"काठावरून निरखलेला कामाठीपुरा " वाचला. त्यापाठोपाठ त्या सीतामढीच्या हलकट गावकर्यांच्या
क्रुर वागणुकीची बातमीही वाचली.
पण काही प्रश्न पडलेतः-
"कामाठीपुरा किंवा बुधवार पेठ" इथं काय चालतं हे पोलिसांसकट सर्व यंत्रणेला ठाउक आहे ना?
मग वर्तमान पत्रात "पेठेतील अमुक ठिकाणी धाड आणी तमुक इतक्या व्यक्तिंची सुटका"
किंवा "भरशहरातील अमुक पार्लरच्या नावामागच्या कुंटणखान्यावर छापा."
अशा बातम्या दिसतात.
बरं ह्या बातम्या येउन गेल्यावरही (पोलिसांनी सगळ्यांना पकडुन नेल्यावरही)ह्या भागातील(पेठांमधील) "कार्यक्रम" चालुच.
ह्ये कसं काय होतय?
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय?
जर अधिकृत असेल तर पोलिस कुणालाही अटक कसे करु शकतात?
नसल्यास कोणत्या कलमाखाली तो दंडनीय गुन्हा आहे?
शरीर विक्रय करणारी व्यक्ती गुन्हेगार मानली जाते, की त्यासाठी दलाली (ह्याचा समानार्थी असभ्य शब्द टाळतोय.)
करणारी व्यक्ती गुन्हेगार असते?
ग्राहकाला नक्की काय शिक्षा मिळते?(किमान ते कमाल)
स्वतः प्रस्तुत लेखक टोकाच्या सुरक्षित(टिपिकल पांढरपेशा) आणि मध्यम वर्गीय घरातील असल्याने, ह्या
गोष्टींची माहिती केवळ पेपर मधुन होते, तेव्हढीच आहे.पण तीही संदिग्ध वाटते आहे.
कुणाला आणखी माहिती आहे का?
माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो.
(ह्याच्या अगदि जवळचा प्रकार"स्ट्रिप डान्सिंग" हा तर अगदिच सर्रास चालतो.)
पण इथे कुणाला जबरदस्तीनं,मारुन मुटकुन "धंद्याला" बसवलं जात नाही असं दिसतं.
म्हणजे, शरीर विक्रय करणार्या व्यक्तिच्याही ईच्छा-अनिच्छेला मान आहे.
शिवाय आपल्याकडे आहे, तितकी अवहेलना इथे नाहिये.
जर आपल्याला मानवाला १००% सुसंस्कृत करणं, आणि त्यायोगे हा व्यवसाय थांबवणं अशक्य असेल, तर निदान त्या व्यक्तिंना
इथल्या प्रमाणे सुसह्य आणि कमी अपमानास्पद जीवन देण भारतात करण्यासाठी किती काळ लागेल?
त्यासाठी कुणी आणि काय करायला हवं?
(आपण स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी . याशिवाय काय करता येइल? )
प्रतिक्रिया
22 May 2008 - 8:49 pm | मदनबाण
आपल्या देशातील लोकांची पतनाकडे जोरदार रेस चालु आहे.....
अरे इंटरनेट वर सुद्दा कुठे लक्ष आहे सरकारच ?
इंटरनेटवर सहजरित्या उपलब्ध अश्लील साहित्य भारतात दिसणे कोणी रोखु शकेल काय?
कुठल्याही देशाला नष्ट करायचे असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा म्हणजे तो देश आपोआप पांगळा होईल !!!!!
हेच चाललय आपल्या देशाबरोबर....वेळीच जागे झाले पाहिजे.
स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी .हीच महत्वाची पायरी आहे.....आणि प्रत्येक हिंदूस्थानी युवकांनी वेळीच ओलांडायला हवी.....
(* चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे...आणि जर
समजा ती तशी ब्लोक झाली असेल तर माझा प्रश्न आहे की जर गुगल ब्लोक होऊ शकत असेल तर अशा तर्हेचे फक्त अश्लील साईट ब्लोक करण्याचा निर्णय आपला देशाच सरकार घेऊ शकेल काय ?
