गत सप्ताहात उपग्रह वाहिनीवर प्रसारित झालेला राजा आयेगी बारात हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटासोबत अपरिहार्यपणे जाहिरातीही पाहणे क्रमप्राप्त ठरले. त्यातली एक जाहिरात पाहता जाहिरातीमागची कथा आणि चित्रपटाची कथा यात कमालीचे साधर्म्य आढळले. हे साधर्म्य काय आहे हे समजण्याकरिता प्रथम थोडक्यात चित्रपटाचे कथासूत्र इथे मांडतो.
चित्रपटातील नायक (ननायक म्हणू शकता), नायिकेसोबत अतिप्रसंग करतो. त्यानंतर नायिका त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागते. पुढे ह्या अन्यायाची भरपाई म्हणून नायक व नायिका यांचा विवाह संपन्न होतो. अर्थात नायक विवाहानंतरही नायिकेला छळतच राहतो व पुढे त्यातच नायिकेचा अंत होतो.
या चित्रपटादरम्यान सौ. मलाईका अरबाज खान यांनी सादर केलेली झंडू बाम या औषधाची जाहिरात प्रसारित करण्यात येत होती. याच सौ. मलाईका अरबाज खान यांनी आपल्या गृहनिर्मिती असलेल्या दबंग या चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यात नृत्य केले होते तेव्हा त्यातील "झंडू बाम हुई, डार्लिंग तेरे लिए" या शब्दामुळे झंडू बाम चे निर्माते अस्वस्थ झाले होते. त्यांनी न्यायालयात धावही घेतली होती. शेवटी या अन्यायाची भरपाई म्हणून सौ. मलाईका अरबाज खान यांचेकडून त्यांनी साभिनय व सनृत्य झंडूबामची जाहिरात करवून घेतली आणि तिचे प्रसारणही चालु केले.
जाहिरात आणि सदर चित्रपट यात आढळलेले साधर्म्याचे मुद्दे :-
१. एक पक्ष दुसर्या पक्षाशी करू नये ते वर्तन करतो की ज्यामुळे तो दुसरा पक्ष दुखावला जातो.
२. दुखावला गेलेला दुसरा पक्ष पहिल्या पक्षाविरुद्ध न्यायालयात दाद मागतो.
३. पहिल्या पक्षाने दुसर्या पक्षावर केलेल्या अन्यायाची भरपाई म्हणून त्या दोन्ही पक्षांचा पाट लावला जातो.
साधर्म्य नसलेला मुद्दा म्हणजे, चित्रपटात नायकाबरोबर पाट लावून ही नायिकेची शेवटी शोकांतिकाच होते. झंडू बामची शोकांतिका जरा वेगळ्या प्रकारची आहे. झंडू बामची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, परंतू निर्मात्यांना त्यातून फारसा नफा होत नाहीय कारण मोठ्या प्रमाणावर बनावट (Duplicate) झंडू बाम ची निर्मिती होत असून अनेक लहान शहरातून व खेडेगावांमधून सर्रास त्याचीच विक्री होत आहे. तर अशा प्रकारच्या बनावट बामच्या भीतीने शहरी रूग्णांनी इतर बामकडे वळणे पसंत केले आहे. (आधारस्त्रोत :- माझ्या औषधविक्रेत्याकडून मिळालेली माहिती)
चित्रपट आणि त्या दरम्यान प्रसारित होणारी जाहिरात याचे इतके समर्पक उदाहरण मी यापूर्वी तरी पाहिले नाही.
प्रतिक्रिया
30 Jul 2011 - 8:04 pm | सौन्दर्य
फारच छान निरीक्षण.
सिनेमातल्या गोष्टीसारखी एक घटना खूप वर्षांपूर्वी उत्तर भारतात घडल्याची वाचल्याचे आठवतेय.
ज्या चीजवस्तूना मागणी असते त्यांचीच बनावट निर्मीती होते, त्या मुळे हे चालायचेच.
सौन्दर्य
30 Jul 2011 - 10:22 pm | प्रशांत
चांगलं निरीक्षण आहे... (कदाचित हे चित्रपटामुळे असावे..)
31 Jul 2011 - 9:01 am | रेवती
हा हा
मजेदार माहिती.
31 Jul 2011 - 9:23 am | सहज
छान
31 Jul 2011 - 12:00 pm | भडकमकर मास्तर
लै भारी साधर्म्य... रो च क
31 Jul 2011 - 12:57 pm | सोत्रि
उडालोच हे प्रतिसाद वाचुन. आणि गुगळे ह्यांचा बादरायण संबंध लावण्याच्या प्रतिभेचा महिमा काय वर्णावा :oups:
गुगळॆ हे 'google' चे भाषांतर नसावे, कारण तुमचे 'साधर्म्य सर्च इंजीन' गंडले आहे असे मला वाटते ;)
प्रत्येक चित्रपटात एक नायिका असते (काही अपवाद)
त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत एक नायिका असते (काही अपवाद)
प्रत्येक चित्रपटातील नायिका मादक असते (काही अपवाद)
त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीतील नायिका मादक असते (काही अपवाद)
प्रत्येक चित्रपटात एक नायक असतो (काही अपवाद)
त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत एक नायक असतो (काही अपवाद)
प्रत्येक चित्रपटात संगीत असते (काही अपवाद)
त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत संगीत असते (काही अपवाद)
काही चित्रपट चांगले असतात, काही चित्रपट टुकार असतात
चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या काही जहिराती चांगल्या असतात, काही जहिराती टुकार असतात
चित्रपट थेट्रात जाउन बघितल्यात खिशाला चाट लागते
चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या जहिरातींधली प्रोडक्ट्स विकत घेतल्यास खिशाला चाट लागते
:)
- (साधर्म्य'स्थळं' संशोधक) सोकाजी
31 Jul 2011 - 1:04 pm | पाषाणभेद
फारच छान निरीक्षण.
