मुम्बईतील मिपाकर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
1 Aug 2011 - 3:01 pm
गाभा: 

मिपा परीवार बर्‍याच गावांत आहे. पुण्यातील लोक एकमेकाना बरेचदा भेटत असतात.
एखाद्या गावात गेलो तर आवर्जून तेथील मिपाकराना शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करतात.
मी दिल्लीत होतो त्यावेळेस गुरगावच्या इरसाल भाउनी जे आगत्य दाखवले त्याला तोड नाही.
कोणी आपल्या घरचा पाहुणा आला आहे इतक्या अगत्याने त्याने माझे स्वागत केले.
मिपाकर मोठ्या संख्येने पुणे आणि मुंबई मध्ये आहेत.
पुण्यातील मिपाकर बहुतेक एकमेकाना व्यक्तीशः ओळखतात. मात्र मुंबईतील मिपाकराना हे वेळेअभावी शक्य होत नसावे. देवकाका , प्रभू मास्तर , रामदास , निलकान्त ( सध्या बहुतेक मुम्बईकर) , स्पा , गवि , विमे , निधप , लीमाऊजेट , अमिता , वहीदा असे बरेच जण मुम्बैत आहेत ( ठाणे धरून बृहन्मुम्बई)
आपण इथे एक प्रयत्न करुयात ..... मुम्बईतील मिपाकरांच्या ओळखीचा
या धाग्यावर मुम्बईतील मिपाकरानी स्वतःची ओळख करुन द्यावी त्या योगे मुम्बईतील मिपाकरांची माहिती एकमेकाना होईल.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

1 Aug 2011 - 3:04 pm | विजुभाऊ

मी विजुभाऊ
मूळ गाव सातारा सध्या विले पार्ले ( पूर्व) .
व्यवसाय: इ आर पी सल्लागार.
छंद : वाचन, गाणे ऐकणे.

सुनील's picture

1 Aug 2011 - 3:10 pm | सुनील

चांगला उपक्रम. चालू द्या.

सोत्रि's picture

1 Aug 2011 - 3:18 pm | सोत्रि

प्रकाटाआ

- (पक्का पुणॆरी) सोकाजी

ऋषिकेश's picture

1 Aug 2011 - 3:40 pm | ऋषिकेश

मी अनिवासी मुंबईकर आहे. :)

स्पा's picture

1 Aug 2011 - 3:48 pm | स्पा

मी स्पा
नाव : प्रसन्न आपटे
मूळ गाव: राजापूर (आडिवरे) सध्या ठाकुर्ली ( पूर्व) .
व्यवसाय: 3d visualiser (मराठीत काय म्हणतात माहित नाही)
छंद : वाचन, गाणे ,भटकणे

आडिवर्‍याचा तू? अरे वा.

मी रत्नांग्रीचा. म्हणजे तसे मूळ गाव गुहागरनजीक. पण राहिलो वाढलो रत्नांग्रीसच. तिथून पावस पूर्णगड साईडने आडिवर्‍याला तरीत बसून चिक्कार वेळा जायचो मित्राकडे.

गेल्या महिन्यात ड्रायव्हिंग टूर करत त्या बाजूने आलो तेव्हा पाहिले त काय? तर-बीर सगळे इतिहासजमा. आता मोठेमोठे खाडीपूल सगळीकडे.

जातोस का रे आडिवर्‍यास अजून प्रसंगोपात्त?

कसल काय ..
नावाला गाव आहे आपल..
घर वेग्रे काहीच नाही :(

पण आडिवऱ्याची महाकाली.. आणि पावसचा स्वरूपानंदांचा आश्रम, मस्त ठिकाण आहेत , तिकडची खिचडी आणि कोकम सरबत तर अप्रतिम ..... :)
खिचडीला तर तोडच नाही ब्वा

अजितजी's picture

3 Aug 2011 - 4:13 am | अजितजी

मी गुहागर च्या जवळ पालशेत चा आता माटुंगा माहीम ला राहतो

प्रास's picture

1 Aug 2011 - 4:04 pm | प्रास

मी प्रास

नाव - प्रसाद अकोलकर.
राहणार - दादर (प), मुंबई ४०० ०२८
व्यवसाय - आयुर्वेद तज्ञ, औषध निर्मिती संशोधक.
छंद - नानाविध