22 May 2008 - 9:05 pm | कोलबेर
नाही. कारण सुदैवाने भारत म्हणजे चीन नाही!
22 May 2008 - 9:07 pm | कोलबेर
ह्या विषयाचा गाढा अभ्यास असलेले प्रा. डॉ. विसोबा खेचर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.
22 May 2008 - 9:08 pm | बिपिन कार्यकर्ते
चीन मधे गूगल नाही तर त्यातले सर्च रिझल्ट्स फिल्टर होतात. आणि साईट ब्लॉकिंग तर बहुधा सगळीकडेच आहे. इथे दुबई मधे सुद्धा बर्याच साईट्स ब्लॉक आहेत. सौदी अरेबिया, कुवेत, बाहरिन सगळीकडेच तसे आहे. सौदी अरेबिया मधे तर केवळ पोर्नोग्राफिकच नव्हे तर धार्मिक (गैर मुस्लिम), राजकिय अश्या सगळ्याच साईट्स ब्लॉक आहेत. जेव्हा ह्य साईट्स वर जायचा प्रयत्न केला तर चक्क स्क्रीनवर संदेश येतो की 'हे स्थळ सौदी अरेबियाच्या संस्कृतिला अनुसरून नाही' ... पण गंमत अशी की हे ब्लॉक बायपास करायचे पण तितकेच मार्ग उपलब्ध आहेत.
असो... मला असे वाटते अश्या प्रकारचे उपजिविकेचे साधन ह्या स्त्रिया (आणि पुरुषही, हा पण धंदा तेजीत आहे) केवळ मजबूरी म्हणूनच स्वीकारतात. बरेच वेळा बळजबरी असते. पण हेही इथे नमूद करावेसे वाटते की आजकाल बोकाळलेल्या चंगळवादामुळे बरेचजण अगदी पूर्ण पणे स्वेच्छेने ह्यात भाग घेतात, केवळ झटपट पैसा मिळावा म्हणून. (आठवा 'तरन्नुम' प्रकरण) तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्यात भाग न घेणे हा एक उपाय आहे पण तो 'पॅसिव्ह' आहे. 'ऍक्टिव्ह' उपाय म्हणजे सावधान सारख्या संघटना जे ह्या मुलींना सोडवण्याचे किंवा त्यांची सुटका झाल्यावर त्यांचे पुनर्वसन करणे वगैरे... आमच्या माहितीतल्या एक बाई खूप वर्षांपूर्वी असे काम करायच्या असे आठवते.
22 May 2008 - 9:09 pm | वेलदोडा
>>चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे
माझ्या माहीतीत दुबई मध्ये तर अशा सर्वच साईट्स (ज्या वर अश्लील साहित्य , फोटोज वगैरे उपलब्ध असते ) ब्लॉक केलेल्या आहेत. आणि हे तेथील सरकारी आदेशावरून करण्यात आलेले आहे. जवळ्चा एक मित्र दुबईत असल्याने त्याच्याकडून ही माहिती मिळाली . दुबईत हे शक्य आहे तर भारतात ही असे लागू करणे अजिबातच अवघड नसणार.
22 May 2008 - 9:15 pm | कोलबेर
हा हा हा!! मुंबईचे शांघाय करू अश्या घोषणा देणार्या नेत्यांनी मुंबईचे दुबई करु अश्या घोषणा द्याव्यात. यमकही जुळतेय.
मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार.
अवांतर : जमल्यास पुण्याचेही मस्कत करू म्हणजे पेठकर काकांना आपली दोन्ही हाटेलं इथेच बसुन चालवता येतील :)
22 May 2008 - 10:11 pm | धनंजय
याबाबत माझ्या एका चर्चाप्रस्तावावर अनेक मिसळप्रेमींनी मांडलेली मते येथे मिळतील.
"वेश्याव्यवसायाची नैतिकता"
http://www.misalpav.com/node/1073
22 May 2008 - 10:19 pm | प्रभाकर पेठकर
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय?
माझ्या ऐकिव माहितीनुसार हा व्यवसाय कायदेशिर आहे. राज्य सरकार्/म्युनिसिपालटी अशा व्यावसायिकांना परवाना (लायसन्स) देते. वेळोवेळी आरोग्यविभागा कडून शारीरिक आरोग्य तपासणीही होते. (हेही बंधनकारक आहे). ह्यात होणारा भ्रष्टाचारही भरपूर आहे.