लै भारी साधर्म्य... रो च क
मजेदार माहिती.
2 Aug 2011 - 4:24 pm | विजुभाऊ
प्रत्येक चित्रपटातील नायिका मादक असते (काही अपवाद)
अपवाद बरेच आहेत
पिंजरा , दो आंखे बारा हाथ इ.
2 Aug 2011 - 4:29 pm | प्यारे१
लैला को मजनू की नजर से देखो विजुभौ...!!!
वणकुद्रे अण्णांनी सिलेक्ट केलेलं कॅरॅक्टर. असं कसं बरं म्हणू शकता?
बाकी तो 'डॅन्स' बघून लकवा मारणे म्हणजे काय हे लगेच कळून यायचं ब्वा आपल्याला.... ;)
31 Jul 2011 - 7:25 pm | श्रीरंग
हा चित्रपट संपूर्ण पाहू शकलात म्हणजे कमालच आहे तुमची.
असो. चित्रपटातील गाण्यामुळे झंडू बामवाले अस्वस्थ होणे, त्यांनी न्यायालयात धाव घेणे. हे जितके हास्यास्पद वाटते, तितकेच खोटे आहे. आपणही कोणत्यातरी भैया चॅनलच्या सवंग बातम्या(!)ना बळी पडलेले दिसता.
1 Aug 2011 - 4:14 am | इंटरनेटस्नेही
.
31 Jul 2011 - 8:01 pm | पंगा
गप्प बसायचे ठरवले आहे.
(हे नवोदित लेखकांस प्रोत्साहन खुशाल समजावे.)
1 Aug 2011 - 12:17 pm | स्पा
लेख जम्या नाही
ओढून ताणून केलेलं निरीक्षण वाटल
असो
बाकी कोणी कसे वागावे... निरीक्षण वेग्रे .. आहेच.. :D
चालुद्या
1 Aug 2011 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
अमेझिंग !!
शब्दच नाहित तुमच्या निरिक्षण शक्तीचे कौतुक करायला.
साला आमच्या डोक्यात हे असले कधी आलेच नसते.
महान आहात तुम्ही __/\__
आता अगदी खरे खरे सांगा, इतक्या वेगवेगळ्या विषयावर येवढे छान छान रोजच्या रोज लिहायला तुम्हाला कसे जमते हो ? आम्हाला रोज डायरीच्या चार ओळी लिहायची बोंब होते.
1 Aug 2011 - 1:11 pm | चेतन सुभाष गुगळे
@ प्रसाद,
सूचायचं म्हणाल, रोज दहावीस गोष्टी तरी सूचत असतातच. मी कुठेही नजर टाकली तरी त्या वस्तु / व्यक्ति / घटनेकडे पाहून लगेच माझ्या मनात काहीना काही कल्पना सुरू होतातच. थांबवू म्हणता थांबत नाही.
पण लिहायचा मात्र कंटाळा येतो. रोज लिहायला जमलं असतं तर आजपर्यंत हजारो लेख प्रसिद्ध झाले असते. आतापर्यंत शतक ही गाठलेले नाहीय.
तुम्हाला हवं असेल तर मला कधीही भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकता. तुम्हाला रोज सहज तीनचार कल्पना सांगेल मी. तुम्ही देखील लिहू शकाल रोज च्या रोज नियमित.
धन्यवाद.
1 Aug 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद :)
पण तुमच्या कल्पना तुमच्याच ओघवत्या लिखाण शैलीत वाचायला जास्त मजा येते आणि येत राहिल हे नक्की. आणि आमची लिखाण शैली तुमच्या येवढी आकर्षक नसल्याने आमचे लिखाण रोज न आलेलेच बरे.
तुम्ही लिहिते रहा.
1 Aug 2011 - 1:29 pm | चेतन सुभाष गुगळे
आणि शिवाय मला सूचलेल्या कितीतरी कल्पना अव्यक्तच राहतात ना? तुम्ही हातभार लावला तर त्याही व्यक्त होतीलच की.
1 Aug 2011 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार
आता तुम्हाला दोष द्यावा लागेल मग.
प्रतिक्रिया लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या अव्यक्त कल्पना शब्दबद्ध करा की. अहो यु द्या रोज दोन चार मस्त लेख.
1 Aug 2011 - 1:47 pm | चेतन सुभाष गुगळे
मला सूचलेल्या प्रत्येकच विषयावर मीच लिहायचं ठरवलं तर १५० वर्षांचं आयुष्य देखील पुरणार नाही. शिवाय मी लिहीत बसलो तर विचार केव्हा करणार?
मला नेहमीच असं वाटतं की काही कार्य करण्यासाठी माझा जन्म झाला नसून मी फक्त विचार च करायला हवा आयुष्यभर. माझे विचार इतरांना सांगून त्याप्रमाणे त्यांच्याकडून कृती करवून घ्यायला हवी.
याच पद्धतीने लेखनाच्या बाबतीत मला सूचलेल्या दहा कल्पना रोज वेगवेगळ्या दहा लेखकांना ऐकवून त्यांचेकडून दहा लेख लिहून घ्यायला हवेत.
इथे प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवितोय तो केवळ इथे असे इच्छुक लेखक सापडू शकतील या आशेवरच...
1 Aug 2011 - 12:48 pm | स्पा
आम्हाला रोज डायरीच्या चार ओळी लिहायची बोंब होते.