पिंगू's picture

1 Aug 2011 - 5:52 pm | पिंगू

मी पिंगू

नावः भारत मुंबईकर
राहणारः नवी मुंबई, पण सध्यातरी तात्पुरता पुणेकर.
व्यवसायः रेड हॅट लिनक्स सपोर्ट.
छंदः बरेच आहेत. काय काय सांगू..

तात्पुरते का होइना पुणेकर आहात ना?
आता तुम्ही नावडते झालात.;)

इंटरनेटस्नेही's picture

2 Aug 2011 - 3:07 am | इंटरनेटस्नेही

तात्पुरते का होइना पुणेकर आहात ना?
आता तुम्ही नावडते झालात.

=)) =)) ज्योक समजल्या गेला आहे!

-
(एकेकाळचा तात्पुरता पुणेकर) इंट्या.

माझीही शॅम्पेन's picture

1 Aug 2011 - 5:56 pm | माझीही शॅम्पेन

ठाणे धरून बृहन्मुम्बई

निषेध निषेध निषेध ! ठाण्याला स्वत:चे अस्तिव आहे. (कृ ह घ्या)

ठाणे पकडायचं आहे तर पुणे पण पकडा की बृहन्मुम्बई मध्ये :)

मी-सौरभ's picture

1 Aug 2011 - 5:59 pm | मी-सौरभ

म्हंजे एका म्यानात २ तरवारी.

अवांतरः
शतकमहोत्सवी धागा होणार हा.... :)

पुणे पण पकडा की बृहन्मुम्बई मध्ये
चालेल. फक्त सदाशीव पेठ वेगळी ठेवा म्हणजे झालं.;)

इंटरनेटस्नेही's picture

2 Aug 2011 - 3:10 am | इंटरनेटस्नेही

पुणे पण पकडा की बृहन्मुम्बई मध्ये
चालेल. फक्त सदाशीव पेठ वेगळी ठेवा म्हणजे झालं.

सपे वेगळीच छान छान वाटते! ;) :D

-
(मुंबई (गोरेगावकर)) इंट्या!

प्रशु's picture

1 Aug 2011 - 8:24 pm | प्रशु

मी प्रशांत परब,

मुळ गाव, कणकवली. पण जन्म मुळचा परळ गावातला म्हणजेच गिरणगावातला. आणि म्हणुन पक्का मुंबईकर.
मुक्काम - विरार (प).
व्यवसाय - स्यॅप तंत्रदय.

......

प्रशु..

विजुभाऊ's picture

1 Aug 2011 - 8:57 pm | विजुभाऊ

सदाशिव पेठ ही पुण्यात आहे.
सदाशिव पेठेशिवाय पुणे म्हणजे सर्व उणे

शैलेन्द्र's picture

1 Aug 2011 - 9:18 pm | शैलेन्द्र

मि शैलेन्द्र..

शैलेन्द्र कवाडे..

व्यवसाय ... उम्म.. कळाला की सांगतो.. थोडक्यात.. एक भटका विक्रेता आहे..

रहायला डोंबिवलीत.. डोंबिवली पुर्व, जोशी हाय्स्कुल जवळ्ळ..

आवड म्हणाल तर खाणे.. भटकणे, गाडी दामटणे.. ईतीहास इत्यादी इत्यादी..

मुंबै कट्टा करणार असलात तर उपस्थीतीचा हात वर आहे..

क्लिंटन's picture

1 Aug 2011 - 9:36 pm | क्लिंटन

मी विल्यम जेफरसन क्लिंटन!! १९९३ ते २००१ या काळात अमेरिकेचा अध्यक्ष होतो. मोनिका ल्युइन्स्की प्रकरणी बराच बदनामही झालो होतो.