नैतिक/अनैतिक च्या आपल्या कल्पना आणि दारिद्र्याचा अक्राळ वि़क्राळ राक्षस ह्यांची सांगड घालता येत नाही. ह्या व्यवसायातून जन्मास आलेल्या मुलींना बाहेरील समाज स्विकारत नाही त्यामुळे नाईलाजाने (आणि वातावरणाची सवय असल्यामुळेही) त्या मुली ह्या व्यवसायातच येतात.
चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे.
ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहणे हेच उत्तम.
शेवटी, 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक'.
23 May 2008 - 12:34 pm | मदनबाण
चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे.
चांगल्या घरातल्या स्त्रीया,सुशिक्षित मुलीही हा व्यवसाय करतात्,,,,हा प्रकार तर आता एवढा बोकाळला आहे की विचारु नका....बर्याच बातम्या हल्लीच पाहावयास मिळाल्या आहेत !!!!! दिल्ली तर अशा स्त्रीयांनी या सर्व मौजेसाठी (लेट्स हॅव फन...अस काहीस आजच्या या स्त्रीया म्हणतात आणि मुल सुद्दा)एका हॉटेल मधील एक खोलीच महिनाभर बुक करुन ठेवली होती.....
आणि काही दिवसांपुर्वीच कोल्हापुरातच एका लॉज वर धाड टाकुन अशाच काही महिलांना अटक करण्यात आली होती....
न्युज चॅनेल खाली कॅप्शन मधे सांगत होत्ते या सर्व चांगल्या घरातील मुली आणि स्त्रीया आहेत !!!!!.....म्हणजे नवरा कामावर गेलेला आणि बायको लॉज वर.....तरी या सर्व चांगल्या घरातील आहेत?.....हे प्रकार वाढत का चालले आहेत ?
माझ्या मते ही हिंदूस्थानात वाढलेल्या भोगवादाची ही ल़क्षणे आहेत.....
सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका करणार्या आणि भूमिका मिळवण्यासाठी मुली
हा त्याग करतात,,,,, हा कुठला त्याग म्हणायचा?...काही अभिनेत्र्या बुरखा घालुन पंचतारांकीत हॉटेल मधे काही तासाचे लाखो रुपये मिळवण्यासाठी कशा येतात हे ही आता उघडकीस आलेल आहे......
मला वाटत ज्या प्रमाणे चीन,सौदी अरेबियाच्या येथे पोर्नोग्राफिक साईट ब्लॉक आहेत त्या प्रमाणे आपल्या येथेही त्या ब्लॉक झाल्या पाहिजे.....
हल्ली बर्याच घरात इंटरनेट कनेक्शन आलेले आहे...पालक कामा निमित्त्य घराबाहेर पडतात पण आपला मुलगा / मुलगी नेट वर काय करतात याचा थांगपत्ताही त्यांना लागत नाही.....
हा पोर्नोग्राफिचा विळखा या आपल्या तरुण पिढीला आवळल्या शिवाय राहणार नाही....
काही आकडे :--
३७२million या फक्त पोर्नोग्राफिक साईट आहेत....
३५% डाऊनलोड हे पोर्नोग्राफिक कंटेन्ट च आहे.....
दर दिवसाला २६६ अशा नवीन साईट या जालावर येतात.....
३% हे साहित्य युके मधे बनते.
4% हे साहित्य जर्मनी मधे बनते.
89% हे साहित्य अमेरिकेत बनते.
US revenue from internet porn in 2006 $ 2.84 Billion.....
हे जरा पहा :--
http://www.youtube.com/watch?v=BSX9zRJUa2c
http://www.youtube.com/watch?v=SHm4de0UfVc
खरचं हे सर्व भयानक आहे.....
(युवा पिढी या विळख्यात अडकणार का ?)या विचारात पडलेला
मदनबाण.....
23 May 2008 - 1:28 am | अभिता
मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार.
मग आपल्या इथल्या अरबांनी कुठे जायाच.