ओ मालक.. तुम्ही बी जिलबीचा साचा घेऊन टाका कि .. हाका नाका :D
1 Aug 2011 - 1:48 pm | सोत्रि
आमालाबी सांगा की वो असला जिलबीचा साचा कुटशीक मिळतो ते?
आमालाबी रोजच काहीबाही लिवावस वाटुन राहिलय वो.
- (साचेबद्ध) सोकाजी
1 Aug 2011 - 6:31 pm | विकाल
मुळात तुम्हाला सांगितल कुणी की झंबा दुखावल्यामुळं कोर्टात गेली म्ह्णून....
काहीच्या काही...
निव्वळ बादरायण...!
1 Aug 2011 - 6:46 pm | चेतन सुभाष गुगळे
@विकाल
मी तसं लोकसत्तेत वाचलं होतं.
तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का?
1 Aug 2011 - 7:01 pm | विकाल
चान... ! अन भरवस्सा बसला तुमचा....?
नुसते वाचू नका हो... घट्ना.. अतंस्थ हेतू न परिणाम जरा जाणून घेत जा हो...!!
आणखी एक... संध्याणंद वाचता का ओ...?
1 Aug 2011 - 7:14 pm | वपाडाव
वाचता म्हंजे !!!!!
रोज कल्पनांचा पाट वाहाण्यास ऊर्जा तेथुनच जमा करतात ना....
संध्यानंदच्या (आयचा घो वाचु नये....) हपिसातुन दरमहा येणारा ५०/- किमतीचा चेक वटवताना लाईनीत हुबारुन त्ये संध्यानंदच वाचतात.....
आणि घरी येउन श्रमपरिहारास्तव लेख पाडतात...
त्यांच्या कल्पनाशक्तीला दर सायंकाळी संध्यानंदाचे विरझण लागते...
आन स्पावड्याने सांगितल्याप्रमाणे याच विरझणाच्या दुसर्या दिशी ते जिलब्या पाडतात...
1 Aug 2011 - 7:27 pm | चेतन सुभाष गुगळे
मी संध्यानंद वाचत नाही. असले वर्तमानपत्र बहुधा वडापाव बांधून देण्यासाठी वापरले जाते.
हे वर्तमान पत्र आणि वडापाव दोन्ही जंक फूड असल्याने मी त्यापासून दूरच राहतो.
1 Aug 2011 - 7:35 pm | विकाल
असले वर्तमानपत्र बहुधा वडापाव बांधून देण्यासाठी वापरले जाते.
कुठे वाचलतं....संध्यानंद मध्ये..?
नाही तुम्ही वर्तमानपत्र वाचता म्ह्णून विचारलं....!
1 Aug 2011 - 7:52 pm | चेतन सुभाष गुगळे
वडापाव विकणार्याकडे जे वर्तमानपत्राचे रद्दी कागद होते त्यापैकी एकावर ठळक अक्षरांत संध्यानंद लिहीलं होतं. बरेचसे उतारू जे उपनगरी लोकलगाड्यांमधल्या प्रवासात संध्यानंद विकत घेतात ते तो पुन्हा घरी नेत नाहीत, कारण तो कुटुंबियांच्या (बायको, मुले) हाती पडावा अशा लायकीचा नसतो (असं ह्या उतारूंचंच स्वत:च मत असतं) आसनांवर तसाच सोडून देतात जो फुकटच अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांना उपलब्ध होतो.
1 Aug 2011 - 7:53 pm | गणपा
हा हा हा... पक्क मुरलेलं पाणी आहे हे. ;)
1 Aug 2011 - 7:59 pm | चेतन सुभाष गुगळे
@प्रतिक ठाकूर
त्याशिवाय दोन आघाड्यांवर एकाच वेळी लढता येणं शक्य आहे का? मी कौल लावलाय तिथेही असंच विचित्र नाव धारण केलेली एक वाचक मला पीडतेय. तिला आणि ह्या "वडापाव विकाल" ला एकाच वेळी मी प्रत्युत्तरं देत बसलोय.
Thanks to Aparna Typing Classes जिथे मी १९९३ साली टंकलेखनांचं प्रशिक्षण घेतलं.
1 Aug 2011 - 8:06 pm | गणपा
मित्रा तु एक हाती इतक्या आघाड्यांवर (समर्थ्पणे) लढादेतोयस याच खरच कौतुक आहे.
असो नवी बॅच आली की कालची नवी असलेली आणि आजची जुनी झालेली बॅच रॅगिंग करते हे काही नवं नाही.
तु आपला स्वांत सुखाय लिहित जा.. लोकांच्या पसंतीस उतरल तर त्याची दाद मिळाल्या वाचुन रहाणार नाही. :)
1 Aug 2011 - 8:23 pm | चेतन सुभाष गुगळे
होय रे खरंच आहे तू म्हणतोस ते. त्रास देणारे देतातच. त्यांना त्यात आनंद तर आपला आनंद लिहीण्यात.
पण मी इथे काही नवा नाही. यापूर्वी असाच त्रासदायक अनुभव आल्याने काही काळ दूर गेलो होतो इतकंच.
अर्थात यावेळी रणजित चितळे, मन, राकेश महाजन, प्रसाद, प्रितम / पियुषा, सविता / निशा, सागर पराडकर, विजय शाह, सुनील, ऋषिकेश चिंदरकर, तृप्ती दळवी, रुपाली पोयेकर, गणेशा, अविनाशकुलकर्णी, प्रसन्न आपटे आणि तू अशा अनेकांनी माझ्या विविध लेखनावर सकारात्मक व प्रशंसा यूक्त प्रतिसाद दिला असल्याने टीकाकारांना कंटाळून एवढ्यात लिखाण थांबविणार नाहीय.