सध्या वास्तव्य चेंबूर येथे.नोकरी Yes Bank मध्ये. विकांताला विद्यार्थांना इंटरनेटवरून क्लास घेऊन बोअर करतो !! अनेक वर्षे विद्यार्थी असणे हाच माझा पेशा होता.पण आता बदल म्हणून नोकरी करत आहे. आवड म्हणाल तर अर्थशास्त्र, फायनान्स, इतिहास वगैरे वगैरे.

सध्या कार्यबाहुल्यामुळे मिपासाठी पूर्वीइतका वेळ देता येत नाही.तरीही मुंबई कट्टा झाल्यास यायला नक्कीच आवडेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Aug 2011 - 1:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>तरीही मुंबई कट्टा झाल्यास यायला नक्कीच आवडेल.
तुम्ही आणि ते वरचे शैलेंद्र, मागचा अख्खा आठवडा कुठे होते हो ??
म्हणजे कीर्तन होऊन गेले आणि आत्ता तुम्ही कापूस घेऊन आलात व्हय ??

असो, पुढील वेळेस नक्की या. आणि ती लेखमाला परत चालू करा ना, रामकुमार च्या छड्यावाली :-)

शैलेन्द्र's picture

2 Aug 2011 - 10:12 pm | शैलेन्द्र

अहो तुम्ही गपचुप गपचुप स्वाद घेता त्याला आम्ही काय करनार?

सुहास झेले's picture

1 Aug 2011 - 11:03 pm | सुहास झेले

चांगला उपक्रम !!

नाव: सुहास दिवाकर झेले..

राहणार: कांदिवली (चारकोप)

व्यवसाय : इम्फसीस (ही कंपनी माझी नाही, मी इथे काम करतो आणि कंपनी व्यवसाय करते ;-) )

छंद: खाणे, फिरणे आणि जमल्यास लिहिणे :) :)

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2011 - 11:39 pm | टवाळ कार्टा

मी एक सॉ.ई. (च++, जावा, शेल्ल स्च्रिप्त, .....)
नाव - चंदन सावंत
एक मिपाचा नियमीत वाचक
अजुन कहिहि टंकलेले नाही...वाट बघतोय आतुन उर्मि कधी येइल त्याची :)
आवड - वाचन, छायचित्रण, फटफट्या चालवणे, गप्पा, पत्ते, भटकणे....

५० फक्त's picture

2 Aug 2011 - 12:26 am | ५० फक्त

''अजुन कहिहि टंकलेले नाही...वाट बघतोय आतुन उर्मि कधी येइल त्याची''

उर्मि, म्हणजे मार्तोंडकरांची काय ओ,

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2011 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

मातोंडकरांची ऊर्मी आतून येत नाही.....
...........बाहेरून येते..... ह्ही ह्ही ह्ही ह्ही......:P -:P :tongue:

इंटरनेटस्नेही's picture

2 Aug 2011 - 3:22 am | इंटरनेटस्नेही

नाव: ऋषिकेश चिंदरकर
शिक्षणः बीएमएस (स्पेशलायझेशन: फायनान्स, एच आर), सध्या कंपनी सेक्रेटरी पर्स्यु करत आहे.
व्यवसाय: पुर्णवेळ विद्यार्थी.
वास्तव्याचे ठिकाणः मुंबई (गोरेगांव / जोगेश्वरी).
गांव: चिंदर (मुळ गाव)
सध्याचे गांव: कट्टा, मालवण तालुका / राष्ट्रीय महामार्ग, कुडाळ तालुका.
***
आपण www.facebook.com/rishikesh.chindarkar इथे मला कनेक्ट होऊ शकता.
***

मी जन्मानं मुंबईकर, परुळेकर हॉस्पिटल, हाजीअली इथं माझा जन्म झाला, म्हणजे मुंबई जन्मभुमी, मग सोलापुरात वाढलो, शिकलो आणि आता गेली ५ वर्षे पुण्यात आहे.