23 May 2008 - 2:46 am | पक्या
>> माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो.
अहो मनराव, अशी बाळबोधासारखी कसली माहिती देताय. :)
हे तर सर्व जगात चालू आहे. ..all over the world
ऍम्स्टरडॅम ( नेदरर्लॅड्स मधील) तर 'ह्या' ची राजधानी म्हणावी लागेल. येथील रेड लाईट डिस्ट्रीक्ट जगप्रसिध्द आहे. आणि त्यास सरकारी मान्यता आहे. इथे आलेले इतर देशातील पर्यटक खास या स्थळाला भेट देतात. बार . कॉफीशॉप्स, पब्ज, क्ल्ब्ज, म्यझिक वगैरेंची इथे रेलचेल आहे. ईथल्या बायकाना सरकारचे लायसन्स मिळालेले असते आणि इतर कोणत्याही कमावत्या नागरिका सारखे त्या इन्कम टॅक्स ही भरतात.
असाच दुसरा देश म्हणजे थायलंड. थायलंड मधील वेशाव्यवसाय हा अनेक शतकांपासून थाई संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. आणि हे त्या देशात अगदी सहजरित्या स्विकारलं गेलेलं आहे. दारीद्र्य आणि घरातील खाणार्यांची जास्त तोंडे हे मुख्य कारण या मागे आहे. इतर व्यवसांयाप्रमाणे हा ही एक व्यवसाय आहे असे इथे समजले जाते. पटाया या शहरात हा व्यवसाय सर्वाधिक वाढीस लागलेला आहे. त्या नंतर बॅकॉक, क्राबी , फुकेट या ठिकाणांची नावे घेता येतील.
व्हिएतनाम युध्दाच्या वेळेस अमेरिकन सैनिकांसाठी थायलंड चा वापर R&R Spot म्हणुन केला होता. (रेस्ट ऍन्ड रिलॅक्सेशन).
लिओनार्दो चा 'द बीच' , श्रेयस तळपदे चा 'बॉम्बे टू बॅकॉक ' या सिनेमांमध्ये थायलंड च्या या ' संस्कृतीची ' झलक बघावयास मिळते.
यूएस मधील लासवेगास हे शहर देखील वरील शहरांच्या रांगेत जाउन बसेल असे म्हट्ल्यास अतिशयोक्ती होणार नाही. येथे legal prostitution (म्हणजे लायसेन्स्ड ) मान्यता प्राप्त आहे.
जपान मधील गेशांचा (geisha) व्यवसाय पण असाच परंपरागत. पण त्यांचे काम नाचगाण्यापुरते मर्यादित. हल्लीच्या गेशा तर इन्ग्लीश ग्राहकांसाठी म्हणुन इन्ग्लिश भाषा आत्मसात करू लागल्या आहेत.
अवांतरः २-३ वर्षापूर्वी Memoirs of a Geisha हा एक सिनेमा आला होता. त्यात सायुरी नावाच्या गेशा चा जीवनपट उलगडून दाखवला होता. संगीत, कला दिग्दर्शन , कॉस्ट्युम डिझाईन वगैरे साठी या सिनेमाला २००६ चे ऍकॅड्मी ऍवॉर्ड (ऑस्कर) मिळाले होते.
पुण्यातील बुधवार पेठेलाही पेशेवेकालीन इतिहास आहे.
23 May 2008 - 11:49 am | शैलेन्द्र
याचे अनेक पैलू आहेत, आणि खरतर यात फक्त बळजबरी नसेल तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न होतो. वेश्या व्यवसाय कितिहि वाइट असला तरि एक वास्तव आहे. आणि तुम्हि ते स्विकारता कि नाहि याचिहि कुनाला पड्लेली नाहि.
जर आपन आपल्या स्वत्।च्या शरिरचा वापर, तेच शरिर पोसन्यासाठी करत असु तर त्यात वाइट काय, असा काहिसा युक्तिवाद ऐकीवात आला होता.
मुळात स्त्री पुरुष सम्बन्धात केवल शरिर हेच ज्यान्च साध्य असत, अशा लोकांमुळेच हा प्रश्न आहे, जर हि विचार सरनी बदलली तर हेहि बदलेल..