पण जर का कधी काळी प्रशंसकांपेक्षा टीकाकारांची संख्या अधिक झाली तर मला इथे त्यानंतर लेखन प्रसिद्ध करायला आवडणार नाही.
धन्यवाद.
2 Aug 2011 - 12:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
चेतनराव,
बर्याच दिवसांपासुन तुम्हाला मि.पा. वर बघतो आहे. तुम्हाला येणारे प्रशंसेचे / टीकेचे प्रतिसादही वाचतो आहे. तुम्ही लिहीत असलेल्या लेखांविषयी नंतर कधीतरी बोलु. पण कोणीतरी टीका करते म्हणुन ना उमेद होउन लिहीणे बंद करु नका. जे सुचेल ते लिहीत रहा.
फक्त एकच करा लिहीलेत की ताबडतोब प्रसिध्द करायची घाई करु नका. ते परत परत वाचा त्यात सुधारणा करा. एकदा का तुमच्या मनपसंत लेख उतरला की मग तो ईतरांना वाचण्या साठी उपलब्ध करुन द्या.
एखादा लेखक चांगला किंवा वाईट हे त्याने केलेल्या लिखाणाच्या गुणवत्ते वरुन ठरते. असे नसते तर टी. व्ही. वर डेली सोप लिहीणार्या सगळ्यांना ज्ञानपीठ पुरस्कार द्यावा लागला असता.
बाकी तुमची निरीक्षण शक्ती आणि लेखन शैली खरोखर अचाट आहे.
तुमच्यावर होणार्या टीके कडे सकारात्मक दॄष्टीने पहा. त्या टीकेचाही फायदाच करुन घ्या. मग बघा इथे सुध्दा तुम्हाला कितीतरी मित्र भेटतील.
तुमच्या वरील प्रतिसादात मला एक नकारात्मक सुर दीसला म्हणुन हा जाहीर प्रतिसाद.
पैजारबुवा,
2 Aug 2011 - 1:05 pm | सोत्रि
पैजार्बुवा,
अतिशय 'मॅचुअर्ड' प्रतिसाद.
आशा आहे गुगळे ह्याच्यावर सकारात्मक विचार करतील.
- (पैजारपंखा) सोकाजी
2 Aug 2011 - 1:05 pm | चेतन सुभाष गुगळे
पैजारबुवा,
आपणांस माझे लिखाण आवडले व तसे आपण मुद्दाम तसदी घेऊन इथे नमूद केले तसेच प्रशंसायुक्त चार उद्गारही टंकले याबद्दल आपले अतिशय आभार.
नकारात्मक सूराबद्दल म्हणाल तर ज्यांना माझे लेखन आवडत नाही अशांचीच संख्या जर जास्त झाली तर मी इथे लिखाण प्रसिद्ध करण्यात अर्थ तरी काय आहे? शेवटी काही झाले तरी हे एक खासगी संकेतस्थळ आहे. इथे लोकांना आवडेल तेच आणि तेच प्रसिद्ध केले जाते.
जसे की, हे पाहा - http://www.misalpav.com/node/10095#new
याउलट, यापेक्षा अनेक पटींनी माझे लिखाण सौम्य असूनही काल ते एका धाग्यावरून उडविले गेले. इथे संपादक मंडळीचा शब्द अंतिम असतो. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. मी तर त्यांना माझे सर्वच्या सर्व लेखन उडविले आणि माझे खाते बंद केले तरी चालेल असे कळविले आहे.
जास्त काय लिहू? अंतिम नियंत्रण इतर कुणाच्या तरी हातात असेल तर माझी मेहनत वायाच जाणार.
धन्यवाद.
2 Aug 2011 - 5:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
चेतनराव,
आपण संपादकांच्या भुमिकेत शिरुन बघावे. म्हणजे कदाचीत आपल्याला त्यांनी तुमचे लिखाण का उडवले ते समजु शकेल. त्यांच्या अडचणी समजावुन घेत त्यांना आपण सहकार्य करणार नाही तर कोण?
तुम्हाला काय वाटते तुमचे एकट्याचेच लेख उडवले जातात? तुमच्या एकट्यावर ईथे टीका होते? तुम्हाला प्रतिसाद देणार्या प्रत्येकाचा किमान एकतरी लेख ईथुन उडवला गेला असेल (माझ्या सकट). त्यांच्या पैकी काही जणांना संपादकां कडुन तंबी सुध्दा मिळालेली असेल. पण म्हणुन कोणी इथे यायचे थांबत नाही किंवा त्रागा करुन लिहीणे बंद करत नाही.
मी तुम्हाला इथेच लिहा म्हणुन आग्रह वगेरे मुळीच करत नाही. फक्त नाउमेद होउन लिहीणेच थांबवुनका ईतकेच सांगतो.
2 Aug 2011 - 5:12 pm | चेतन सुभाष गुगळे
पैजारबुवा,
<< आपण संपादकांच्या भुमिकेत शिरुन बघावे. म्हणजे कदाचीत आपल्याला त्यांनी तुमचे लिखाण का उडवले ते समजु शकेल. त्यांच्या अडचणी समजावुन घेत त्यांना आपण सहकार्य करणार नाही तर कोण?>>
या तुमच्या वाक्याशी मी सहमत होऊ शकत नाही. माझ्या वरील उत्तरात मी जी लिंक दिलीय ती आपण बहुधा वाचलीच नसावी अन्यथा असे लिहीले नसते. संपादकांनी संपादन अवश्य करावे. तो त्यांचा हक्कच आहे. फक्त इथे पक्षपात होतोय असे माझे म्हणणे आहे. मी जी लिंक दिलीय त्या लिंकवर जाऊन सर्व लिखाण व प्रत्युत्तरे / प्रतिसाद वाचा. दिल्ली बेली वालेही लाजतील अशा शिव्यांची मुक्त उधळण झालीय. असे धागे उडविले जात नाहीत. आमचे मात्र सौम्य लिखाणदेखिल उडविले जाते. यामुळेच आम्ही इथे लिहावे की नाही या संभ्रमात पडलोय.