पण पहिल्या श्वासाबरोबर जी मुंबईची हवा या शरीरात भिनली आहे ती स्वस्थ बसु देत नाही, ओढते आतुन कुठेतरी, त्यामुळं प्रत्यक्ष मुंबैकर नसलो तरी मुंबईचा प्रचंड अभिमान आहे, बेस्ट आणि लोकल चालवणा-याबद्दल प्रचंड आदर आहे,

नोकरीवरुन काढुन टाकायची धमकी मिळुन सुद्धा नियमाबाहेर जाउन आणि आपल्या हातातल्या मशिनवर विश्वास ठेवुन लाखो मुंबैकरांना इष्टस्थळी वेळेवर पोहोचवणे याला सलाम, बेस्टवाल्यांची निम्मि शिस्त पुण्याच्या पिएमटीवाल्यांना लागलि ना तर पुणे जगणेबल होईल. असो फार अवांतर नको. घेतलेला पहिला श्वास मुंबईतच एवढ्या आधारावर हा प्रतिसाद

मराठी_माणूस's picture

2 Aug 2011 - 9:15 am | मराठी_माणूस

बेस्टवाल्यांची निम्मि शिस्त.......

शिस्त का बेशिस्त ?

माफ करा, पण हे पटु शकत नाही कारण , असंख्य कटु अनुभव गाठीशी आहेत . ते लोक रस्ता स्वत्;च्या ** चा असल्या सारखे बस चालवतात.

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2011 - 8:33 pm | अप्पा जोगळेकर

त्यामुळं प्रत्यक्ष मुंबैकर नसलो तरी मुंबईचा प्रचंड अभिमान आहे,
म्हणूनच तुम्ही खरे मुंबईकर नव्हेत. खर्या मुंबईकराला मुंबईचा जराही अभिमान नसतो हे पु.लं. च वाक्य शब्दशः खरे आहे हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. :)

बेस्ट आणि लोकल चालवणा-याबद्दल प्रचंड आदर आहे,
त्याहून जास्त आदर त्यामधे बसणार्यांबद्दल वाटला पाहिजे. :) तुम्ही फक्त एकच दिवस सकाळी डोंबिवली ते अंधेरी व्हाय साकी नाका हा प्रवास सकाळी ८ आणि संध्याकाळी ८ वाजता उलट दिशेने करुन पाहा म्हणजे नक्कीच कळेल. जे कर्जत/कसारा/बदलापूर वगैरे वरुन ये-जा करतात त्यांच्या बद्दल तर बोलणेच नको.

मि सौन्दर्य सोहोनी

जन्मलो परळ - के इ एम मध्ये, वाढलो बोरीवलि येथे. नोकरी निमीत्ते गुजरातला २० वर्षे वास्तव्व्य. महाराष्ट्रापेक्षा सम्पूर्ण गुजरात पालथा घातला.

सध्या मुक्काम ह्युस्ट्न, टेक्सास स्टेट, अमेरिका.

आवडी - वाचन,गाणि ऐकणे - खास करुन लोक संगीतात रुची, भट्कणे, हौशी फोटोग्राफर, डिस्कव्हरी, नेशनल जोग्रोफी मध्ये फार इंटरेस्ट, मित्रांबरोबर गप्पा मारणे आणि मधे मधे काहितरी (च) लिहीणे

मुंबई विषयी फार प्रेम, पण गर्दी, अस्वच्छ्ते मुळे नकोशी वाटते.

तरी मि मुंबईकरच.

सौन्दर्य

मराठी_माणूस's picture

2 Aug 2011 - 9:15 am | मराठी_माणूस

.

अमोल केळकर's picture

2 Aug 2011 - 9:30 am | अमोल केळकर

मी अमोल केळकर
राहणार - बेलापूर ( नवी मुंबई )
व्यवसाय - नोकरी

धन्यवाद

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Aug 2011 - 11:55 am | घाशीराम कोतवाल १.२

मी घाशीराम कोतवाल मिपाचा ३ वर्षाचा सभासद सध्या बॅक बेंचर
नाव शैलेश पिंगळे
काम - हार्डवेअर ईन्जिनिअर सिस्टिम अ‍ॅडमिन डब्लु एल सी कॉलेज
जन्माने पक्का मुंबईकर जन्म माझगावचा म्हण्जे गिरण गावातील

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 12:02 pm | नन्दादीप

मी नन्दादीप
नाव : आदित्य प्रदीप जोशी,
मूळ गाव: देवगड (व्ह्याया : रत्नागिरी(खानू)) , सध्या बोरिवली (पूर्व) . (काही काळापुरता पुणेकर)
व्यवसाय: आय. टी.,
छंद : वाचन, भटकणे (बायका* घेऊन)
.
.
.
..* - बाईक चे अनेकवचन.

