कट्टा ईन मेलबर्न !

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
2 Aug 2011 - 3:39 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,

कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बरेच दिवस वेळ झाला नाही इकडे डोकवायला. :)
असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी मेलबर्न, सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील मिपाकरांना भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे. (पुन्हा एकदा इथे काहीही दाखवण्याचा कोणताही क्षीण प्रयत्न नाही. :) )

कुणी मिपाकर मेलबर्न किंवा जवळपासच्या भागात असल्याचे माहिती असल्यास आणि त्यांच्यापर्यंत हा धागा नक्की पोहोचवावा ही विनंती.

मागच्या वेळीया धाग्यामुळे भरभरुन उसातले मिपाकर भेटले होते. चला तर मग तात्पुरत्या ऑसी मिपाकरांनो, होऊन जाऊ देत एक झकास झणझणीत कट्टा. :)

पुढील तपशीलासाठी कृपया व्यनितुन संपर्क साधावा.

आपला,
मराठमोळा

प्रतिक्रिया

च्यायची कटकट ... जिथे बघाव तिथे हे मिपाकर कट्टे आयोजीत करतायत.

अरे कुणी आहे का आफ्रिकेत?

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 4:09 pm | नन्दादीप

टारझन ला शोधा....

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार

आपण मेलबर्नवासी असल्याची जाहिरात करणारा धागा ;)

राक्या तू आधी इथे फोन करुन भेटायला शिक. मेलबर्न वैग्रे बघु नंतर.

कुंदन's picture

2 Aug 2011 - 4:27 pm | कुंदन

आधी बोलला असतास , तर दुबैला यायच्या आधी तिकडे आलो असतो.

योगी९००'s picture

2 Aug 2011 - 8:04 pm | योगी९००

तुमच्या आजुबाजूला जवळपास काही मराठी मंडळी रहात असतीलच..

त्यांना आधी मि.पा. चे सदस्य बनवा आणि लावा एक झकास झणझणीत कट्टा त्यांच्याबरोबरच.... हाय काय आन नाय काय..!! किंवा जी मंडळी कट्ट्याला येतील त्यांना तेथेच सदस्य बनवा...)

(मी पण तोच विचार करतोय.... ;०)

मन१'s picture

2 Aug 2011 - 8:36 pm | मन१

कुणी तिकिट पाठवेल भारतात ह्याची वाट पहातोय. ;-)
कट्ट्याला शुभेच्छा.

--मनोबा

धमाल मुलगा's picture

2 Aug 2011 - 8:43 pm | धमाल मुलगा

मीपण हेच म्हणायला आलो होतो, पण आमचा मनोबा मोठा हुश्शार हों....आधीच खडा टाकून बसलाय. ;)

राक्या...बघ रे...काय सोय लावतोस बोल.

निनाद's picture

3 Aug 2011 - 6:17 am | निनाद

येण्यास उत्सुक...

इंटरनेटस्नेही's picture

3 Aug 2011 - 6:36 am | इंटरनेटस्नेही

मेलर्बनला 'शिवनेरी' जाते का? ;)
-
(प्रवासी-दे-मुंबई-पुणे) इंट्या. ;)

नरेश_'s picture

3 Aug 2011 - 1:14 pm | नरेश_

मेलबोर्न कट्ट्याला शुभेच्छा देऊ यात !!

पूढील वेळी नक्की प्रयत्न करेन. कट्ट्याला मन:पूर्वक शुभेच्छा!!

मैत्र's picture

3 Aug 2011 - 7:12 pm | मैत्र

मी आहे सध्या इथे पण आता मुक्काम संपत आला आहे. एक दोन आठवड्यात जमल्यास येईन..
मेलबर्न सिटी मध्येच आहे - डॉकलँडस / कॉलिन्स स्ट्रीट.
व्य नि करा.