5 Aug 2011 - 2:54 pm | मृत्युन्जय
दिली बेली ला लाजवणार्या शिव्या नाही ब्वॉ दिसल्या आपल्याला.
हा तात्यांनी (पुर्वी आम्ही एकेरी तात्या असा उल्लेख करायचो. पण आजकाल तात्याच कॅटरीनाला बाळ वगैरे म्हणायला लागलेत. आम्ही बाळापेक्षा ३-४ वर्षांनी मोठे फक्त. त्यामुळे आदरार्थी संबोधिले) वापरलेला मायझव शब्द तेवढा दिसला. हा शब्द तात्यांनी का वापरला ते काही कळाले नाही. कारण तात्यांना याहुन चांगल्या आणि समर्पक शिव्या नक्की येत असल्या पाहिजेत. ही तर फारच गुळमुळीत शिवी झाली. ज्याबद्दल शिवी दिली गेलेली आहे ती शिवी देण्यासारखी घटना होतीच असे आमचे ठाम मत आहे.
असो. हा लेख जेव्हा लिहिला गेला तेव्हा तात्या बहुधा संस्थळाचे मालक होते. आता ते नाहीत. नीलकांत ला मी कधी शिव्या देताना बघितलेले नाही (बहुधा त्याला त्या द्याव्याश्या वाटत असाव्यात कधीकधी. पण सौजन्याचे आणि जबाबदारीचे भान ठेवुन बहुधा तो शांत बसत असावा). त्यामुळे त्याच्या कारकीर्दीत असे लेख उडवले जात असल्यास त्यात नवल ते काहीच नाही.
नीलकांत ने शोधुन शोधुन जुने शिवराळ लेख आणि प्रतिक्रिया काढाव्यात अशी जर तुमची इच्छा असेल तर मात्र अवघड आहे.
तुमचे लिखाण जर उडवले गेले असेल तर नक्कीच त्यात काहितरी आक्षेपार्ह असेल. संपादकांपैकी जे आंजावर असतील ते अर्थात कारवाई करत असणार. एखाद्यावेळेस एखादा लेख किंवा प्रतिक्रिया नजरेतुन राहुन जाते अश्यावेळेस संमं च्या लक्षात आणुन दिल्यास योग्य ती कारवाई होते. तुमचा लेख / प्रतिक्रिया आक्षेपार्ह वाटली असल्यास त्यावर कारवाई होणे अपेक्षितच आहे. २ वर्षांपुर्वी इतरांवर नव्हती झाली म्हणुन माझ्यावर होउ नये हे तर्कशास्त्र नाही पटले.
5 Aug 2011 - 3:13 pm | चेतन सुभाष गुगळे
माझ्या लिखाणात एकही शिवी किंवा असंसदीय शब्द नव्हते हे मी खात्रीने सांगू शकतो. मी जे काही प्रतिक्रियेच्या प्रत्युत्तरादाखल मांडले होते त्यात काही आक्षेपार्ह नव्हते हे मला अजूनही ठामपणे वाटते. त्यापेक्षाही भयानक भाषा अजूनही मी दर्शविलेल्या धाग्यावर (संपूर्ण वाचा. भाषा नक्कीच आक्षेपार्ह आहे. मुख्य म्हणजे चार लोकनियुक्त प्रतिनिधींचे कौतूक करताना इतर अनेकांकरिता जी अर्वाच्य विशेषणे वापरली आहेत, ते देखील लोकनियूक्तच आहेत हे सोयीस्कररीत्या विसरले गेले आहे. सदर धाग्यावरदेखील काहींनी भाषा आक्षेपार्ह आहे असे मत व्यक्त केले आहेच) आणि इतर ही अनेक धाग्यांवर आहे.
बाकी काय ठेवायचे आणि काय उडवायचे ते नियंत्रक ठरविणार त्याबाबत आपण काय करू शकतो? इथे कुठले तर्कशास्त्र कामी येणार? काही झाले तरी हे खासगी मालकीचे संकेतस्थळ आहे.
याहून अधिक चर्चा इथे करू शकत नाही कारण तेव्हा काय घडले याचा पुन्हा उल्लेख करावा लागणार आणि संपादक तो भाग पुन्हा उडविणार. तेव्हा काय घडले हे जाणून घ्यायचे असेल तर व्यक्तिगत संपर्क करावा.
2 Aug 2011 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
गुगळे साहेब, आम्ही तुमचे फॅन, पण हे वाचुन तुम्ही 'माती खाल्लीत' असे म्हणतो बघा उद्वेगाने.
अहो 'लेखकाने लिहावे आणि 'गंगार्पणमस्तु' म्हणून सोडून द्यावे' असे आमचा अवलिया म्हणायचा. त्या लेखाचे पुढे काय झाले त्यात चित्त गुंतवू नये, पुढील लेखनाकडे वळावे. जसे वाचक तुम्हाला काय लिहावे ते सांगत नाहीत तसे तुम्ही पण त्यांनी कशा प्रतिक्रिया द्याव्यात त्याची अपेक्षा ठेवू नये.
तुम्ही लिहा, रोज चांगले १० लेख लिहा :) बघू कोण अडवते तुम्हाला.