आदिजोशी's picture

2 Aug 2011 - 12:22 pm | आदिजोशी

नंद्या माझं नाव ढापतो का बे?

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 12:29 pm | नन्दादीप

हा हा हा........

प्रास's picture

2 Aug 2011 - 12:29 pm | प्रास

ते डू आयडी, डू आयडी म्हणतात ते हेच का?

.....की डू आयडी सांगूनही लपवण्याची एक क्लुप्ती? ;-)

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 12:32 pm | नन्दादीप

नाय वो, डु. आयड्या वगैरे काय नाय....
मधल नाव वेगळ आहे ..........

आदिजोशी's picture

2 Aug 2011 - 12:35 pm | आदिजोशी

विचार करण्यासाठी समिती बसवली आहे.

साला ह्या इंटरनेटवरच्या गप्पांमुळे समोरच्याचे वय कळत नाही, मग लोचा होतो. ज्यांना मी ताई-दादा म्हणायचं अशी १७-१८ वर्षाची मुलं मलाच दादा म्हणतात तेव्हा वाईट वाटतं.

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 12:49 pm | नन्दादीप

आता वय पण टाकायच का प्रत्येकाने???? सगळ्या काकवांचा/माम्यांचा/आज्यांचा प्रॉब्लेम व्हईल ना भौ.....

पंगा's picture

4 Aug 2011 - 3:01 am | पंगा

आता वय पण टाकायच का प्रत्येकाने????

नाहीतर काय! तेवढेच राहिले होते. इथे लोक कोठल्या म्याटर्निटी हॉस्पिटलात जन्म झाला हे पण सांगून राहिलेयत. तरी नशीब डेलिवरी नॉर्मल* की सीसेक्शन हे नाही सांगितले अजूनपर्यंत एकाही पठ्ठ्याने.

* (हल्ली म्हणा सीसेक्शन हेच नॉर्मल असते इंडियात असे ऐकलेले आहे. असो.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Aug 2011 - 1:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

साहेब, आदित्य हे नाव जितके कॉमन आहे त्याच्या पेक्षा जास्त जोशी हे आडनाव कॉमन आहे. तुम्ही रस्त्यावर उभे राहून १२ दगड भिरकावले तर त्यातले ७ जोश्यांना लागतील. ;-)

भलतेच कठोर हो तुम्ही विमें.

रस्त्यावर उभे राहून १२ दगड भिरकावले तर त्यातले ७ जोश्यांना लागतील
कसले हे खळ्ळ फट्याक हिंसक विचार.

त्याऐवजी रस्त्यावर उभे राहून १२ फुले उधळली तर त्यातली ७ जोश्यांवर पडतील असं म्हटलंत तर?

कसे?

अन्या दातार's picture

2 Aug 2011 - 4:19 pm | अन्या दातार

विमे पूर्वीचे शिव किंवा आत्ताचे मनसैनिक असतील हो गवि!
सुंभ जळला तरी पिळ जात नाही ना! ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Aug 2011 - 9:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>त्याऐवजी रस्त्यावर उभे राहून १२ फुले उधळली तर त्यातली ७ जोश्यांवर पडतील असं म्हटलंत तर?
तुमच्या ओळखीत कुणी जोशी दिसत नाही. हीहीही :-)
(समस्त जोशांची विनोदबुद्धी खूप चांगली असते त्याचा गैरफायदा घेतो झाले.)
बाकी मुळ वाक्य वसंत सबनीसांचे आहे, ते बदलायचे कशाला ? फक्त देशपांडे ऐवजी जोशी घातले. एवढेच..

