions

Lucknow Area, India Information Technology and Services
Current
Managing Director at MARG Software Solutions
Connections
93 connections
Ahmad Jamal Siddiqui's Experience

Managing Director
MARG Software Solutions
Information Technology and Services industry
August 1998 – Present (13 years 1 month)

Contact Ahmad Jamal for:

Ahmad Jamal Siddiqui is not currently open to receiving Introductions or InMail™.

आनंदयात्री's picture

15 Aug 2011 - 5:06 am | आनंदयात्री

म्हणुनच पाकीस्तानी हॅकर्स हा चाईनीज हॅकर्सचा एक बागुलबुवा असावा असे वाटते.

यकु's picture

15 Aug 2011 - 7:08 am | यकु

काथाकुटात "संपादन" हा पर्याय दिसत नसल्याने इथेच पुरवणी प्रश्न लिहीत आहे. कृपया जाणकारांनी उत्तरे दिल्यास आभारी राहिन.
संस्थळाची हॅकींग म्हणजे संकेतस्थळाचा मालक सोडून दुसर्‍याच कुणीतरी माणसाने त्याचा ताबा मिळवणे एवढाच मला आतापर्यंत बोध झालेला आहे. यापुढचे प्रश्न म्हणजे -
१. साईट हॅक होते म्ह्णजे ती पूर्णपणे हॅक करणार्‍यांच्या ताब्यात जाते काय? की फक्त तिचे होमपेज ब्लॉक केले जाते आणि बाकी साईट तशीच त्यांच्या ताब्यात असते?
२. हॅकर्स संबंधित साईटच्या सर्व्हरमधील माहितीत फेरफार करु शकतात काय? ती नष्ट केली जाते काय ?
३. एखाद्या साईटच्या सर्व्हरवर नियंत्रण मिळवूनही ती हॅक न झाल्याचे भासवून हॅकर्स माहितीचा गैरवापर करतात काय?

कृपया आणखी प्रश्नांची भर टाकावी.

वेताळ's picture

15 Aug 2011 - 10:04 am | वेताळ

मायावतीना कळवा कुणी तरी.उत्तरप्रदेश विषयी अत्यंत मौलिक माहिती होती काहो त्या साईटवर?

वेताळ's picture

15 Aug 2011 - 10:05 am | वेताळ

मायावतीना कळवा कुणी तरी.उत्तरप्रदेश विषयी अत्यंत मौलिक माहिती होती काहो त्या साईटवर?

मायावतीना वेबसाईट म्हणजे काय हे देखील कोणीतरी कळवा

चिरोटा's picture

15 Aug 2011 - 12:58 pm | चिरोटा

Network/security infrastructure कडे दुर्लक्ष केल्याने हे झाले आहे. हल्लीच गृह/पंतप्रधानांच्या अखत्यारीतल्या काही वेबसाईट पण हॅक झाल्या होत्या.अनेक राज्यांनी/खात्यांनी वेबसाईटस केवळ बनवायच्या म्हणून बनवल्या आहेत.!

आत्मशून्य's picture

15 Aug 2011 - 4:55 pm | आत्मशून्य

Last Updated On:20-May-2011 08:55:04 UTC म्हणत असल्याने हे हॅकिंग आत्ताच झाले असावे असं वाटत नाही. निश्काळजीपणाचा चांगला नमूना आहे. कदाचित आपणच पहिले असाल ज्यांना सदरील संस्थळ हॅक झाले आहे हे सर्वप्रथम कळाले.

१. साईट हॅक होते म्ह्णजे ती पूर्णपणे हॅक करणार्‍यांच्या ताब्यात जाते काय? की फक्त तिचे होमपेज ब्लॉक केले जाते आणि बाकी साईट तशीच त्यांच्या ताब्यात असते?
- संपूर्ण ताब्यात जाते.

२. हॅकर्स संबंधित साईटच्या सर्व्हरमधील माहितीत फेरफार करु शकतात काय? ती नष्ट केली जाते काय ?
- हॅक झाली असेल तर हॅकर्स संबंधित साईटच्या सर्व्हरमधील माहितीत फेरफार करु शकतात वा ती नष्ट करु शकतात. घरात घूसल्यावर काय काय लूटायचं ही चोराची मर्जी.

३. एखाद्या साईटच्या सर्व्हरवर नियंत्रण मिळवूनही ती हॅक न झाल्याचे भासवून हॅकर्स माहितीचा गैरवापर करतात काय?
- चांगला प्लॅन आहे पण जर साइट हॅक झाली असेल व इतर लोकांकडून नियमीत चेक केली जात असेल/वापरात असेल तर गडबड लगेच लक्षात येऊ शकते. पण आपण म्हणत असलेला प्रकार पूरेशी सूरक्षा नसलेल्या उजरच्या अकांऊअट बाबत घडत राहणे सहज शक्य आहे. थोडक्यात आपण व्यवस्थित काळजी घेत नसू तर हॅकर्सना माहितीचा अशाप्रकारे गैरवापर करणे शक्य आहे.

आपल्या उत्तरांसाठी आभारी आहे. :)

Last Updated On:20-May-2011 08:55:04 UTC म्हणत असल्याने हे हॅकिंग आत्ताच झाले असावे असं वाटत नाही. निश्काळजीपणाचा चांगला नमूना आहे. कदाचित आपणच पहिले असाल ज्यांना सदरील संस्थळ हॅक झाले आहे हे सर्वप्रथम कळाले.

तसं असेल तर मग, हॅकर्सकडे असं सपाटून दुर्लक्ष करावं की त्यांनी हॅकींगच्या धंद्यातूनच उठून गेलं पाहिजे असं गन्ना शोध परिषदेनं ठरवलं असेल.