लिहिणार्याने लिहितच जावे, लिहिता लिहिता वाचणार्याचे डोळेच पांढरे करावेत.
2 Aug 2011 - 12:33 pm | मितभाषी
ठॉऑऑ.... =)) =)) मेलो खपलो.......
बाकी गुगळेसाहेब तुमचा लेख आवडला गेल्या आहे. असेच लिहीत रहा.
पुलेशु.
2 Aug 2011 - 1:10 pm | चेतन सुभाष गुगळे
प्रसाद,
इथले मालक / नियंत्रक / संपादक स्वत:ची मर्जी चालविणार. माझे लेखन / प्रतिक्रिया उडविण्यात आल्या आहेत. मग माझी मेहनत वायाच जाणार.
अश्या वेळी मी इथे लिहीणे थांबवायलाच हवे नाही का?
मी माझ्या ब्लॉगवर माझे लेखन प्रसिद्ध करीत राहील. तुम्ही तिथे वाचू शकता की. लेखन थांबणार नाहीच. फक्त जागा बदलेल.
बळकट पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.
5 Aug 2011 - 10:59 am | चेतन सुभाष गुगळे
@ प्रसाद साहेब,
मध्यंतरी मिळालेल्या उलटसुलट प्रतिसादांमुळे पुन्हा मिसळपाव वर लेख प्रसिद्ध करावयाचा की नाही या संभ्रमात होतो. त्यामुळे माझ्या सर्व धाग्यांवरील सर्व प्रतिसाद वाचून काढले. तूर्तास तरी सकारात्मक प्रतिसाद देणार्या वाचकांची संख्या नकारात्मक प्रतिसाद देणार्यांपेक्षा जास्त असल्याने (विशेषत: तुमच्या ह्या प्रतिसादातील आवाहनास अनुसरून) अजून एक लेख या संकेतस्थळावर प्रकाशित करीत आहे.
धन्यवाद.
5 Aug 2011 - 11:14 am | प्यारे१
>>>>तूर्तास तरी सकारात्मक प्रतिसाद देणार्या वाचकांची संख्या नकारात्मक प्रतिसाद देणार्यांपेक्षा जास्त असल्याने (विशेषत: तुमच्या ह्या प्रतिसादातील आवाहनास अनुसरून) अजून एक लेख या संकेतस्थळावर प्रकाशित करीत आहे.
क्षमस्व महाराज पण आपले तर्कशास्त्र समजले नाही. आपण लिखाण करता ते कशासाठी? त्याहून जास्त कुणासाठी?
अवांतरः आपले लग्न झाले आहे काय? ( हे अवांतर वरील प्रश्नांची उत्तरे मिळण्यास उपयुक्त ठरेल असे वाटल्याने इथे टाकले आहे)
5 Aug 2011 - 11:33 am | चेतन सुभाष गुगळे
@प्रशांत,
एकतर वरील प्रतिसाद मी प्रसादला उद्देशून लिहीला होता. त्यामागील तर्कशास्त्र आपणांस समजावे अशी माझी मूळीच अपेक्षा नाही.
दुसरे असे की मी लिखाण कुणासाठी करतो हा प्रश्न इथे गैरलागू असून संबंधित मुद्दा हा या संकेतस्थळावर लेखन प्रसिद्ध करण्याविषयी आहे.
तरीही या दोन्हीमागील तर्कशास्त्र आपणांस समजून घ्यावयाचे असल्यास त्यापूर्वीचे सर्व प्रतिसाद व प्रत्युत्तरे आपण वाचून पाहावयास हवी.
आपल्या अवांतर प्रश्नाचा आपल्या तत्पूर्वी विचारलेल्या प्रश्नाशी काही एक संबंध नाहीय कारण मी वयाच्या १३ व्या वर्षापासून विविध विषयांवर लेखन करीत आहे. तसे वयाच्या १५ व्या वर्षी माझा लेख प्रथम लोकसत्ता (०२.१२.१९९३) वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तेव्हा लेखनाचा लग्नाशी काय संबंध?
तसेच आपण विचारलेला प्रश्न व्यक्तिगत स्वरुपाचा आहे. वैयक्तिक माहिती हवी असल्यास ती व्यक्तिगत संपर्क करूनच विचारायला हवी तर आणि तरच त्याची उत्तरे मिळतील.
धन्यवाद.
5 Aug 2011 - 11:46 am | प्यारे१
>>>>आपल्या अवांतर प्रश्नाचा आपल्या तत्पूर्वी विचारलेल्या प्रश्नाशी काही एक संबंध नाहीय कारण मी वयाच्या १३ व्या वर्षापासून विविध विषयांवर लेखन करीत आहे. तसे वयाच्या १५ व्या वर्षी माझा लेख प्रथम लोकसत्ता (०२.१२.१९९३) वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तेव्हा लेखनाचा लग्नाशी काय संबंध?
वा! आपल्याला प्रतिज्ञानेश्वरच म्हटले पाहिजे. १३ व्या वर्षापासून लेखन आणि १५ व्या वर्षी लेख प्रसिद्धी? बापरे!
आपल्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या लेखाचा विषय काय होता हे विचारले तर चालेल का?
बाकी आम्हाला कोल्हापूरच्या मित्राची अतिशय तीव्रतेने जाणीव झाली. आणि ड्वाळे पाणावले. ;)
5 Aug 2011 - 11:58 am | चेतन सुभाष गुगळे
@ प्रशांत,
धर्म आणि राजकारण यांची फारकत केली जावी असा विचार त्याकाळी देशात चर्चिला जात होता. मीही त्याच विषयावर मत प्रदर्शन केले होते आणि लोकसत्तेने त्या लेखास कुठलीही काट छाट न करता प्रसिद्धी दिली होती.