>>विमे पूर्वीचे शिव किंवा आत्ताचे मनसैनिक असतील हो गवि!
अरे मग, ओळख आहे आपली :-)

>>सुंभ जळला तरी पिळ जात नाही ना!
अरे सगळे माझ्या सुंभाच्या जीवावर का उठले आहेत रे ? सुंभ आणि पीळ, दोन्ही आहेत. ;-)

धमाल मुलगा's picture

2 Aug 2011 - 5:36 pm | धमाल मुलगा

जोशी आहेत हो अजून. ;)

पंगा's picture

4 Aug 2011 - 2:54 am | पंगा

:D

पंगा's picture

4 Aug 2011 - 2:53 am | पंगा

त्याऐवजी रस्त्यावर उभे राहून १२ फुले उधळली तर त्यातली ७ जोश्यांवर पडतील असं म्हटलंत तर?

मालक, फुलांना पैसे पडतात म्हटले. बारा फुलांचे पैसे तुम्ही देणार आहात काय?

धमाल मुलगा's picture

4 Aug 2011 - 1:59 pm | धमाल मुलगा

तुम्ही जोशीच ना?...की जोशी? ;)

आदिजोशी's picture

2 Aug 2011 - 12:25 pm | आदिजोशी

नाव - आदित्य रमेश जोशी
मु.पो. - बोरिवली (प.). मूळचा आणि पक्का गिरगांवकर
व्यवसाय - जाहिरात लेखक
छंद - झोपणे, बाईकवरून भटकणे, पुस्तक वाचन

michmadhura's picture

2 Aug 2011 - 1:18 pm | michmadhura

नाव : मधुरा कदम.

मुम्बैमधे सासर अशोकवन, बोरिवली पूर्व आणि माहेर ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व.

व्यवसाय: नोकरी, एअरलाइन रिझर्वेशन एक्झिक्युटिव, अकबर ट्रॅव्हलस

छंद : मिपावाचन

सविता००१'s picture

2 Aug 2011 - 2:44 pm | सविता००१

नावः सविता देशपांडे
माहेरः पुणे, सासरः भांडुप पू.
व्यवसायः ओनलाइन ट्रेडिंग - शेअर मार्केट
छंदः मिपावाचन

आदिजोशी's picture

2 Aug 2011 - 4:09 pm | आदिजोशी

बघता बघता बोरिवली-कांदिवली मधे बरेच मिपाकर निघाले की. एक कट्टा भरवूया लवकरच.

गणपा's picture

2 Aug 2011 - 4:30 pm | गणपा

आम्ही सध्या अनिवासी पण आहोत बोरिवली-दहिसरकर.
जन्मापासुन मुंबईकर.
पुढाल्या फेरीत नक्की हजेरी लावु.

नंदन's picture

3 Aug 2011 - 6:39 am | नंदन

आम्ही सध्या अनिवासी पण आहोत बोरिवली-दहिसरकर.
जन्मापासुन मुंबईकर.
पुढाल्या फेरीत नक्की हजेरी लावु.

--- अगदी असेच :)

मेघवेडा's picture

3 Aug 2011 - 8:44 pm | मेघवेडा

थोडाफार ऐसाय्च..

आम्ही सध्या अनिवासी पण आहोत गोरेगांवकर.
जन्मापासुन मुंबईकर.
पुढाल्या फेरीत नक्की हजेरी लावु. कधी करतांव तां सांगा..

इंटरनेटस्नेही's picture

2 Aug 2011 - 4:36 pm | इंटरनेटस्नेही

नक्कीच!