5 Aug 2011 - 12:13 pm | प्यारे१
१५ व्या वर्षी धर्म आणि राजकारण ? ग्रेटच आहात हो !
बाकी लेख पुनःप्रकाशित/ स्कॅन करु शकाल काय?
5 Aug 2011 - 12:29 pm | चेतन सुभाष गुगळे
त्याकाळचे हस्तलिखीत आणि ०२.१२.१९९३ चा तो अंक ठिसूळ होऊन त्यांचे तुकडे पडल्याने आता माझ्या संग्रहात नाहीत. लोकसत्तेच्या कार्यालयातून या तारखेचा पुणे आवृत्ती अंक कदाचित मिळू शकेल, नक्की सांगता येत नाही. पुणे शहरात राहत असाल तर पुणे नगर वाचन मंदिर या वाचनालयात आपणास हा अंक तिथेच वाचायला मिळू शकतो. तिथे सर्व वृत्तपत्रांचे सर्वच्या सर्व तारखांना प्रसिद्ध किमान एक एक अंक तरी जतन करून ठेवलेले असतात असे ऐकून आहे.
धर्म म्हणजे कुठलाही एखादा विशिष्ट धर्म (हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन अथवा पारशी अश्यांपैकी) नव्हे तर धर्म म्हणजे सदाचरणाचे नियम अशी धर्माची व्याख्या केल्यास तो राजकारणातून कधीच हद्दपार झाला आहे. आता अधिकृत रीत्या तसे जाहीर केले म्हणजे राजकारणात केवळ पशूच उरतील कारण सदाचरणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ पशू.
असे विचार मी त्या लेखात मांडले होते.
5 Aug 2011 - 12:41 pm | प्यारे१
बघा ना जरा काही करता येते का. प्लीज...!
असे बहुमोल वाचन आम्हाला वाचायला मिळालेच पाहिजे.
आम्हा वाचकांचा हक्कच आहे ना तो...!
5 Aug 2011 - 12:48 pm | प्रचेतस
गुगळेराव,
त्याची एक स्क्यान कॉपी लावाच इकडे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच तुमच्यात असलेली एव्हढी प्रगल्भता छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांखेरीज आमच्या पाहाण्यात नाही सबब ती लोकसत्ताची कॉपी कसेही करून मिळवून द्याच तुम्ही आम्हाला.
5 Aug 2011 - 12:57 pm | किसन शिंदे
वयाच्या १५ व्या वर्षी तुम्ही केलेलं लेखन आम्हाला जर इथे वाचायंला मिळालं तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.
5 Aug 2011 - 1:25 pm | चेतन सुभाष गुगळे
पुणे शहरापासून मी २५ किमी दूर राहतो. तितकेच महत्वाचे काम असल्याशिवाय सहसा मी शहरात जात नाही. पुणे नगर वाचन मंदीरापाशी काही कामानिमित्त जायचे झालेच तर नक्कीच तो अंक शोधायचा प्रयत्न करीन. तसेही मी अंकाची तारीख व इतर तपशील दिला आहेच. आपणही तो अंक मिळवू शकता.
शिवाय लेखातला मुख्य मुद्दा मी इथे मांडला आहेच.
1 Aug 2011 - 8:32 pm | रेवती
आता मस्करी बास हां.
नंतर धागा वाचनमात्र करावा लागतो.
2 Aug 2011 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार
रेवती काकु हे काय पटले न्हाय हा !
बिचार्या लेखकाचा काय दोष ? काही दिवसांपूर्वी असाच एक धागा लेखकाची काही चूक नसताना वाचनमात्र करण्यात आला :( (अर्थात लेखकाने तशी विनंती केली नसावी अशी आशा आहे)
आमच्या सारख्या चार टग्या प्रतिसादकांपायी लेखकाच्या लेखनावर गदा कशाला ? गुगळे साहेब, ओक साहेब अशा लोकांना कायमच टार्गेट केले जात आहे.
2 Aug 2011 - 12:42 pm | प्यारे१
भेजा फ्राय कन्टिन्युड?
गुगळे तुम्ही कोल्हापुरचे का? आमचे एक 'दादा' मित्र आहेत कोल्हापुरचे. साधारण (थोडंसंच हं) असंच लिहायचे. आठवण झाली इतकंच.
आपल्या कल्पनांना शब्दरुप देऊ शकणारांमध्ये आमचे काही मित्र आहेत. आवश्यकता वाटल्यास नावे कळवू.
बाकी १५० वर्षे कशी मोजलीत हो?
आमच्यासाठी का होईना रामदेवबाबांना गाठा. त्यांच्या प्राणायामाने तुम्ही १५० वर्षे जगू शकाल आणि तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकाल किमान लिखीत स्वरुपात तरी. आम्हाला नाही झाला तरी आमच्या नातवंड-परतवंडांना तरी लाभ होईल. कसे?
2 Aug 2011 - 1:15 pm | चेतन सुभाष गुगळे
मी पुण्याचाच. कोल्हापूरशी काही संबंध नाही. तुम्हाला असे लिहीणारे लोक ठाऊक असल्यास जरूर कळविणे. मी त्यांना संकल्पना / मुद्दे जरूर सांगत जाईल. माझे विचार लोकांपर्यंत पोचल्याशी मतलब. ते माझ्याच नावाने प्रसिद्ध व्हावे असा माझा आग्रह नसतो.
इतर कुणीही ते पोचवू शकतोच की.
मला संपर्क करू शकता (अर्थात तुमचा मेंदू तळला जाण्याची भीती वाटत नसेल तर..)