सुहास झेले's picture

3 Aug 2011 - 10:47 am | सुहास झेले

असेच म्हणतो :D

स्पा's picture

2 Aug 2011 - 4:11 pm | स्पा

बोरिवली-कांदिवली

बोरिवली-कांदिवलीवाल्यांचा.. कि मुंबईकरांचा ;)

पर्नल नेने मराठे's picture

2 Aug 2011 - 4:53 pm | पर्नल नेने मराठे

मी सॉ. पर्नल नेने मराठे
गिरगावकर (३१ ऑगस्ट पहाटे ४ पासुन ते २ ऑक्ट. रात्री ११ पर्य्न ) ;)

वा वा वा वा चुचू आत्ते आल्या निमित्त एक झक्कास कट्टा भरवू या मुम्बैत

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Aug 2011 - 5:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सदस्यनाव :- विश्वनाथ मेहेंदळे
राहणार :- दादर पूर्व
व्यवसाय :- आयटी हमाल.
छंद :- वाचन, गप्पा मारणे, ट्रेकिंग, गाणी ऐकणे (भाषांची बंधने नाहीत), नाटक(करणे नाही, बघणे), सध्या मिपावर पडीक असणे आणि हो शेअर मार्केट ची हालहवाल बघत राहणे.

गणेशा's picture

2 Aug 2011 - 8:37 pm | गणेशा

नाव :- गणेशा
रुम :- ऐरोली, नवी मुंबई.
घर : पुणे (पिंपरी-चिंचवड)
गावः बारामती(उंडवडी)
व्यवसाय :- आयटी, पवई
छंद :- लेखन, वाचन, ट्रेकिंग, बाईकिंग.

----
२००७ पासुन मुंबईत आहे, मुंबईबद्दल खुपच प्रेम आहे, शब्दात तसे जास्त मांडणार नाहीच.
कदाचीत एखादेच वर्ष येथे असेन आता, याचे वाईट वाटते आहे.

मुंबई तुला सलाम.

नितिन थत्ते's picture

2 Aug 2011 - 10:32 pm | नितिन थत्ते

मी नितिन थत्ते ऊर्फ खराटा

जल्म: ठाण्यात
शिक्षण: ठाण्यात
कायम निवास : ठाण्यात (सध्या तातुरता ठाण्याबाहेर)

जाई.'s picture

2 Aug 2011 - 11:37 pm | जाई.

नाव = जाई सरवणकर
व्यास्तव्य= गोरेगाव
छंद =वाचन कँलिग्राफी
शिक्षण =सीएस लॉ

अजितजी's picture

3 Aug 2011 - 4:06 am | अजितजी

मी अजित गद्रे --माटुंगा-माहीम चा ,जन्माने दादरकर आणि शिक्षणाने पण
सध्या रिटायर्ड आहे त्या मुळे माशा मारणे हेच काम आहे . कारण सगळी बँकेची कामे ecs ने होतात ना

मी नीरजा पटवर्धन.
पुण्याची माहेरवाशीण.
सासरः पार्ले इस्ट.
व्यवसायः नाटकसिनेमात खुडबुड चालू आहे. जम बसल्यास सांगेन.

विकाल's picture

3 Aug 2011 - 9:58 am | विकाल

विकाल

मुळ गाव आटपाडी जि सांगली

सध्या राहणार कामोठे नवी मुंबई

कामासाठी पडिक काळा घोडा, फोर्ट मुंबई

इजुभौ मुंबई बाहेरच्यांनी लीवायचे कि नाय ?
आमी मुंबईकर बी नाय आणि पुणेकर बी नाय !!!!!!!!!!!

किसन शिंदे's picture

3 Aug 2011 - 11:06 am | किसन शिंदे

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून सांगून हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
.

लै भारी! :)

इरसाल's picture

3 Aug 2011 - 2:20 pm | इरसाल

धन्यवाद किसन.

किसन शिंदे's picture

3 Aug 2011 - 11:21 am | किसन शिंदे

मी किसन शिंदे,
जन्माने पुणेकर पण लहानपणापासून मुंबईत(ठाण्यात) वाढलो म्हणून ठाणे-मुंबईकर!
सध्या डॉऊ कॉर्नींग मध्ये अ‍ॅडमीन ऑफीसर म्हणून कार्यरत.
छंद(त्यापेक्षा व्यसन हा शब्द कसा वाटतो? ) ;) म्हणाल तर, एक म्हणजे मिपावर नेहमी पडीक राहणे आणी दुसरं म्हणजे झपाटल्यासारखी(झपाटलेली नव्हे) पुस्तकं वाचणे.