2 Aug 2011 - 3:50 pm | प्यारे१
असं नै चालणार हो.... ज्याचं श्रेय /क्रेडिट त्याला मिळायलाच हवं अशा मताचे आहोत आम्ही.
तुमच्या लिखाणाचं क्रेडिट तुम्हालाच मिळायला हवं
आमच्या एका मित्रानं २-३ टंचनिका ठेवल्याचं दुसर्या मित्रानं सांगितलेलं तिसरा मित्र चौथ्याला सांगताना पाचव्या मित्रानं रेकॉर्ड केलेलं आम्ही लांबून पाहिलं होतं....
आता लांबून पाहिल्यानं खात्री करुन घ्यावी म्हणून चौकशी करेपर्यंत त्या 'टंचनिका' नसून 'टंकनिका' आहेत आणि त्या लेख/प्रतिसाद/ खरडी लिहिण्यासाठी'च' फक्त ठेवल्या आहेत असे समजले.
नुकताच तो मित्र आजारी होता. आजारातून सावरेपर्यंत त्याला खाल्लेल्याव्यतिरिक्त दुसरे काही बाहेर टाकू नको असे डॉक्टरने सांगितल्यामुळे ह्या टंच..टंकनिका बसून आहेत. अर्थात त्या फक्त आणि फक्त सांगितलेले लिहितात. त्यामुळे तुम्हाला त्याम्ना लिहितं करावं लागेल. तुम्हाला हव्या असतील तर मागवू, आपलं, सांगू.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणं तुमचे विचार तुम्ही न सांगता ' इतर कुणीही ते पोचवू शकतोच की.' हे कसे शक्य आहे ते जरा विस्तृत करुन सांगाल काय?
कळावे, आ आ
2 Aug 2011 - 4:26 pm | वपाडाव
अहो, टपाल खात्याचं पगार कमी पडतो पोस्टमनाईले... मंग त्यात असले युगपुरुष सत्कार्य करुन त्याईला जर आपल्या घरी कामावर ठुवत असतीन तर एका मांसाचा संसाराले हातभार लागंन... त्यैचा मामला चांगला चालंन नै का हो भाऊ...
लै उदात्त ईचार है न हो त्येंचे... तुमी काय्ले पैले पाडे पंचावन करुन र्हाईले... मानसानं झेपन तेच कराव बर्का... तुमी असले पर्तिसाद देउन त्येंच काईच वाकडं करु शकंन न्हाई...
कार्ड नं देउन र्हाला न वं गुगळे सायब...
2 Aug 2011 - 4:39 pm | प्यारे१
अरे काय हे अरबट चरबट लिहितोयस वपाडाव? अरे दोन हजार वर्षांनंतर कुणी विचारलं युगप्रवर्तनांचं काम कुणी केलं तर हे लिखाण ओरडून ओरडून सांगेल खरं काय ते.
तुम्ही आजकालची पोरं म्हणजे ना! अरे १५० वर्षं पुरी पडणार नाहीत यांच्या कल्पना लिहून घ्यायला. आणि १५००० वर्षं पुरायची नाहीत आपल्यासारख्यांना समजायला. अरे असे महान लोक विनम्र असतात रे फारच.
का असं हिडीस फिडीस करतोयस वपा का? तू तरी काय करणार म्हणा? अरे थोरांची महती ते गेल्यानंतरच कळते रे लोकांना.... :(
2 Aug 2011 - 4:50 pm | नावातकायआहे
भाउ तुमाला संध्यानंद मंदी गुन्डाळतात ते खर का?
2 Aug 2011 - 4:51 pm | चेतन सुभाष गुगळे
तुम्ही जर मला कधी भ्रमणध्वनीवर संपर्क साधलात तर मी तुम्हाला काही संकल्पना / मुद्दे सांगू शकेन. आपले संभाषण फक्त ५ ते १० मिनीटात उरकेल. त्यावर तुम्ही सहज एखादा २५० शब्दांपर्यंतचा लेख लिहू शकाल. दिवसभरात केवळ तास-दीड तास खर्चून मला असे १० जणांना वेगवेगळे विषय सूचविता येतील. मी सूचविलेल्या कल्पनांवर १० लेख वेगवेगळ्या लेखकांकडून लिहून प्रकाशित होतील.
एकदा प्रयोग तर करून पाहा.
टंकनिका / टंकनिका मागवायची / पाठवायची गरज नाही. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तरी पुरेसे आहे.
धन्यवाद.
2 Aug 2011 - 5:08 pm | प्यारे१
एक काम का करत नाही? आपले लग्न झाले आहे काय? असेल तर आपल्या ज्या संकल्पना बिंकल्पना असतील त्या आपल्याच सौं ना सांगा, लग्न झाले नसेल तर आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना सांगा,
दिवसभरात केवळ तास-दीड तास खर्चून आपल्याला असे १० जणांना वेगवेगळे विषय सूचविता येतील. आपण सूचविलेल्या कल्पनांवर १० लेख वेगवेगळ्या नातेवाईक, मित्र मंडळींकडून लिहून प्रकाशित होतील. प्रकाशित झाल्यावर मिळणारा नफा तुम्हीच वाटून घ्या.
एकदा प्रयोग तर करून पाहा.
भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचीही गरज नाही.
कसे????
5 Aug 2011 - 11:41 am | चेतन सुभाष गुगळे
मी स्वत:च या लेखनातून नफा मिळवत नाहीय. हा माझा केवळ छंद आहे.नातेवाईक परिचित अशा कुणाला लेखनाचा छंद नाहीय. ते इतर कामात व्यग्र असतात.
यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही.
2 Aug 2011 - 12:48 pm | पल्लवी
!!!!!