तुषार घवी's picture

3 Aug 2011 - 2:17 pm | तुषार घवी

नमस्कार, मी तुषार घवी.
मुळचा पुणेकर, परंतु नोकरीनिमित्त डोंबिवलीत स्थायिक.
मिपावर वाचनमात्र.
छंद - झाक्या टाकणे. (पिंपरी चिंचवड चा ''वायफळ बडबडीला'' समानार्थी शब्द.)

वेडा कुंभार's picture

4 Aug 2011 - 9:54 am | वेडा कुंभार

नमस्कार, मी सतिश,
लहानपण भांडूप (पु) येथे गेले. सध्याचे वास्तव्य डोंबिवली (प ) येथे.
मिपावर वाचनमात्र.
व्यवसाय : पोटापाण्या साठी नोकरी
छंद - मिपा वाचणे, TV पाहणे (बायकोच्या डेली सोप्स संपल्यानंतर ), झोपणे

आमोद's picture

4 Aug 2011 - 11:00 am | आमोद

मी आमोद लाड, जन्म रत्नागीरी, शालेय शिक्शण विवेकानंद विद्यामंदीर, राणाप्रताप भवन,डोंबिवली (प ), सध्या वास्तव्य हरि ओम नगर मुलुंड (पू) येथे, व्यवसाय नोकरी

आमोद's picture

4 Aug 2011 - 11:01 am | आमोद

मी आमोद लाड, जन्म रत्नागीरी, शालेय शिक्शण विवेकानंद विद्यामंदीर, राणाप्रताप भवन,डोंबिवली (प ), सध्या वास्तव्य हरि ओम नगर मुलुंड (पू) येथे, व्यवसाय नोकरी

नितिन थत्ते's picture

4 Aug 2011 - 11:53 am | नितिन थत्ते

हरि ओम नगर ठाण्यात आहे की मुलुंड मध्ये?

(खवचट)

आमोद's picture

4 Aug 2011 - 12:10 pm | आमोद

आम्ही एका identity crisis मध्ये आहोत. मुलुंडचे रिक्शा वाले आमच्या कडे ढुंकुन पाहात नाहीत आणि ठाण्यातले ऊपकार केल्या सारखे येतात. जोडिला डंपीग ग्राऊंड आहेच की. तुम्ही ठाण्यात कुठे?

सुनील's picture

4 Aug 2011 - 12:34 pm | सुनील

जोडिला डंपीग ग्राऊंड आहेच की
अजून आहे का ते डंपिंग ग्राऊंड? आजकाल त्या परिसरातून जाताना पूर्वीसारखी दरवळ येत नाही!!

छोटा डॉन's picture

4 Aug 2011 - 2:10 pm | छोटा डॉन

आयला, मुंबईत एकगठ्ठा एवढे मिपाकर सोडाच पण एवढी मराठी मान्सं आहेत हे पहिल्यांदाच समजले.
आम्ही तर समजत होतो की मुंबईत मराठी टक्का कमीच आहे म्हणुन ;)

छान छान, मस्त वाटले एकदम.
बरं का, आम्ही पण चक्क २ संपुर्ण दिवस मुंबईकर झालो होतो, पण आता तेवढ्यातच आमची हौस फिटली आहे असे समजायला हरकत नाही.

- छोटा डॉन

आदिजोशी's picture

4 Aug 2011 - 2:34 pm | आदिजोशी

भारीच विनोदी बुवा डान्राव तुम्ही. खळखळून हसलो.

मी, किरण मराठे.
आई वडील, आजी आजोबा, काका मामा, सासू सासरे सगळे ठाण्यात.. टू बी स्पेसिफिकः नौपाड्यात.
सध्या देहाने उसात पण मनाने सतत नौपाड्यातच.

विलासराव's picture

9 Aug 2011 - 11:21 pm | विलासराव

विलास शिंदे.
गाव- बुगेवाडी, पारनेर.
सध्या गिरगाव, मुंबई.